देणगी

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

'साधना ट्रस्ट'च्या वतीने साधना साप्ताहिक, प्रकाशन व मीडिया सेंटर अशा तीन माध्यमांतून समाजशिक्षणाचे काम चालवले जाते.

हे काम करताना 'ना नफा ना तोटा' या तत्वानुसार आर्थिक व्यवहार केले जातात. म्हणजे काही फायदा झाला, तर तो पुन्हा सामाजिक कार्यात गुंतवला जातो आणि तोटा झाला, तर तो जाहिराती व देणग्या या मिळवून भरून काढला जातो.

त्यामुळे साधना वाचकांना असे आवाहन आहे की, आपण साधनाच्या कोणत्याही उपक्रमासाठी देणगी स्वरुपात मदत करावी. त्या संदर्भातील तपशील वेळोवेळी 'साधना' वेबसाईटवरून व साधना अंकातून दिले जातील. पण आपण अधिक माहितीसाठी साधनाच्या संपादकांशी संपर्क साधू शकता.