डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

यवतमाळला गेलेल्या माणसाला ‘स्वदेश’कार श्री. ब. ना. एकबोटे यांची भेट टाळून चालतच नाही. यवतमाळच्या जडण घडणीत त्यांचाही वाटा आहे. विशेषतः यवतमाळच्या वैचारिक व सांस्कृतिक घडणीत.

यवतमाळला गेलेल्या माणसाला ‘स्वदेश’कार श्री. ब. ना. एकबोटे यांची भेट टाळून चालतच नाही. यवतमाळच्या जडण घडणीत त्यांचाही वाटा आहे. विशेषतः यवतमाळच्या वैचारिक व सांस्कृतिक घडणीत.

त्यांचा सार्वजनिक कार्यातला उत्साह पाहिला की त्यांनी पाऊणशे वयमान गाठले असेल असा संशयदेखील कोणाला येत नाही. सत्य-शिव-सुंदराचे तेच आहेत आणि त्यामुळे कुठल्याही एका पठडीत ते अडकत नाहीत, पण त्यांच्या लोकसंग्रहात सर्व मतपंथांची माणसे मात्र हटकून सापडतात. ‘स्वदेश’ हे एक छोटेसे पत्र आहे पण तेही त्याच उद्देशाने त्यांनी गेली तेवीस वर्षे चालवलेले आहे.

आंतर भारतीच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे आणि त्या कामात त्यांचे सतत सहकार्य मिळत असते. आंतर भारतीतर्फे आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांत आपल्या भागातील व विशेषतः शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मंडळींनी सामील व्हावे अशी तळमळ त्यांना वाटते आणि त्यासाठी ते मनापासून मेहनत करतात.

यवतमाळला त्यांचा अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी प्रा. राम शेवाळकर यांनी अत्यंत मार्मिकपणे श्री. ब. ना. एकबोटे यांच्या कामगिरीचे वर्णन केले. ते म्हणाले, “सध्याच्या मूल्यनिष्ठेच्या दुष्काळाच्या काळात सत्प्रवृत्ती एकाकी पडली आहे. अशा काळात सत्प्रवृत्तींची विझू विझू पाहाणारी ज्योत प्राणपणाने तेवत ठेवणारे आणि सतत्वाची माधुकरी मागणारे श्री. एकबोटे वंदनीय वाटतात.”

श्री. ब. ना. एकबोटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे हार्दिक शुभचिंतन!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके