साधना प्रकाशन

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

माझे विद्यार्थी

 • गजा  हा शरीरविक्री करणाऱ्या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई -वडिलांनीच शिक्षणापासून पारखे  केले. प्राप्त परिस्थीतीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट  केली . शबनासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला .सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले.

   

  लेखक - रघुराज मेटकरी

  पृष्ठे – १५२

  किंमत – १२५ रुपये

बिकट वाट

 • या सामाजिक गोष्टी असल्या तरी या कहाण्यांची खरी ताकद आहे ती म्हणजे त्या घडवीत असणारे स्त्री-रूप दर्शन. स्त्री चे खरे रूप काय आहे ह्याचे सुस्पष्ट दर्शन आपल्याला या गोष्टीतून होते. ते आदिम आहे. सद्यकालीन आहे आणि भविष्यातलेही आहे. मुख्य म्हणजे ते वाचकाला स्तिमित करून टाकणारे आहे.

  लेखक - नीता बडवे

  पृष्ठे – ११२

  किंमत – १०० रुपये

आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्त

 • या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, सधन शेती-बाजारपेठ असणार व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्वि शिक्षकी शाळा, तीनशे-साडेतीनशे पट असणारी शाळा - अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे.

  लेखक - नामदेव माळी

  पृष्ठे १२८

  किंमत १२५ रुपये

उंबरठ्यावर

 • ‘उंबरठ्यावर’ हे डॉ. सदानंद मोरे यांनी साधना साप्ताहिकात लिहिलेल्या लेखमालेचे पुस्तकरूप आहे. भारतासारख्या प्रदीर्घ इतिहासाचा वारसा लाभणा-या देशासाठी असे उंबरठ्यावरून पाहणे उपयुक्त ठरेल.

लाटा लहरी

 • लाटा लहरी

  सहा तरुण मित्रांचे वादसंवाद

  विनोद शिरसाठ यांनी साधना साप्ताहिकातून लिहिलेल्या ‘लाटा लहरी’ या सदरातील लेखांची ही पुस्तिका आहे. सहा तरुण मित्रांनी राजकारण, समाजकारण अशा जीवनावर परिणाम करणा-या घटनांवर केलेल्या चर्चेतील सततच्या घुसळणीतून बाहेर पडलेले रसायन या पुस्तिकेत संवादरुपाने उतरलेले आहे.

   

  लेखक - विनोद शिरसाठ

  पृष्ठे – ६८

  किंमत – ५० रुपये

थैमान चंगळवादाचे

 • व्यवस्थापन, उद्योग, गणित, संगीत, मानसशास्त्र आणि साहित्य इत्यादी प्रांतात बेस्ट सेलर मराठी पुस्तके लिहिणा-या लेखकाची छोटीशी पण डोळे उघडणारी पुस्तिका...

  लेखक – अच्युत गोडबोले

  पृष्ठे – 47

  किंमत – 40

गुडमॉर्निंग

 • आनंद लाटकर हे प्रख्यात मुद्रक म्हणून मराठी साहित्यविश्वाला विशेष परिचित असले, तरी त्यांच्या खुमासदार व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दाखविणारा चटकदार लेखांचा हा संग्रह...

  लेखक – आनंद लाटकर

  पृष्ठे – 128

  किंमत – 100

सणांचे कुळ उत्सवांचे मूळ

 • सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादि साहित्य व पुराणांमध्ये सापडतं.

  लेखिका – सुमन ओक

  पृष्ठे – 120

  किंमत – 100

बुलंद आवाज बाईचा

 • प्रमिला दंडवते म्हणजे भारतीय समाजवादी चळवळीच्या वेलीवर बहरलेले टवटवीत फूल होय.

  लेखक – पन्नालाल सुराणा

  पृष्ठे – 119

  किंमत – 60

कारंत चिंतन

 • कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांचे अन्य साहित्य सर्वत्र उपलब्ध आहे. पण त्यांचे वैचारिक लेखन असलेला हा दुर्मीळ संग्रह. त्यांना समजून घेण्यासाठी अधिक उपयुक्त...

  मूळ कन्नड लेखक – डॉ. के. शिवराम कारंत

  मराठी अनुवाद – उमा कुलकर्णी

  पृष्ठे – 159, किंमत – 150

भारत आणि भारताचे शेजारी

 • अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव या शेजारी राष्ट्रांची राज्यव्यवस्था आणि तेथील समाजाचा मागोवा घेणारे लेख...

  संपादक – मनीषा टिकेकर

  पृष्ठे – 271

  किंमत – 250

शोधयात्रा : ईशान्य भारताची

 • भारताच्या इशान्येकडील सात राज्यांमध्ये (सेव्हन सिस्टर्स) तब्बल दोन महिने तळागाळातील समूहांमध्ये भ्रमंती करून, संवाद साधून केलेले अभ्यासपूर्ण लेखन...

  लेखक – राजा शिरगुप्पे

  पृष्ठे – 219

  किंमत – 200

मला प्रभावित करून गेलेला सिनेमा

 • विविध क्षेत्रांतील २७ मान्यवरांनी त्यांच्यावर (भाषा, विचारप्रक्रिया, आकलन, जीवनविषयक जाणीवा) विशेष प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमांविषयी लिहिलेले लेख...

  संपादन – विनोद शिरसाठ

  पृष्ठे – 199

  किंमत – 200

बखर : भारतीय प्रशासनाची

 • भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या, यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे.

  लेखक – लक्ष्मीकांत देशमुख

  पृष्ठे – 304

  किंमत – 250

नोकरशाईचे रंग

 • नोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत ; समाजातूनच तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात.

  लेखक – ज्ञानेश्वर मुळे

  पृष्ठे – 256

  किंमत – 250

कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट

 • रोहिणी गवाणकर यांनी आझाद हिंद फौजेच्या वाटचालीचा मागोवा घेऊन कॅप्टन लक्ष्मी यांच्याशी संवाद साधून लिहिलेले मराठीतील पहिलेच समग्र चरित्र...

  लेखक – डॉ. रोहिणी गवाणकर

  पृष्ठे – 308

  किंमत – 250

शोधयात्रा

 • महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची स्थिती नेमकी आहे तरी कशी...

  ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची

  लेखक – राजा शिरगुप्पे

  पृष्ठे – 136

  किंमत – 100

कैफियत

 • सर्जनशील लेखक अतिशय जाणीवपूर्वक आपल्या खेडेगावात राहतो आणि सभोवतालची सृष्टी (प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसं) निरखून पाहतो, तेव्हा आकाराला येते कैफियत...

  लेखक – राजन गवस

  पृष्ठे – 152

  किंमत – 150

रुग्णानुबंध

 • आज सर्वसामान्य माणसाचा वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संशयग्रस्त बनला आहे.

  लेखक – डॉ. दिलीप शिंदे

  पृष्ठे – 180

  किंमत – 150

युगांतर

 • कूळ, जात, वर्ण, धर्म, जन्मस्थान वा देश याविषयी व्यक्तीला वाटणारे प्रेम वा निष्ठा जन्मदत्त स्वरूपाच्या असतात, त्या जन्माने मिळतात.

  लेखक – सुरेश द्वादशीवार

  पृष्ठे – 128

  किंमत – 125

सम्यक सकारात्मक

 • २००५ ते २०१३ या काळात साधना साप्ताहिकातून अतिथी संपादक, युवा संपादक व कार्यकारी संपादक या नात्याने लिहिलेल्या २०० संपादकीय लेखांतील निवडक ४७...

  साधना साप्ताहिकातील निवडक संपादकीय लेख

  लेखक – विनोद शिरसाठ

  किंमत – 250, पृष्ठे – 303

समता – संगर

 • समतेचा विचार हा साधनेच्या दृष्टीने आम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटतो.

  साधना साप्ताहिकातील निवडक संपादकीय लेख

  लेखक - डॉ. नरेंद्र दाभोलकर

  किंमत – 250

  पृष्ठे – 288

शाळाभेट

 • 'जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं, पण ते तितकंसं खरं नाही! तुमच्या – माझ्या आसपास कितीतरी चांगल्या शाळा व चांगले शिक्षक आहेत.

  लेखक – नामदेव माळीे

  किंमत – 100 रुपये

न पेटलेले दिवे

 • 'राजा शिरगुप्पेंचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं; कधी थंड पाणी ओततं.

  लेखक – राजा शिरगुप्पे

  किंमत – 100 रुपये

माझी काटेमुंढरीची शाळा

 • गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात ५० वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणा-या एका शिक्षकाचे आत्मवृत्त आजच्या परिस्थितीलाही तेवढेच लागू पडते...

  लेखक – गो. ना. मुनघाटे

  किंमत – 100 रुपये

कवाडे उघडताच

 • विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रतिभा भराडे यांनी प्राथमिक शाळांमध्ये जे काही प्रयोग घडवून आणले, यशस्वी केले, त्यांच्या चित्तरकथा...

  लेखिका – प्रतिभा भराडे

  पृष्ठे –

  किंमत – 100 रुपये

संध्यासमयीच्या गुजगोष्टी

 • साहित्य समीक्षक म्हणून चार दशके मराठी साहित्यात मानाचे स्थान टिकवलेल्या रा. ग. जाधव यांनी आपल्या आयुष्यातील, अनुभवांतील सांगितलेल्या गोष्टी...

  लेखक – प्रा. रा. ग. जाधव

  पृष्ठे – 172

  किंमत – 125 रुपये

आई

 • 18 व्यक्तींनी स्वत:च्या आईविषयी लिहिलेले लेख...

  संपादक – प्रवीण बर्दापूरकर

  पृष्ठे – 200

  किंमत – 200 रुपये

बहादूर थापा आणि इतर कविता

 • 'आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, कन्नड, बंगाली साहित्यात मोठा फरक जाणवतो.

  कवी – संतोष पद्माकर पवार

  पृष्ठे – 150

  किंमत – 125 रुपये

लढे अंधश्रद्धेचे

 • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केल्यानंतर पहिल्या दशकभरात (महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील) केलेल्या संघर्षाच्या कथा...

  लेखक – नरेंद्र दाभोलकर

  पृष्ठे – 360

  किंमत – 300 रुपये

मन्वंतर

 • राजकारण, साहित्य व तत्त्वज्ञान या तीनही प्रांतात मुशाफिरी करणा-या सुरेश द्वादशीवार यांच्या लेखणीतून उतरलेले ललितरम्य शैलीतील वैचारिक निबंध...

  समूहाकडून स्वत:कडे

  पृष्ठे – 168

  किंमत – 150 रुपये

सा. रे. पाटील बोलतोय

 • आप्पासाहेब सर्वसामान्य शेतकरी - कामगार- मजूर यांच्यासोबत राहत होते, काम करीत होते.

  लेखक – किशोर रक्ताटे

  पृष्ठे – 116

  किंमत – 125 रुपये

बापू

 • महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्याचा काही एक परिणाम रा. ग. जाधव यांच्या बालमनावर झाला आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या लेखणीतून उगविलेले चिंतनकाव्य...

  एकभाषित चिंतनकाव्य

  पृष्ठे – 108

  किंमत – 100 रुपये

हे मित्रवर्या!

 • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे घनिष्ठ मित्र प्रा. रा. ग. जाधव यांनी दोन महिन्यांच्या काळात लिहिलेल्या ६७ स्मृतिरचनांचा (कविता) हा संग्रह...

  लेखक – प्रा. रा. ग. जाधव

  पृष्ठे – 80

  किंमत – 100 रुपये

नक्षलवादाचे आव्हान

 • गेली 25 वर्षे नक्षलवादग्रस्त भागात पत्रकारिता करणा-या देवेंद्र गावंडे यांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती, तीन नवीन लेखांची भर टाकून प्रकाशित झाली.

  लेखक – देवेंद्र गावंडे

  पृष्ठे – 268

  किंमत – 250 रुपये

थेट सभागृहातून

 • राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रांतील देश – विदेशातील मान्यवरांची भाषणे जशीच्या तशी लिहिलेली, शब्दांकन किंवा अनुवाद केलेली...

  संपादन – विनोद शिरसाठ

  पृष्ठे – 270

  किंमत – 250 रुपये

सेंटर पेज

 • 'सेंटर पेज' हे मध्यम मार्गाच्या जवळचे 'उग्र पेज' राहिले आहे.

  सोशिओ – पोलिटिकल कॉमेंट्री

  लेखक – सुरेश द्वादशीवार

  पृष्ठे – 204

  किंमत – 200 रुपये

राजकारणाचा ताळेबंद

 • प्रस्तुत लेखसंग्रहामध्ये स्वतंत्र भारतातील राजकारणाचा आढावा घेतला आहे.

  भारतीय लोकशाहीची वाटचाल

  लेखक – सुहास पळशीकर

  पृष्ठे – 232

  किंमत – 250 रुपये

वैचारिक व्यासपीठे

 • युरोप – अमेरिकेतील सात, भारतातील सात व पाकिस्तानातील एक अशा एकूण 15 इंग्रजी नियतकालिकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख करून देणारे हे पुस्तक.

  लेखक – गोविंद तळवळकर

  पृष्ठे – 208

  किंमत – 200 रुपये

झपाटलेपण ते जाणतेपण

 • व्यक्तिगत जडणघडण, जीवनाविषयक दृष्टिकोन, स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप व सामाजिक जीवनावर भाष्य करताना या सर्वांनी आपला 'झपाटलेपण ते जाणतेपण' हा प्रवास उलगडून दाखवला आहे.

  पृष्ठे – 248

  किंमत – 250 रुपये

तारांगण

 • ही केवळ व्यक्तिचित्रे नाहीत. अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आणि अगोदर हाती आलेल्या काही उत्तरांविषयी संशय उत्पन्न करणारी चित्रणे आहेत.

  लेखक – सुरेश द्वादशीवार

  पृष्ठे – 220

  किंमत – 200 रुपये