अभ्यासवृत्ती

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

दीर्घ लेख व विशेषांक हे साधना साप्ताहिकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी काही अभ्यासकांना 10 हजार ते 50 हजार रुपये या दरम्यानची रक्कम देऊन लेखन मिळवले जाते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक यांपैकी कोणत्याही एक वा अधिक क्षेत्रात अधिक सखोल अभ्यास करून दीर्घ लेखन करण्याची इच्छा असणा-यांनी आपले प्रस्ताव साधना संपादकांच्या नावे पाठवावेत. समाजातील अनेक मान्यवरांना काही विषय विशेष जिव्हाळ्याचे वाटत असतात. आणि त्याविषयावर अभ्यासपूर्ण लेखन प्रसिद्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी काही रक्कम देणगी म्हणून देण्यासही ते तयार असतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या आवडीच्या विषयांना अभ्यासवृत्तीची रक्कम देण्यासाठी साधना कार्यालयाशी संपर्क साधावा.