Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

तपशीलाकडे डोळेझाक करण्याचा पवित्रा!

‘बजेट' अथवा त्याचे मराठी रूप असणारा‘अंदाजपत्रक’ हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेमध्येआढळत नाहीत. दरवर्षीच्या एक एप्रिल रोजी सुरूहोणाऱ्या नवीन वित्तीय वर्षासाठीचे ‘वार्षिक वित्तीयविवरणपत्र’ (ॲन्युअल फिनान्शिअल स्टेटमेन्ट)सत्तारूढ सरकारने संसदेच्या सभागृहामध्ये सादर केलेचपाहिजे, अशी तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे.म्हणजेच, विविध मार्गांनी सरकारच्या तिजोरीमध्येजमा होणाऱ्या महसुलाचा आणि संकलित झालेला तोमहसूल सरकार कशाप्रकारे व कोणत्या उपक्रमांवर खर्चकरू इच्छिते याचा तपशील त्या वार्षिक वित्तीयविवरणपत्राद्वारे सरकारने देशवासीयांना सादर करावा,अशी राज्यघटनेच्या शिल्पकारांची इच्छा होती व आहे.

हे सगळे पुराण पुन्हा एकवार नव्याने सांगण्याचीगरज आता निर्माण झालेली आहे आणि त्याचे कारणम्हणजे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019-20या वित्तीय वर्षासाठी 5 जुलै 2019 रोजी संसदेमध्येमांडलेला अर्थसंकल्प. तब्बल दोन तास पाच मिनिटेभाषण ठोकून माननीय अर्थमंत्र्यांनी सभागृहात त्यादिवशी जे काही सादर केले, त्यात ‘वार्षिक वित्तीयविवरणपत्र’ या शब्दसंहितेच्या गाभ्याचा मागमूसहीकोठे लागला नाही. कर तसेच करेतर स्रोतांद्वारे2019-20 या वित्तीय वर्षादरम्यान सरकारच्यातिजोरीत अपेक्षित असलेला महसुल, सरकारचा एकंदरप्रस्तावित खर्च, त्यांत भांडवली खर्चाचा वाटा किती,महसुली खर्चाची जडणघडण नेमकी कशी आहे,सरकारची अपेक्षित वित्तीय तूट किती असेल, महसुलीतुटीचे आकारमान कितपत राहील... यापैकी कशाचाम्हणून तपशिल अर्थमंत्र्यांनी त्यांच्या सादरीकरणामध्येसभागृहापुढे मांडलाच नाही. त्यामुळे ‘वित्तीयतपशीलाचा संपूर्ण अभाव असलेले वार्षिक वित्तीयविवरणपत्र’, असेच या अंदाजपत्रकाचे वर्णन करणेक्रमप्राप्त ठरते.

या सगळ्याचा अर्थ काय व कसालावायचा? संपूर्ण भाषण संपल्यानंतर, जणू काहीपश्चातबुद्धी झाल्याप्रमाणे, ‘वित्तीय तुटीबाबत ज्यांनाजिज्ञासा वा उत्सुकता आहे त्यांना सांगते की, 2019-20या वित्तीय वर्षात सरकारच्या अपेक्षित वित्तीय तुटीचेदेशाच्या ठोकळ उत्पादिताशी असलेले अंदाजित प्रमाण3.3 टक्के इतके असेल,’ अशा आशयाचे एक वाक्य तेवढेत्यांनी उच्चारले. वार्षिक वित्तीय विवरणपत्रातील, तोंडीलावण्यापुरता म्हणायचाच झाला तर वित्तीय तपशील हाएवढाच!

तब्बल 16 वर्षांपूर्वी, म्हणजे 2003 साली,आपल्या संसदेने राजकोषीय उत्तरदायित्व आणिअंदाजपत्रकीय व्यवस्थापन विधेयक मंजूर केलेले आहे.त्यानुसार, अर्थसंकल्पाच्या जोडीनेच सरकारने मध्यममुदतीच्या राजकोषीय धोरणाचा मसुदाही संसदेच्यापुढ्यात सादर करणे अपेक्षित व बंधनकारक आहे. देशाचेमध्यम मुदतीसाठीचे राजकोषीय धोरण कसे असेल,वित्तीय तुटीचे तसेच महसुली तुटीचे व्यवस्थापनकरण्याबाबत सरकारचे भविष्यकालीन मनसुबे कायआहेत, करांची एकंदर थकबाकी किती आहे, ती वसूलकरण्याबाबत सरकार काय पावले उचलू इच्छिते. अशाबाबींसंदर्भात त्या दस्तऐवजात सरकारची कार्यक्रमपत्रिकामांडली जाणे त्या कायद्याद्वारे अनिवार्य ठरते. परंतु यंदा,माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा मध्यममुदतीच्या राजकोषीय धोरणाचा मसुदा संसदेला सादरकेला अथवा नाही, याचाही पत्ता लागला नाही.वित्तविषयक संकेत, नियम व कार्यपद्धती यांबाबतची हीसरासर अनास्था समजायची की सरकारची बेदरकारी?

अशा सगळ्या संवेदनशील वित्तीय बाबींना सरसहासोडचिठ्ठी देत, भारतीय अर्थव्यवस्थेला येत्यादशकभरादरम्यान पाच लाख कोटींच्या टप्प्यावर नेऊनठेवायचे, एवढे एकच एक भरजरी चित्र अर्थमंत्री अगत्यानेरंगवत राहिल्या. या सगळ्यांतून एकच अर्थ निघतो. तोअसा की, ‘आम्ही दाखवू तेवढे व तेच विशाल अर्थचित्रतुम्ही बघायचे, त्या चित्राच्या तपशीलामध्ये जाण्याच्याभानगडीत उगीचच पडू नका.’ अर्थमंत्र्यांचा आणि पर्यायानेसत्तारूढ सरकारचा देशाला हाच रोकडा संदेश आहे?हे असे असेल तर मग, 2019-20 या एकाच वित्तीयवर्षासाठी दोन-दोन अर्थसंकल्प मांडण्याचा खटाटोप यासरकारने का केला, असा प्रश्न विचारणे भागच आहे.तिथेही पुन्हा राज्यघटनेची, संसदीय संकेतांची व परंपरांचीसपशेल पायमल्लीच दिसते. वस्तुत: नजीकच्या भविष्यातनिवडणुकांना सामोरे जाणाऱ्या सरकारने नवीन वित्तीयवर्षासाठी पूर्ण अंदाजपत्रक मांडू नये, असा संकेत आहे.नवीन वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून ते निवडणुकाआटोपल्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल, त्या सरकारचाअर्थसंकल्प मंजूर होईपर्यंतच्या काळात जे सरकारी खर्चअनिवार्य आहेत, त्या खर्चांना संसदेची मंजुरी घेण्यासाठीलेखानुदान सादर केले जावे, अशी पद्धत व संकेत आहे.त्या संकेताला अलीकडील काळात सरसकट फाटा दिलाजाताना आपण पाहतो आहोत.

पंतप्रधान माननीय नरेंद्रमोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले ते नेमके हेच.चालू कॅलेंडर वर्षातील फेब्रुवारी महिन्यात त्या सरकारनेअंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मतदारांवर प्रभाव टाकूशकतील असे काही उपक्रम त्यांत अंतर्भूत होते. मुळात,‘अंतरिम अर्थसंकल्प’ या संकल्पनेलाच कोणतेही तात्विकअथवा वैधानिक अधिष्ठान नाही. लेखानुदानाला मंजुरी घेतअसताना, कोणत्याही नवीन उपक्रमाची अथवा योजनेचीघोषणा करणे त्यांत अपेक्षितच नाही. या सगळ्याव्यावहारिक संकेतांना आताशा तिलांजली दिली जातेआहे. एकदा का केंद्र सरकारनेच संसदीय परंपरा धाब्यावरबसवल्या की राज्य सरकारे तरी मागे का राहतील? सर्वचबाबतींत देशामध्ये अग्रेसर असल्याची शेखी मिरवणाऱ्यामहाराष्ट्राने मग या बाबतीत केंद्र सरकारवरही कडी केली.फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पसादर केला आणि आता जुलै महिन्यात अतिरिक्तअर्थसंकल्पही मांडून टाकला! आहे की नाही गंमत! सगळाशब्दांचा खेळ. आधी ‘अंतरिम’ आणि नंतर ‘अतिरिक्त’.एकाच वित्तीय वर्षासाठी किती वेळा अंदाजपत्रके सादरकरावयाची याला काही मर्यादा आहे की नाही?

हा सगळाथिल्लरपणा रेटून नेण्याइतपत राजकीय व्यवस्थेची हिंमतवाढलेली असावी, हे निरोगी लोकशाही राज्यव्यवस्थेचेलक्षण मानायचे का?मुदलात, फेब्रुवारी आणि जुलै अशा अवघ्या चारमहिन्यांच्या अवधीत मांडल्या गेलेल्या दोनअर्थसंकल्पांमध्ये असून असून फरक असा किती असेल,हा प्रश्न खाली उरतोच. त्याचे विश्लेषण कोणी तरीकरायलाच हवे. इथेही केंद्र सरकारने चलाखी केलेलीआहेच. जी काही आकडेवारी माननीय अर्थमंत्र्यांनीअर्थसंकल्पाच्या परिशिष्टांमध्ये सादर केलेली आहेतिच्यात, 2019-20 या वर्षासाठीच्या अंदाजपत्रकीयतरतुदींची बहुतांश तुलना केलेली आहे, ती 2018-19या वित्तीय वर्षासाठीच्या सुधारित अंदाजांशी.पारदर्शकपणा राखण्याची सरकारची खरोखरच इच्छाअसती तर, 2018-19 या वित्तीय वर्षासाठीचे सुधारितअंदाज 2019-20 या वर्षासाठी फेब्रुवारी महिन्यातमांडलेल्या अंतरिम अंदाजपत्रकातील तरतूद आणि त्याचवित्तीय वर्षासाठी आता जुलै महिन्यात सादर केलेल्याअर्थसंकल्पातील तरतुदीचा तपशील सादर केला जायलाहवा होता. मात्र, सरकारने ते केले नाही.

कारण, केवळचारच महिन्यांच्या कालावधीदरम्यान आकडेवारीतफारसा फरक पडणार नाही, हे सरकारलाही पुरते ठावूकहोते. अंतरिम अंदाजपत्रक मांडण्यातील निरर्थकता अशातौलनिक तक्त्यांद्वारे उघडी पडणे सरकारला परवडणारेनाही व नव्हते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकाळात तत्कालीन अर्थमंत्री जनार्दन पुजारी यांनी गावगन्नाकर्जमेळावे भरवून पक्षीय राजकारणाच्या हितसंवर्धनासाठीबँकांना वेठीस धरले होते. आता काळ सुधारला आहे.बँकांच्या जोडीनेच अर्थसंकल्पांनाही पक्षीय स्वार्थासाठीराबवून घेण्याचा जमाना आपण अनुभवतो आहोत. हासगळा दांभिकपणा उघडा पडू नये, म्हणून कोणताहीतपशील आकडेवारीनिशी न मांडता पाच लाख कोटींच्याअर्थव्यवस्थेचे साजरेगोजरे चित्र रंगवत सीतारामन यांनीअर्थसंकल्पीय भाषणातील शब्दजंजाळात निकडीच्याअनेकानेक अर्थपैलूंना पुरते गुंडाळून ठेवले. त्यांतीलकाहीच मुद्यांचा परामर्श वानगीदाखल इथे घेता येईल.

आपल्या देशातील शेती आणि शेतकरी अलीकडीलकाही वर्षांत संक्रमणाच्या चरकातून पिळून निघत आहेत.पर्यावरणीय बदलांपायी वाढलेला मॉन्सूनचा लहरीपणा,शेतीमधील सरकारी गुंतवणुकीचा घसरणारा टक्का,वाढलेला उत्पादन खर्च, गोठून राहिलेली सरासरीउत्पादकता... अशांसारख्या अनेकानेक ‘स्ट्रक्चरल’गुंत्यांपायी शेती आणि शेतकरी गांजलेले आहेत. शेती हामुख्यत: राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय आहे, हेमान्य केले तरीही, निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्याअर्थसंकल्पात शेतीसंदर्भात कमालीची जुजबी आणिपराकोटीची ढोबळ व तितकीच त्रोटक टिप्पण्णी काय तीबघावयास मिळते, हे वास्तव हतबुद्ध करणारे आहे.देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांचाएक भाग म्हणून आमचे सरकार शून्य खर्चाधारितशेतीप्रणालीला (झीरो बजेट फार्मिंग) प्रोत्साहन देणारआहे, असे बयान माननीय अर्थमंत्र्यांनी केले.

‘झीरो बजेटफार्मिंग’ ही, अगदी थोडक्यात सांगायचे तर, नैसर्गिकशेतीच्या संकल्पनेजवळ जाणारी शेतीप्रणाली होय.शेतीमधून अधिक उत्पादन काढण्यासाठी जी रासायनिकखते, औषधे, कीटकनाशके वापरली जातात, तसेच दरएकक क्षेत्रामागे अधिक उत्पादन देणारी जी आधुनिक बी-बियाणे बाजारातून विकत घेतली जातात त्यांपायीशेतकऱ्यांच्या खिशावर बोजा वाढतो. दर एकक उत्पादनखर्चात या सगळ्यांमुळे भर पडते. दुसरीकडे, शेतमालालाबाजारात मिळणाऱ्या भावांवर शेतकऱ्याचे काहीच नियंत्रणनसल्याने शेती आतबट्ट्याची ठरत जाते आणि या चक्रातूनफिरत राहणारा शेतकरी अखेरीस कर्जबाजारी बनतो. हीकार्यकारणभावाची साखळी तोडण्यासाठी ‘झीरो बजेटफार्मिंग’च्या प्रणालीचा प्रचार अलीकडील काळातकर्नाटक तसेच आंध्राच्या काही भागांत जोमाने केला जातोआहे.

रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरापायीजमिनीचा पोतही पार खालावतो. तेव्हा, शेतीमध्येरासायनिक द्रव्यांचा तसेच बाजारातून खरेदी केलेल्याअधिक उत्पादक वाणांचा वापर न करता, देशी गाईचे शेणव गोमूत्र यांच्या वापरावर भर देणारी लागवडीची पर्यायीपद्धत ‘झीरो बजेट फार्मिंग’मध्ये प्रतिपादन केली जाते.शेतमालाला अदा करावयाच्या किमान आधारभूतकिमतींमध्ये वाढ घडवून आणण्यावर व्यावहारिक मर्यादाअसल्यामुळे आता, शेतीच्या दर एकक उत्पादन खर्चामध्येबचत घडवून आणत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचाप्रयत्न सरकार ‘झीरो बजेट फार्मिंग’चे तत्त्वज्ञान राबवूनकरू पाहते आहे.

शेतीचे एक पर्यायी प्रारूप म्हणून हे सगळेठीक आहे. देशातील सर्व शेतकरी त्या प्रारूपाचा अंगिकारकरतील किंवा नाही, हादेखील पुढचा प्रश्न. मुळात, यासगळ्याच ‘ॲप्रोच’मध्ये दोन कच्चे दुवे आहेत. एकम्हणजे, अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीमधून 130कोटी लोकसंख्येची अन्नधान्यविषयक गरज पूर्णहोण्याइतपत उत्पादन सातत्याने होत राहील का, हे प्रारूप‘रेप्लिकेबल’ आहे का... हे प्रश्न तपासून बघावयास हवेत.दुसरे म्हणजे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढवायचे हे जेध्येय या सरकारने नजरेसमोर ठेवलेले आहे, त्याचाहीनिव्वळ आंधळा पाठपुरावा काय कामाचा? समजा,एखाद्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याला त्याच्यातुटपुंज्या शेतीमधून वर्षाला 10 ते 12 हजार रुपये मिळणारअसतील तर त्याचे उत्पन्न दुपटीने वाढून ते 25 हजारांवरगेले तर आपण समाधान मानणार आहोत का, या प्रश्नाचेउत्तर कोणीच देत नाही. शेतकऱ्याला स्वाभिमानाने चांगलेजीवन कसे जगता येईल, तो कसत असलेल्या शेतीमध्येगुंतवणूक करण्याइतपत पैसा त्याच्या हातात कसा राहील,हे बघणे सगळ्यांत जास्त महत्त्वाचे.

त्यासाठी,शेतीधारणविषयक नियम, कायदेकानून यांत कालोचितबदल, सिंचनाचा विस्तार, एकंदरीने सरासरी उत्पादकताउंचावण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न यांसारख्या अनेकआघाड्यांवर सातत्याने मेहनत घ्यायला हवी. केवळ‘झीरो बजेट फार्मिंग’च्या एका प्रयोगाने जादूची कांडीफिरेल, असे मानण्याने आपली फसवणूक आपणच करूनघेत राहू.हे झाले केवळ एक उदाहरण. अशा अनेक गंमती याअर्थसंकल्पात आहेत. परंतु, तपशीलाकडे पुरेपूर डोळेझाककरण्याचा पवित्रा स्वीकारायचा असे कंकणच जरअर्थमंत्र्यांनी बांधले असेल तर बोलणेच खुंटते.

अभय टिळक, पुणे

agtilak@gmail.com

चिकित्सा

देशाला काय हवे? ऐक्य की एकरूपता?

सुरेश द्वादशीवार

धर्म व वंश यांच्या श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना माणसांच्या हत्येला सिद्ध करतात, हा मध्ययुगाचा सांगावा आहे. ‘सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना गुलाम करतात’ हे गोऱ्यांनी काळ्यांबाबत, हिंदूंमधील सवर्णांनी अवर्णांबाबत आणि मुसलमानांमधील अरबांनी जगातल्या अन्य मुसलमानांबाबत दाखविले. ‘निळ्या डोळ्यांचे व सरळ नाकाचे आर्य हेच जगातले सर्वश्रेष्ठ लोक असून त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे’ असे हिटलर म्हणाला. रोमनम्हणाले, ‘आमची भूमी जगातली सर्वांत श्रेष्ठ.’ भारतीय म्हणतात, ‘आमची भूमी ही विश्वगुरूंची भूमी आहे.’ या अहंतांनीही आजवर किती माणसे मारली? या अहंता राजकारणात येतात, त्याला धर्मकारण जोडतात आणि त्यालाच इतरांच्या द्वेषाचीही कडा आणतात. तसे झाले की, त्या हिंस्र होतात. भाषेचे अहंकारही असेच असतात.

‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश’ या घटकांचे मिळून राष्ट्र तयार होते. इटलीचा स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी याचे हे मत. सावरकरांनी मॅझिनीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रभाव मराठी ब्राह्मण तरुणांवर एके काळी फार मोठा होता. हाच वर्ग पुढे हिंदू महासभा व रा.स्व.संघाच्या माध्यमाने देशभर स्वयंसेवक वा शाखाप्रमुख म्हणून गेला. परिणामी, मॅझिनीची भाषा ही संघाची व त्याच्या परिवाराचीही भाषा झाली. त्या आधी ‘भारत हे हिंदू राष्ट्र आहे’ ही भाषा संघाचे संस्थापक डॉ.के.ब. हेडगेवार यांनीही वापरली होती. संघाच्या आरंभीच्या वा नंतरच्याही स्वयंसेवकांना तशा प्रतिज्ञा त्यांनी दिल्या व घ्यायला लावल्या होत्या. संघाच्या वेगानुसार व विस्तारानुसार ही भूमिका देशातील ब्राह्मण कुटुंबांत व तरुणांतही रुजत गेली. (दोन जाती अखिल भारतीय आहेत, ब्राह्मण व चर्मकार ही गोष्ट लक्षात घेतली की, हा विचार अल्पावधीत देशाच्या अनेक भागांत, एका जातीपुरता का होईना कसा रुजला असावा याची कल्पना येते.)

आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात गांधीजींनीही मॅझिनीविषयी लिहिले आहे. हे पुस्तक त्यांनी इंग्लंडमधून आफ्रिकेला जाताना बोटीवरच्या प्रवासात लिहिले. त्यात त्यांनी मॅझिनीच्या सेनापतीपदाचा व शस्त्रसामर्थ्याचा गौरवकरण्याऐवजी त्याच्या लोकशाही प्रेमाला अधिक महत्त्व दिले. ज्या इटलीच्या एकीकरणासाठी तो लढला, ते एकीकरण झाल्यानंतर अखेरच्या मानवंदनेच्या लष्करी कवायतीत तो खांद्यावर साधी बंदूक घेऊन सामान्य शिपायासारखा अखेरच्या रांगेत उभा होता. त्याचे तेव्हाचे दुःख होते, ‘एवढे सारे लढून आणि इतक्या साऱ्या सैनिकांचे रक्त सांडून आम्ही जनतेचे लोकशाही राज्य आणू शकलो नाही. इटलीची सत्ता पुन्हा राजेशाहीच्याच ताब्यात राहिली.’ मॅझिनीकडे पाहण्याचा गांधींचा दृष्टिकोन सावरकर व हेडगेवारांच्या दृष्टिकोनांहून वेगळा होता, हे यावरून स्पष्ट व्हावे.

स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिल्याने हेडगेवारांना संस्था-संघटना उभारायला वेळ मिळाला. गांधींना ‘हिंद स्वराज’ यापलीकडे जाता आले नाही. भारतात 1915 मध्ये आलेले गांधी 1920 मध्ये देशाचे नेते झाले. 1948 मध्ये त्यांचा खून झाला. मधल्या 28 वर्षांतील दहा वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली. स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांशी वाटाघाटी, काँग्रेसची उभारणी आणि समाजाला एकत्र ठेवण्यासाठी प्राणार्पणापर्यंत जाण्याची तयारी- या साऱ्या गोष्टींमुळे त्यांना स्वत:चा मॅझिनी व त्याचा विचार खऱ्या स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचविता आला नाही. उलट एकविचार, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झाल्याने मिळालेला वेळ व एक जात यामुळे हेडगेवार आणि त्यांचे अनुयायी यांचे काम सोपे व सरळ होते.

गांधीजींच्या पश्चात सत्तेवर आलेल्या नेहरूंसमोर राष्ट्रउभारणीचे काम अग्रक्रमाचे होते. शिवाय, ते समाजवादी होते आणि काँग्रेसमधील बुजुर्गांनाही समाजवाद मान्य नसताना ते त्या बाजूने उभे होते. स्वातंत्र्यलढा, विविध विचारसरणी,कार्यबाहुल्य व तुरुंगवास यात अडकलेली काँग्रेस आणि एका विचाराच्या प्रसाराखेरीज दुसरी जबाबदारी नसणारा संघपरिवार यांची ही वाटचाल लक्षात घेतली की, संघपरिवाराचे आजचे यश व काँग्रेसच्या राजकारणाची एवढ्या वर्षांत झालेली उताराची व काहीशी अधोगतीची वाटचाल यांचा परिणाम व त्यातील अंतर लक्षात घेता येते. आजच्या पडत्या काळातही काँग्रेसला स्वातंत्र्य-लढ्याचा अभिमान व त्यातील मूल्यांचा गौरव करता येतो, उलट संघाला तो लढा व ती मूल्ये पुसून काढायची असल्याने ते त्यांचा उच्चारही करीत नाहीत. जमलेच तर त्याविषयी टवाळखोरीच्या व छद्‌मी भाषेत बोलताना अधिक दिसतात. यातला दोष ऐतिहासिक वाटचालीचा व तिच्या संस्कारांचा आहे, तेवढाच तो मूळ विचारांमागील भूमिकांचा आहे.

हा काळ कम्युनिस्ट, समाजवादी, हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी या साऱ्यांचाच- गांधी व त्यांची चळवळ यावर टीका करण्याचा होता. त्यातल्या हिंदुत्ववाद्यांचा व आंबेडकरवाद्यांचा तर तो त्या चळवळीपासून दूर राहण्याचाही होता. कारणे अनेक होती. गांधी एकटे होते आणि विरोधक विविध मठांत संघटित होते. स्वातंत्र्य हे लक्ष्य आणि त्यासाठी सर्वस्व यावर गांधींचा व त्यांच्या अनुयायांचा भर; तर इतरांचा त्यांच्या विचारसरणीवर, जातींच्या उत्थानावर, संघटनांच्या उभारणीवर आणि गांधीजींची चळवळ लहान करून दाखविण्यावर होता. गांधीजींचा खून ही एकच घटना या साऱ्यांवर लख्ख उजेड पाडणारी किंवा काळोख फिरविणारी आहे.

गांधीजी भारतात येण्यापूर्वी वा त्यांचे नेतृत्व भारतात रुजण्यापूर्वी बॅ.जीना व लो. टिळक यांच्यातील लखनऊ करार झाला होता. त्या कराराने मान्य केलेले मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ हे देश व समाज यात फूट पाडणारे आहेत, हे गांधींचे तेव्हापासूनचे म्हणणे होते. परंतु तो करार झाला होता व 1919 च्या माँन्टेग्यू-चेम्सफर्ड कायद्यात तो आलाही होता. पुढे पुणे कराराच्या वेळीही ‘दलितांना विभक्त मतदारसंघ देण्याने देशातच नव्हे तर हिंदू समाजात फूट पडेल व ती तशी पाडण्याचा ब्रिटिशांचा डाव आहे,’ असे गांधीजी म्हणाले. त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध करून संयुक्त मतदारसंघाचा पर्याय दिला व तो सर्वमान्य झाला.

नंतरच्या काळात प्रत्यक्ष फाळणीच्या वेळी जिनांना सगळा बंगाल व सगळा पंजाब हवा होता. मात्र तसे केले तर बंगालमधील 39 टक्के हिंदूंवर तो अन्याय होईल आणि पंजाबातील तेवढ्याच शिखांवर व हिंदूंवर पाकिस्तान लादले जाईल, असे गांधींचे म्हणणे होते. त्यासाठी त्या दोन प्रांतांच्या विभाजनाची मागणी करून त्यातील हिंदू व शीख या वर्गांना गांधींनी जीनांच्या ताब्यातून मुक्त केले. गांधीजींची हिंदूविषयक भूमिका समजून घ्यायला या गोष्टींचा उल्लेखकरणे आवश्यक आहे. ही भूमिका गांधींना हिंदुत्ववादी बनविणारी नाही; हिंदूंवर अन्याय होऊ न देण्याची व त्यांच्यात फूट पडू न देण्याची आहे, एवढेच येथे लक्षात घ्यायचे. ही भूमिका हिंदू राष्ट्रवादाची वा हिंदू वर्चस्ववादाची नाही.

मॅझिनीची राष्ट्रकल्पना जगाने व इतिहासाने कधीचीच नाकारली आहे. धर्मवर्णादी गोष्टी समाजात ऐक्य राखू शकणाऱ्या असल्या तरी तो म्हणतो तसा एकही देश आज जगात नाही. बहुतेक सारे देश भारतासारखे बहुधर्मी, बहुवर्णी,बहुभाषी व संस्कृतिबहुल आहेत. इंडोनेशिया, फिलिपाइन्स व जपान हे तर शेकडो बेटांवर वसलेले देश आहेत. भारताचीही अंदमान-निकोबार किंवा लक्षद्वीप ही बेटे मुख्य भूमीपासून दूर आहेत. एकधर्मी असणाऱ्या देशातही पंथोपपंथांच्या, आर्थिक वर्चस्वाच्या आणि सांस्कृतिक वेगळेपणाच्या बाबी युद्धस्तरावर आहेत. धर्म व भाषा एक असूनही जगात अरब देशांची संख्या एवढी का? किंवा सोव्हिएत युनियन हे संघराज्यांचे संघराज्य 15 स्वतंत्र देशांत का तुटले? पाकिस्तानचे दोन तुकडे झाले ते का? आणि कॅनडामध्ये क्युबेकच्या वेगळेपणाची चळवळ का होते? चीनमध्ये झिजियांग प्रांत वेगळेपण का मागतो? अगदी श्रीलंकेसारख्या चिमुकल्या देशात तमिळींची सिंहलींशी लढत कशी होते?

भारताच्या 132 कोटी लोकसंख्येत 18 कोटी मुसलमान, 2 कोटी शीख, 2 कोटी ख्रिश्चन व लक्षावधींच्या संख्येने अन्य धर्मांचे लोक आहेत. (शिवाय आजच्या जगात 114 कोटी लोक स्वतःला सेक्युलर म्हणविणारे आहेत आणि त्यांची भारतातील संख्याही मोठी आहे.) या देशात 14 मान्यताप्राप्त भाषा आहेत. सांस्कृतिक व प्रादेशिक वेगळेपण आहे. दर दहा मैलांनी येथे भाषा बदलते, असे आपणच म्हणतो. यातील प्रत्येक गट आपली अस्मिता सांभाळणारा व परंपरा जपणारा आहे. त्या साऱ्यांना त्यांचे सारे विसरून हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणण्याची संघाची आकांक्षा आहे; तर धर्मासाठी मरू, धर्मासाठी मारू, भाषेच्या वेगळेपणासाठी लढा देऊ, संस्कृती-रक्षणार्थ उभे राहू- अशी त्यातल्या प्रदेशांची भाषा आहे.

या देशात एकाच वेदाचे पठण शतकानुशतके झाले. तीच उपनिषदे सर्वत्र आळवली गेली. हे खरे असले तरी हे वेदपठण करणाऱ्यांची व उपनिषदांचे वाचन करणाऱ्यांची, पोथ्या व पुराणे सांगणाऱ्यांची संख्या केवढी होती? त्यातही एकाचजातीची माणसे होती की नाही? हा वर्गही किती टक्क्यांचा होता आणि तो धर्माच्या नावावर हे करीत होता, की त्यामागच्या सत्तेच्या आधाराने करीत होता? या प्रश्नांची उत्तरे फार वेगळे सांगणारी आहेत. समाजाचा केवढा वर्ग ते सांगणारा होता, केवढा नुसतेच ऐकणारा होता, केवढा दुर्लक्ष करणारा होता आणि केवढ्यावर ते ऐकू न देण्याचे बंधन होते? शिवाय, धर्म एक असला तरी शैव व वैष्णवांची युद्धे त्यात किती काळ चालली आणि त्यात किती माणसे मारली गेली? हे सारे विसरायला लावण्याचा व समाजाला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांचा, तर त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपानिशी बहरू देण्याचा प्रयत्न उदारमतवादी सेक्युलरांचा आहे.

समाज व वर्ग इतिहास विसरतात काय? देश स्वातंत्र्यासाठी लढत असतानाही ते स्वातंत्र्य समाजातील वरिष्ठ वर्गांचे असेल, आमचे नसेल- असे म्हणणारे वर्ग देशात होते की नाही आणि आज त्यांच्या भूमिका अधिक धारदार झाल्या आहेत की नाहीत? राजकीय यश म्हणजे सामाजिक ऐक्य नव्हे, तसे ते एका वर्गाचे वर्चस्वही नव्हे. सामाजिक ऐक्याची साधना व समरसताही ती नव्हे. जगातली किती राष्ट्रे धर्माने एक केली व किती राष्ट्रे तोडली? ख्रिश्चन धर्माचे जगात अनेक देश का आहेत? शिवाय त्यात प्रोटेस्टंट व कॅथॉलिक यांच्यात संघर्ष का आहे? इंग्लंडसारखा अतिप्राचीन देश याच आधारावर तुटून त्यातून आयर्लंड वेगळे झाले. ज्यू धर्माचे लोक जगात सर्वत्र आहेत. पण युरोपात त्यांना जाळणारे ‘पोग्रोम्स’ किती शतके सुरू होते? धर्माने एकत्र केलेले समाज स्वतंत्र किती व कायद्याने धास्तावलेले किती?

‘स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येक चेटकीण ही वध्य असते’, असे चौथ्या शतकात सांगणाऱ्या पोपनंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात किती स्त्रिया जाळल्या गेल्या? एकट्या बिकानेर या राजस्थानातील शहरात ओसवाल या एकाच जातीची 36 सतीमंदिरे आहेत. त्यांची बंगालातली व राजस्थानातली संख्या किती? 18 व्या शतकापर्यंत स्त्रीला तिचा विचार लिहू न देण्याची सक्ती युरोपातील किती देशांत होती? मुसलमान हा धर्म एक, त्याचा संस्थापक व धर्मग्रंथ एक, पण शिया व सुन्नी हे त्याचे दोन पंथ परस्परात लढले किती आणि त्यात त्यांनी केलेला रक्तपात केवढा? अजूनही अहमदिया पंथाच्या लोकांना मारणे हा धर्माचा अपराध आहे, असे तो का समजत नाही?

जपानात बुद्ध व शिंटो या धर्मांत किती युद्धे झाली? चीनमध्ये लाओत्से आणि कन्फ्युशिअसच्या धर्ममतांशी बुद्धांनी किती लढाया केल्या? श्रीलंकेत सिंहली बुद्ध व तमिळ हिंदू यांच्यात कितीसे सख्य आहे? म्यानमारमध्ये रोहिंग्यांचे बळी कोण घेतो? ख्रिश्चन व मुसलमान या दोन धर्मांत सातव्या शतकात सुरू झालेले धर्मयुद्ध सातशे वर्षे चालून चौदाव्या शतकात संपले. भारतावरची इस्लामची पहिली चढाईही सातव्या शतकातली. येथे गादी कायम करायला त्यांनासातशे वर्षे लागली. या साऱ्या धर्मांनी मिळून मध्ययुगातील त्यांच्या लढायांत किती माणसे मारली? हिंदूंनी माणसे मारल्याच्या नोंदी फारशा नाहीत, पण त्यांनी आपल्याच समाजाचा केवढा मोठा भाग अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर राखला.

धर्म व वंश यांच्या श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना माणसांच्या हत्येला सिद्ध करतात, हा मध्ययुगाचा सांगावा आहे. ‘सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना गुलाम करतात’ हे गोऱ्यांनी काळ्यांबाबत, हिंदूंमधील सवर्णांनी अवर्णांबाबत आणि मुसलमानांमधील अरबांनी जगातल्या अन्य मुसलमानांबाबत दाखविले. ‘निळ्या डोळ्यांचे व सरळ नाकाचे आर्य हेच जगातले सर्वश्रेष्ठ लोक असून त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे’ असे हिटलर म्हणाला. रोमन म्हणाले, ‘आमची भूमी जगातली सर्वांत श्रेष्ठ.’ भारतीय म्हणतात, ‘आमची भूमी ही विश्वगुरूंची भूमी आहे.’ या अहंतांनीही आजवर किती माणसे मारली?

या अहंता राजकारणात येतात, त्याला धर्मकारण जोडतात आणि त्यालाच इतरांच्या द्वेषाचीही कडा आणतात. तसे झाले की, त्या हिंस्र होतात. भाषेचे अहंकारही असेच असतात. आमच्या प्रांतात अन्य भाषिक नकोत. त्यांना नोकऱ्या नकोत. त्यांना आमच्या प्रांताबाहेर घालवा, अशा मागण्या आजही देशात होतात की नाही? इंग्रजी राज्याची स्थापना प्रथम बंगालमध्ये कलकत्त्यात झाली. स्वाभाविकच त्या सरकारात बंगाली बाबूंची भरती मोठ्या प्रमाणावर झाली. आणि त्यांनी आपली मनमानीही त्यात केली. या लोकांनी प्रथम आसामी लिपी नाहीशी केली व त्या भाषेचे वेगळेपणही संपविण्याचा प्रयत्न केला. आजही आसामच्या जनतेत त्याविषयी बंगाल्यांवर राग आहे.

कोणतीही गोष्ट- मग तो धर्म असो वा संस्कृती- ती लादण्याचा प्रयत्न प्रतिक्रियांना जन्म देतो. हे सामाजिक वास्तव लक्षात घेऊनच धोरणे आखावी लागतात. देश एकरंगी बनवायचा, की आहे तसा बहुरंगी राखायचा? त्याला त्याचे चेहरे राखू द्यायचे, की त्यावर एकच एक मुखवटा चढवायचा? शिवाय हा देश जातींचा आहे. त्यातला आजचा साऱ्यात उपद्रवकारक प्रश्न आरक्षणाचा आहे. आरक्षणाने जातिव्यवस्था मजबूत होते, की सामाजिक न्यायाची मांडणी? देशातली प्रत्येकच जात आरक्षण मागत असेल (व ते दिले पाहिजे असे म्हणणारे लोक देशात असतील), तर नोकऱ्याच कमी होत जाणाऱ्या या देशात, हा विषय वादाचा होईल की संवादाचा?

जात, पंथ, वर्ण, भाषा व संस्कृती हे सारे जन्मदत्त विषय आहेत आणि जन्मदत्त विषयांच्या अहंता जन्मभर टिकणाऱ्याही आहेत. ‘स्वातंत्र्याचे आंदोलन हे प्रामुख्याने उत्तरेचे व हिंदी लोकांचे आहे’ असे म्हणत त्याला विरोध करणारीदक्षिणेतील जस्टिस पार्टी 1920 ते 1952 पर्यंत बहुमतात राहिली. नेहरूंनी 52 च्या निवडणुकीत तिचा पराभव केला तेव्हा तिची अहंता ओसरली, हा इतिहास आहे. दक्षिणेवर हिंदी लादण्याचे प्रयत्न आजवर फसले. (मुळात हिंदीला विशेष भाषेचा दर्जा तिच्या बाजूने घटना समितीत एक मत जास्तीचे पडल्यामुळे व काही हिंदीविरोधी सभासदांना गैरहजर ठेवल्यामुळे मिळाले, हे कसे विसरायचे?) हिंदीला राष्ट्रभाषा बनविण्याच्या प्रयत्नांविरुद्ध सारा दक्षिण भारत कसा पेटून उठला? केंद्र सरकारने एनसीसीतील आज्ञा हिंदी बनविल्या, तेव्हा तमिळनाडूने त्या राज्यातील सारी एनसीसीच बरखास्त केली- याचे स्मरण ठेवायचे की नाही?

भाषा प्रादेशिक अहंता जागविते व प्रसंगी केंद्राला त्यापुढे माघारही घ्यावी लागते, याचे आणखी एक उदाहरण पाकिस्तानचे आहे. पाकिस्तान सरकारने पूर्व पाकिस्तानवर उर्दूचे नियंत्रण लादले, तेव्हा तेथील बंगाली मुसलमानांनी तो देश व धर्म विसरून त्याविरुद्ध आंदोलन केले. त्यात लाखो माणसे मेली, लाखो स्त्रियांवर अत्याचार झाले. 1 कोटी 10 लाख लोक तो देश सोडून भारतात आले. ही घटना तर केवळ साठ वर्षांआधीची.

भारतात भाषावार प्रांतरचना आहे, प्रदेशवार संस्कृतिभिन्नता आहे. धर्म व जातींचे समूह त्यांच्या श्रद्धा-समजुतींचे आग्रह धरून आहेत. जगात एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेल्या देशांची संख्या शंभरावर जाणारी आहे. लोकसंख्येबाबत फ्रान्स हा देश आपल्या कर्नाटकाएवढा. कॅनडा हा देश तेलंगणाएवढा, इंग्लंड महाराष्ट्राएवढा तर रशिया व अमेरिका उत्तर प्रदेशाएवढे. ते छोटे देश आपली एकात्मता कशी राखतात? स्वित्झर्लंडची लोकसंख्या पन्नास लाखांहून कमी असली तरी त्यात 22 प्रांत (कॅन्टन्स) आहेत. जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमान्श या चार भाषांना त्यात राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता आहे. त्या चारही भाषांतून कायदे प्रसिद्ध होतात. तसे न केल्याने रशियाचे महासंघराज्य तुटले.

चीनचा शांघाय विभाग व तिबेट यात साम्य किती आणि आपले मिझोराम, मणिपूर, मद्रास व महाराष्ट्र यातील वेगळेपणा किती? लोकांचे प्रेम त्यातल्या वेगळेपणावर किती आणि साऱ्यांच्या ऐक्यावर किती? यातली किती राज्ये आपणही लष्कराच्या बळावर ताब्यात ठेवली आहेत? शिवाय ऐक्याला सुरूंग लावण्याचे प्रयत्नही देशात झाले आहेत. पंजाबात जर्नेलसिंगाचा उदय, उत्तर प्रदेशात बाबरी मशिदीचा विध्वंस, ओरिसातील चर्चेसची जाळपोळ, दिल्लीतील शिखांचेहत्याकांड, गुजरातेतील मुसलमानांची कत्तल, मिझोराम व मणिपुरातील अत्याचार, आणि काश्मीर? तिथे तर सामान्यपणे दरमहा पाच ते सात तरुण मारले जातात. गेल्या साठ वर्षांत ही संख्या कुठवर गेली असेल? या प्रश्नांची काळजी किती जण करतात आणि त्याला टाळ्या वाजवून शाबासकी किती जणांकडून मिळते?

मिझोराम व नागालँड हे प्रदेश ब्रिटिशांनी 1926 मध्ये यांदाबुच्या तहाने जिंकून भारताला जोडले. त्यानंतर देशात आलेल्या सायमन कमिशनसमोर त्या प्रदेशाच्या लोकांनी ‘तुम्ही भारत सोडाल तेव्हा आम्हालाही मोकळे करा’ अशी मागणी केली. पुढे स्वातंत्र्य आले, तेव्हा तीच मागणी त्यांनी माऊंटबॅटनसमोर ठेवली. त्यावर ‘तुम्ही गांधीजींशी चर्चा करा’ असे माऊंटबॅटन यांनी त्यांना समजावले. तेव्हा ‘वीस वर्षे ब्रिटिशांसोबत राहिलात, दहा वर्षे आमच्यासोबत राहा;कदाचित आपण एक होऊ,’ असा दिलासा गांधींनी दिल्यानंतर ते प्रदेश भारतात राहायला राजी झाले. नागांनी 1957 मध्ये तीच मागणी केली, तेव्हा भारताने तेथे सैन्य पाठवून ती दडपून टाकली. मिझोराममध्येही केंद्र सरकारने 1967मध्ये तेच केले. तेव्हापासून ते प्रदेश लष्करी कायद्याखाली आहेत. काश्मीरही त्याच कायद्याखाली आहे.

इराम शर्मिला नावाची मुलगी मणिपूरमध्ये लष्करी अत्याचारांविरुद्ध सोळा वर्षे उपोषण करते, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? ती निवडणुकीत पराभूत झाली असेल; पण दीड दशकांचा तिचा आकांत तेथील लोकांच्या मनात भरून असणारच की नाही? पूर्वी इम्फाळजवळ मनकर्णिका नावाच्या तरुणीवर लष्करी जवानांनी असाच बलात्कार केला व तिचे प्रेत जंगलात फेकून दिले. त्याविरुद्ध साऱ्या मणिपुरातील महिला अधिकाऱ्यांनी, प्राध्यापक, पत्रकार, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जगातला पहिला नग्न निषेध मोर्चा काढला, तो कोण कसा विसरेल? देश एक आहे. त्याची प्रादेशिकता अखंड आहे. मात्र त्यातली माणसे नागरिक असूनही वेगवेगळ्या प्रकारचे जीवन अनुभवणारी व जगणारी आहेत. त्यांना तसे जगू द्यायचे, की त्यांना एका चरकात घालून रस काढायचा?

आता तर कित्येक दशके देशात राहिलेल्या व नागरिकत्व अनुभवलेल्या लोकांना आसामातून काढायचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. तो एखादे वेळी काश्मिरातही केला जाईल. पंजाबात याचे दुष्परिणाम- त्याचा आरंभ कोणीही करो- आपण अनुभवले आहेत. देशात खलिस्तानची चळवळ होती. द्रविडीस्तानची होती. काश्मीरची आहे. मणिपूर-मिझोरामच्या आहेत. या साऱ्या संघर्षरत वर्गात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे आव्हान मोठे आहे.

नुकतेच न्या.रंजन गोगोई म्हणाले, ‘‘देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे न्याय, हा बंधुत्वाचा व्यवहार आहे.’’ राज्यात अन्याय असेल, राज्य लोकांच्या भावभावनांचे व वेगळेपणाचे मारक असेल; तर वेगळे काय व्हायचे असते? समाजाचे प्रश्न देवाणघेवाणीतून व त्यातही मोठ्यांनी जास्तीचे सोडूनच यशस्वी होतात. ही वृत्ती कुठे आहे? इथे तर बहुसंख्यच जास्तीच्या मागण्या घेऊन इतरांना त्यांचे मोल मागताना दिसत आहेत. हे चित्र बदलेल. किमान ते बदलावे, अशीच सगळ्या राष्ट्रप्रेमींची भावना असेल.

धर्म-वंशासारख्या जन्मदत्त श्रद्धाच माणसांना हिंस्र बनवितात असे नाही, विचारांचे कडवेपणही तो हिंसाचार समाजात आणत असते. ‘जगात धर्माने अधिक माणसे मारली की विचारांनी?’ या प्रश्नाचे उत्तर अजून अभ्यासकांनी शोधले नाही. ऑर्थर पामर या अमेरिकन राष्ट्रदूताने मांडलेल्या हिशेबात एकट्या विसाव्या शतकात विचारसरणीच्या कडवेपणाने आणि त्यावर स्वार झालेल्या हुकूमशहांनी जगातली सोळा कोटी नव्वद लाख माणसे मारली आहेत. यात हिटलरने दोन कोटी, स्टालिनने पाच कोटी, तर माओने सात कोटी माणसे मारली वा ती मरतील अशी व्यवस्था केली (यात युद्धात मारले गेलेल्यांचा समावेश नाही.) याखेरीज ‘मेरूज’सारख्या बारीकसारीक व स्थानिक हुकूमशहांनी मारलेल्या माणसांची आकडेवारी टाकली की, ही बेरीज पूर्ण होते...

तात्पर्य- प्रश्न विचारांचा नाही, मूल्यांचा नाही आणि जन्मदत्त श्रद्धांचाही नाही; तो आहे त्यांच्यात येणाऱ्या कडवेपणाचा व अहंतांचा. या अहंता जेव्हा शांत होतात, तेव्हाच जगात व समाजात शांतता नांदते. दुर्दैवाने आजचा आपला काळ श्रद्धांना वा अशा अहंतांना धार चढविण्याचाच आहे. प्रश्न, समाज आणि देश यांचे वैविध्य राखून त्यात एकात्मता आणायची, की त्याला थेट एकरूपच बनविण्याचा अट्टहास धरायचा? असा अट्टहास कधी यशस्वी होत नाही आणि वेगळेपण राखून एकात्मता आणायची, तर ती मूल्यांच्याच आधारे आणता येते. हे वास्तव विस्मरणात गेले की समाज तुटतात आणि देश विखुरतात. याचे भान राखले की देश, समाज व माणूसही समाधानी, स्थिर आणि सुखी होत असतो.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

sdwadashiwar@gmail.com

खुलासा : 20 जुलैच्या अंकातील सुरेश द्वादशीवार यांच्या लेखात सम्राट अशोकाच्या संदर्भात ‘कलिंग’ युद्धाच्याऐवजी ‘राक्षसतागडी’ची लढाई असा उल्लेख अनवधानाने आला आहे. क्षमस्व. – संपादक

सिनेमा

बायकांनी सांगितलेल्या गोष्टी

मीना कर्णिक

समाजात असे विरोधाभास असतातही; पण ज्यासंस्कृतीविषयी प्रेक्षकांनाही फार माहिती नाही, त्याबद्दलची गोष्ट सांगताना हे बारकावे दिसायलाहवेत. नात्यांमधले पदर लक्षात यायला हवेत. पणसिनेमा पाहताना मुळात दिग्दर्शकानेच फार खोलातजायचा प्रयत्न केला नसावा, असं वाटत राहतं. ‘किती बिचाऱ्या ना...’ अशा भूमिकेतून हा सिनेमाबनवला गेलाय की काय, असा विचार मनात येतराहतो. म्हणजे, माझ्या मनात येत होता. पणबेल्जियमची सारा आणि नॉर्वेची क्रिस्टिन यादोघींनाही हा सिनेमा आवडला. त्यांच्या विकसितदेशांतल्या पाश्चात्त्य जाणिवांना या सिनेमाने ‘काहीतरी एक्झॉटिक’ दाखवलं होतं. सिनेमाच्या फ्रेम्सअप्रतिम होत्या, यात शंकाच नाही. वाळवंटातलीमाती आणि त्या पार्श्वभूमीवर विविध रंगांमधल्याओढण्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. पण फक्तसुरेख दृश्यं म्हणजे काही सिनेमा नव्हे. यासिनेमामध्ये आत्मा, प्रामाणिकपणा नव्हता- असंमला वाटलं. वेरिदाचं दु:ख कदाचित म्हणूनचमला समजलं, पण भावलं नाही.

अंकारा इथे झालेल्या 22 व्या महिलांच्याफ्लाइंग ब्रूम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येदाखवण्यात आलेल्या तीन डॉक्युमेंटरींबद्दल मागीलअंकात वाचलं. आज या महोत्सवामध्ये महिलादिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी-

अंकाराच्या फ्लाइंग ब्रूम चित्रपट महोत्सवासाठीजाताना मनात एक उत्सुकता होती. महिला दिग्दर्शकांनीकेलेले सिनेमे इथे दाखवण्यात येणार होते. या वर्षीमहोत्सवाच्या आयोजन समितीकडे तब्बल 1721एन्ट्रीज आलेल्या होत्या. त्यातून निवडलेले 140 सिनेमेदाखवले गेले. जगभरातल्या बायकांना कोणत्या गोष्टीसांगायच्या आहेत याची झलक आपल्याला पाहायलामिळेल, असा विचार मनात होता. अर्थात, हे सगळेसिनेमे पाहणं शक्यच नव्हतं. शिवाय, फीप्रेसी या चित्रपटसमीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ज्युरी म्हणूनगेल्याने स्पर्धेसाठी जे सिनेमे होते, ते पाहणं आवश्यकहोतंच. त्यात अनेक डॉक्युमेंटरीज होत्या. त्यामुळे खूपजास्त फीचर फिल्म्स पाहता आल्या नाहीत. ज्याबघितल्या, त्यांतल्या काहींची ओळख इथे करून द्यावी,असं वाटलं.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळमिळावं, सिनेमाच्या माध्यमातून त्याविषयी जागरूकतानिर्माण व्हावी- अशा उद्देशाने स्थापन झालेल्या चित्रपटमहोत्सवामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सिनेमांमधूनमहिलांच्या व्यक्तिरेखा मध्यवर्ती असणार, हे स्पष्ट होतं.पण म्हणून हे सिनेमे काही प्रचारकी नव्हते. केवळकलात्मक दर्जाचा विचार केला तर ते महान होते, असंनाही; पण या महिला-दिग्दर्शकांना बायकांच्यावेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात रस होता. आपल्यानायिकांची तळमळ, त्यांची द्विधा मन:स्थिती, त्यांचंहताश होणं, कधी बंड करून ठामपणे उभं राहणं इथेपाहायला मिळालं.0

‘जर्नी टु अ मदर्स रूम’मध्ये आई आणि मुलीची गोष्टआपण पाहतो. कधी आईच्या दृष्टिकोनातून, तर कधीमुलीच्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर एस्त्रेला एकटी पडलीयेआणि या एकटेपणाच्या भीतीतून ती आपल्या मुलीमध्येआधार शोधतेय. तिच्यासाठी खायला करणं, कपडेशिवणं, तिचं सगळं हवं-नको बघणं- हेच आताएस्त्रेलाचं आयुष्य झालंय. लिओनोरचंही आपल्याआईवर खूप प्रेम आहे. तिच्या एकटेपणाची जाणीवलिओनोरला आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर पबमध्येमजा करण्याऐवजी ती आईबरोबर घरी बसून टीव्हीवरमालिका बघणं पसंत करते.

पण तिची स्वत:चीही काहीस्वप्नं आहेत. स्पेनमधल्या एका छोट्याशा शहरात तिलाआपलं आयुष्य घालवायचं नाहीये. लंडनला जाऊनकरिअर करण्याचे वेध तिला लागलेत.दिग्दर्शक सेलिया रिको क्लॅव्हेलिनोने आई आणिमुलीमधला हा संघर्ष, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग,आईने आपल्या आयुष्याचा शोधलेला अर्थ हे एकासाध्या-सरळ गोष्टीतून मांडलंय. या सिनेमात असामान्यकाहीच नाही, पण तरीही एक गोडवा आहे. एकप्रामाणिकपणा आहे, तो मनाला भिडतो- एवढं नक्की.माझ्याबरोबर ज्युरी असणाऱ्या बेल्जियमच्या सारालाही गोष्ट फारशी भावली नाही. वयात आल्यावर मुलांनीघराबाहेर पडायचं यात संघर्ष कुठे आहे, असं तिला वाटतहोतं. आणि सोळा-सतरा वर्षांच्या मुलीने आईच्याकुशीत झोपणंही तिला खटकलं. मला या दोन्ही गोष्टीसमजू शकत होत्या. सिनेमा आपल्याला का आणि कसाभावतो, हे संस्कृतींमध्ये असलेल्या फरकावरही अवलंबूनअसतंच. 0

‘फ्लेश आऊट’ हा सिनेमा पाहिल्यानंतरही नेमकं हेचघडलं. इटलीची दिग्दर्शक मिकेला ओचिपिन्तीनेमॉरिटानिआ नावाच्या देशातल्या रिवाजावर केलेला हासिनेमा. मॉरिटानिआ हा आफ्रिका खंडात वायव्येलाअसलेला इस्लामी देश. इथे लग्नाअगोदर वधू चांगलीतंदुरुस्त असावी म्हणून तिला खायला घातलं जातं, तिचंवजन वाढावं म्हणून प्रयत्न केले जातात. मिकेलाच्यासिनेमामध्ये अशाच एका मुलीची गोष्ट सांगितलेलीआहे. भिन्न संस्कृतींमुळे सिनेमाकडे पाहण्याच्यादृष्टिकोनात कसा बदल होतो, हे सांगण्याआधी यासिनेमाबद्दल सांगते. खऱ्या-खुऱ्या घटनांवर हा सिनेमाआधारलेला आहे.वेरिदा या तरुण मुलीचं लग्न ठरतं. तीन महिन्यांनी लग्नआहे आणि समाजातल्या रिवाजानुसार सुंदर दिसायचं तरया काळात तिचं वजन किमान दहा किलोनी वाढणं गरजेचंआहे. सिनेमाची सुरुवातच मुळी काजळ घातलेले दोनविषण्ण डोळे आणि त्या खाली एक भलं मोठं दुधानेभरलेलं मातीचं पातेलं दाखवून होते. मग वेरिदाची आईरोज तिला दिवसभरात दहा वेळा बळजबरीने कशीखायला घालत असते, हे आपण पाहतो.

तिची धाकटीबहीण बिर्याणी मागते तेव्हा, ‘तुझं लग्न ठरेल तेव्हा तुलाहीहे सगळं मिळेल,’ असं सांगितलं जातं. वेरिदाला हे सहनहोत नाही. रोज तिच्यासाठी वजनाचा काटा घेऊन येणारामुलगा तिला आवडलाय, पण ती ते सांगू शकत नाही,मैत्रिणीकडे मन मोकळं केलं, तरी प्रत्यक्ष आयुष्यबदलण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नसतो.मात्र वेरिदाची ही कथा अस्वस्थ करत नाही. बहुधापाश्चात्त्य देशातल्या एका स्त्रीने काठावर राहूनआपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीचं केलेलं हे चित्रणअसल्यामुळे असेल, पण दिग्दर्शक आपल्याला वेरिदाच्याआयुष्यात सहभागी करून घेण्यात अयशस्वी ठरते. तिचंकाठावर असणं पदोपदी जाणवत राहतं. त्यात कुठे तरी,‘बघा ना या मुली किती बिचाऱ्या आहेत,’ अशी भावनाआहे की काय, अशी शंका येत राहते. बळी देण्याआधीबकऱ्याला धष्टपुष्ट करणं आणि बाईला खायला घालूननवऱ्यासाठी तयार करणं सारखंच आहे, हे एकदाप्रस्थापित झाल्यानंतर दिग्दर्शक नवं काहीच सांगत नाही.

या देशातल्या बायका अशा शरण जाणाऱ्या आहेत, हेएका बाजूला दाखवताना; दुसऱ्या बाजूला एकत्रजमल्यानंतर या बायका ‘माझ्या दुसऱ्या नवऱ्याला मीसोडून दिलंय, आता मी नवा पुरुष शोधतेय’, अशा गप्पामारताना दिसतात. समाजात असे विरोधाभासअसतातही; पण ज्या संस्कृतीविषयी प्रेक्षकांनाही फारमाहिती नाही, त्याबद्दलची गोष्ट सांगताना हे बारकावेदिसायला हवेत. नात्यांमधले पदर लक्षात यायला हवेत.पण सिनेमा पाहताना मुळात दिग्दर्शकानेच फार खोलातजायचा प्रयत्न केला नसावा, असं वाटत राहतं. ‘कितीबिचाऱ्या ना...’ अशा भूमिकेतून हा सिनेमा बनवलागेलाय की काय, असा विचार मनात येत राहतो.म्हणजे, माझ्या मनात येत होता. पण बेल्जियमचीसारा आणि नॉर्वेची क्रिस्टिन या दोघींनाही हा सिनेमाआवडला. त्यांच्या विकसित देशांतल्या पाश्चात्त्यजाणिवांना या सिनेमाने ‘काही तरी एक्झॉटिक’ दाखवलंहोतं. सिनेमाच्या फ्रेम्स अप्रतिम होत्या, यात शंकाचनाही. वाळवंटातली माती आणि त्या पार्श्वभूमीवर विविधरंगांमधल्या ओढण्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. पणफक्त सुरेख दृश्यं म्हणजे काही सिनेमा नव्हे. यासिनेमामध्ये आत्मा नव्हता, प्रामाणिकपणा नव्हता- असंमला वाटलं. वेरिदाचं दु:ख कदाचित म्हणूनच मलासमजलं, पण भावलं नाही. 0

‘सिस्टिम क्रॅशर’ हीसुद्धा एका नऊ वर्षांच्या मुलीचीशोकांतिका आहे- जर्मनीच्या नोरा फिंगशेड्‌टनेसांगितलेली. सगळे नियम मोडणाऱ्या लहान मुलांचं वर्णनसिस्टिम क्रॅशर म्हणून केलं जातं. अशा मुलांमध्ये प्रचंडऊर्जा असते. पण तिचा उपयोग नेमका कसा करावा, हेत्यांना कळत नाही. भावनिक दृष्ट्या ती अतिशय हळवीअसतात. छोट्या-छोट्या गोष्टींनी त्यांना राग येतो आणितो इतका पराकोटीचा असतो की, ती हिंसक बनतात. मगआपल्यासमोर लहान मूल आहे, याचंही भान त्यांना राहतनाही. समाजाने आखून दिलेल्या नियमांचं पालन त्यांनाकरायचं नसतं. त्यावर वेळीच योग्य उपाय झाले नाहीत,तर अशा विध्वंसक वृत्तीच्या मुलांची शोकांतिका होऊशकते.बर्नाडेटचंही तेच होतं. तिचे मानसोपचारतज्ज्ञ,वेगळ्या मुलांसाठी असलेल्या शाळेतले तिचे शिक्षक, तीबरी व्हावी म्हणून अनेक धोके पत्करणारा तिच्याआश्रमातला तरुण, तिला आपल्या घरी राहायला नेणारीतिची केअरटेकर- असे अनेक जण बर्नाडेटला माणसांतआणायचा प्रयत्न करतात. पण आपल्या आईजवळराहावं, लहान भावंडांबरोबर मोठं व्हावं- ही तिचीलहानशी इच्छाही पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणामम्हणून ती अधिकाधिक हिंसक बनू लागते.

तिला घरी नेलंतर ती लहान भावंडांशी कधी कशी वागेल, याचीआईच्या मनात सतत भीती असल्याने तिला तरबर्नाडेटला घरी न्यायचंच नाहीये. जेमतेम पैसे देणारीनोकरी आणि घर सांभाळता-सांभाळता तिला आपलंचआयुष्य मार्गी लावता येत नाहीये; तर अशा मानसिकआजार असलेल्या मुलीची काळजी ती कशी घेणार?मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण परिस्थितीपुढे ती हतबलआहे.हा सिनेमा पाहताना आईची आणि त्या लहानग्यामुलीचीही हतबलता आपल्यापर्यंत तितक्याच तीव्रतेनेपोचते. आईची चूक नाही, हे जाणवतं; पण तरीहीबर्नाडेटच्या शोकांतिकेला ती मोठ्या प्रमाणात जबाबदारआहे, हेही लक्षात येतं. तिच्या आजूबाजूच्यांचे प्रयत्ननिष्फळ होताना दिसतात, तेव्हा आपणही त्यांच्याबरोबरहळहळतो. त्यांची पोटतिडीक आपणही अनुभवतो.

सिनेमा संपतो तेव्हा एक वेगळीच गोष्ट पाहायलामिळाल्याची जाणीव असते. दोन तास आपण बर्नाडेटच्याजगात वावरतो. मात्र ‘सिस्टिम क्रॅशर’ प्रामुख्याने लक्षातराहतो तो बर्नाडेटची भूमिका करणाऱ्या हेलेना झेन्गल यामुलीच्या अप्रतिम अभिनयामुळे. वर्गातल्या मुलांनामारामारी करून जखमी करणारी जंगली मुलगी,शहरापासून दूर निसर्गाच्या सहवासात मुक्तपणे वावरायलामिळाल्यावर थोडीफार शहाणी झालेली, फोनवर कबूलकेलंय म्हणजे आई आपल्याला घरी न्यायला नक्की येईलया विश्वासावर जगणारी आणि ती येणार नाही हेकळल्यावर मोडून गेलेली, तिच्यासाठी जिवाचं रानकरणाऱ्या पुरुषामध्ये आपला बाप शोधणारी... अशाविविध मनोवस्था या छोट्या मुलीने इतक्यापरिणामकारकतेने साकारल्या आहेत की, थक्क व्हायलाहोतं. या वर्षीच्या बर्लिनालेमध्ये स्पर्धेसाठी या सिनेमाचीनिवड करण्यात आलेली होती. 0

गेल्या वर्षीच्या लोकार्नो इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामध्ये फीप्रेसीचं पारितोषिक पटकावणारा‘सिबेल’ हा सिनेमा मला सगळ्यात प्रभावी वाटला.चागला झेनसिरसी आणि ग्वालोम जिओव्हॅनेटी यांनी यासिनेमाचं दिग्दर्शन केलंय.25 वर्षांची सिबेल बोलू शकत नाही. वडील आणिधाकट्या बहिणीबरोबर टर्कीच्या डोंगराळ भागातल्याएका गावात ती राहतेय. बोलता येत नसलं तरी गावातलीपूर्वापार चालत आलेली शिट्ट्यांची भाषा ती शिकलीये.एरवी कामाला वाघ असलेली ही मुलगी ‘बायको’होण्याच्या लायकीची नाही, असं गावाने ठरवून टाकलंय.तिच्या लहान बहिणीसाठी मुलगे सांगून येताहेत, पणसिबेलचं नावही कुणाच्या ध्यानी येत नाही.

सिबेल तशीजात्याच बंडखोर आहे. डोंगरावरच्या जंगलात एकटीचफिरत असताना ती सिगारेट ओढते. डोक्यावरची ओढणीकाढून ठेवते. बूट घालून, बंदूक घेऊन गावकऱ्यांना त्रासदेणाऱ्या लांडग्याचा शोध घेते.एक दिवस जंगलात सिबेलला भेटतो एक बंडखोर.पोलिसांची नजर चुकवून जखमी अवस्थेत तो डोंगरातल्यागर्द झाडीत लपलाय. सिबेल त्याची काळजी घेते. त्यालाबरं करते. हा पुरुष आपल्याकडे बिचारी मुकी मुलगीम्हणून बघत नाही, तो आपल्याशी बोलताना नॉर्मलमाणसाशी बोलावं तसा बोलतो- हे तिला जाणवू लागतंआणि ती त्याच्या प्रेमात पडते.

आपलं लग्न कधीचहोणार नाही, हे माहीत असल्यामुळे त्याच्याबरोबर सेक्सकरताना तिच्या मनात कोणतीही अपराधी भावना नसते.त्याच्याविषयी कोणालाही काही कळू देत नाही.पण अशा गोष्टी लपून राहू शकत नाहीत. गावातल्यालोकांमध्ये कुजबूज सुरू होते. पोलिसांच्या कानांवरगोष्टी पडतात. ते जंगलात शोध घेतात, पण तोवर हा पुरुषपळून गेलेला असतो. तो परत येणार नाही याची खात्रीसिबेलला असते, तिची तशी अपेक्षाही नसते. मात्र,तिच्या या वागण्याचा परिणाम तिच्या बहिणीला भोगावालागतो. बहिणीचं लग्न मोडतं आणि सगळा दोषसिबेलवर येतो. आजवर तिच्या पाठीशी ठामपणे उभेराहणारे तिचे वडीलही तिला माफ करत नाहीत. पणयामुळे मोडून पडणारी सिबेल नसतेच. गावाच्या आणिवडिलांच्या विरोधात जाऊन ती बहिणीला शहरात जाऊनशिक्षण घ्यायला तयार करते.सिनेमाच्या शेवटी बसमध्ये खाली मान घालूनबसलेली बहीण आपल्याला दिसते. रस्त्यावर उभीअसलेली सिबेल तिच्या जवळ जाते. हळुवार हातानेतिची मान सरळ करते आणि बसमधून बाहेर पडते.बहिणीच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हसू येतं आणि सिनेमासंपतो.नंतरचा बराच काळ सिबेल आपल्याबरोबर रेंगाळतराहते, मनाला उभारी देते. सिनेमा बघायला आलेल्याअंकारामधल्या तरुण मुलींनी केलेल्या टाळ्यांच्याकडकडाटामधून मला तरी असंच वाटलं.

मीना कर्णिक, मुंबई

meenakarnik@gmail.com

नवे पुस्तक

केला होता अट्टहास’ या पुस्तकाची प्रस्तावना

उषा मेहता

परिस्थितीच्या मुशीतून घडलेले काही तरुण ‘केला होता अट्टहास’ या कादंबरीच्या केंद्रभागीआहेत. तरुणांचा हा गट ‘कसेल त्याला जमीन’ देण्यासाठी, जमिनीशी संबंधित लढ्यांमधेआणि चळवळींमधे कार्यरत आहे. सामाजिकपरिवर्तनासाठी धडपडणाऱ्या या तरुणांना, त्यांना असलेली ‘क्रांती’ची आस स्वस्थ बसूदेत नाही. कमालीचे खडतर जीवन त्यांनीस्वेच्छेने स्वीकारले आहे. या कादंबरीत, तेज्या पद्धतीने काम करतात, ते तर समजतेचआणि अशा कार्यकर्त्यांना कुणाकुणाशी लढावेलागते, कायकाय सोसावे लागते, कशाकशाआशा-निराशा पचवाव्या लागतात, याचीहीकल्पना येते... आणि सरतेशेवटी व्यक्तिगतमहत्त्वाकांक्षा कशा प्रभावी ठरतात त्याचेहीनैराश्यजनक दर्शन!याखेरीज यांच्यातीलच एक जण ‘कार्यकर्ता’पणझेपणारे नाही म्हणून वा परिस्थितीशी तडजोडम्हणून म्हणा, एका फार मोठ्या शासकीयप्रकल्पावर नोकरी स्वीकारतो.

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिकशिवदयाल यांच्या ‘एक और दुनिया होती’ या कादंबरीचाअनुवाद. कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्यापरस्परसंबंधांतून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यत:अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे,परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं सगळं आयुष्य खर्चीघालणारे, जयप्रकाशजींच्या समग्र क्रांतीच्या विचारांनीभारलेले बिहारमधले तरुण आहेत.

या तरुणांना वर्षानुवर्षंसातत्यानं अशा प्रकारचं काम करण्यासाठी आवश्यक असंमनोबल कुठून आणि कसं लाभलं असेल हे जाणूनघेण्यासाठी मी पुन्हा एकदा ग. प्र. प्रधानांनी लिहिलेल्याजयप्रकाशांच्या चरित्राकडे वळले आणि त्यावरून 1960व 70च्या दशकातील बिहारमधल्या वातावरणाची, यातरुणांच्या मन:स्थितीचीही कल्पना येऊ शकली.त्या वेळेस बिहारमधील विद्यार्थ्यांधे केवढा तरीअसंतोष खदखदत होता. शिक्षणक्षेत्रातील वशिलेबाजी,लाचलुचपत, परीक्षांच्या निकालातही भ्रष्टाचार, अनेककेंद्रांवर परीक्षांच्या वेळी झालेली सामुदायिक कॉपीयामुळे, प्रामाणिक विद्यार्थी संतापलेले होते. 1974च्याफेब्रुवारीत बिहार विद्यापीठ, भागलपूर विद्यापीठ, पाटणाविद्यापीठ आणि मगध विद्यापीठ यांच्याशी संलग्नअसलेल्या 65 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची एक परिषदभरली आणि परिषदेत 18 मार्चला विधानसभेवर मोर्चानेऊन मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन द्यायचंअसा निर्णय झाला होता. पण बिहारचे मुख्यमंत्री गफूर वत्यांचे सहकारी यांनी ही विद्यार्थी-चळवळ दडपूनटाकण्याचे ठरवले.

18 मार्चला हजारो विद्यार्थी पाटण्यामधेजमले असताना त्यांच्यावर निष्ठुरपणे लाठीमार व गोळीबारकरण्यात आला, त्यात चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले.विद्यार्थ्यांनी याचा निषेध केला व गफूर सरकारच्याराजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थी-चळवळीतले हेलोक वेगवेगळ्या शहरांमधेही पोचले. गफूर सरकारच्यादडपशाहीचा निषेध सर्वत्र होऊ लागला.या दडपशाहीमुळे विद्यार्थी काहीसे भांबावलेले होते.विद्यार्थ्यांना नेमके काय करायला हवे हे कळत नव्हते.म्हणून मार्गदर्शनासाठी ते जयप्रकाशजींना भेटले. खरे तरजयप्रकाशजींची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे त्यांची याआंदोलनात सहभागी होण्याची तयारी नव्हती. परंतुविद्यार्थ्यांच्या हट्टामुळे त्यांना विद्यार्थ्यांची विनंती मान्यकरावी लागली. मात्र त्यापूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांना काहीअटी घातल्या होत्या. जयप्रकाशजींनी सांगितले होते,‘तुम्ही हे आंदोलन अहिंसेच्या मार्गानीच चालवले पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक कार्यकारिणीनेचआंदोलनाचा कार्यक्रम एकमताने ठरवला पाहिजे.’ या अटीविद्यार्थ्यांनी मान्य केल्या.

पुढे हे चळवळीचे लोण बिहारआणि इतरही राज्यांमधे पसरतच होते.पाटण्यामधे 5 जून 1974ला, जयप्रकाशजींच्यानेतृत्वाखाली एक अभूतपूर्व मोर्चा निघाला. त्यात सामीलहोण्यासाठी बिहारच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखांहूनअधिक लोक पाटण्यात आले होते. मोर्चात पुढे फक्त‘विद्यार्थी संघर्षवाहिनी’चा फलक होता, सर्वात पुढे उघड्याजीपमधे जयप्रकाशजी होते, मागे ‘विधानसभा बरखास्तकरावी’ अशा आशयाच्या पत्रकावर सह्या केलेले एक कोटीकागद घेऊन जाणारे काही ट्रक्स होते, आणि त्यांच्यामागेस्त्रिया, शेतकरी आणि इतरेजन यांच्या प्रचंड रांगा होत्या.गांधी मैदान फुलून गेले होते. बरोबर तीन वाजताजयप्रकाशजी तिथे पोचले आणि ‘लोकनायक जयप्रकाशझिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणा करून लोकांनी त्यांचेस्वागत केले. प्रधानांनी लिहिलेल्या चरित्रातील असे सर्ववर्णन वाचून, त्या वातावरणातला थरार आजही जाणवतो.

तेवढ्यात बातमी आली की याच मोर्चाच्या अखेरच्याभागातल्या लोकांवर गोळीबार झाला आहे, अर्थातच लोकप्रक्षुब्ध झाले. आता एक मोठी दंगल उसळण्याची शक्यताहोती, पण जयप्रकाशजींचा लोकांवर इतका प्रभाव होता,त्यांनी ताबडतोब घोषणा केली, ‘हमला चाहे जैसा होगा,हाथ हमारा नहीं उठेगा!’ लोक शांत राहिले. आता त्यांनीशांत लयीत आपलं भाषण सुरू केलं आणि ती दंगल होऊदिली नाही. त्यांनी सांगितलं, भ्रष्टाचाराचं समूळ निर्मूलनकरायचं असेल तर राजकीय भ्रष्टाचाराबरोबरच जमीनदारीनष्ट करून कसणाऱ्याची जमीन झाली पाहिजे,जातिव्यवस्था तोडली पाहिजे. युवाशक्तीने आमूलाग्रसमाजपरिवर्तनासाठी, आपले सर्वस्व पणाला लावलेपाहिजे आणि याच सभेत त्यांनी प्रथम ती क्रांतिकारीकल्पना स्पष्ट केली, ‘संपूर्ण क्रांती’ची.

छात्रसंघर्ष वाहिनीच्या एका मेळाव्यात ते म्हणाले, ‘‘मीजाहीर सभेत लोकांना ग्रामस्वराज्याचा गांधीजींचा कार्यक्रमसांगितला. पण ही गोष्ट केवळ आंदोलनातून साध्य होणारीनाही. त्यासाठी समाजमानस व समाजरचना या दोन्हींमधेमूलभूत परिवर्तन घडवून आणावे लागेल आणि हे काम तुम्हीतरुण मंडळीच करू शकाल... जमीनदारी, सावकारी नष्टकेली पाहिजे. आजच्या जुन्या अन्याय्य समाजरचनेच्याजागी, ‘तेजस्वी, आत्मनिर्भर समाज’ निर्माण होणे, जात,धर्म आदि भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्म राष्ट्र निर्माण होणेयालाच मी ‘संपूर्ण क्रांती’ म्हणतो.’’तेव्हा, अशा परिस्थितीच्या मुशीतून घडलेले काहीतरुण या ‘केला होता अट्टहास’ कादंबरीच्या केंद्रभागीआहेत. तरुणांचा हा गट ‘कसेल त्याला जमीन’देण्यासाठी, जमिनीशी संबंधित लढ्यांमधे आणिचळवळींमधे कार्यरत आहे. सामाजिक परिवर्तनासाठीधडपडणाऱ्या या तरुणांना, त्यांना असलेली ‘क्रांती’चीआस स्वस्थ बसू देत नाही. कमालीचे खडतर जीवन त्यांनीस्वेच्छेने स्वीकारले आहे. या कादंबरीत, ते ज्या पद्धतीनेकाम करतात, ते तर समजतेच आणि अशा कार्यकर्त्यांनाकुणाकुणाशी लढावे लागते, कायकाय सोसावे लागते,कशाकशा आशा-निराशा पचवाव्या लागतात, याचीहीकल्पना येते... आणि सरतेशेवटी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाकशा प्रभावी ठरतात त्याचेही नैराश्यजनक दर्शन!

याखेरीज यांच्यातीलच एक जण ‘कार्यकर्ता’पणझेपणारे नाही म्हणून वा परिस्थितीशी तडजोड म्हणूनम्हणा, एका फार मोठ्या शासकीय प्रकल्पावर नोकरीस्वीकारतो. तिथे त्याने घेतलेल्या अनुभवांवरून अशाप्रकल्पांच्या ठिकाणी असलेले वातावरण, तेथीलवेगवेगळ्या युनियन्सचे परस्परांशी व अधिकाऱ्यांशीअसलेले संबंध, ताणतणाव, तेथे कृत्रिम रीतीने निर्माणकेलेल्या प्रचंड जलाशयामुळे निर्माण झालेले विस्थापितांचेप्रश्न अशा कितीतरी गोष्टी अवगत होतात.हे तरुण बुद्धिमान आहेत, संवेदनशील आहेत आणिविचारी आहेत. कादंबरीच्या ओघातच त्यांच्यासंभाषणांमधून, शिबिरातील चर्चांमधून, पत्रांमधून,मनोगतांमधून देशातल्या त्या काळातल्या महत्त्वाच्याघडामोडींवर खल होत असतो आणि अन्य देशांतल्याघडामोडींवरचेही विवेचन, मतमतांतरे सहजपणे येत राहतात.

सोविएत संघाबरोबरच पूर्व युरोपमधेही ‘समाजवाद’कोसळल्यानंतर जगभर जी व्यवस्था उदयास येत गेली त्याअनुषंगाने युरोप, अमेरिका, आफ्रिका यामधील महत्त्वाच्याचळवळी आणि खळबळीही या कादंबरीच्या कवेत येतात.ही कादंबरी म्हणजे केवळ घटनांची जंत्री नाही. कादंबरीतीलमुख्य पात्रांचे भावविश्व, त्यातला तारुण्यसुलभ रोमँटीसिझम,तोही तर आहेच कादंबरीत, संयमित आणि हळुवार. जमिनीशीअसलेल्या नात्याबरोबरच स्री-पुरुषांमधल्या बदलत्यानात्यांचाही इथे वेध घेतला गेला आहे.सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजहीजमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणाचे, बेकारांचेप्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी या चळवळी सुरूचआहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापकस्वरुपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असते असेहीनाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरीमहत्त्वाची वाटते.

शिवदयाल यांनी माझ्या विनंतीला मान देऊन याकादंबरीच्या अनुवादासाठी अनुमती दिली, याबद्दल मीत्यांची ऋणी आहे. रेखा देशपांडे या माझ्या मैत्रिणीनेअविलंब अनुवाद केला. तिचे आभार मी मानत नाही, कारणही कादंबरी मराठीत यावी अशी तिचीही इच्छा होती!अच्युत पालव यांनी वास्तवातील अनेकानेक प्रश्नसूचित करणारे मुखपृष्ठ तयार केले आहे, याबद्दल त्यांचेआभार. ‘ऑलरीच’च्या अतुल जोशींनी वेळेवर जेसहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत.‘साधना प्रकाशन’ ही कादंबरी प्रकाशित करीत आहे...विनोद शिरसाठ यांची मी आभारी आहेच.

उषा मेहता, मुंबई

मंच-18

इस्पितळातील नाताळ!

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस

नाताळचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. मीत्या नर्सेसना इस्पितळातील उपस्थित लहानमुलांना भेटवस्तू वाटताना पाहिले आणि मलामाझे लहानपण आठवले. मी विचार करूलागलो... लहानपणी मला मिळणाऱ्याभेटवस्तूंमुळे नाताळ आवडायचा, थोडा मोठाझाल्यावर नवे कपडे मिळतात म्हणून नाताळचीमी वाट पाहायचो, तर पुढे तारुण्यातमित्रांबरोबर पाटर्या करण्याचे अधिकृत कारणम्हणून मला ‘ख्रिसमस ईव्ह’ आवडू लागलाहोता, आणि आता काही वर्षांपासूनकुटुंबीयांसोबत काही निवांत क्षण व्यतीत करणेइथपर्यंतच आता या उत्सवाचे प्रयोजन सीमितझाले होते. मी आईला ज्या खोलीत ठेवले होतेतिथे परत आलो. ऑपरेशन थिएटरमधून बेडवरआणल्याला सात-आठ तास उलटूनही आईअजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. ‘काय होईलआईचं? किती वेळ लागेल ह्यातून रिकव्हरव्हायला? मुळात ती रिकव्हर होईल कीनाही?’ काहीच कळत नव्हतं.

सप्टेंबरमहिना म्हटला की, डोळ्यांसमोर जे चित्र उभेराहते, ते म्हणजे कडाक्याची थंडी, पहाटेचे धुके, स्वेटरशालघालून घराबाहेर हिंडणारे लोक आणि दिवसभररेंगाळणारा गारवा ह्याचे. डिसेंबर महिन्यात वसई एकानव्या नवरीसारखी सजते. वातावरणातील शीतल बदल,ठिकठिकाणी सुरू झालेले लग्नसराईचे कार्यक्रम आणिनाताळची लागलेली चाहूल. डिसेंबरच्या शेवटच्या 10दिवसांत तर वसईत नाताळचा उत्साह अगदी ओसंडूनवाहत असतो. घरोघरी व गावाच्या वेशीवर ठिकठिकाणीकेलेली रंगेबेरंगी दिव्यांची रोषणाई वसईतील बंगल्यांचेआणि गावाचे सौंदर्य अधिकच खुलविते. शेतातीलभाजीपाल्यांनी बहरलेले मळे तर या काळ्या मातीचीसमृद्धी अधिकच अधोरेखित करतात. कामानिमित्त देशापरदेशातअसलेले वसईकर या वेळी घरी परतू लागतातआणि ओकीबोकी पडलेली गावे पुन्हा त्यांच्या माणसांनीफुलून येतात. कट्‌ट्यावर पाटर्यांचे व सहलींचे बेत रंगतातआणि वेगवेगळ्या जिन्नस, पक्वानांनी घरे अगदीमोहरून जातात.

मीही पुण्याहून सणाच्या याकालावधीसाठी सुट्टी घेऊन वसईस घरी परतत होतो.वर्षाची अखेर आणि त्यात नाताळच्या उत्सवाचा आनंद.शनिवार असूनही ट्रेनमध्ये तशी वर्दळ कमीच होती.वसई स्टेशन येण्यास अजून दोन तास तरी होते.संध्याकाळचे सात वाजलेत, हे पाहून मी लगेच घरीआईला फोन लावला.‘‘रिपोर्ट कलेक्ट केलेत का?’’ आईच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं आणि त्यासाठी काही मेडिकलचाचण्या करायच्या होत्या. त्याचे रिपोर्ट संध्याकाळीसहानंतर मिळणार होते.

‘‘हो, केले कलेक्ट. वाचायचा प्रयत्नही केला, पणकाही कळत नाही. आज डॉक्टर नव्हते. त्यात उद्यारविवार. सोमवारीच दाखवावे लागतील.’’ आई फोनवरूनमला सांगत होती.

‘‘हम्म... मला जरा फोटो काढून व्हाट्‌सॲपवर सेंडकरतेस का?’’

मेडिकल टर्म्स इंटरनेटवर पाहून आपल्यापरीने काही रिपोर्ट कळतोय का ते पाहू, असा विचार करूनमी विचारले.पाचच मिनिटांत आईचा त्या रिपोर्टच्या इमेजेसचाव्हाट्‌सॲप मेसेज आला. रिपोर्ट खूपच वर्णनात्मकअसल्याने काही कळत नव्हते. नेहमीसारख्या रेफरन्सरेंजेसही त्यात नव्हत्या. एकेक मेडिकल टर्म्स इंटरनेटवरसर्च करत असताना रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळेला उल्लेखकेलेला ‘कार्सेनोमा’ हा अनोळखी शब्द मी गुगलवरटाकला आणि गुगलने दिलेल्या सर्च रिझल्ट्‌सने पोटातधस्स झालं. सगळ्या रिझल्ट्‌समध्ये ‘कॅन्सर’ हा शब्दठळकपणे दिसत होता. मी आवंढा गिळला. माझा घसाअचानक कोरडा पडल्याचे जाणवले. बॉटलमधीलपाणीही संपले होते. हात-पाय थंड पडले, डोके जड झाले.उरात एक अनामिक भीती दाटून आली होती. कसाबसाप्रवास करत मी घरी पोहोचलो.

‘‘काही कळलं का इंटरनेटवरून?’’

माझ्या खांद्याची बॅगघेत आईने विचारले. तिच्याही मनात संशयाने घर केले होते.

‘‘नाही. आता सोमवारी डॉक्टरांनाच दाखवू.’’

मीखोटे अवसान आणत खोटेच म्हटले....वडिलांबरोबर बोलून पुढची चक्रे मग मी वेगानेफिरवली. सोमवारी आईला तडक मुंबईला घेऊन गेलो.तेथील एका इस्पितळात एका डॉक्टरांना दाखवले.त्यांनीही रिपोर्ट पाहून आईच्या पोटात दुखत असण्याचेकारण पोटात असलेली गाठ हे आहे, असे सांगितले व तीगाठ कॅन्सरची आहे, ह्यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले.ती गाठ काढण्यासाठी ताबडतोब ऑपेरेशन करणे भागहोते.नाताळ तीन दिवसांवर येऊन ठेपला होता.

‘‘तुम्हालाऑपरेशनसाठी नाताळ सण उरकून इस्पितळात भरतीव्हायचं असेल तरी चालेल...’’ अशा केसेसची सवयअसल्याने त्या डॉक्टरांच्या असिस्टन्ट डॉक्टरने सहजपणेआम्हाला विचारले.

‘‘नाही डॉक्टर, आम्हाला ताबडतोब भरतीव्हायचंय.’’

असे म्हणत आम्ही दुसऱ्याच दिवशी आईलाइस्पितळात भरती केले. नाताळच्या आदल्या दिवशीआईचे ऑपरेशन पार पडले.ऑपरेशन झाल्यानंतरची पहिली रात्र असल्याने मीहॉस्पिटलमध्ये वस्तीसाठी थांबलो.नाताळनिमित्त हॉस्पिटलमध्ये बरीच रोषणाई केलेलीदिसत होती. हॉस्पिटलच्या प्रत्येक मजल्यावरीलव्हरांड्यात नर्सेसनी ख्रिसमस ट्री डेकोरेट केलेला होता.त्याच्या पुढ्यात बाळयेशूच्या जन्माचा देखावाहीमांडलेला होता. मी नाताळाच्या सणाच्या पूर्वसंध्येलाप्रथमच ‘इस्पितळ’ अशा अगदी अनपेक्षित ठिकाणी होतो.तोच काही नर्सेस व इस्पितळातील कर्मचारी वर्ग कॅरेलसिंगिंग करत आपापल्या परीने तेथील चिंताग्रस्त रुग्णांना वत्यांच्या नातेवाइकांना चीअरअप करत प्रत्येक वॉर्डमधूनफिरत असल्याचे मी पाहिले.नाताळचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. मी त्यानर्सेसना इस्पितळातील उपस्थित लहान मुलांना भेटवस्तूवाटताना पाहिले आणि मला माझे लहानपण आठवले.

मी विचार करू लागलो... लहानपणी मला मिळणाऱ्या भेटवस्तूंमुळे नाताळ आवडायचा, थोडा मोठा झाल्यावरनवे कपडे मिळतात म्हणून नाताळची मी वाट पाहायचो, तरपुढे तारुण्यात मित्रांबरोबर पाटर्या करण्याचे अधिकृतकारण म्हणून मला ‘ख्रिसमस ईव्ह’ आवडू लागला होता,आणि आता काही वर्षांपासून कुटुंबीयांसोबत काही निवांतक्षण व्यतीत करणे इथपर्यंतच आता या उत्सवाचे प्रयोजनसीमित झाले होते. सणाच्या मागे जरी एखादे धार्मिकनिमित्त असले, तरी तो उत्सव साजरा करण्यामागचीआपली कारणे मात्र वेगळीच असतात.

मी आईला ज्या खोलीत ठेवले होते तिथे परत आलो.ऑपरेशन थिएटरमधून बेडवर आणल्याला सात-आठतास उलटूनही आई अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती.‘काय होईल आईचं? किती वेळ लागेल ह्यातून रिकव्हरव्हायला? मुळात ती रिकव्हर होईल की नाही?’ काहीचकळत नव्हतं. कॅन्सर म्हणजे अंधारातील वाट. त्यावाटेवरून चाचपडत चालणे इतकेच काय ते आपल्याहातात असते. तो प्रवास किती वेळ चालेल, किती खडतरअसेल याचा आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही.विचार करून करून डोके जड झाले होते. संपूर्ण दिवसाचाथकवा, ऑपरेशनपूर्वीची धावपळ, सर्जरी पूर्ण होईपर्यंत6-7 तास बाहेर येरझाऱ्या घालून शरीर गलितगात्र झालेलेहोते... पेंगुळले होते. त्राण संपलेले होते.गुंगीत असूनही आईच्या चेहऱ्यावरील थकवा जाणवतहोता. काळवंडलेला निस्तेज चेहरा, नाका-तोंडातीलनळ्या, निपचित पांढऱ्या चादरी खाली पहुडलेलं बेशुद्धअवस्थेतील शरीर... बाजूला विविध औषधांच्यादाटीवाटीने भरलेले ते बाजूचं टेबल आणि निळ्या रंगाच्याझीरो बल्बचा त्या दहा बाय दहाच्या खोलीत पडलेला अंधुकप्रकाश...

मी आईच्या बेडशेजारीच असलेल्या खुर्चीत बसतविचार करत होतो. ‘आता कुठे संध्याकाळचे सात वाजलेहोते. उद्याची सकाळ कधी होईल?’ त्याहीपेक्षा या दुःखाचीपहाट कधी होईल? एक दीर्घ श्वास घेत मी डोळे मिटले.‘‘डेव्हिड...’’ मला कोण हाक मारतोय म्हणून मी डोळेपरत उघडले अन्‌ आजूबाजूला पाहिले. खोलीत तर कुणीचतिऱ्हाईत दिसत नव्हते, फक्त हळूहळू फिरणाऱ्या फॅनचाचकाय तो घरघर असा आवाज येत होता. आई अजूनही गाढझोपेत होती. मी परत डोळे मिटले.

‘‘अरे डेव्हिड...’’

परत आवाज सुरू झाला.

“तुला भीती वाटतेय, कारण कॅन्सर म्हणजे मृत्यू- असेसमीकरण तुझ्या डोक्यात बसलेले आहे.’’

डिसोझा सरांचाआवाज होता तो. मला खूपच थकवा वाटत होता. मी डोळेतसेच बंद ठेवले.

‘‘एक्झॅक्टली! थोडक्यात, कॅन्सरबाबत असलेल्याअज्ञानामुळे. सध्या कॅन्सरच्या औषधोपचारांमध्ये बरेचआमूलाग्र बदल होत आहेत.’’ ॲड.अनुपहीत्यांच्याकडील माहिती शेअर करत होते.

‘‘देवापेक्षा विज्ञानावर जास्त विश्वास ठेवणे गरजचेआहे,’’ सुनीलाही या चर्चेत सूर मिळवत म्हणाली.

‘‘ॲक्च्युली, आता ना यात एवढे रिसर्च झाले आहेकी, मेजॉरिटी केसेसमध्ये पेशंट कॅन्सरने मरण्यापेक्षा तोशेवटपर्यंत बरोबर घेऊन जगू शकतो- आपल्याडायबिटिससारखं!’’ फ्लोरीच्या या बोलण्याने माझ्याचेहऱ्यावर आशेची एक लकेर उमटली. काहीसा आधारआला मला तिच्या बोलण्याने.

‘‘शेवटी मृत्यू कोणाला चुकला आहे का? हार्ट ॲटॅक,अपघात ह्याने धडधाकट तरुण काही सेकंदांत मृत्युमुखीपडतो. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींत काही क्षणांतहोत्याचं नव्हतं होतं.’’ दीपेश नेहमीच्या शांत आवाजातउद्गारला.

‘‘...आणि जरी कॅन्सरने मृत्यू जवळ आला आहे असेजाणवले, तरी आपल्या कुटुंबीयांसह वा नातेवाइक-हितचिंतकांसह राहिलेले क्षण आनंदाने व्यतीत करूनकृतार्थपणे मृत्यूला कवटाळणे कधीही चांगले!’’ रामदेशमुख दीपेशचे वाक्य पूर्ण करत म्हणाले.

मंचातील सदस्य असे एकेक करीत आपले मत, आपलीसहानभूती दर्शवीत होते. मी शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकतहोतो. हळूहळू सर्वांचे आवाज अचानक कमी-कमी होत गेलेआणि सगळ्यांचे चेहरेही हळूहळू धूसर होऊ लागले. एकनिरव शांतता खोलीत पसरली. मी वर पाहिले. खोलीतीलनिळ्या रंगाच्या झीरो बल्बचा अंधुक प्रकाश अचानकनाहीसा होऊन आता तिथे पांढऱ्या आकाशकंदिलाचातितकाच पांढरा शुभ्र प्रकाश पसरला होता. ग्लुकोजचीबाटली ज्या स्टॅन्डला टांगलेली होती तो स्टॅन्ड आणित्यावरील नळीही लाल व निळ्या रंगाच्या छोट्या-छोट्याप्रकाशमाळेने सजलेला दिसत होता. आईच्या बाजूलाअंगात सर्जनचा सफेद एप्रन व डोक्यावर सांताक्लॉजचीलाल रंगाची टोपी घातलेले डॉक्टर उभे होते व तिला काहीतरी भेटवस्तू देत होते. त्याच वेळी खोलीच्या चारहीभिंतींचंही समाज विकास मंडळातील पुस्तकाच्या उंच-उंचकपाटात रूपांतर होताना दिसत होतं...

‘‘अरे डेव्हिड... घसा सुकलाय... थोडे पाणी देतोस का?’’आईच्या हाकेने मी चटकन भानावर आलो. सकाळचीसूर्यकिरणे खिडकीतून आत डोकावत होती. घड्याळात पाहतोतर, सकाळचे साडेसात वाजले होते. काल रात्री खुर्चीतबसल्या-बसल्या माझा डोळा कधी लागला, हेच मला कळलेनव्हते. मी तिथेच झोपी गेलेलो होतो.‘‘हो, देतो- देतो...’’ थर्मासमधील गरम पाणीग्लासमध्ये घेऊन मी तो ग्लास आईला दिला.

‘‘आता कसं वाटतंय ग?’’ मी विचारले.

आई शुद्धीवरआली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला.

‘‘अजून थोडं अशक्त वाटतंय. जरा खिडकीचा पडदासरकावतोस का?’’ असे म्हणत आईने परत डोळे मिटले.‘‘हो-’’ असे म्हणत मी पडदा बाजूला केला. सूर्याच्याकोवळ्या किरणांनी ती छोटी खोली प्रकाशमान झाली.कडकडीत थंडीमुळे तो उबदारपणा हवाहवासा वाटणारा होता.मलाही एक नवा हुरूप आल्याचे जाणवले. विवेकमंचचक्क स्वप्नात माझ्या मदतीला आला होता. मंचाची चर्चाआता नेणिवेच्या पातळीवर झिरपली होती. मोबाईलइंटरनेटवरून कॅन्सर या आजाराविषयी जितकी माहिती गोळाकरता येईल तितकी मी गोळा करत होतो. कॅन्सर, त्याच्याविविध स्टेजेस, केमोथेरपी, जेनेटिक्स... जी माहिती हातीलागेल ती मी वाचत होतो. प्रचलित गैरसमज, आधुनिकतंत्रज्ञान ह्याविषयी ज्ञानात बरीच भर पडत होती. कॅन्सरच्याआजारात पूर्ण भिस्त डॉक्टरांवर ठेवण्याऐवजी आपणहीत्या-त्या विशिष्ट स्थितीतील आजारावर काय लेटेस्टसंशोधन झाले आहे, त्याची माहिती आपल्या परीनेइंटरनेटवरून काढून डॉक्टरांबरोबर चर्चा करू शकतो, इतक्यावेगाने या विविध आजारांत आज संशोधन होत आहे.

इंटरनेटम्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढा मोठामानवजातीचा शोध आहे. ज्ञानाची भांडारे त्याने सर्वांनाकोणताही शैक्षणिक, भौगोलिक भेदभाव न करता खुलीकेलेली आहेत. कॅन्सरच्या लढाईत किती तरी लहान बालके,तरुण माता, युवक-युवती धारातीर्थी पडले आहेत.त्याचबरोबर किती तरी शास्त्रज्ञ, activtists यांनी यासंबंधीआपापल्या परीने योगदान दिलेले आहे. हे सर्व वाचून एकवेगळाच आत्मविश्वास माझ्यात आला.

दहाएक दिवसांनी आईला डिस्चार्ज मिळाला. आम्हीतिला घरी आणले. आईच्या प्रकृतीत हळूहळू सुधार होऊलागला. तिलाही मग मी तिच्या आजाराची कल्पना दिली.तिनेही या आजाराचा स्वीकार केला. नंतर तर तिनेकेमोच्या सगळ्या सायकल्सही पूर्ण केल्या आणि गेल्यादोन वर्षांपासून तिच्या प्रकृतीत खूप सुधार आहे.काही वर्षांपूर्वी माझ्या आजीचंदेखील कॅन्सरचं निदानझालं होतं. जेव्हा ते मला कळले होते, तेव्हा मी खूपहादरलो होतो. ‘तिला देवाने बरे करावे’ म्हणून मी तेव्हाबरेच उपास-तपास केले होते. बऱ्याच चर्चेसमध्ये मीप्रार्थना वाहिलेल्या होत्या. पुढील सहा महिन्यांतच ‘बय’अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती. या वेळेला मात्रइतका बाका प्रसंग माझ्या आईवर ओढवूनही मलाउपासतापास, प्रार्थना ह्यापैकी काहीही करावेसे वाटलेनाही. जो काही प्रसंग उद्‌भवला आहे, त्याविषयीकोणताही पूर्वग्रहदूषितपणा न बाळगता, पूर्ण तटस्थपणेमाहिती गोळा करून त्या प्रसंगाला शक्य तितक्या हिमतीनेतोंड देणे हाच त्या प्रसंगावर मात मिळविण्याचा खरातोडगा आहे हे मला थायलंडच्या ट्रिपनंतर पुन्हा एकदाजाणवले. विचारांबरोबर माझ्या कृतीतही मंचाचा विचारहळूहळू भिनायला सुरुवात झाली होती.

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस, वसई

danifm2001@gmail.com

पुस्तक परिचय

कादंबरीमय वारकरी संतांचे दर्शन

किरण गाढवे

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीचीऐतिहासिकता ही चरित्र-इतिहास-चरित्रात्मककादंबरी, चमत्कारांचे उदात्तीकरण, चमत्काराविषयी वेगळी भूमिका, चिकित्सेचाअभाव या अनुषंगाने अभ्यासण्याचा प्रयत्न यापुस्तकात केलेला दिसतो. या कादंबरीलेखनातकाही मर्यादाही आढळतात. त्याविषयी मतमांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात, ‘वारकरीसंतविषयक कादंबरीकारांनी सांप्रदायिक चरित्रांचाआधार घेऊन कादंबरीलेखन केलेले आहे.पारंपरिक चरित्रातील विविध चमत्कारकादंबरीकारांनी काव्यात्मकतेने व नाट्यात्मकतेनेरेखाटून चमत्कारांतून संतांचा गौरव केला आहे.वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी ऐतिहासिकतेचावेध घेण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरलेली आहे.तत्कालीन विविध संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा, श्री विठ्ठल व पंढरीची वारी, इत्यादी चित्रणकादंबऱ्यांतून येत असले तरी त्यामध्येऐतिहासिक दृष्ट्या चिकित्सेऐवजीभावनाशीलताच आढळते.

महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा लाभलेला संप्रदायम्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिले जाते. ही परंपराअजूनही टिकून आहे. संतांचे विचार टिकून आहेत. हेविचार टिकून राहण्यामागे काहीएक कारणे आहेत.त्यापैकी एक कारण म्हणजे, वारकरी संतांनी आपल्याविचारांना कृतीची जोड दिली आहे. सामान्यांना समजेलअशा सरळ-साध्या भाषेत आपले विचार मांडलेलेआहेत. ज्यांना लिहिला-वाचता येत नाही त्यांनाहीज्ञानेशांची ओवी, तुकोबांचे अभंग तोंडपाठ आहेत.वारकरी संतांच्या साहित्याचा व कार्याचा प्रभाव कीर्तन,कविता, चरित्र, नाटक, नभोनाट्य, सिनेमा इत्यादीमाध्यमांतून जाणवतो. कादंबरी या लोकप्रिय साहित्य-प्रकारातून वारकरी संतांचे जीवनचरित्र अनेक लेखकांनीरेखाटले आहे.त्यातील काही कादंबऱ्यांचा आस्वादक दृष्टिकोनातूनघेतलेला वेध म्हणजे ‘वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’हे पुस्तक होय.

वारकरी संतांवर मराठी साहित्यातूनमोठ्या प्रमाणावर लेखन झालेले आहे. सदर पुस्तक त्यांनीमहाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंग चरणीविनम्रतेने अर्पण केले आहे.‘वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’ या पुस्तकाचीविभागणी लेखकाने पाच प्रकरणांमध्ये केलेली आहे.

 • संत चरित्रात्मक कादंबरीच्या प्रेरणा,
 • वारकरीसंत चरित्रात्मक कादंबरीचे स्वरूप,
 • वारकरी संतदर्शन,
 • वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीतील समाजचित्रण,
 • वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीची ऐतिहासिकता.
 • या पाच प्रकरणांतून डॉ.राजेंद्र थोरात यांनी वारकरीसंतविषयक कादंबऱ्यांवर ओघवत्या शैलीत लेखन केलेआहे. वारकरी संतांचे जीवनचरित्र व त्यांच्याजीवनावरील कादंबऱ्या अभ्यासण्याच्या दृष्टीने हे पुस्तकमहत्त्वाचे आहे.कादंबरी या लोकप्रिय साहित्यप्रकारामध्ये संतांनाउशिरा न्याय मिळाला आहे. स.कृ. जोशी यांची ‘ताटीउघडा ज्ञानेश्वरा’ ही कादंबरी 1958 मध्ये प्रसिद्ध झाली.नंतरच्या काळात ‘मुंगी उडाली आकाशी’, ‘मोगराफुलला’, ‘आनंदओवरी’, ‘घास घेई पांडुरंगा’,‘महाभागवत’, ‘मुक्ताई’, ‘शांतिब्रह्म’, ‘महाद्वार’ इत्यादीकादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या दिसतात. प्रस्तुत पुस्तकामध्येया कादंबऱ्यांच्या अनुषंगाने विचार केलेला आहे.त्याचबरोबर चरित्र या प्रकाराची मीमांसा केलेली आहे.

  चरित्र आणि कादंबरीमधील साम्य-भेद याविषयी विवेचनकेले आहे.वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी लेखनामागीलप्रेरणांबद्दल विचार मांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात,‘‘संतविषयक आदरातून व श्रद्धेतून कादंबरीलेखन झालेलेआहे. प्राचीन काळापासून समृद्धपणे बहरत असलेल्यासंतविषयक ‘चरित्रा’तून कादंबरीकारांना प्रेरणा मिळालीआहे, तसा निर्देशही कादंबरीकारांनी कादंबरीमध्ये केलेलाआहे. ‘माणूस धर्माची’ शिकवण कादंबरीमधून देणे याप्रेरणेतूनही संतविषयक चरित्रात्मक कादंबरीचे लेखनझालेले आहे. कादंबरी या प्रकारामध्ये कल्पनेला वावअसतो, त्यामुळे या वाङ्‌मयप्रकाराची निवडकादंबरीलेखकांनी केलेली दिसते. त्याचबरोबरचरित्रनायकाविषयीचा आदर व श्रद्धाभाव, संतविषयकसमृद्ध चरित्र वाङ्‌मय, चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचाशोध घेणे, संस्कृतीचा अभिमान व माणूस धर्माचीशिकवण अशा विविध प्रेरणांमधून चरित्रात्मक कादंबरीचेलेखन झालेले दिसते. वारकरी संतांच्या व्यक्तिमत्त्वाचाशोध घेणे या प्रेरणेमधून-देखील कादंबरीलेखन झालेआहे.

  ‘कादंबरीकार चरित्रनायक यांच्या जीवनातील दुवेजोडण्याचा यशस्वी प्रयत्न करतो.’ याविषयीचे सोदाहरणविवेचन लेखकाने केले आहे.वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीचे स्वरूप स्पष्टकरताना सर्वच संतांच्या जीवनावरील कादंबरीलेखनाचाविचार केलेला आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव,एकनाथ, तुकाराम, त्याचबरोबर मुक्ताई, चोखोबा,जनाबाई, सेनामहाराज, निळोबा आदी संतांच्याजीवनावरील कादंबरी-लेखनाच्या स्वरूपाचा विचारकेलेला दिसतो. या सर्व कादंबऱ्यांचा विचार केल्यासअसे लक्षात येते की, संतांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेलेकादंबरीकार संतांच्या जीवनाचा वेध सात्त्विकतेने वलालित्यपूर्ण भाषेमध्ये घेतात. विविध घटना-प्रसंगकार्यकारणभावाने जोडलेले दिसतात. ‘पुढे काय’, अशीउत्सुकता वाचकांमध्ये निर्माण होते. कथानकाला एकात्मसंस्कार कसा लाभेल, याचा विचार कादंबरीकारांनीकेलेला दिसतो. इतर पात्रांच्या तुलनेत चरित्रनायकाचागौरव कसा होईल, या दृष्टीने कलात्मक लेखन लेखकांनीकेलेले दिसते. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील विविधसंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला दिसतो. माणूसम्हणून संतांना करावा लागलेला संघर्ष, त्यांनी केलेलेसमाजप्रबोधन इत्यादी दृष्टिकोनांतून बऱ्याचकादंबरीकारांनी कादंबरीलेखन केलेले दिसते. त्यांच्याव्यक्तिमत्त्वाचे विविध पदरही त्यामधून उलगडलेलेदिसतात.

  ‘वारकरी संतदर्शन’ या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये कवी,तत्त्वज्ञ, संघटक, प्रचारक, लोकशिक्षक असणाऱ्यावारकरी संतांचे जीवनचरित्र अतीव आदर व श्रद्धेतूनकादंबरीकारांनी सुलभतेने चित्रित केले आहे. संत ज्ञानेश्वरव संत तुकाराम यांच्यावर अधिक संख्येने कादंबरीलेखनझाले आहे.वारकरी संत चरित्रात्मक कादंबऱ्यांमध्ये मध्ययुगीनसमाजजीवनाचे चित्रण आढळते. संतांनी दिलेलीनीतिमूल्यांची शिकवण, उत्तरेकडील भयावह स्थिती,यवनी आक्रमण, संतांनी केलेले चमत्कार, तत्कालीनकुटुंबपद्धती, विवाहपद्धती, कर्मठ रूढी-परंपरा, धार्मिकअवडंबर, शूद्र देवांची पूजा, आर्थिक व्यवस्था,सामाजिक जीवनाचे चित्रण, संतांची लोकशिक्षकाचीभूमिका इत्यादी परिप्रेक्ष्यातून संतविषयक कादंबरीचीसामाजिकता अभ्यासणे महत्त्वाचे आहे.एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिकव्यवस्था अभ्यासण्याचा प्रयत्न यामधून केलेला दिसतो.तत्कालीन यादवकाळ, मध्ययुगीन काळ आणिशिवकाळाची सामाजिकता अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातूनहे कादंबरीलेखन अतिशय महत्त्वाचे आहे.

  विविध आक्रमणांच्या काळात मराठी समाजाची अस्मिता जागृतठेवण्याचे कार्य संतांनी केलेले दिसते. वारकरी संतचरित्रात्मक कादंबरीची ऐतिहासिकता ही चरित्र-इतिहास-चरित्रात्मक कादंबरी, चमत्कारांचे उदात्तीकरण,चमत्काराविषयी वेगळी भूमिका, चिकित्सेचा अभाव याअनुषंगाने अभ्यासण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेलादिसतो. या कादंबरीलेखनात काही मर्यादाही आढळतात.त्याविषयी मत मांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात,‘वारकरी संतविषयक कादंबरीकारांनी सांप्रदायिकचरित्रांचा आधार घेऊन कादंबरीलेखन केलेले आहे.पारंपरिक चरित्रातील विविध चमत्कार कादंबरीकारांनीकाव्यात्मकतेने व नाट्यात्मकतेने रेखाटून चमत्कारांतूनसंतांचा गौरव केला आहे. वारकरी संत चरित्रात्मककादंबरी ऐतिहासिकतेचा वेध घेण्याच्या दृष्टीने कुचकामीठरलेली आहे. तत्कालीन विविध संप्रदाय, गुरू-शिष्यपरंपरा, श्री विठ्ठल व पंढरीची वारी, इत्यादी चित्रणकादंबऱ्यांतून येत असले तरी त्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्याचिकित्सेऐवजी भावनाशीलताच आढळते.कादंबरीकारांनी पारंपरिक चरित्रांचा आधार घेतलेलाअसल्यामुळे दंतकथा व चमत्कार मोठ्या प्रमाणावरआढळतात,’ अशा प्रकारच्या मर्यादांचा उल्लेखही यापुस्तकात आलेला आहे.

  वारकरी संत, महाराष्ट्र संस्कृती अभ्यासण्याच्या दृष्टीनेहे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. वारकरी संत ववारकरी संप्रदाय यावर यापुढील काळात डॉ.राजेंद्र थोरातयांच्याकडून लेखन होईल, अशी अपेक्षा या पुस्तकातूननिर्माण होते. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांना,संशोधकांना व वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल,असे वाटते.

  प्रा. किरण गाढवे
  kirangadhave99@gmail.com

  वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी
  प्रा.डॉ. राजेंद्र थोरात,
  संस्कृती प्रकाशन, पुणे
  फोन. : 020-24497343
  पृष्ठे - 210 किंमत - 250 रुपये

  चर्चामंथन

  कृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढविणे शक्य

  सुखदेव काळे

  मुक्त अर्थव्यवस्था आली आणि पर्यावरण, पाणी हे विषय मागे पडून आय.टी. उद्योग, मोठेप्रकल्प, मोठी अंदाजपत्रके यांमध्ये मोठी टक्केवारीआली आणि घात झाला. पाणलोट विकास, माती-पाणी-संवर्धन, वृक्षारोपण हे जसे कालबाह्यझाले, तसे शेतीच्या एनए प्लॉटींगनेअक्राळविक्राळ रूप धारण केले. कोकणात जिथेआंबा, काजूच्या बागा उभ्या करण्यात आम्हीतांत्रिक मदत केली, त्या जागी फार्म हाऊस आणिजंगलात, उभ्या उतारावर जेसीबी आले.पावसाळ्यात ती माती नदीमार्गे समुद्राला जाते, जिला निसर्गात तयार व्हायला किमान 500 वर्षेलागली होती. मातीचा आधार गेला, झाडेपडायला लागली. टोलेजंग बंगले (ज्यांचा वापरवर्षातून तुरळक) उभे राहायला लागले, तेव्हाचकुठे तरी मनात पाल चुकचुकली, हा तरआत्मनाश. उजनी धरण 123 टीएमसी (महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण) पूर्णक्षमतेनेभरूनही कोरडे पडल्याचे छायाचित्र लोकसत्ता (3 जून) रोजी पाहिले आणि धस्स झाले.

  दि.30 मार्च 2019 च्या साधना अंकात रत्नाकरपटवर्धन यांचा ‘महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर तोडगा’ हालेख वाचला. महाराष्ट्रातील भीषण पाणीटंचाईच्यापार्श्वभूमीवर त्यानी तो तळमळीने लिहिला हे जाणवते.त्यातील प्रतिपादनात काही तथ्ये आहेत. परंतु त्यातीलभूजल आणि भूगर्भातील रचना, पाणी साठवणूक क्षमतायाविषयीची माहिती अचूक नसून, ती वरवरच्यामाहितीवर विसंबून लिहिली आहे असे वाटते.‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ हीगोविंदाग्रज यांची कविता महाराष्ट्राचे भौगोलिक वर्णनकरते; त्यातून हे राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्तआहे, हा निष्कर्ष योग्य, पण तो फक्त सह्याद्रीपुरता आणितोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. इतर विभाग जसेकोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशांना लागूपडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणातील जांभादगड ठिसूळ, सच्छिद्र असून, त्यात पाणी साठवूनठेवण्याची आणि अंतसरण प्रक्रियेवाटे भूगर्भात संक्रमितकरण्याची त्याची क्षमता अफाट आहे. कोकण आजपर्यंतभूगर्भजलावर विसंबून होता, आजही आहे. या वर्षीरत्नागिरी, रायगडमध्ये काही भागात तीव्र पाणीटंचाईआहे, त्याची कारणे पुढे विषद केली आहेत.

  भारतात सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात असून, तीसह्याद्रीच्या पायथ्याला आहेत. दोन्ही बाजूंनी कोकण,पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यावर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकइत्यादी शहरांची तहान भागते, तर धरणांपासून 250किमीपर्यंतचा प्रदेश (कुकडी कालवा उदाहरण)कालव्यांनी सिंचित होत असल्याने, त्या प्रदेशातलीभूगर्भजल पातळी संपृक्त असते. त्याचा प्रत्यय त्याचअंकातील अंकुश आवारे यांचा लेख वाचल्यास येईल.मुद्दा असा की, भूगर्भातील नैसर्गिक जलसाठ्याच्यामर्यादा लक्षात घेऊन विज्ञानाच्या आधारे त्यावर मातकेली आहे.आळेफाटा येथून महाराष्ट्र कमी पर्जन्यछायेचा प्रदेशसुरू होतो. तो नगर, पारनेर, पाथर्डी, माण, खटाव,आटपाडी, तासगाव असा विस्तृत होत विजापूरपर्यंतजातो. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार हे याच बेल्टमध्ये येतअसून, शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून तेथील भूगर्भजलकिती वाढले हे सर्वश्रुत आहे.

  रत्नाकर पटवर्धन प्रतिपादनकरतात तसे ‘भूगर्भातील रचना माहिती नाही’, म्हणूननाही तर त्या ‘उपलब्ध माहितीचा अभ्यास करूनच’ हेझाले आहे. अंडरग्राउंड बंधारा ही पटवर्धन यांनीमांडलेली कल्पना राळेगणसिद्धी येथे 1990 मध्येराबवली गेली आहे, त्याचा दृश्य परिणाम विहिरींचीजलपातळी वाढण्यात दिसून येतो.यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भूगर्भात जलसाठाकरण्यासारखी रचना आहे आणि पाऊस फार कमीझालेला नाही. तरीही सरासरीइतका पाऊस पडूनहीउन्हाळ्यात टंचाई का होते? याचे कारण हजारो वर्षांचेपाण्याचे साठे प्रचंड गतीने उपसले जात आहेत, आणिभूगर्भजल पुनर्भरण तर नैसर्गिक गतीनेच होत आहेत.वाढती लोकसंख्या, शहरे, उद्योग, शेती यांच्यासाठीखोल विहिरी खोदून पाणी उपसण्याचे तंत्रज्ञान वाढत गेले,याचा हा एकत्रित परिणाम आहे.

  ही टंचाई सिंचनक्षेत्रनसलेल्या सगळ्या ठिकाणी तीव्र आहे. रत्नागिरी-रायगडजिल्ह्यात या वर्षी सरासरीइतका पाऊस पडूनही शेकडोगावे व वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होतोय,त्यालाही हेच कारण आहे. उदा. खात्यात जमा तेवढीचपण खर्चात वाढ, म्हणून इतरांकडून उसणे घेणे- तसे टँकरपाणीपुरवठा म्हणजे दुसरीकडून उसणे पाणी. आज सरकारखर्च करतेय एवढाच काय तो बदल.रत्नाकर पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे काही ठिकाणीमात्र भूगर्भातील रचना अनुकूल नाही आणि पर्जन्यमानहीकमी, तिथे पाणीटंचाई भयावह आणि ऑक्टोबरपासूनटँकर हे सत्य आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठीमहाराष्ट्रात पटवर्धन यांनी सुचविल्याप्रमाणे बोअर ब्लास्टपद्धत वापरून ‘भूगर्भजल सर्व्हे आणि विकाससंचालनालय, पुणे’ यांनी काही प्रमाणात यश मिळविलेआहे.असे प्रयोग उंबरडा (जिल्हा यवतमाळ), भल(गुजरात) घोटकरवाडी (ता.अकोले, अहमदनगर),सरस्ते (तालुका पेठ, जि. नाशिक) आणि इतरही. हे सर्वप्रयोग GSDA भूगर्भजल सर्व्हे आणि विकास याविभागामार्फत केले गेले. पुण्यातील पाषाण येथील मैत्रीपार्क येथेही हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

  बोअर ब्लास्ट पद्धत

  पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मैत्री अव्हेन्यू,पाषाण येथे ही पद्धत अवलंबविली गेली. त्यातअस्तित्वात असलेल्या विहिरीच्या परिघात 15,21,33आणि 42 मीटर खोलीपर्यंत बोअर घेतले, दोनबोअरमधील जागा हैड्रोफ्रॅक्टरिंग करून पोकळ केली तरजिथून भूगर्भजल बाहेर जात होते, ती सिमेंटने बुजवली.त्यानंतर बोअरची क्षमता तपासली ती पुढीलप्रमाणेवाढली-

  3-7-90 । 160 लिटर/मिनिट 1-8-90 । 900 लिटर/मिनिट 16-8-90। 1300 लिटर/मिनिट

  हैड्रोफॅ्रक्टरिंग :(Hydro fracturing)

  असे काही प्रदेश आहेत की, तिथे उघडे बोडके खडकव तेही काळे, डेक्कन बेसाल्ट. उदा. घोटकरवाडी(ता.अकोले) येथे पाणलोट आधारित तत्त्वावर माथा तेविमोचकापर्यंत खडकात सुरुंग लावून कृत्रिम पोकळ्यानिर्माण केल्या, त्या एकमेकांना त्याच पद्धतीने जोडल्याआणि त्यातील पाणी विमोचकापर्यंत येईल व तेथीलविहिरीत उतरेल अशी रचना करून पिण्यासाठी पाण्याचीसुविधा निर्माण केली गेली.यात 56 सुरुंग पाच-सहा मीटर खोलीवर उडवले,त्यातून 15 लाख लिटर पाणीसाठवण क्षमता विकसितकेली. त्यापैकी 50 टक्के विहिरींतून उपलब्ध होईल, असेगृहीत धरले म्हणजे 7.5 लाख लिटर. मार्च ते मेपर्यंत150 माणसांना ते पुरेल अशी सोय त्यावेळी 50 हजाररुपयांत (1987) तयार करण्यात आली.

  एके काळी महाराष्ट्रात पाणलोट विकास उपक्रम,ठिबकसिंचन पद्धत, वृक्षलागवड यांवर अनेक संस्था कामकरीत होत्या. त्यात अण्णा हजारे, विलासराव साळुंखे,मोहन धारिया, वसंतराव गंगावणे (अमेरिकेतील सुखवस्तूनोकरी सोडून राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाददेऊन आलेले) डॉ.लोहिया, निरीडचे डॉ.चित्रे, युसुफमेहेरअली संस्थेचे जी.जी.पारीख असे अनेक लोक होते.अण्णा हजारे यांनी जर निव्वळ पाणलोटक्षेत्र विकासातकाम केले असते तर ते नोबेल पारितोषिकपात्र झालेअसते. या सगळ्यांसोबत चर्चा करण्याची संधी मलामिळाली. गंगावणे आणि निरीड यांच्यासोबत पालघरआदिवासी भागात काम करणाऱ्या संस्थेबरोबरपाणलोटक्षेत्र आराखडे तयार करण्यापासून निधीमिळविणे, प्रकल्प अहवाल लिहिणे आणि प्रत्यक्ष कामकरणे इतकी संधी मिळाली. फार मूलभूत काम मध्य प्रदेशव आंध्र प्रदेशमध्ये त्या वेळी होत होते आणि महाराष्ट्रत्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता.

  पण? पण मुक्त अर्थव्यवस्था आली आणि पर्यावरण, पाणीहे विषय मागे पडून आय.टी. उद्योग, मोठे प्रकल्प, मोठीअंदाजपत्रके यांमध्ये मोठी टक्केवारी आली आणि घातझाला. पाणलोट विकास, माती-पाणी-संवर्धन,वृक्षारोपण हे जसे कालबाह्य झाले, तसे शेतीच्या एनएप्लॉटींगने अक्राळविक्राळ रूप धारण केले. कोकणातजिथे आंबा, काजूच्या बागा उभ्याकरण्यात आम्ही तांत्रिक मदत केली, त्याजागी फार्म हाऊस आणि जंगलात, उभ्याउतारावर जेसीबी आले. पावसाळ्यात तीमाती नदीमार्गे समुद्राला जाते, जिलानिसर्गात तयार व्हायला किमान 500वर्षे लागली होती. मातीचा आधारगेला, झाडे पडायला लागली. टोलेजंगबंगले (ज्यांचा वापर वर्षातून तुरळक)उभे राहायला लागले, तेव्हाच कुठे तरीमनात पाल चुकचुकली, हा तरआत्मनाश.

  उजनी धरण 123 टीएमसी(महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण) पूर्णक्षमतेने भरूनहीकोरडे पडल्याचे छायाचित्र लोकसत्ता (3 जून) रोजीपाहिले आणि धस्स झाले. मनमाडला 18 दिवसांनी होतअसलेला पाणीपुरवठा आता 30 दिवसांनी, तरकेपटाऊनचा पाणीपुरवठा बंद, या बातम्या झोपउडवणाऱ्या आहेत. लोकसंख्या 133 कोटी, हे एक मुख्यकारण. प्रचंड काँक्रिटीकरण, रस्ते, घरे, मेट्रो, पूलइत्यादीसाठी प्रचंड पाणीवापर. तर भूगर्भातील पुनर्भणातव्यत्यय, हे सूक्ष्म पातळीवर घडत आहे आणि त्याचाहीहातभार पाणीटंचाई तीव्र होण्यात आहे.रत्नाकर पटवर्धन यांनी या विषयाला वाचा फोडली हेअभिमानास्पद आहे. या विषयावर जाणून घ्यायचे असेलतर 19-21 नोव्हेंबर 1990 या काळात ग्रामीण विकासमंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि भूगर्भजल सर्व्हे आणिविकास संचालनालय, यांनी आयोजित केलेल्या अखिलभारतीय परिषदेचे इतिवृत्त (938 पानी, इंग्रजीत असलेले)वाचावे. प्रस्तुत लेखातील प्रयोग या इतिवृतांतून घेतलेआहेत. सदर इतिवृत्त ‘संचालक, भूगर्भजल सर्व्हे आणिविकास संस्था, पुणे 411037’, येथे उपलब्ध होईल.

  सुखदेव काळेदापोली (रत्नागिरी)

  a2zsukhadeo@gmail.com

  संदर्भ : Proceedings of All India Seminar on Modern Techniques of Rain Water Harvesting, held at Pune, November 19-21,1990

  मुलाखत

  ‘शेंदूर’वर आधारित लघुपट करताना...

  अनिकेत कुलथे

  2015 मध्ये अवधूत डोंगरे या युवा लेखकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या स्वतंत्र चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत आणि काही इंग्रजी पुस्तकांचे अनुवादही त्याने केले आहेत. परंतु त्याचे अगदी सुरुवातीचे लेखन म्हणजे 2008-09 मध्ये (पत्रकारितेचा विद्यार्थी असताना) प्रकाशित झालेल्या साधना साप्ताहिकातील नऊ बालकथा. त्या कथांचे गेल्या वर्षी ‘तात्पर्य’ या नावाने पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्यातील ‘शेंदूर’ या कथेवर आधारित आठ मिनिटांचा लघुपट 17 जुलै 2019 रोजी पॉकेट फिल्मस या भारतातील नामवंत लघुपट वाहिनीकडून यु-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.

  झाडाखालचा शेंदूर फासलेला दगड आपण गावागावात; अगदी शहरातसुद्धा कोपऱ्या- कोपऱ्यावर बघतो. शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलाच्या मनात त्या देवाकडे पाहून निर्माण झालेले प्रश्न, त्याची उत्तरं शोधताना त्याने करून बघितलेला प्रयोग आणि श्रद्धा- अंधश्रद्धा याविषयी त्याच्या मनात निर्माण झालेली संदिग्धता हा या कथेचा गाभा आहे. श्रद्धा या विषयावर कोणालाही अंतर्मुख करू शकेल अशी ही कथा आहे. अनिकेत कुलथे हे ‘शेंदूर’ या लघुपटाचे दिग्दर्शक- छायाचित्रकार आणि संकलक असून त्यांनी याआधी चिकाटी, जाई, गो-सोलो आणि गंज हे लघुपट केलेले आहेत. ‘शेंदूर’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद-

  प्रश्न - शेंदूर कथा तुम्हाला कशी मिळाली? कुठे सापडली?

  - माझे एक दिग्दर्शक मित्र आहेत. मी त्यांच्या घरी गेलो होतो. कुणाच्याही घरी गेलं की, त्यांच्या पुस्तकांचा संग्रह चाळायची मला सवय आहे. तिथं मला एक छोटसं पुस्तक मिळालं अवधूत डोंगरे यांचं ‘तात्पर्य’ नावाचं. छोट्या-छोट्या नऊ कथा होत्या. मी सहज त्यातली पहिली कथा वाचली, मग ती आवडली म्हणून दुसरी वाचली. असं करत करत सर्वच कथा वाचल्या. पुस्तक आवडलं होतं. मग साधनात येऊन स्वतःसाठी त्या पुस्तकाची एक प्रत घेतली.

  प्रश्न - या पुस्तकातून ‘शेंदूर’ ही कथा शॉर्ट- फिल्मसाठी निवडण्यामागे काही खास कारण?

  • साधनातून पुस्तक आणून परत वाचलं, तेव्हा त्यातली शेवटची कथा ‘शेंदूर’ मला सगळ्यात जास्त आवडली. त्याचं कारण म्हणजे कथेचा विषय. सिनेमाच्या क्षेत्रात काम करायला लागल्यापासून ‘अंधश्रद्धा’ या विषयावर एखादा लघुपट बनवावा असं डोक्यात होतं. पण त्या दृष्टीने चांगली संकल्पना मिळत नव्हती. शेंदूर कथा वाचून असं वाटलं की, ‘येस, यावर लघुपट बनू शकतो.’

  प्रश्न - कथा तर ठरली. मग पुढे?

  • पुस्तकामध्ये लेखकाचा इ-मेल आयडी होता. मग त्यांना मेल केला की, लघुपट करण्यासाठी परवानगी हवी म्हणून. त्यांनी माझ्या मेलला रिप्लाय केला, माझं आधीचं काम पाठवायला सांगितलं. जेणेकरून त्यांना तपासायचं असावं की, माझ्या हातात कथा देणं योग्य होईल की नाही. युट्युबवर उपलब्ध असणाऱ्या माझ्या एक-दोन लघुपटांची लिंक मी त्यांना पाठवली. त्यांना माझं काम आवडलं असावं. कारण त्यानंतर त्यांचा मेल आला की, अनिकेत तू लघुपट बनव. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रॉयल्टीचा एक रुपयाही घेतला नाही. त्यामुळे, या लघुपटाची सुरुवात खूपच आनंदी आणि सकारात्मक झाली असं म्हणता येईल.

  प्रश्न - कथेत काही आवश्यक बदल करण्यापासून ते कलाकारांच्या निवडीपर्यंत... कथेचं लघुपटात रूपांतर करतानाची प्रक्रिया आणि अनुभव कसा होता?

  • कथेची पटकथा होताना त्यात काही बदल करावे लागले. पण कथेच्या मूळ संकल्पनेला हात न लावता आम्ही ते केले आणि अवधूत डोंगरे यांनी तशी परवानगी दिली होती. ‘चिकाटी’ हा जो लघुपट मी केला त्यात एक लहान मुलगा होता- अथर्व मांढरे- त्यालाच मी याही लघुपटासाठी घेतलं. चिकाटीच्या वेळी मी ऑडिशन्स वगैरे घेऊन त्याला निवडलं होतं. विजय कोटस्थानी हे अनुभवी नट आहेत, त्यांनी यामध्ये आजोबांची भूमिका केलीय. बाकी सगळे स्थानिक लोक घेतलेत, ते व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यांना फक्त सांगितलं होतं की, ॲक्शन काय करायचीय. उदाहरणार्थ, त्या झाडाखालच्या देवाला नमस्कार करून पुढे जा, एवढीच सूचना केलेली असायची. कॅमेरा कुठंय, कसा अँगल आहे, वगैरे त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्यांच्या लाईव्ह ऍक्शन शूट केल्या.

  त्यांच्याकडून काम करून घेणं तसं पाहिलं तर अवघड असतं; पण एकदम रिॲलिस्टिक शॉट मिळतात. लघुपटांना बऱ्याचदा बजेट कमी असतं. त्यामुळं व्यावसायिक कलाकार घेण्यापेक्षा हे परवडतंसुद्धा. हे लोकदेखील खूप हौसेने व प्रामाणिकपणे काम करतात. शेंदूरचं संगीत ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या सिनेमाचे संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केलंय. माझ्या आधीच्या लघुपटांचं संगीतसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. त्यांच्या संगीतानं या लघुपटाला अधिक जान आलीय असं म्हणता येईल.

  प्रश्न - तुम्ही काय सांगाल, हा लघुपट कोणासाठी आहे?

  • मला वाटतं हा विषय वैश्विक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलं अंतर शोधू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा लघुपट आहे. अधिकाधिक तटस्थ भूमिकेतून कथेला चिकटून राहून तो बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या आशयाच्या वैश्विकतेचा विचार करून संवाद कमी ठेवलेत आणि ॲक्शनमधून पात्रं अधिक बोलतील असं बघितलंय. इंग्रजीमध्ये सबटायटल्ससुद्धा दिलेली आहेत.

  कथेचा शेवट आश्चर्यकारक व स्वाभाविक आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा यांना पडताळून पाहणारे सर्वजण कथेतल्या त्या लहान मुलाशी स्वत:ला रिलेट करू शकतील. त्यामुळं भाषा, धर्म, प्रांत याची मर्यादा नसलेली ही संकल्पना आहे, म्हणूनच हा लघुपटदेखील तसाच अमर्याद आवाका असणारा आहे. तो सर्वांनी पहावा आणि बघून मला प्रतिक्रियादेखील कळवाव्यात. हा लघुपट पुढील लिंकवर पाहता येईल. https://www.youtube.com/watch?v=45w0PcJD6vY

  (मुलाखत व शब्दांकन : मृद्‌गंधा दीक्षित)

  अनिकेत कुलथे, पुणे

  kultheaniket07@gmail.com

  आवाहन

  मासवणच्या कन्याछात्रालयाची 25 वर्षे

  वर्षा गुप्ते

  बामणाच्या जन्माला जाशी त लिखूलिखू मरशी ।
  पणवारल्याच्या जन्मा येशी तर जंगलचा राजा होशी।।

  अशी समजूत असलेल्या आदिवासीचे वास्तव्यअसलेल्या मासवण पाड्यात समाजवादी महिला सभेनेप्रकल्प हाती घेतला. वास्तविक हा प्रकल्प आमच्याकामापेक्षा वेगळा होता. आदिवासी जीवन वेगळ्याधाटणीचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात यांचे जीवन जंगलजमिनीशी जोडलेले, तारफाच्या तालावर नाचून मनरिझवणारे, मिळेल ती कंदमुळे खाऊन, जमेल तेवढे कष्टकरणे, दारू गाळणे, दारू पिणे, मनमोकळे जीवन जगणे.पण आदिवासी समाजावर स्वार्थी हितचिंतकाचा वेढानकळत आवळला गेला आणि मग गुलामगिरीची,लाचारीची भित्र्या स्वभावाची परंपरा हाडीमासी रूळली.याचा विचार करून अनुतार्इं लिमये व त्यांच्या साथींनी याभागात सामाजिक विकासाचे पहिले पाऊल टाकले म्हणजेअज्ञान घालवणे, यासाठी शिक्षणाने कामाचा प्रारंभ1980 मध्ये केला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणदेण्याचे केंद्र तयार करणे आवश्यक वाटले. त्यांना कपडे,नाश्ता देणेही तेवढेच आवश्यक होते, कारण आर्थिकगरिबी!

  या उपक्रमाला समाजवादी विचाराच्या स्त्रीपुरुषांचे असंख्य हात पुढे आले. 1982 ते 1987 याकाळात प्रौढ वर्गाचे सायंकाळचे वर्ग सुरू केले, उपस्थितीकमी असली तरी वर्ग चालू ठेवले, असे 25 वर्ग सुरूकेले. हळूहळू शिक्षणाचे महत्त्व या समाजाला पटत गेले.आमची मुले शिकली पाहिजेत, ही मागणी वाढत गेली.हाच धागा पकडून ‘आदिवासी सहज शिक्षणपरिवारा’च्या संस्थापक अनुतार्इं लिमये यांनी मुलींसाठीवसतिगृह असायला हवे, असा विचार केला. कारणमुलींना पाड्यापासून शाळेत येणे सोईचे नव्हते, त्यातघरची परिस्थिती. याबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केलीव योजना अमलात आणली, साल होते 1991.

  राष्ट्रसेवादलाच्या कार्यकर्त्या इंदूताई नवले, वय वर्षे 70 यांनीही जबाबदारी स्वीकारली. 25 मुलींचे पहिले वसतिगृहमासवण, जिल्हा पालघर (पूर्वी ठाणे जिल्हा) येथे सुरूझाले. वसतिगृहास कन्याछात्रालय हे नाव आमचेविश्वस्त नवनीतभाई शहा यांच्या प्रेरणेतून मिळाले.वसतिगृह चालवताना आर्थिक प्रश्न होताच, शासनाच्यासमाज कल्याण खात्याकडे अनुदानासाठी आमचेहितचिंतक वासुदेव वर्तक यांनी योग्य ती धडपड करूनअनुदान मिळवले, या उपक्रमास पालकांचा मोठा सहभागव प्रोत्साहन मिळत गेले. आता वसतिगृहात 45 मुलीइयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी राहतात.समाज कल्याणचे अनुदान मिळेपर्यंत मुख्य संस्थेकडूनआर्थिक मदत घ्यावी लागते. वसतिगृहात काम करणाऱ्याआया मुलींच्या पोषण आहारासाठी काम करतात. जेवणचविष्ट, रूचकर व स्वच्छ असते. पहिल्यांदा यांनाचपातीची सवय नव्हती, आता रोजच्या जेवणात चपातीअसते. जेवणाचे मेनूकार्ड ठरलेले असते. आठवड्यातूनदोन वेळेला त्यांच्या आवडीची मासळीची भाजी असते.कडधान्ये, भाजी, आमटी-भात हे रोजच्या जेवणातअसतेच.

  कन्याछात्रालय म्हणजे मुलींचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे एक केंद्र बनले आहे. हा पाया इंदूताई नवलेयांनी घातला. खाद्यपदार्थ बनविणे, भरतकाम, विणकाम,अभिनय, गाणी या उपक्रमातून मुली घडत गेल्या. त्यांचीशैक्षणिक प्रगती वाढीस लागण्यासाठी अनुतार्इं लिमये,मीरा भागवत, तंबाखू बाई, सुधा तांबे व अनेक कार्यकर्तेइंग्लिश, गणित, मराठी या विषयांची मांडणी करत. मनोर,पालघर येथूनही श्री.महाजन व प्रा.गढरी इंग्रजीशिकवायचे. पालघरचे सर्वच हितचिंतक, कार्यकर्ते ‘हेछात्रालय आपलेच आहे,’ या भावनेने संपर्कात असतात.एक देखणे असे कन्याछात्रालय व्यवस्थापक चारूताई अविरतअनेक वर्षे यशस्वीपणे संभाळत आहेत. त्या स्वत:चहरहुन्नरी असल्याने मुलींच्या अंगी विविध गुणसाकारण्यासाठी धडपडत असतात.

  सामाजिक जाणमुलींना यावी म्हणून राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात सहभागीहोण्यासाठी पाठवले जाते. गटागटाच्या सहभागाने गाणी,गोष्टी, पोवाडे पथनाट्यकला इत्यादी गुण या मुलींनीआत्मसात केले आहेत. त्यांच्यात धीटपणा, लिडरशीप हेगुण वाढीस लागले, शैक्षणिक प्रगतीचा वाढता आढावापाहता, मुली 75 टक्क्यांपुढे जात आहेत. एकूण निकालआता 90 ते 100 टक्के लागत आहे. मुलींचे वसतिगृहचालवणे म्हणजे फक्त निवारा, जेवण, शिक्षण एवढेचध्येय न ठेवता, मुलींचे आरोग्य ही मोठी जबाबदारीअसते. मुली पाचवीपासून इथे असतात, सणासुदीलाजोडून सुट्टी आली तर घरी जातात. त्यांच्या तब्येतीबाबतकाळजी घ्यावी लागते. वयात आलेल्या मुलींमध्येमासिक पाळीबाबत जागृती करणे, त्यांची मानसिकताजपणे ही जबाबदारी सांभाळावी लागते. या भागातअंधश्रद्धा आहेत, त्यांचीही जाणीव-जागृती, शिबिरेघ्यावी लागतात. डॉ.सुधाताई रणदिवे यांनी दवाखान्याचीजबाबदारी केंद्रातच राहून घेतली आहे. त्यांच्या जोडीलासुमन देशपांडे यांनी संस्थेची जबाबदारी सांभाळली. सर्वस्टाफ नेहमी सहकार्य करत असतोच!

  बालवाडीतून शिकलेली मुले-मुली आमचे कार्यकर्तेआहेत, त्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन मिळते. यातूनचवारली पेंटींग हा विभाग चालू आहे. या वस्तूंना मागणीआहे. गावातील महिलांचीही जाणीव-जागृती याशिबिरांतून केली जाते. त्याचा परिणाम गावातीलमहिलांमध्ये आत्मविश्वासातून आलेला बदल दिसतोआहे. पंचायत राजच्या शिबिरांमुळे आदिवासींसाठीपारित कायद्यांचा उपयोग गावपातळीवर करण्यात संस्थेचेकार्यकर्ते अभ्यासू दृष्टीने तयार होत आहेत.आदिवासींसाठी असलेल्या पेसा कायद्यासंदर्भातग्रामपंचायतीत मिटिंगांमध्ये महिलांचा सहभागसंवादात्मक असतो.हा सर्व संसार आतापर्यंत ज्या इमारतीत चालत होताती इमारत 1973साली बांधलेली आता धोक्याची झालीआहे. पालघर जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्याधक्क्यांचाही परिणाम इमारतीवर होत आहे. यासाठीस्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे.जुनी इमारत पाडली आहे. त्या ठिकाणी सुसज्यप्रोग्राम हॉल, संस्थेचे ऑफिस, वारली पेंटींग विभाग,वाचनालय, स्वयंपाकघर, कार्यकर्ता रूम अशा अद्ययावतसोयींयुक्त अशी इमारत बांधण्यासाठी खर्चाचा प्रश्न आहे.(साधारणत: 40 लाख रुपये खर्च येणार आहे.) त्यासाठीहितचिंतकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी विनंतीआहे. सर्वांच्या सहकार्याने अनुताई लिमये व त्यांच्यासहकाऱ्यांचे स्वप्न या नव्या वास्तूत पूर्ण करू या.त्यासाठी संस्थेला भेट द्या, आर्थिक मदत करा.संपर्कासाठी व्यक्ती आणि त्यांचे मो.नंबर.

  साधना दधीच, मोबा. 822314992 वर्षा गुप्ते, मोबा. 9881369837 प्रभा गोगावले, मोबा. 9922111978 वर्षा फातरपेकर, मोबा. 9823943072

  प्रतिसाद

  सगळीकडे बनगरवाडीच

  साधनाचा 6 जुलैचा अंक वाचून मुद्दाम साधनाचे अभिनंदन करण्यासाठी लिहीतआहे. महाराष्ट्राच्या विभिन्न भागांमधील माणसे कशी जगत आहेत, याचे यथातथ्य चित्र‘दुष्काळाने उसवलेले लोकजीवन’ या रिपोर्ताजमधून आसाराम लोमटे यांनी उभे केलेआहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. मराठीत लोकजीवनाच्या गोष्टीसांगण्याची व्यंकटेश माडगूळकरांनी सुरू केलेली परंपरा समर्थपणे चालविणाऱ्या लेखकांमध्ये लोमटे यांचे नाव आवर्जूनघेतले पाहिजे. ते लेंगरवाडीला गेले आणि माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’तील काय काय बदलले आहे, याचा शोध घेऊलागले; तेव्हा सगळे बदलले तरी दुष्काळ कायम राहिला असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. ही महाराष्ट्राच्या लोकशाहीव्यवस्थेच्या थोबाडात मारलेली चपराक आहे. ही बनगरवाडी आता दूर-दूर पसरली असून, सगळा प्रदेशच बनगरवाडीबनला आहे, बनत आहे- हे वास्तव या रिपोर्ताजने मांडले आहे.सत्तर वर्षांनंतरही दुष्काळ का हटला नाही, याचे उत्तर ऐका...

  साधनाचा अंक छापला जात होता, त्याच सुमाराससर्व वृत्तपत्रांमध्ये सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आपण पाहिली. या अर्ध्या पानाच्या रंगीत जाहिरातीत,पार्श्वभूमीला जंगलांची सूचना करणारे एक अंधुक छायाचित्र आहे आणि पुढच्या बाजूला एक मंत्रीमहोदय नव्यानेलावलेल्या एका रोपाला झारीने पाणी देत आहेत. काही कोटी झाडे लावणार असल्याचे सांगण्यासाठी ही जाहिरात दिलीआहे. एका मजुराच्या बारावीतील मुलाने ती जाहिरात पाहून तीन गोष्टींकडे माझे लक्ष वेधले. तो म्हणाला- पहिले म्हणजेजाहिरातीतील पुढाऱ्याने झारी मुठीत धरलेली नाही, ती त्यांच्या हाताला नंतर चिटकवली आहे. दुसरा दोष- समोर हिरवेरोप त्यांनी लावल्याचे दिसते, ते दुसरीकडचे चित्र उचलून झारीखाली चिकटवले आहे. या दोन ‘दुरुस्त्या’ करताना एकविनोद घडलाय की, झारी तिरकी ‘धरली’ असताना तिच्यातून पाणी पडताना मात्र दिसत नाही. झारी खोटी, झाड खोटे;मग त्याला पाणी तरी हवे कशाला? एवढ्या जाहिरातीत मंत्री तेवढे खरे!कसे वाढणार जंगल? कसा वाढेल पाऊस? कसा हटेल दुष्काळ? सगळी फसवाफसवी. आपण सगळेचस्वत:लासुद्धा फसवतोय.

  या अंकाच्या संपादकीयात ‘बहुजन समाज’ या संज्ञेविषयी मांडलेला विचार सर्वांना कळतो, पण वळत नाही. याचेकारण त्यास जातीय अर्थांमध्ये रंगविण्यात सत्ताकारणाचा स्वार्थ गुंतला आहे. समाज जाती-जातींमध्ये विभागणे हेमतसंकलनाचे सुलभ व्यवस्थापन आहे. त्यात भाषेच्या दुरुपयोगाचे एक तंत्र बसविण्यात आले आहे. त्यात सामाजिकरचनाकार्य वगैरे संज्ञा फेकून लोकांना फसविले जाते. मागील पाऊण शतकात बहुजन समाजाचा अर्थ कसकसा बदलतगेला याचा शोध घेतला, तर त्याचा मतांच्या राजकारणाशी थेट संबंध स्पष्ट होईल. या राजकारणात बहुजन समाजासाठीनेमके काय व कोणी करायचे, हे मात्र अधिकाधिक संदिग्ध आणि आता तर अदृश्य बनले आहे, असेही लक्षात येईल.

  ही एक डोंगराएवढी फसवणूक आहे. मोठ्या फसवणुकीचा मोठा गुण हा असतो की, ती मुळी लक्षातच येणार नाही. याबहुजन समाजाच्या नावाखालीच राज्यात उसाचे राजकारण फोफावले आहे आणि यात आपले शोषण होत आहे, हेबहुजन समाजाला कळतसुद्धा नाही. 1972 च्या दुष्काळानंतरही महाराष्ट्रात ऊसबंदी केली गेली नाही, तशी मागणीसुद्धाकोणी करीत नाही. लोमटे यांनी रिपोर्ताजच्या शेवटी उसाच्या प्रश्नाचा मार्मिकपणे उल्लेख केला आहे. सुरुवातीलासाखरसम्राटांना खलनायक म्हणून त्वेषाने साकार करणारे नेते पुढे सत्तेच्या मांडवाखाली जातात, आणि मग त्यांचाविरोधही मावळतो, धार बोथट होते- असे लोमटे यांनी लिहिले आहे.बहुसंख्य शेतकरी सिंचनापासून वंचित असताना, साखर कारखान्यांसाठी ऊस लावण्याचा हट्ट लोकशाहीनीतिमत्तेत ग्राह्य नाही. ऊस लावणे हा कोणाचाही हक्क असू शकत नाही. भूगर्भातील पाणी ही कोणाची खासगी मालमत्ताअसू शकत नाही. त्याचे व्यवस्थापन सरकारवर सोपविले आहे ते संविधानाच्या आदेशानुसार, समग्रतेचे हितसांभाळण्यासाठी. त्यामुळे ऊस लावणे म्हणजे दुसऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी त्यांना नाकारणे!

  असा अन्यायसरकार करू शकत नाही, त्याला तो अधिकार नाही. हे ठावूक असूनही, सत्ताकारणाच्या पोटी येणाऱ्या लाचारीखातर प्रश्नसोडविण्याचा देखावा तेवढा केला जातो. ठिबक सिंचनाचे तंत्र खरोखर फलदायी आहे, पण पाण्याच्या विषम वाटपातूनउद्‌भवणाऱ्या प्रश्नावर तो उतारा नव्हे. ठिबक सिंचन केल्याने वाचणारे पाणी दुसऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि दुष्काळीटापूला मिळते, असे घडले काय? झाले असे की- ऊस बागायतदाराने त्याच्या आणखी दोन एकरांत उसाचा विस्तारकेला. बाकी जमिनींची वंचना कायमच राहिली. दुष्काळाविरुद्ध लढाईत समन्यायी पाणीवाटप हे पहिले पाऊल आहे.म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी तरी ऊस बंद केला पाहिजे. हे करण्याची महाराष्ट्राची तयारीनाही, त्यामुळे बनगरवाडीत दुष्काळ कायम आहे.सरकार दुष्काळ हटवील आणि हटवू शकते, हा भ्रम लोकांनी सोडून दिला आणि स्वतःच स्वतःच्या गावापुरते मार्गशोधले तर काही तरी आशा आहे. यासाठी गावाची लोकशाही स्वीकारली पाहिजे. साधनाने त्या दृष्टीने आणखी असेचरिपोर्ट प्रसिद्ध करीत राहावे, ही विनंती.

  सुभाषचंद्र वाघोलीकर, औरंगाबाद.

  कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

  आसाराम लोमटे यांनी केलेला दुष्काळावरील साधना अंक (6 जुलै) वाचला. दुष्काळावर स्वतंत्र अंक करण्याचीसंकल्पना, संपादक किती जमिनीवर आहेत याची द्योतक आहे. त्या संकल्पनेला लेखकाने पुरेपूर न्याय दिला आहे.संपतराव पवारांनी छावणीला दिलेला पर्याय जमिनीवरील माणसाने दिलेला पर्याय आहे, पंख्याखाली बसलेल्यामाणसांना तो समजण्याची सुतराम शक्यता नाही. ऊस जनावरांच्या अंगी लागत नाही, हा अनुभव आहे. खेड्यात, शहरातकोटी-कोटी रुपयांचे बंगले बांधले, मात्र त्यात प्यायलाच पाणी नसेल तर त्याची किंमत कवडीमोल ठरते. घरात भरपूरपाणी असले तर घर भरल्यासारखे वाटते, श्रीमंती वाटते; हा मुद्दा रिपोर्ताजमधील ‘श्रीमंत गाव, घोटभर पाण्याला महाग’या लेखातून पुढे येतो.पाणी नसेल तर मन उदास होते. यमुनाबार्इंचे बोल खरे आहेत. त्या म्हणतात, ‘पाणीच नसंल तरबाकीचं काय, सगळं असून नसल्यासारखं हाय.’मेंढपाळ मनोजला रानात चार पायांच्या लांडग्यांचीच नाही, तर दोन पायांच्या लांडग्यांची पण भीती वाटते.

  ‘शासनाने आमचे कष्टाचे लाख-लाख रुपये कसे बुडवले’ याची करुण कहाणी जालन्याच्या सुभद्राबाई सांगतात.खेड्यामधील पाणी योजनांची सांगितलेली दुर्दशा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याचे प्रातिनिधिक चित्र आहे. ‘गावात पोटचभरता येऊ नये, असं काय करून ठेवलंय आपण एवढ्या वर्षांत?’ हा लाख मोलाचा प्रश्न लेखक विचारतात. सरकारकडेकाय उत्तर आहे या प्रश्नाचे?

  या अंकातील मुदखेडचे भगवान सूर्यकांत पोटे यांच्या कुटुंबीयांचा फोटो पाहून आणि त्यांची हृदयद्रावक कहाणीवाचून, संवेदनशील माणसाच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाहीत. गोरेपान छोटे बाळ हायवेवरीलचौफुल्यावर किती बिनघोरपणे झोपलेय! हा फोटो अगदीच अंगावर आल्याशिवाय राहत नाही. फोटोतील भगवानच्याकारभारणीची नजर खूप काही सांगून जाते. या अंकाचा हा कळसाध्याय म्हणावा लागेल.शेतकऱ्यांनी पाण्यासाठी बोअर घेऊन जमिनीच्या अगदी ‘चिंध्या’ करून टाकल्यात- किती समर्पक शब्द वापरलायलेखकाने! ‘1200 फूट खोलवरून येणारं पाणी उकळतं असतं. आता फक्त लाव्हा तेवढा बाहेर यायचा राहिलाय’ असंलेखक म्हणतो.

  नगर तालुक्यात बोअरमधून लाव्हा वर येऊन बोअरची गाडी पेटल्याचा व्हिडिओ मी यू-ट्यूबवरपाहिलाय.वृक्षारोपण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे, ही दिनकर पाटलांनी केलेली नवी मांडणी योग्यच आहे.उसाचं टिपरूही न येणाऱ्या माळरानावर पुढाऱ्यांनी कारखाने काढून ठेवले, हेसुद्धा महाराष्ट्राचे एक प्रातिनिधक चित्र आहे.बीडसारख्या कायम दुष्काळी जिल्ह्यात 10 साखर कारखाने आहेत, हे वाचून माहितीत मोठी भर पडली. एकूणच, याअंकामध्ये बीड जिल्ह्याचे केलेले चित्रण विस्मयकारक आहे.

  चाराछावण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर छावणीत गुरे आणण्यासाठी चालकांना शेतकऱ्यांच्या दारोदार फिरावे लागले, हेवाचून शाळेत पोरे आणण्यासाठी घरोघर फिरावे लागणाऱ्या शिक्षकांची आठवण झाली. बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातीलछावण्यांची हकिगत वाचल्यानंतर, अहमदननगर जिल्ह्यातील छावण्यांचा मात्र अभिमान वाटला. नगरचे जिल्हाधिकारीराहुल द्विवेदी यांनी सर्व छावण्या कशा एका रेषेत आणल्या! छावणीचालकांना चाळचूळच करू दिली नाही. उर्वरितमहाराष्ट्राने द्विवेदीसाहेबांचा आदर्श निश्चितच घेण्यासारखा आहे.टँकरमुक्त आणि छावणीमुक्त महाराष्ट्र होणे अनेकांच्या तोट्याचे आहे, म्हणून ते होणार नाही. झालीच तर टँकरमध्येआणि छावण्यांमध्ये वाढच होईल. एकूण सर्व अंक वाचनीय, लेखकाने प्रवासादरम्यान काढलेली छायाचित्रे अंकातछापल्याने सुंदर समन्वय साधलाय. अंक वाचल्यानंतर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे विचारल्याशिवायराहवत नाही.

  कल्याण कदम, अहमदनगर

  दुष्काळाचे वास्तवपूर्ण व दाहक दर्शन

  दि.6 जुलैचा साधना अंक वाचून दुष्काळाची वस्तुस्थिती व दाहकता लक्षात आली. उभ्या महाराष्ट्रात काहीठिकाणी घोटभर पाण्यासाठी चाललेली वणवण, धडपड वाचून व छायाचित्रे पाहून अंगावर शहारे आले. कसं असतं जगणंकाही जणाचं? किती दिवस वांझ वेदना सहन करायच्या, या दुष्काळपीडित जनतेने? कारण पुन्हा पुरेसा पाऊस नाही झालातर पुढच्या वर्षी या परिस्थितीत फारसा बदल होईल, असे वाटत नाही.या महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याचे मोठे साठे व वितरणव्यवस्था तयार करून ठेवलीगेली आहे. त्यांना ग्रामीण भागातील दुष्काळ व पाणीटंचाई यांची कल्पना आली असेल का, याची शंका वाटते. कारणशहरातील रस्त्यांवर तुफान वेगाने आलिशान वाहने धावताना दिसतात. मॉलमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येते. हॉटेल्सआणि बार यांच्याबाहेरही तीच परिस्थिती असते. शहरामधील गडबड, गोंधळ, धावपळ नेहमीप्रमाणेच आहे. शहरातीलअशा परिस्थितीचा व दुष्काळाचा कसा संबंध लावायचा?

  संपादकांनी दुष्काळाबाबत अगदी योग्य व्यक्तीकडून हा रिपोर्ताज करवून घेतला आहे. आसाराम लोमटे यांनीआपल्या प्रवाही आणि प्रभावी लेखनशैलीने दुष्काळाचे व पाणीटंचाईचे भीषण चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभेकेले आहे. मराठी वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवण्यांतून व इतरही नियतकालिकांतून या वर्षाच्या दुष्काळाबाबत काहीलेख आले आहेत. परंतु महाराष्ट्रात फिरून एकसंध असा ‘आँखो देखा हाल’ साधनाच्या या अंकात आला आहे, त्यालातोड नाही. त्याबद्दल आसाराम लोमटे कौतुकास पात्र आहेत.

  प्रभाकर रामचंद्र बटगेरी, सोलापूर

  वास्तवदर्शी रिपोर्ताजला सलाम!

  दि.6 जुलैचा साधना : दुष्काळ विशेषांक वाचला. पत्रकार आसाराम लोमटे यांनी दुष्काळी भागाचा प्रत्यक्ष दौराकरून लिहिलेला रिपोर्ताज वाचून मन भयभीत झाले. हे जर असेच चालू राहिले तर पुढील पिढीला किती संकटांना तोंडद्यावे लागेल, या विचाराने मन उदास झाले. दुष्काळ हवाहवासा वाटणारे सरकारी बाबू, पुढारी, टँकरलॉबी, छावणीचालकयांचा दृष्टिकोन या निमित्ताने दिसून आला, समाजाची अधोगती झालेली पाहून भारत कधी महासत्ता होईल असा प्रश्नपडतो. सामान्य माणसांचे जीवन खूपच खडतर झाले आहे, त्यांच्या मृत्यूलाही फारशी किंमत नाही. या वास्तवदर्शीरिपोर्ताजला सलाम!

  डॉ.संजय लढ्ढा, शेवगाव, जि.अहमदनगर