- न्यूयॉर्कला आंबेडकर जयंती
- कोल्हाटी समाजाचे अधिवेशन
- युनिसेफचा रत्नागिरी प्रकल्प
- ‘अनुष्टुभ्’तर्फे आयोजित कथा-स्पर्धा व काव्य-स्पर्धा
- सहवेदना
न्यूयॉर्कला आंबेडकर जयंती
भारतातल्या दलितांवरच्या अत्याचारांना वाचा फोडावी व त्याची जाणीव परदेशात येणाऱ्या नागरिकांना व्हावी, परदेशात येणाऱ्या भारतीय नेत्यांना भेटून अत्याचार थांबवण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करण्याच्या उद्देशाने येथे 'व्हीजन' (व्हॉलिटीअर्स इन सव्हिस टू इंडियाज अँड निगलेक्टेड) या संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली. मागील महिन्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहात तिबेटचे प्रसिद्ध भिक्खू लामा नोरला, डॉ. एलीनार झेलीपट, डॉ. ओवेन लिन्च व युनोचे भारतीय वकील रिखी जयपाल यांची भाषणे झाली.
-----
कोल्हाटी समाजाचे अधिवेशन
उस्मानाबादजवळ भूम येथे नुकतेच कोल्हाटी समाजाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला सुमारे तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य पातळीवर पार पडलेले हे पहिलेच अधिवेशन.
कोल्हाटी समाजाविषयी लोकांना फारशी माहिती नाही. जी माहिती आहे ती फारशी चांगली नाही. भूमच्या अधिवेशनाचे यासाठी कौतुक वाटते. इतस्ततः विखुरलेल्या बांधवांना एकत्र आणून नवा सुधारक विचार रुजवण्यासाठी हे अधिवेशन म्हणजे एक संधी होती. या अधिवेशनाच्या प्रसंगी समाज कल्याण खात्याचे मंत्री श्री अर्जुनराव कस्तुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री वासुदेवराव देशमुख होते.
शासनाने मागासवर्गीयांच्या विकासासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ नावाच्या समितीची स्थापना केली आहे. कोल्हाटी बांधवांनी त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. कोल्हाटी समाज बांधवांनी त्यांच्या समाजात केवळ पूर्वीपासून चालत आलेल्या म्हणून आजही अस्तित्वात ठेवल्या जाणाऱ्या वाईट चालीरीतींचा बंदोबस्त केला पाहिजे, असे श्री कस्तुरे यांनी सांगितले.
श्री वासुदेवराव देशमुख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कोल्हाटी बांधवांनी शिक्षण घण्याचे प्रमाण वाढवावे. त्यायोगे विचाराची दिशा बदलणे शक्य होईल. खुळ्या समजुती नाहीशा झाल्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जाता येईल. तमाशा परंपरेबरोबर कोल्हाटी समाजाने समाजाने शास्त्रीय कला जोपासावी, असेही त्यांनी सांगितले. हे अधिवेशन म्हणजे कोल्हाटी समाजाने सुधारणेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरावे.
----
युनिसेफचा रत्नागिरी प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्यात स्त्रिया व मुले यांच्या विकासासाठी युनिसेफच्या वतीने एक प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मुंबई युनिसेफचे निवासी कार्यक्रम अधिकारी श्री जी. एस. मुळगावकर व दिल्ली येथील नियोजन संचालिका श्रीमती पद्मिनी रामस्वामी यांनी सावंतवाडीजवळ आंबोली इथे 27 ते 30 मे दरम्यान भरलेल्या परिसंवाद शिबिरात ही माहिती दिली.
या प्रकल्पानुसार सावंतवाडी ते संगमेश्वर या दहा तालुक्यांतल्या मागास वाढ्या विकासासाठी मुकर करण्यात येणार आहेत. पाळणाघरे, सकस आहार योजना, बाल सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी मुलांसाठी असणाऱ्या शिशु-विहार गृहात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्त्रियांना आरोग्य सुधाराबरोबरच लहान लहान उत्पादक उद्योगधंदे पुरवण्यात येणार आहेत. याच प्रकल्पाखाली गोपुरी पद्धतीचे संडास बांधुन गोबर गॅस प्लॅन्ट उभारण्याची एक योजना आहे.
----
‘अनुष्टुभ्’तर्फे आयोजित कथा-स्पर्धा व काव्य-स्पर्धा
कथा स्पर्धा : 'रेऊ प्रतिष्ठान' ने पहिल्या तीन उत्कृष्ट कथांना रु. 500, रु. 300 व 6 200 अशी ‘रेऊ पारितोषिके’ ठेवली असून या कथा ‘अनुष्टुभ’ च्या दिवाळी अंकात ( 1979 ) प्रसिद्ध होतील. स्पर्धकांनी कथा ‘अनुष्टुभ’कडे पाठवण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 1979 ही आहे.
काव्य-स्पर्धा: सुप्रसिद्ध कवी कै. पु. शि. रेगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रु. 101, रु. 51 व रु. 25 याप्रमाणे पहिल्या तीन उत्कृष्ट कवितांना ‘पु. शि. रेगे पारितोषिक' ठेवले असून स्पर्धकांनी कविता 'अनुष्टुभु' कडे पाठवण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 1979 ही आहे.
या दोन्ही स्पर्धाच नियम, अटी इत्यादी तपशिलवार माहितीसाठी 25 पेक्षांच्या तिकिटासह पुढील पत्यावर लिहावे : ‘अनुष्टुभ' द्वारा पुरुषोत्तम पाटील, बेडसे बिल्डींग, वाडीभोकर नाका, पूर, धुळे ( 424002 )
----
सहवेदना
श्री भार्गव वि. शेट्ये व श्री गणेश खैरे या दोन समाजवादी कार्यकर्त्यांचे अपघातात सापडून दिनांक 22-5-79 रोजी निधन झाले.
श्री भार्गव शेट्ये हे समाजवादी पक्षाचे सुरुवातीपासूनचे कुंभारवाडा विभागातील निष्ठावंत सेवाभावी कार्यकर्ते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, भाववाढ आंदोलनात, गोवा मुक्ती संग्राम या लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. आणीबाणीच्या काळात ते मिसा कुटुंबियांकरता 1500 ते 2000 रु. मासिक निधी जमवीत असत. रत्नागिरीच्या निवडणूक प्रचारासाठी दोन दोन महिन्यांची रजा घेऊन जिल्ह्यात कै. नाथ पै व श्री दंडवते यांचे कार्य करीत. आता गुहागर येथील शाळेचे उद्घाटन व जिल्हापरिषद निवडणुकांचे प्रचार करून येत असता त्यांच्या जीपला ट्रकचा धक्का लागून दोघाही कार्यकर्त्यांचा अलिबाग हॉस्पिटल मध्ये अंत झाला.
श्री शेट्ये आणि खैरे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात साधना परिवार सहभागी आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या