डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'धान्य बँके'चे दामाजी तुकाराम शिंदे गेले!

...

तुकाराम शिंदे गेले, ही बातमी वणव्यासारखी गावात पसरली. दोनएक हजार वस्तीचं दारफळ. सोलापूर जिल्हयातलं, माढा तालुक्यातलं. आमचा प्रेरणेचा झरा आटला. किती जणांना आधार त्यानं दिला. गावाचा जिरेटोप, उजेड, आर्थिक आघाडीचा वीर, आमच्या विश्वासाचे ठिकाण, धान्य बँकेचा कर्ता, किती तुकारामाची रूपं! 

मिणमिणत्या चिमणीपुढे त्यांनी बालवयात धडे गिरवले ते गरिबीतही सत्याने, करारी, पण हळव्या स्वभावाने राहण्याचे. आईचे छत्र लहानपणीच गेले. माध्यमिक शिक्षणासाठी माढ्याला हेलपाटे. पुढे ग्रामसेवकाची नोकरी. सय्यद उमराव मास्तरांनी पेटविलेली सेवा दलाची मशाल तुकाराम निवृत्ती शिंदे यांनी उंच उचलली. खादी कमिशनचा प्रकल्प, अंबर चरखा, ग्रामोद्योग, यांनी गावाचे रुपच पालटले. समर्थ सरपंच, तीन समाजमंदिरांचे कर्ते, नळ, पाणी, वीज, गावात आणणारे भगीरथ, 'वसंत बंधाऱ्या'चे उद्गाते, नेदरलॅन्ड मदतीने आणखी जमीन ओलिताखाली आणणारे, मातंग समाजाला जगण्यास साधन देणारे, खेड्यात 80 टक्के यशस्वी मुलांची शाळा स्थापणारे-गावाचा कंठमणी ठरलेल्या शिंदे यांना आदराच्या अनेक पुष्पांजली!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके