डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

एका वादळी व्यक्तिमत्त्वाचे जीवन व्ही. के. कृष्ण मेनन

कृष्ण मेनन यांच्या काटेरी स्वभावाची  नेहरूंना जाणीव होती,  हे चरित्रात उद्‌धृत  केलेल्या पत्रव्यहारातून स्पष्ट होते. कृष्ण मेनन हे  अनेक वेळा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात,  हेदेखील नेहरूंना ठावूक होते. त्यांच्या  कर्तबगारीच्या आड येणारे हे अवगुण होते. असे  असूनदेखील नेहरू यांनी त्यांच्यावर चढत्या क्रमाने जबाबदाऱ्या का सोपविल्या असतील, याचा खुलासा रमेश करीत नाहीत किंवा काही  शक्यतादेखील मांडत नाहीत.   मोहन मालवीय यांनी आर्थिक मदत केली.  लवकरच ते डाव्या विचारांचे आगर मानल्या गेलेल्या  ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स्‌’मध्ये विद्यार्थी म्हणून  दाखल झाले. तिथे त्यांच्या परिचय झाला तो जागतिक  किर्तीचे समाजवादी विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की  यांच्याशी. त्यांच्यावरील लास्कींचा प्रभाव आयुष्यभर  टिकला. लास्की कुटुंबाचे ते मित्र बनले. लास्कींमुळे मेनन  यांचा मजूर पक्षाच्या नेतृत्वाच्या दोन पिढ्यांशी परिचय झाला अथवा मैत्री जमली. त्यात क्लेमेंट ॲटली,  सर स्टॅफर्ड क्रिप्स्‌ तसेच युवा पिढीतील मायकल फूट हे होते. इतकेच नाही तर मेनन मजूर पक्षाचे सदस्यही झाले, पक्षातर्फे नगरसेवकही झाले.

व्हेंगालिल कृष्णन कृष्ण मेनन (1896-1974) हे नाव  उच्चारताच आठवण होते ती 1962 साली झालेल्या भारत-चीन युध्दाची आणि त्यात आपल्याला भोगाव्या  लागलेल्या नामुष्कीची. मात्र कृष्ण मेनन म्हणजे तेवढेच  नाही त्या पलीकडेदेखील त्यांचे देशाच्या उभारणीत स्थान  आहे हे दाखविण्यासाठीच हे चरित्र लिहिण्यात आले आहे, असे लेखक माजी केंद्रिय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले  आहे. त्यांचा हा हेतू निश्चितपणे साध्य होतो. कृष्ण मेनन यांचा विपुल पत्रव्यवहार होता आणि तो सर्व दिल्लीतील  नेहरू स्मृती ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. तो  आतापर्यंत अभ्यासकांना उपलब्ध नव्हता. त्याचा उपयोग  करणारे रमेश हे पहिले अभ्यासक आहेत.  

मराठी माणसांच्या दृष्टीने कृष्ण मेनन यांना महत्त्व आहे. पण मराठीच काय आपली मातृभाषा मल्याळमदेखील  सफाईदारपणे बोलता न येणाऱ्या कृष्ण मेनन यांनी दोन वेळा (1957 आणि 1962 साली) मुंबईतून लोकसभेची निवडणूक जिंकली. पहिला विजय तर संयुक्त महाराष्ट्र  चळवळीच्या दरम्यानचा होता. कृष्ण मेनन यांचा जन्म केरळमधील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला आणि  महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले.

उच्च शिक्षण घेत  असताना त्यांना संस्कृतमधील प्रावीण्याबद्दल एक  पारितोषिक मिळाले. यादरम्यान ते ॲनी बेझंट यांच्या  प्रभावाखाली येऊन थिऑसॉफिस्ट पंथाचे पाईक झाले. या  पंथाचा काही काळ प्रसारदेखील त्यांनी केला आणि 1920  च्या दशकाच्या उत्तरार्धात बेझंट यांच्या आर्थिक  पाठबळावर इग्लंडला प्रयाण केले. तेथे उच्च शिक्षण घेत  असताना, काही काळ थियॉसॉफीचा प्रचार केला खरा, पण लवकरच ते अध्यात्मिक बाबींपासून दूर होत राजकारण  आणि डाव्या विचारांकडे ओढले गेले. तो काळ कायदेभंगाच्या चळवळीचा आणि गोलमेज परिषदांचा  होता. त्यामुळे लवकरच ते भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार  करण्याच्या कार्यात सक्रिय झाले.

या कार्यासाठी वाहिलेली  ‘इंडिया लीग’ ही संस्था कृष्ण मेनन यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. सबकुछ कृष्ण मेनन असे या संघटनेचे स्वरूप होते. या कार्यात त्यांना प्रारंभीच्या काळात पं. मदन रमेश यांच्यामते आपण चरित्र लिहिताना जी तथ्य पुढे आली, त्यांची खातरजमा करून वाचकांपुढे मांडली आहेत, त्यांच्याबद्दल काही एक मतप्रदर्शन करण्याचे अथवा विश्लेषणात्मक  मांडणी करण्याचे टाळले आहे. त्यामुळेच  वाचकाला पडलेले हे प्रश्न अनुत्तरित राहतात. कृष्ण मेनन यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला मौलाना आझाद यांचा बराच काळ विरोध होता  तो का, हे या चरित्रात अनुल्लेखितच राहाते. ‘तो  नंतर का मावळला’ हा असाच एक अनुत्तरित  प्रश्न.

कृष्ण मेनन यांच्या काटेरी स्वभावाची  नेहरूंना जाणीव होती,  हे चरित्रात उद्‌धृत  केलेल्या पत्रव्यहारातून स्पष्ट होते. कृष्ण मेनन हे अनेक वेळा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात,  हेदेखील नेहरूंना ठावूक होते. त्यांच्या  कर्तबगारीच्या आड येणारे हे अवगुण होते.असे असूनदेखील नेहरू यांनी त्यांच्यावर चढत्या क्रमाने जबाबदाऱ्या का सोपविल्या असतील, याचा खुलासा रमेश करीत नाहीत किंवा काही  शक्यतादेखील मांडत नाहीत. मोहन मालवीय यांनी आर्थिक मदत केली.  लवकरच ते डाव्या विचारांचे आगर मानल्या गेलेल्या  ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स्‌’मध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले. तिथे त्यांच्या परिचय झाला तो जागतिक  किर्तीचे समाजवादी विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की  यांच्याशी. त्यांच्यावरील लास्कींचा प्रभाव आयुष्यभर  टिकला. लास्की कुटुंबाचे ते मित्र बनले. लास्कींमुळे मेनन  यांचा मजूर पक्षाच्या नेतृत्वाच्या दोन पिढ्यांशी परिचय झाला अथवा मैत्री जमली. त्यात क्लेमेंट ॲटली, सर स्टॅफर्ड क्रिप्स्‌ तसेच युवा पिढीतील मायकल फूट हे होते. इतकेच नाही तर मेनन मजूर पक्षाचे सदस्यही झाले, पक्षातर्फे नगरसेवकही झाले.

प्रकाशन व्यवसायातील त्यांची  कामगिरीदेखील महत्त्वाची होती. ‘पेंग्विन’ या ख्यातनाम  प्रकाशन संस्थेच्या यशात त्यांचा वाटा होता.  या काळात त्यांचा परिचय जवाहारलाल नेहरूंशी होऊन  मैत्री झाली, त्यामुळे कृष्ण मेनन यांच्या राजकीय  कारकिर्दीला एक वेगळीच दिशा मिळाली. इग्लंडमधील  वास्तव्यात भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा त्यांनी धसास लावून धरला. त्यासंदर्भात लोकमत जागृत करण्यास मदत झाली. स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत त्यांनी पडद्यामागे  महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर भारत राष्ट्रकुलाचा  सदस्य राहील, यासाठी सर्वमान्य होईल असा तोडगा काढला. यादरम्यान ते इग्लंडमधील भारताचे पहिले  उच्चायुक्त (1947-1952) झाले. त्यानंतर ते दीर्घकाळ संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून  कार्यरत राहिले.

या दोन पदांवरील त्यांची कारकीर्द तशी वादग्रस्त आणि  वादळी ठरली. ते उच्चायुक्त असतानाचे जीप खरेदी प्रकरण बरेच गाजले. महत्त्वाचे म्हणजे ते कम्युनिस्टांचे हेर असावेत, किमानपक्षी सहप्रवासी तरी असणारच हा ब्रिटिश  सरकारला आलेला संशय. या सर्व बाबी तसेच त्यांची  प्रकृती यामुळे त्यांना अतिशय अनिच्छेने त्या पदावरून दूर व्हावे लागले. ते संयुक्त राष्ट्रसंघात असताना भारताचीच  नव्हे तर तिसऱ्या जगाची भूमिका ठामपणे मांडणारे कुशल  नेते म्हणून त्यांची प्रतिमा झाली.

कोरियन युध्दाच्या समाप्तीसाठी तोडगा काढण्यात, 1950 च्या दशकात इंडो- चायनासंदर्भातील जिनिव्हा वाटाघाटीत तसेच चीनच्या  ताब्यातील वैमानिक सोडविण्यात, बांडुंग परिषदेच्या यशात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,  वादग्रस्त विषयांवरील  चर्चा पुढे जाईल असा सर्वमान्य मसुदा तयार करण्यात त्यांचे विलक्षण कौशल्य होते आणि याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. मात्र या कार्यात त्यांचे स्वभावदोष पुढे आले. डाव्या  विचारांकडे कल असल्यामुळे असेल कदाचित,  सोव्हिएत  युनियनच्या दोषांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि  पाश्चात्यांच्या ढोंगावर सातत्याने बोट ठेवण्यामुळे ते  पक्षपाती आहेत,  असे पाश्चात्य देशातील नेतेमंडळींना वाटत  असे. हीच मंडळी प्रसंगी त्यांची मदत घेत असत, मात्र बोलण्यातील नको इतका फटकळपणा,  दुसऱ्यांना  दुखावण्याची सवय,  इत्यादी अवगुणांमुळे एक पाताळयंत्री मुत्सद्दी अशी त्यांची प्रतिमा बनत गेली.

भारताला सोव्हिएत युनियनच्या जवळ नको इतके नेण्यात तेच जबाबदार आहेत, अशी भारतातच नव्हे तर देशाबाहेरदेखील समजूत झाली. 1956 मध्ये घडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन घटनांबाबत (सुएझ कालवा  करणात इंग्लंड, फ्रान्स आणि इस्रायल यांनी कट करून इजिप्तवर केलेले आक्रमण आणि हंगेरीतील साम्यवादी राजवट टिकविण्यासाठी सोव्हिएत रशियाने केलेली लष्करी कारवाई). त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका हा त्यासाठी पुरावा मानला जाऊ लागला. त्यात भर पडली त्यांना सततची वाटणारी असुरक्षितता.

अधूनमधून आपण लोकांना आणि विशेषतः नेहरूंना नकोसे झालो आहोत,  आपण निरुपयोगी ठरत आहोत; असे वाटून त्यांचे मानसिक  संतुलन बिघडायचे. काही वेळा तर त्यांनी आत्महत्या  करण्याचे विचार बोलूनदेखील दाखविले होते.  असे असले तरी त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख  चढताच राहिला. पक्षांतर्गत विरोध असूनही नेहरूंनी त्यांना  आधी बिनखात्याचे मंत्री म्हणून नेमले,  आणि त्यानंतर थेट संरक्षणमंत्री केले. त्यांची ही दुसरी जबाबदारी सर्वांत वादग्रस्त ठरली. संरक्षण मंत्रीपदाच्या काळातील कृष्ण मेनन  यांच्या जमेच्या बाजूंची विस्तृत चर्चा रमेश यांनी केली  आहे. देशांतर्गत शस्त्रास्त्रांचे उत्पादन व्हावे, यासाठी त्यांनी  बरेच प्रयत्न केले. ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ तथा डी.आर.डी.ओंची स्थापना हे मेनन  यांचे योगदान आहे. एवढेच नाही तर, तोपर्यंत आपण  शस्त्रास्त्रांसाठी पाश्चिमात्य देशांवर प्रामुख्याने अवलंबून  होतो. कृष्ण मेनन यांनी सोव्हिएत रशियाच्या पर्यायावर भर  देऊन देशाचे लष्करी सामर्थ्य वाढविले, याची नोंद रमेश  यांनी घेतली आहे.  

संरक्षण मंत्रीपदावर असताना कृष्ण मेनन यांची प्रमुख  कामगिरी म्हणजे 1961 साली झालेली गोव्याची मुक्ती. हा  प्रश्न वाटाघाटीने सुटेल,  असे भारत सरकारला दीर्घ काळ वाटत राहिले. मात्र जगभर निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला  1950 च्या दशकात वेग आला. भारताने त्याला केवळ  पाठिंबाच दिला असे नाही तर आफ्रिका खंडातील अनेक स्वातंत्र्य चळवळींना मदतदेखील केली. या पोर्शभूमीवर  गोव्याबाबत भारत काहीच करत नाही, म्हणून तिसऱ्या  जगाकडून टीका होऊ लागली, देशांतर्गत टीकाही होत होती. या संधीचा उपयोग कृष्ण मेनन यांनी करुन घेतला. 1962 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा आपल्याला व्यक्तिशः फायदा होईल, हे गणित त्यांच्या मनात असणारच. नेहरू या कारवाईला फारसे अनुकूल नव्हते, मात्र कृष्ण मेनन यांनी त्यांना राजी केले  आणि गोव्याबाबत अशी कारवाई न करण्यासाठी पंतप्रधानांवर वाढत चाललेला अमेरिकाचा दबाव शिताफीने  चकवून ती कारवाई यशस्वी केली. यामुळे कृष्ण मेनन  यांच्या लोकप्रियतेत वाढ झालीच आणि 1962 ची निवडणूक त्यांनी सहज जिंकली.

नेहरूंचे संभाव्य वारसदार म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. मौलाना आझाद आणि पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्यासारखे ज्येष्ठ  हयात नसल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. 1962मध्ये झालेल्या नामुष्कीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची संरक्षणसिद्दता कमकुवत ठेवल्याचा आरोप कृष्ण  मेनन यांच्यावर लावला जातो. चीनचा धोका त्यांनी कधीच गांभीर्याने घेतला नाही, असाही आरोप त्यांच्यावर घेतला जातो. चीनपासून धोका आहे हे कदाचित कृष्ण मेनन यांना अमान्य असेलही, मात्र चीनशी वाटाघाटींचाच मार्ग इष्ट आहे हे इतरांनादेखील वाटत असल्याचे रमेश नमूद करतात.  खुद्द लष्करप्रमुख जनरल के.एस.थिमय्या यांनी लेख लिहून या भूमिकेचा पुरस्कार केला होता, याची नोंद या चरित्रात  आहे. संरक्षण खर्च अपुरा असण्याचे कारण अनास्था हे  नसून भारताची नाजूक आर्थिक परिस्थिती होय, हा रमेश  यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. मात्र असे असतानाही  संरक्षणावर वाजवी खर्च करताच आला असता. तसे न  होण्याचे अपश्रेय तत्कालिन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचे  आहे ही रमेश यांची मांडणी न पटणारी आहे.

देसार्इंचे  आक्षेप बाजूला सारून पं. नेहरू यांना निर्णय घेता आले  असते, पण तसे झालेले दिसत नाही. म्हणजेच यासाठी पं. नेहरूदेखील काहीअंशी जबाबदार आहेत, असे म्हणावे  लागेल आणि त्याबाबत लेखक काहीच भाष्य करीत नाही. चरित्रात भारत-चीन सीमावादाची सविस्तर चर्चा  केलेली आहे. 1960 मध्ये चीनचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान झाऊ एनलाय (नर्हेी एपश्ररळ) हे यासंदर्भात  भारतात आले होते. अक्साई चीनवरचा चीनचा हक्क  भारताने मान्य केल्यास अरुणाचल प्रदेशावरील (त्यावेळचे नेफा) भारताचा हक्क आणि पर्यायाने मॅकमोहन रेषा चीन  मान्य करेल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. अक्साई चीन  भारताने चीनला देऊन टाकण्यापेक्षा दीर्घ मुदतीने भाडेपट्‌ट्याने द्यावा असाही एक प्रस्ताव होता.

कृष्ण मेनन  हे एकटेच अशा चौकटीतील वाटाघाटीस तयार होते असे  रमेश यांनी नमूद केले आहे. किंबहुना हाच त्यासंदर्भातील  व्यवहार्य प्रस्ताव होय, असे रमेश (नामवंत अभ्यासक  डॉ. श्रीनाथ राघवन यांचा हवाला देत) सूचित करतात. नेहरूंवरील देशांतर्गत दबावामुळे ते शक्य झाले, ही राघवन यांची नोंद लेखक उद्‌धृत करतात. मात्र अशी शक्यता होती  हे मान्य करताना ती स्वीकारायला हवी होती, हा पश्चातबुध्दिचा प्रकार होय असेदेखील राघवन म्हणतात.  तसेच या चौकटीत वाटाघाटी यशस्वी झाल्या असत्या तर, चीनने भविष्यात अधिक मागण्या केल्या असत्या आणि ते  भारताला मान्य करणे भाग पडेल, अशी भारतीय नेते- अधिकाऱ्यांची भीती रास्त होती. त्यामुळेच हा प्रस्ताव स्वीकारला जाणे अवघड होते असेही राघवन म्हणतात. त्यामुळे रमेश यांनी कृष्ण मेनन यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी राघवन यांच्या विवेचनातील सोइस्कर भाग तेवढा घेतला आहे, असे वाटण्याचा संभव आहे.

कृष्ण मेनन यांच्यावर दुसरा आरोप होतो तो लष्करातील नेमणुकांबाबतचा अवाजवी हस्तक्षेप. तो कसा खरा आहे असे रमेश सांगतात, तसेच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमधील आपापसातील बेबनाव हे काहीसे अज्ञात  तथ्यदेखील मांडतात. मेनन यांच्या हस्तक्षेपामुळे जनरल  थिमय्या यांनी लष्करप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि त्याचवेळी नौदल आणि वायुदल प्रमुखांनी राजीनाम्याची  तयारी दर्शविली होती. नेहरूंच्या शिष्टाईमुळे थिमय्या यांनी  राजीनामा मागे घेतला खरा, पण एकूण वातावरणातील तटस्थपणा कायम राहिला. जनरल थिमय्या यांनी निवृत्त  होण्याआधी,  आपल्यानंतर लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांची नियुक्ती करावी, अशी सरकारला शिफारस केली होती. पण सरकारने म्हणजे प्रामुख्याने कृष्ण मेनन  यांनी लेफ्टनंट जनरल पी.एन. थापर यांच्या नावाला पसंती  दिली.

पदभार स्वीकारण्याचा आधी थापर यांनी थिमय्या  आणि थोरात यांना स्वतंत्रपणे पत्र लिहून त्यांच्यावर अनेक  आरोप ठेवत, त्यांबाबत खुलासा मागितला. असे करताना  या सगळ्यांसाठी आपल्याला संरक्षण मंत्री आणि खुद्द  पंतप्रधान यांची संमती आहे असे सांगितले. हे प्रकरण नंतर  नेहरूंच्या हस्तक्षेपामुळे निस्तरले गेले. या संदर्भातील कृष्ण मेनन यांच्या भूमिकेबाबत रमेश यांची टीका अगदीच  मिळमिळीत वाटते. या प्रकरणातील नेहरूंच्या  भूमिकेबाबतदेखील ते काही टिपण्णी करीत नाहीत. या  सगळ्याचा परिणाम संरक्षणसिध्देतेवर झाला आणि त्याचे  परिणाम 1962 साली भोगावे लागले. या लष्करी नामुष्कीमुळे सरकारला,  नेहरूंना आणि  अर्थातच कृष्ण मेनन यांना विरोधकांच्या टिकेला सामोरे  जावे लागले. टीकेचा भडिमार वाढत गेला आणि त्यात  सत्ताधारी पक्षातील आवाजही सामील झाले. खुद्द नेहरूंच्या  स्थानाला धक्का पोहोचतो की काय, अशी परिस्थिती निर्माण  झाली आणि अखेर कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला.  

त्यातदेखील नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. प्रारंभी  त्यांच्याकडील संरक्षण खाते काढून घेण्यात आले आणि केवळ संरक्षण उत्पादन खाते ठेवण्यात आले. टीकेचा जोर  वाढत गेला आणि अनिच्छेने नेहरूंनी त्यांचा राजीनामा  स्वीकारला. त्यासाठी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांचा जसा  अप्रत्यक्ष दबाव होता, तसा अमेरिकेचे राजदूत आणि  प्रख्यात अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅलब्रेथ यांचादेखील होता,  हे रमेश यांनी दाखवून दिले आहे. मेनन हे संरक्षणमंत्रीपदी  राहिले तर भारताला शस्त्रास्त्र पुरवठा करणे अमेरिकेला अवघड जाईल, असे गॅलब्रेथ यांचे म्हणणे राजीनाम्याला  कारणीभूत ठरले. यावरून आपण किती आगतिक झालो  होते हे दिसते.  राजीनाम्यानंतरदेखील मेनन हे काँग्रेसच्या राजकारणात  सक्रिय राहिले. 1967 साली त्यांना काँग्रेसने लोकसभेची  उमेदवारी दिली नाही,  पण त्यांची राजकीय कारकीर्द संपली  नाही.

डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर ते 1969 आणि 1971 साली ते लोकसभेवर निवडून आले,  त्यांच्यात अर्थातच पूर्वीइतका जोश उरला नव्हता. चरित्रात त्यांच्या या विस्तृत  आणि विविधांगी कारकिर्दीची तपशीलवार माहिती मिळते, पण मनात काही प्रश्न उभे राहतात आणि एक  असामाधानाची भावना निर्माण होते. त्याचे कारण म्हणजे हे चरित्र लिहिताना रमेश यांनी स्वीकारलेली भूमिका. रमेश यांच्यामते आपण चरित्र लिहिताना जी तथ्य पुढे आली, त्यांची खातरजमा करून  वाचकांपुढे मांडली आहेत, त्यांच्याबद्दल काही एक मतप्रदर्शन करण्याचे अथवा विश्लेषणात्मक मांडणी  करण्याचे टाळले आहे. त्यामुळेच वाचकाला पडलेले हे प्रश्न अनुत्तरित राहतात.

कृष्ण मेनन यांच्या मंत्रिमंडळातील  समावेशाला मौलाना आझाद यांचा बराच काळ विरोध  होता तो का, हे या चरित्रात अनुल्लेखितच राहाते. ‘तो नंतर  का मावळला’ हा असाच एक अनुत्तरित प्रश्न. कृष्ण मेनन यांच्या काटेरी स्वभावाची नेहरूंना जाणीव होती,  हे चरित्रात  उद्‌धृत केलेल्या पत्रव्यहारातून स्पष्ट होते. कृष्ण मेनन हे  अनेक वेळा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात, हेदेखील  नेहरूंना ठावूक होते. त्यांच्या कर्तबगारीच्या आड येणारे हे  अवगुण होते. असे असूनदेखील नेहरू यांनी त्यांच्यावर  चढत्या क्रमाने जबाबदाऱ्या का सोपविल्या असतील,  याचा  खुलासा रमेश करीत नाहीत किंवा काही शक्यतादेखील  मांडत नाहीत.

कृष्ण मेनन यांचा संयुक्त राष्ट्रसंघातील  काश्मीर विषयात दोन हप्त्यात झालेल्या तब्बल आठ  तासांच्या घणाघाती भाषणाचा नेमका परिणाम काय झाला, हेदेखील आपल्याला समजत नाही. या आणि अशा इतर काही प्रश्नांची उत्तरे कदाचित पुढील  काळात इतर संशोधक देतील. कृष्ण मेनन यांचा पत्रव्यवहार  खुला झाल्यामुळे ते शक्यदेखील होईल. मात्र आतापर्यंत  सात-आठ पुस्तके हातावेगळी करणाऱ्या रमेश यांना वाचकाला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर स्वतः द्यावे लागेल, ते म्हणजे सक्रिय राजकारणात कार्यरत असताना सखोल  संशोधन करून लिखाण करण्यासाठी त्यांना वेळ कसा काय  मिळतो. चरित्रात काही गफलती झालेल्या दिसतात. कृष्ण मेनन  यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर त्यांच्याबाबत प्रकाशित  झालेल्या अनेक पुस्तकांचा सविस्तर आढावा रमेश यांनी  घेतला आहे.

यात समकालिनांच्या आठवणी-आत्मचरित्र  तसेच देशी-परदेशी अभ्यासकांचे लेखन यांचा समावेश  आहे. मात्र ज्येष्ठ पत्रकार डी.आर. मानकेकर यांच्या ‘द गिल्टी मेन ऑफ 1962’. तसेच एके ठिकाणी कमलनयन आणि रामकृष्ण या बजाज बंधूंची गल्लत झालेली दिसते. 1950 च्या दशकात कृष्ण मेनन संयुक्त राष्ट्रसंघाचे मैदान  गाजवत असताना,  गगनविहारीलाल मेहता (वैकुंठभाई  मेहता यांचे बंधू) भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. मेनन  यांची एकूण अमेरिकाविरोधी प्रतिमा पाहता,  त्यांना आपले काम खुबीने करावे लागले असणार. मात्र त्यांचा साधा  उल्लेखदेखील या चरित्रात नाही. पुस्तकात अनेक महत्त्वाची छायाचित्रे आहेत,  त्यामुळे वाचनीयतेत भर पडली आहे. मात्र नामसूची सदोष आहे.

कृष्ण मेनन हे डाव्या विचारांचे असले तरी इतर विचारसरणीचे अनुयायी असलेल्या व्यक्तींना त्यांच्याशी जवळीक साधावी वाटली. त्यापैकी एक म्हणजे भाजपचे  नेते, ज्येष्ठ कायदेपंडित (माजी पंतप्रधान अटलबिहारी  वाजपेयी यांचे घनिष्ट मित्र) ना.म.घटाटे, कृष्ण मेनन  सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असनाता घटाटे यांनी  आवर्जून त्यांचे ज्युनियर म्हणून काम करायचे ठरविले.  त्यांच्यामुळे वाजपेयी आणि मेनन यांचा स्नेह जमला. कृष्ण  मेनन यांच्या निधनानंतर घटाटे यांनी ऑर्गनायझर या राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाशी संलग्न साप्ताहिकात- दोन गौरवपर लेख  लिहून देशांतर्गत शस्त्रास्त्र उत्पादनाचे उद्योग उभारणीच्या  प्रयत्नातील त्यांचे योगदान अधोरेखित केले, अशी नोंद  रमेश यांनी केली आहे. विद्यमान राज्यकर्ते काळाच्या  पडद्याआड गेलेल्या वैचारिक आणि राजकीय विरोधकांच्या  बाबतींत आजच्या घडीला असेच औदार्य दाखवतील  काय, असादेखील प्रश्न या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने  वाचकांना पडेल.

ए चेकर्ड ब्रिलिएन्स्‌ : द मेनी लाईव्स्‌ ऑफ व्ही.के. कृष्ण मेनन 
लेखक : जयराम रमेश  
पेंग्विन व्हायकिंग, 2019  
किंमत : 999 रुपये   

Tags: अभय दातार पेंग्विन व्हायकिंग जयराम रमेश व्ही.के. कृष्ण मेनन  ए चेकर्ड ब्रिलिएन्स्‌ : द मेनी लाईव्स्‌ ऑफ व्ही.के. कृष्ण मेनन  krishna menon पुस्तक परिचय book review abhay datar penguin india jayram ramesh a checkered brilliance weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अभय दातार,  नांदेड, महाराष्ट्र
abhaydatar@hotmail.com

राज्यशास्त्र विभाग, पीपल्स्‌ कॉलेज, नांदेड


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात