डिजिटल अर्काईव्ह

'गांधींच्या सहवासात एक आठवडा' या पुस्तकाच्या लेखकाचे मनोगत

नवी दिल्लीतले भारताचे वॉइसरॉय लॉर्ड लिन्लिथगो मला म्हणाले, "गांधी हे भारतातलं सगळ्यांत भारी प्रकरण आहे." ते बरोबर आहे. गांधी हा एकमेवाद्वितीय असा फिनॉमेनन आहे. त्यांच्या बुद्धीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या संपर्कात येणं हे रोमहर्षक आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी स्टेनोग्राफरप्रमाणे लिहून काढली. पुढच्या पानांत ती मी सांगितली आहे. गांधींवरचं माझं भाष्य पुस्तकाच्या शेवटच्या छोट्याशा प्रकरणात वाचता येईल.

हे छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध झालंय यात माझी काहीही चूक नाहीए. गांधींच्या सहवासात जो एक आठवडा घालवला त्याची एक व्यवस्थित डायरी मी लिहीत होतो. ती टिपणं-टाचणं गहाळ किंवा नष्ट होऊ नयेत म्हणून अमेरिकेला गेल्यावर सगळा मजकूर मी लिहून काढला.

बऱ्याच मित्रांनी तो वाचला आणि "आख्खा छाप" असा आग्रह धरला. पण ती डायरी म्हणजे माझ्या भारतभेटीचा संपूर्ण वृत्तान्त नव्हे, असं माझं म्हणणं. भारत दौऱ्यात मी अनेकांशी बोललो. त्या मुलाखती महत्त्वाच्या आणि ऑफ द रेकॉर्ड होत्या, असं मी मित्रांना म्हणालो. गांधींना समोर ठेवून पुस्तक लिहिलं तर तो भारताचा साद्यंत अहवाल नसेल.

मित्र म्हणाले, "ते ठीक आहे. तसं तू प्रस्तावनेत सांग." तर आता तसं सांगतोय.

गांधींशी झालेली चर्चा हा मला उन्नत आणि आतून समृद्ध करणारा अनुभव होता.

नवी दिल्लीतले भारताचे वॉइसरॉय लॉर्ड लिन्लिथगो मला म्हणाले, "गांधी हे भारतातलं सगळ्यांत भारी प्रकरण आहे." ते बरोबर आहे. गांधी हा एकमेवाद्वितीय असा फिनॉमेनन आहे. त्यांच्या बुद्धीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या संपर्कात येणं हे रोमहर्षक आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी स्टेनोग्राफरप्रमाणे लिहून काढली. पुढच्या पानांत ती मी सांगितली आहे. गांधींवरचं माझं भाष्य पुस्तकाच्या शेवटच्या छोट्याशा प्रकरणात वाचता येईल.

- लुई फिशर, अमेरिका, 1943

अनुवाद : अंबरीश मिश्र

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लुई फिशर ( 13 लेख )

(29 फेब्रुवारी 1896–15 जानेवारी 1970)  

अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधी व व्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार .




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके