डिजिटल अर्काईव्ह

भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे विसावे अधिवेशन : वृत्तान्त

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर राज्यशास्त्राची अन्य विश्लेषणात्मक शास्त्रांच्या जोखडापासून सुटका केली पाहिजे, बुद्धिवादाच्या जोजारापासून त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, भौतिकवादाचे त्यावरील प्रभुत्व नष्ट केले पाहिजे आणि त्याची सांगड धर्म आणि नीति यांच्याशी घातली पाहिजे: “In other words political science must be released from the domination of analytical experimental science, from gross materialism and yoked with ethics and religion.”

राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांनी आपल्याच भाषणाचे काढलेले हे तात्पर्य आहे. समाजशास्त्रांच्या मर्यादा भौतिक शास्त्रांसारख्या रेखीव नसतात. परिणामी मर्यादाभंगाचे प्रमाद घडण्याचे संभव फार. अशा वेळी स्वैरसंचार करू पहाणाऱ्या माणसांची काच-सामानाच्या दुकानात शिरलेल्या वृषमा सारखी अवस्था होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात शास्त्रीजी त्याही पुढे गेले आहेत. त्यांनी इतिहास, समाजशास्त्र ह्यांचा तर उपमर्द केलाच आहे, पण आपल्या कल्पनारम्य आग्रहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी धर्म आणि नीतिशास्त्र ह्यांनाही वेठीस धरले आहे
साम्य शोधण्याचा लटका प्रयास
‘भारत ही पूर्वेकडील अमेरिका आहे’ असा त्यांचा दावा. वरकरणीसुद्धा असंबद्ध वाटणाऱ्या ह्या विधानाला तार्किक पाठिंबा शोधण्याचा जोरदार प्रयत्न त्यांनी भाषणात केला आहे. भारतीय व अमेरिकन समाज रचना व संस्कृती ह्या सारख्या आहेत, असे म्हणण्याचे धाडस सहसा कोणीच करणार नाही. पण शास्त्रीजींचा प्रयत्न आहे तो त्यामध्ये समांतरता (पॅरललिझम) दाखवण्याचा. त्यासाठी विविध दाखले देण्याचा प्रयत्न ते करतात. प्रथम ते इतिहासाला वेठीला धरतात. मेसापोटेमिया ते बांडुंग व ग्रीस ते अमेरिका अशा समांतर जाणाऱ्या सांस्कृतिक साखळ्या दाखवण्याचा प्रयत्न वरवर पाहता कौतुकासद वाटतो. पण सबंध युरोपचा वारसा अमेरिकेकडे इंग्लंडच्या मार्गे गेला, हे विधान तपासून पहाण्याची आवश्यकता जाणवते. ख्रिश्चन संस्कृतीच्या मेसोपोटेमियन संस्कृतीकडे असणाऱ्या ऋणाबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. अमेरिकन संस्कृतीचा गाभा हा ‘प्युरिटन’ कर्मठ आहे, असा शास्त्रींचा दावा. यूरोपमधील धर्मसुधारणेची चळवळ (रिफॉर्मेशन) व प्युरिटॅनिझम ह्यांचे परस्परसंबंध, आणि ग्रीक व रोमन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनःला विरोधक (अॅण्टिनेनासन्स) असे त्यांचे स्वरूप लक्षात घेतले तर ग्रीक संस्कृतीचा वारसा सांगण्याचा हक्क अमेरिकेला आणि मेसापोटेमियन संस्कृतीशी संबंध जोडण्याचा हक्क बुद्ध, चिनी संत, हिंदु धर्म व इस्लाम या स्थूलमानाने परिणामकारक ठरलेल्या आशियायी संस्कृतिविशेषांच्या (कल्चरल फेनॉमेना) वारसदारांना कुठून पोचतो, ते समजत नाही.
अमेरिकन राजकारणाची जातकुळी 
पण केवळ इतिहासाचा विपर्यास पुरेसा होत नसावा. राजकीय क्षेत्रातही अमेरिका व भारत ह्यांनी इंग्लंडचा वारसा उचलला आहे, असे ते म्हणतात. त्यातही मोठी मजेदार गफलत त्यांनी केली आहे. अमेरिकन लोकशाहीचा व नैसर्गिक हक्काच्या परिणामांचा विचार करताना त्यांनी हुकर ते लोकू व लोक् ते जेफरसन् अशी विचारसाखळी मांडली आहे. अमेरिकन राज्यक्रांतीच्या वेळच्या नुसत्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तरी सुद्धा फ्रेंचांचे तिच्यावरील ऋण किती मोठे असले पाहिजे, ह्याची कल्पना येते. मूलभूत विचार एकच असला तरी सुद्धा त्याची वाढ होण्यासाठी अत्यंत नवे व विचित्र वातावरण असणाऱ्या अमेरिकेत इंग्रजी विचारांची मूलभूत स्वच्छता कितपत सांभाळली गेली आहे हे सांगणे कठीण!
भारतीय राज्य-रचना व ब्रिटन
आणि मूलभूत राजकीय विचार हा अमेरिकेने इंग्लंडजवळून उचलला आहे, हे क्षणभर मान्य केले तरी देखील त्याची भारतीय लोकशाहीशी समांतरता दाखवण्याचे धाडस करू नये. भारतीय राजकीय विचारांत ब्रिटिशांचे भ्रूण किती हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. पण गांधीजींच्या बरोबर भारतीय राजकारणात आलेले विचार प्रवाह पहाता भारताचे ब्रिटिश राज्य विचारांबद्दलचे ऋण हे प्रामुख्याने बाह्य स्वरूपाच्या रचनेबाबतच (फॉर्म) आहे असे वाटते. त्यामुळे भारताच्या व अमेरिकेच्या राजकीय विचारांच्या उगम स्थानासंबंधी समांतरता दाखवण्याचा प्रयत्न येथेही फसतो.
भोंगळ साम्यदर्शन
नमुन्यापुरते सांगितले. शास्त्रीजींच्या हे सारे भाषणातील प्रत्येक वाक्य हे असल्या उघड-उघड विरोधाभासांनी भरलेले आहे. शास्त्राने शास्त्रीय मर्यादा उल्लंघून एक धर्मग्रंथ बनावे हे त्यातून निघणारे तात्पर्यही त्याच प्रकारचे! अमेरिकेतील नवमानवतावादाचे तेथील राजकीय जीवनात असलेले काही किमतीचे स्थान व एकलांबी द्वारकेसारखा विनोबांवर आधारलेला भारतीय सर्वोदय हे ह्या समांतर संस्कृतीमधील परस्परसंगतिदर्शक मुद्दे म्हणून पुढे मांडण्याचा अट्टाहास अक्षरशः बादरायण संबंधांच्या प्रसिद्ध आख्यायिकेची आठवण करून देतो. समाजविषयक शास्त्रांचे स्वरूप हे अजून अतिशय गबाळे व अस्पष्ट आहे. अशा वेळी त्याच्या असलेल्या शास्त्रीयत्वावरही आघात करण्याचा प्रयत्न हा पुच्छप्रागतिकाचा मानसिक दुबळेपणा मानायचा काय?
दोन चित्रे!
शास्त्रीजींचे भाषण उल्लेखनीय म्हटले ते ह्या अर्थाने. ह्या पार्श्वभूमीवर डॉ. क्विन्सी राइड यांचे आंतरराष्ट्रीय कायद्यावरचे भाषण व्यांनी ऐकले असेल त्यांना आमच्या राज्यशास्त्रांच्या विवरणदारिद्र्याची (पॉव्हर्टी ऑफ अॅनेलिटिकल थिकिंग) प्रकर्षाने जाणीव व्हावी. यूरोपसाठी शय्यापतीच्या रूपाने निर्माण झालेल्या कायद्यांची आंतरराष्ट्रीयत्वाच्या अवस्थेपर्यंतची घडण त्यांनी अतिशय वस्तुनिष्ठ भूमिकेने रेलली. ह्या कायद्याचा मूलभूत पाया हाच मुळी कायदा, न्याय, योग्य-अयोग्य व अधिकार या युरोपीय कल्पना होत. 1300 वर्षे अंमळ गाजवणाऱ्या यूरोपीय वसाहतवादाने त्याचे आंतरराष्ट्रीयत्व रोवले होते. त्याला पहिला धक्का 1856च्या क्रिमियन युद्धाने मिळाला.
त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीने ह्या कामद्याचे मूलभूत स्वरूपही बदलत गेले. हळूहळू सत्तेच्या समतोलतेच्या तत्त्वाची प्रतिष्ठा कमी होऊन तटस्थतेचा अंर्तभाव सुवर्तनाच्या खात्यात होऊ लागला. आजचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप मोठे मनोरंजक आहे. त्यानुसार युद्धाची कल्पनादेखील बद‌लली आहे. राइट साहेबांनी युद्धाची व्याख्या मोठी रुचकरपणे केली. “ज्या परिस्थितीत दोन या अधिक पक्ष आपल्यापुढील समस्या शस्त्रांच्या साह्याने सोडवण्याला पात्र असतात त्या परिस्थितीला युद्ध अशी संज्ञा आहे - It is a situation where two or more states are equally entitled to solve issues by armed intervention.” ह्यांतून दोन्ही युद्धमग्न पक्षांना समान लेखण्याचे तटस्थ राष्ट्राचे धोरण मान्यता पावले.
राज्यशास्त्राला भवितव्य आहे
ही सारी घडण राष्ट्राच्या संबंधी झाली. व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण हा आजच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा मोठा घटक आहे. अर्थात् आंतरराष्ट्रीय कायद्याचे तात्त्विक स्वरूप हे कालमानाशी निष्ठा ठेवून बदलत गेले असले तरी त्याची प्रत्यक्ष व्यवहारातील अवस्था फारशी वर्णनीय नाही. पण दिवसेंदिवस आकुंचन पावणाऱ्या विश्वांत ह्या घटनेचे स्थान फार मोठे आहे ह्यांत शंका नाही. राइटसाहेबांच्या विवेचनातली सूक्ष्म छटा वेचणारी विवरणबुद्धी बघितली म्हणजे राज्य शास्त्रालाही शास्त्र म्हणून भवितव्य आहे अशी आशा वाटू लागते. पण त्याच क्षणी ह्या शास्त्राला अशास्त्रीय शास्त्रापासून वाचवा, अशी आळवणी करायचा मोह आवरत नाही!
एक परिसंवाद
भारताच्या भावनिक एकात्मतेवरच्या चर्चेने राज्यशास्त्र परिषदेचे सूप वाजवले. ह्या चर्चेत चारः प्राध्यापक व दोन पुढारी यांनी भाग घेतला. विशेषतः एस्.एम्. ना चर्चेत भाग घेण्यास बोलावण्याची कल्पना औचित्यपूर्ण वाटली. चर्चेची सुरुवात प्रा. वर्मोनी केली. त्यांनी समाजशास्त्रातील काही सिद्धान्त उचलून त्या आधारे विवेचन केले. माणसाच्या जीवनातील भावनांचे स्थान त्यांनी मानसशास्त्रांतील विविध सिद्धान्तांच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विवेचनाची बैठक शास्त्रीय झाली खरी, पण त्यावर आधारलेले भारतीय स्थितीचे चित्रण मात्र आवळ्याच्या मोटेसारखे बांधले गेले. भारताच्या राजकीय क्षेत्रात भावनिक एकात्मतेचा अभाव आहे ही गोष्ट सर्वमान्य आहे. पण त्याची कारणे म्हणून आर्थिक अंगाचा प्रमाणहीन वाढ किंवा मध्यमवर्गाची असंतुष्टता असली मांडणे हे तर्कनिष्ठ मनाला थोडेसे विपर्यस्त वाटते. त्या मानाने श्री. आशीर्वादम् ह्यांचे विवेचन अधिक व्यवहार्य वाटले. अर्थात् भावनिक एकात्मतेचे उपाय म्हणून त्यांनी दिलेली जंत्री ही इतकी ठोकळेबाज होती की, एकाचा डॉक्टरने एखाद्या रोगावर स्वतःला माहीत असलेल्या सर्व पेटंट औषधांची नावे लिहून काढावीत व रोग्याला एकाच वेळी व्यायला सांगावीत अशातला प्रकार झाला! प्रा. श्रीनिवासन् यांनी आयत्या वेळी आपल्याला भाषणास बोलावल्याचा आव आणून बरेचसे असंबद्ध भाषण केले तेदेखील स्वतःशीच बोलत असल्यासारखे. त्यामुळे श्रोत्यांच्या सुदैवाने त्यांना बराचसा भाग ऐकावाच लागला नाही. 
एस.एम्. बोलायला उभे रहाताच की नाही त्या टाळ्या वाजल्या! त्यांच्या भाषणापेक्षाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती असणार चारित्र्याचे वयच अधिक प्रभावी ठरते. राजकारणी माणसाने दैनंदिन भूमिकेवरून बोलावे यात वावगे काही नाही. भारतीयांच्या भावनांना आवाहन करणारे सामूहिक ध्येय आज नाही, हे व्यावहारिक सत्य एस्.एम्.नी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राची कैफियत त्यांनी या वेळी विद्वानांना रुजू केली आणि या चळवळीत फुटीरपणाची बीजे नाहीत, उलट भावनात्मक ऐक्याच्या संवर्धनाला संयुक्त महाराष्ट्र उपकारच ठरेल, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. काकासाहेब गाडगीळांनी भवितव्यावर नजर लावण्याचा आदेश दिला. भावनिक संघटनाची इमारत ही आध्यात्मिक असली तरी तिचा पाया आर्थिक सुदृढतेचा असला पाहिजे, हा नवा विचार त्यांनी चर्चेत सोडला. 
प्रा. परीखांचे मार्मिक विवेचन
ह्या आध्यात्मिकतेचे स्वरूप हे मानवधर्माच्या परिपाकाचे असले पाहिजे अशी भूमिका प्रा. गोवर्धन परीख ह्यांनी घेतली. शास्त्रीय विवेचन म्हणजे काय याचा त्यांचे लहानसेच भाषण हा एक नमुना होता. राजकीय क्षेत्रात उतरताच धर्माने विभाजनाला सुरुवात केली. भारताच्या इतिहासात अशी एकही व्यक्ती किंवा असे एकही मानचिन्ह ‘सिम्बॉल’ नाही की ज्याच्याभोवती भावना गुंफता येतील. भारतातील बहुसख्याकांचा धर्म हा संघ (फेडरेशन) स्वरूपाचा आहे. तेव्हा भूतकालाकडे वेश्या आशेने बघण्यापेक्षा भविष्याकडे विधायक दृष्टीने पॉझिटिव्ह व्हिजनने बघणे जरूर आहे. आज भारतात लोकशाही नसून तिचा फक्त सांगाडा आहे. भरभक्कम आर्थिक पायावर उभारलेली समाजव्यवस्था व व्यक्तीचे मानवाच्या सामायिक संस्कृतीत आध्यात्मिक वृत्तीने सहभागी होणे (spiritual participation in the common culture of man) ही भावनिक एकात्मतेची शर्त (प्रि-रिक्विझिट) आहे असे विवेचन त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात केले.
नेहमी इतमामाने पार पडणाच्या परिषदा सारखीच ही परिषदही अंशतः फलदायी ठरली. पुण्याच्या हवेवर, जेवणाच्या व्यवस्थेवर व्यक्तिगत नैपुण्यावर जरी प्रतिनिधी सूप असले तरी त्यातून साफल्याच्या जाणिवेने त्यांनी संतुष्ट होऊ नये. पण दुर्दैवाने सारेच संतुष्ट दिसले! त्यातच असल्या परिषदाचे मूलभूत अपयश आहे. फुटकळ स्वरूपाच्या तांत्रिक वादातून या व्यक्तिगत हेव्यादाव्यात पुण्यात भरणाऱ्या ह्यः अधिवेशनाने एका तुच्छ व जागतिक कीर्तीच्या राज्यशास्त्रज्ञाच्या सहकाऱ्यांला मुकावे, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. चर्चेच्या वेळी देखील अध्यक्षीय बंधने उल्लंघिण्यात, चर्चेत नको त्या विपर्यावर विपर्यस्त विधाने करण्यात, उपस्थित निमंत्रितांची प्रसंगी अवघड अवस्था करून सोडण्यात सन्मान्य प्राध्यापक प्रतिनिधींनी आपल्या विद्यार्थीकडून गुणग्रहण करून त्यांच्याहीवर मात केली. परिषदाचे स्वरूप बद‌लण्यासाठी परिषदेला जाण्यापूर्वीच प्रत्येक प्रतिनिधींने थोडे थोडे आत्मचिंतन केले तर काहीतरी फायदा होण्यासारखा आहे.
 

Tags: proportional representation Krishna Menon Rajyashastra Parishad Jayant Lele प्रमाणशीर प्रतिनिधीत्व कृष्ण मेनन राज्यशास्त्र परिषद जयंत लेले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी