डिजिटल अर्काईव्ह

पुस्तक नेमके कुणासाठी, याचा बोध लेखकांना झालेला दिसत नाही. बुक ट्रस्टच्या अधिकाऱ्यानी तो विचारातही घेतलेला दिसत नाही. कारण यातली माहिती बागाईतदारांना थोडी अपुरी वाटेल जाणि सामान्य वाचकांना ती निरर्थक ठरेल! शिवाय प्रचारातली बहुभाषांतली नावे दिली नसल्याने पंचाईत होते. सपोता- सपोता म्हणून ज्या फळाचे वर्णन आहे (पृ. 120-23) ते चिकू की काय? चिकू हे नाव सहज समजण्यासारखे असता, ते का टाळले आहे? लुकात, लीची, यांची माहिती मनोरंजक वाटते. परंतु आकडे देताना केलेली कसरत अडाणीपणाची दिसते.

‘दृष्टिक्षेपात महाराष्ट्र’ आणि ‘महाराष्ट्र 1969' ही दोन इंग्रजी प्रकाशने आमच्या शासनाने नुकतीच प्रसिद्ध केली. (डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी, मुंबई: 32 बी. आर.) महाराष्ट्र 1969 हे मोठे पुस्तक अघळपघळ रीतीने लिहिलेले आहे. गेल्या वर्षीच्या (1968) पुस्तकाची ही थोडीशी सुधारलेली आवृत्ती आहे. बेने-इसाएल, पारशी, जैन यांची थोडी अधिक माहिती दिली तशी रामोशी, कोमटी, बेरड, फासेपारधी, भिल्ल, गोंड, लमाणी. यांचीही माहिती दिली आहे. ‘मराठी शासन भाषा' हे प्रकरण नव्याने लिहिले आहे. थोडे विनयशीलतेने लिहिले आहे. वैयक्तिक उल्लेख टाळले असून काही कायद्यांचा अनुवाद करताना चुका झाल्या, अशी स्पष्ट कबुली आहे. ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा 1462 अधिकाऱ्यांना मराठी शिकवले! झटपट रंगारी पद्धतीने तीनशे शिक्षक तयार केले आणि 'राजभाषा परिचय' हे पुस्तक प्रसिद्ध केले. भाषा मंडळाची कर्तबगारी किती विविध प्रकारची आहे पाहा! वदनाम कोशापासून राजभाषा परिचयापर्यंतची मजल ही कौतुकास्पद समजू या!!
 
‘दृष्टिक्षेपात महाराष्ट्र' ही खिसा पुस्तिका गेल्या वर्षी फक्त 55 पृष्ठांची होती. ती आता 143 पृष्ठांची झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आकडेशास्त्रीय खात्यामार्फत अगदी अशीच पुस्तिका 'बेसिक स्टॅटिस्टिक्स-हँडबुक’ म्हणून प्रसिद्ध होत असता- प्रसिद्धी खात्याने ही वेगळी पुस्तिका का काढावी? हा प्रश्न कुणाला विचाराया? कुणी? हे बेसिक. हँडबुक पृष्ठे 135 चे असून अवघ्या 60 पैशांत विकत मिळते. शिवाय आकडेशास्त्रीय खात्याच्या शिक्कामोर्तबामुळे त्यावर अधिक विश्वास बसतो. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे फळांचे पुस्तक रणजित सिंग यांनी लिहिलेले प्रसिद्ध झाले. (पृष्ठे 213, रु. 5.75) यात 8 बहुरंगी आणि 20 एकरंगी चित्रे आर्टपेपरवर छापलेली आहेत; म्हणून किंमत वाढली खरी, पण रंगीत छपाई फारशी चांगली नाही. तिजवरून केळी (प्लेट 2) किंवा फणस (प्लेट 5) यांची ओळख नीट पटत नाही- इतका रंगांत फरक पडला आहे. आठ प्रकरणांत निरनिराळ्या फळांची, त्यांच्या लागवडीची खतांची, रोगांची, फवाऱ्यांची माहिती दिली आहे. त्यांचा इतिहासही सांगितला आहे. 

परंतु पुस्तक नेमके कुणासाठी, याचा बोध लेखकांना झालेला दिसत नाही. बुक ट्रस्टच्या अधिकाऱ्यानी तो विचारातही घेतलेला दिसत नाही. कारण यातली माहिती बागाईतदारांना थोडी अपुरी वाटेल जाणि सामान्य वाचकांना ती निरर्थक ठरेल! शिवाय प्रचारातली बहुभाषांतली नावे दिली नसल्याने पंचाईत होते. सपोता- सपोता म्हणून ज्या फळाचे वर्णन आहे (पृ. 120-23) ते चिकू की काय? चिकू हे नाव सहज समजण्यासारखे असता, ते का टाळले आहे? लुकात, लीची, यांची माहिती मनोरंजक वाटते. परंतु आकडे देताना केलेली कसरत अडाणीपणाची दिसते. निरनिराळ्या फळांची लागवड किती क्षेत्रावर आहे, हे सांगण्यासाठी ‘दश लक्ष एकर ' हे मान (स. 1955) वापरले आहे! दोन हजार किंवा आठ हजार एकर असे सरळ सांगण्याऐवजी शून्यांचा, दशांश चिन्हांचा उपयोग कशासाठी केला? कुणासाठी आहे हे पुस्तक? (पृ. 6) ‘चालू' म्हणून कोणत्या सालचे आकडे दिले? आंब्यासाठी किती एकर जमीन गुंतली हे आंबराई असेल तरच कळावयाचे. एरवी सुटी सुटी झाडे असतील तर ती लागवडीची जमीन मोजावी कशी? व तिचा अंदाज 1,39,781 एकर असा देतात, तेव्हा त्याबद्दल शंका स्वाभाविक उद्भवते! पण खरा विनोद आहे तो निराळाच! बुद्धकालीन (?) अमरसिंहाने लिहिलेल्या अमरकोशनामक ग्रंथात (?) आम्रफलाची प्रशंसा चिरकाल टिकेल (?) अशी केली आहे! (पृ. 17) या विद्वानांपुढे आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या सामान्य सल्लागार मंडळापुढे किती (ओ) रडावे?

***

पद्मपुराणांतर्गत जैन रामायण (रचयिता रविषेणाचार्य) हे वाल्मीकी रामायणापेक्षा निराळे काव्य आहे. पद्मपुराणसुद्धा निराळे, जैनांचे आहे. गुणभद्राचार्यांनी लिहिलेले आणखीही निराळे जैन रामायण आहे. कोदंडधारी, एकपत्नीव्रती रामप्रभूंना सीतादेवी आदिक आठ हजार राण्या होत्या; लक्ष्मणाला पृथ्वीसुंदरी आदिक सोळा हजार राण्या होत्या, सीता ही वस्तुतः रावणमंदोदरीची कन्या... अशा फेरफाराचे हे गुणभद्राचार्यांचे रामायण आहे! मारुती हा स्वतंत्र राजा आहे, तो रावणाचा मित्र असून त्याचे अनेक विवाह झाले होते.... वज्रकर्णाने आपल्या आठ कन्या लक्ष्मणाला दिल्या; सिंहोदरानेही आपल्या अनेक कन्या त्याला दिल्या. वनमाला आणि लक्ष्मण यांचा विवाह झाला होता.. इत्यादी अनेक नवी कथानके या जैन रामायणात आहेत. रविषेणाचार्यांचे रामायण इ.स. 678 मध्ये रचिले. मूळ संस्कृतमधील हा ग्रंथ मराठी काव्यरूपाने उपलब्ध झाला आहे. जिनदासशास्त्री फडकुले यांनी सुमारे 40 हजार ओळींचे हे महाकाव्य मराठीत अनुवादिले असल्याने कवी गिरीशांनी त्यांना ‘आधुनिक मोरोपंत’ म्हटले आहे. मराठी वाङ्मयाचे भूषण असे हे दोन खंड छापण्यासाठी 224 जणांनी मिळून 13 हजार रु. जमवले. एकूण पृष्ठे 1488+ 70 अशी झाली. (रामायण प्रकाशन समिती, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर. प्रत्येकी रु.10)

‘डेस्टिनी ऑफ मॅन’ हा इंग्रजी लेख-संग्रह योगी श्री अरविंद आणि माताजी यांच्या निवडक उताऱ्यांचा आहे. (पृ. 269 रु.800 आश्रम, पाँडेचरी) सहा विभागात हे उतारे छापले असून जरूर तेथे अषभचंद व श्यामसुंदर झुंझुंबाला या संग्राहकांनी प्रास्ताविक लिहिले आहे. मानवाचे भवितव्य कोणते? तिकडे जाण्याचा, तेथपर्यंत पोचण्याचा मार्ग त्याला कोण दाखवील? मानवात दैनिक अंशाचा स्फुल्लिंग असेल तर त्याचा विकास कसा व्हावा? स्फुल्लिंगाला अधिक चेतना कशी मिळावी? इत्यादी प्रश्नांना सविस्तर उत्तरे देणारे हे उतारे संग्राहकांनी मुद्दाम निवडले आहेत. साधीच पण टापटिपीची बिनदोष छपाई पाहून मन प्रसन्न होते. खोलवर विचार केल्यावर यातील थोर विचार पटतात. वारंवार त्या संबंधी विचार चालू राहतो -मनात घोळतो. मानसिक शक्तिवर्धक असे हे पुस्तक विचारवंतांना मनापासून आवडेल. श्री अरविंदांच्या विचारांचे हे नवनीतच आहे  

Tags: योगी अरविंद डेस्टिनी ऑफ मॅन कवी गिरीश जैन रामायण राजभाषा परिचय महाराष्ट्र 1969 दृष्टिक्षेपात महाराष्ट्र Yogi Arvind poet Girish. destiny of man Jain Ramayan introduction of rajbhasha Maharashtra 1969 Maharashtra in vision weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी