ताज्या अंकातील लेख

जाहिरात

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान हे पुस्तक

अर्काईव्ह (2008 ते 2025)

मागील तीन अंक

फोटो आणि व्हिडिओ

साधनेतील महत्त्वाच्या घडामोडी

कार्यक्रम / उपक्रम

निमंत्रण प्रकाशन समारंभ

१५५ सदाशिव पेठ, सातारा 
लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा

संपादक : भानू काळे व डॉ. अनिल जोशी

सादर नमस्कार, 
अच्युत व तारा दाभोलकर या दाम्पत्याला दहा अपत्ये झाली. सात मुले व तीन मुली. सर्वांत मोठे देवदत्त तर सर्वांत लहान नरेंद्र. हे सर्वजण साताऱ्यातील १५५ सदाशिव पेठ या घरात लहानाचे मोठे झाले. या दहा भावंडांच्या सोबतच अच्युतरावांच्या भावाच्या दोन मुलीही त्याच घरात वाढल्या. ही सर्वच भावंडे वृत्तीने स्वतंत्र आणि आपापल्या क्षेत्रात कर्तबगार ठरली. त्यातील काहींनी वेळप्रसंगी स्वतःविषयी, भावंडांविषयी व कुटुंबाविषयी लेख लिहिले. काही आप्तस्वकीयांनीही त्यांच्याविषयी लेख लिहिले. अशा निवडक २८ लेखांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ज्ञानदेव म्हस्के (कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ) यांच्या हस्ते होईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता दामोदर नायक (लेखक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते) राहतील. यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरडॉ. शैला दाभोलकर आपली मनोगते व्यक्त करतील. आणि भानू काळे व डॉ. अनिल जोशी, या पुस्तकाच्या संपादनामागची भूमिका मांडतील. प्राचार्य अरुण आंधळे यांची विशेष उपस्थिती असेल. शिरीष चिटणीस हेही आपले विचार मांडतील.

वेळ : बुधवार, २० मे २०२६, सायंकाळी ५.३० ते ७.३० 
स्थळ : सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सदर बाजार, सातारा

या कार्यक्रमाला आपण यावे अशी विनंती आहे.

आपले नम्र
विनोद शिरसाठ
संपादक, साधना प्रकाशन

हेमंत नाईकनवरे 
सचिव, साधना ट्रस्ट

संपर्क : साधना कार्यालय, ४३१, शनिवार पेठ, पुणे ४११०३० 
फोन : ०२०२४४५९६३५ । मोबाईल ७०५८२८६७५३