आपण दररोज छोट्या-मोठ्या क्रांतीचे झेंडे फडकवत असतो. पण प्रत्येक क्रांती ही एका नव्या अस्वस्थतेला जन्माला घालीत आहे, सामान्य माणसाचे आयुष्य सुखी करणं हा कोणत्याही क्रांतीचा उद्देश आहे, असं आपल्याला दिसत नाही. आता माझ्या आयुष्याची काही वर्षच उरली आहेत. त्यामुळे मरणापूर्वी ही दुनिया पूर्वीपेक्षा अधिक कुरूप आणि भयानक असणार आणि त्यात मी काहीही बदल घडवून आणू शकणार नाही, या विचारामुळे मला निराशा आलेली आहे... सात्र्र यांचं सगळं जीवनच 'एका सत्याचा शोध घेण्यात व्यतीत झालं होतं. सार्रव्या साहित्यात एक प्रकारचा नैतिक तणाव आहे; तो आपल्याकडील साहित्यात दिसत नाही ही चिंतेची बाब आहे.
'आतला आवाज' ही संकल्पना मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा प्रकाशात आली होती. सोनिया गांधी यांनी आपल्या आतल्या आवाजाला स्मलन पंतप्रधानपद सोडले असे सांगितले गेलं. पण त्यांचं अनुकरण कोणत्याही काँग्रेस पुढान्याने केले नाही. अलीकडे मात्र शिवसेनेतच आतला आवाज' प्रमाण मानणाच्यांचे प्रमाण वाढलेलं दिसतंय. राणेंनी आतला आवाज ऐकतच सेना सोडली आणि हा वाघ काँग्रेस गवत खाऊ लागला. राजने आतल्या आवाशाप्रमाणे सेना-नेतृत्वपदाचा राजीनामा दिला खरा; पण पुढे काय करणार है बन्याच काळ गुलदस्त्यात ठेवून इतरांची दातखीळ बसवण्याचा प्रसंग आणला. पण अशा प्रकारे जर प्रत्येक राजकीय नेत्याने वागायचं ठरवतं तर सगळ्याच राजकीय पक्षांत गोंधळ उडेल. माणून समर्थ राजकीय नेते आपला 'आतला आवाज' आतल्या आतच दाबून टाकत असतात. पण कायंतांना मात्र तसं करून चालत नाही. जोपर्यंत कलायत आतल्या आवाजाला साक्षी ठेवून आपली नाव हाकतो, तोपर्यंत तो कलावंत म्हणून आपलं सत्त्व टिकवून असतो. अलीकडे मात्र लेखक-कलावंतांनी राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला सुरुवात केल्यामुळे आपल्या आतल्या आवाजाची मुस्कटदाबी सुरू केली आहे. या नाटकाचा नवा प्रयोग सोलापूरच्या साहित्य संमेलनात कदाचित आपणाता पाहायला मिळेल. बेळगाव प्रश्नाचं वादळ घोंघावत आहेच, त्यावर शासनाचा कत बघून त्या संमेलनात त्याविषयी बोलायचं की नाही हे ठरवलं जाईल, असं वाटतंय. असो.
तर यापूर्वीच्या साहित्य संमेलनाचा आपला अनुभव सांगतो की, शासनाला जे सोयीचं तेच साहित्यिकांच्या अंतरात्म्यातून बाहेर पडतं. उगीच शाससनकत्त्याच्या विरोधात बोतून एखाया कमिटीवरची नियुक्ती का घालवा, असा साधा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. या वृत्तीमुळेच आमच्या साहित्य संमेलनावर राजकीय मंडळींचा वरचष्मा असलेला आपण हताशपणे पाहतो. 'गीतरामायण 'सारख्या कलाकृतीच्या 50 व्या वर्धापनदिनाचा सोहळाही राजकीय मंडळीनीथ पुताकार घेऊन केलेला आपणाता थालतो. शैक्षणिक क्षेत्रातल्या नेमणुकाही राजकीय मंडळीच्या इशान्यावरच झालेल्या आपल्या खपवून ध्याच्या लागतात... अशा कितीतरी घटना सांगता येतील, या सगळ्याचं कारण म्हणजे सरकारला धाक वाटेल अशी निर्भय लोकांची फळीच आपण नष्ट करून टाकली आहे. 'आतल्पा आयाजा वे महत्व इयं सुर होतं. महात्मा गांधीनी 'आतता आचाज ऐकतच हा देश स्वतंत्र केला. मध्यंतरी 'दांडी यात्रे'च्या स्मरणार्थ काही काँग्रेस पुढारी त्या मार्गाने चालत गेले; पण नुसतं त्या रस्त्यावरून चार पावलं चालल्याने आतल्या आवाजाला प्रमाणे चालण्याधी हिंमत येत नाही, हे त्या नेत्यांना कुणी सांगावं?
पण मध्यंतरी जुन्या पिढीतील काही कतावंत लेखकांनी सरकारव्या निर्ढावतेपणाविरुद्ध आपला आवाज उठवला होता. ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगत यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सत्कारसभारंभात अपमान झाला होता, म्हणून त्यांनी त्यांना मिळालेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत करायची घोषणा केली होती. त्याची भरपाई म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल कृष्णा यांनी त्यांचा सत्कार महाराष्ट्राच्या वतीने केला होता. ज्येष्ठ हिंदी लेखक विष्णु प्रभाकर यांनीही राष्ट्रपती भवनात झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून 'पचद्मभूषण' परत करायची घोषणा केली होती.
अशा घटनांनंतर सरकार माघार घेतं; पण भविष्यात सरकारी यंत्रणेच्या वागण्यात काही सुधारणा झालेली आहे असं दिसत नाही.
महाराष्ट्रात सरकारी पारितोषिकांना कडवा विरोध केला तो दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या भूमिकेची आठवण कुणीना कुणी सातत्याने करून देत असतं., मध्यंतरी] स्यांच्या भूमिकेची आठवण अंजली कीर्तने यांनी एका नियतकालिकातून करून दिली होती. त्यात दुर्गाबाईची भूमिका सारांशाने मांडतांना त्यांनी लिहिलं होतं की, 'राज्यकत्यांच्या दृष्टीने अनुदान है दान असतं आणि त्या बदल्यात सरकार तुमच्या विधारस्वातंत्र्याची किंमत भागतं. मुक्त विचारशक्ती हेथ खेखकार्थ शस्त्र आहे. ते त्याने सरकारकडे गहाण टाकू नये. सरकारला जाब विचारणारी बुद्धिमान, निर्भय सोकांची फीच नष्ट शासी तर सदसद्विवेक बुद्धीचा आतला आवाजय लोप पावेल. म्हणून कलावंत विचारवंतांनी ही पारितोषिक, देणग्या यांपासून दर असावं.' आर्यात हे आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत. जगभर असे महत्त्वाचे पुरस्कार प्यायला नकार देणारे लोक अजूनही आहेत. 'लगान', 'श्वास' आणि आता 'पहेली' या चित्रपटांमुळे आपल्याला 'ऑस्कर पुरस्कारांबद्दल खूप जवळून माहिती झाली. हा पुरस्कार आयुष्यात एकदा तरी मिळावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यामुळे 'ऑस्कर' घेण्याचं कधी नाकारलं गेलं असेल, असं मला वाटत नव्हतं. पण ते पारितोषिक घ्यायता नकार देणाऱ्या पटनाही 'आस्कर ध्या इतिहासात दोनदा घडलेल्या आहेत. पहिल्यांदा जॉर्ज सी.स्कॉट या अभिनेत्याने त्याला 'पॅटन'मधील नायकाच्या भूमिकेसाठी मिळणारं 'ऑस्कर नाकारले होतं. 'ऑन द वॉटर फ्रंट' (1954) या चित्रपटासाठी पहिलं ऑस्कर मिळविणाऱ्या मार्लन बंडो या अभिनेत्याला 1972 मध्ये 'गॉड फादर'साठी 'ऑस्कर' देण्यात आलं. तेव्हा अमेरिकन सरकार रेड इंडियन्सबर अत्याचार करीत असल्याच्या निषेधार्थ त्याने ते नाकारले होतं.
"नोबेल पुरस्कारासारखा जागतिक पातळीवरचा पुरस्कारही घ्यायला नकार दिला गेला होता. 1964 साली सा्ने त्याला मिळालेला नोबेल पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली होती. नोवेल पुरस्कार न स्वीकारण्यामागची भूमिका विशद करताना त्यांनी म्हटलं होतं की, "नोबेल पुरस्कार न स्वीकारून मी स्वीडिश अकादमीचा आणि त्यांच्या सदस्यांचा अनादर करतोय, असं समजण्याचे कारण नाही. पुरस्कार न स्वीकारण्यामागचं कारण अतिशय व्यक्तिगत आहे. साहित्यिकांची निष्ठा ही सत्याच्या शोधाशी जोडलेली असायला हवी. पण एखादा पुरस्कार स्वीकारताच त्या साहित्यिकाची निष्ठा पुरस्कार देणाऱ्या संस्थेशी जोडली जाते, असं माझे मत आहे. लेखकाने संस्थेच्या रूपात काम करू नये, किंवा कोणत्याही संस्थेशी त्याने स्वतःला जोडून पेऊ नये. त्याने सरकारी किंवा अन्य कोणतेही पुरस्कार स्वीकारू नयेत. असे पुरस्कार स्वीकारून लेखक आपल्या वाचकांवर अन्यायच करीत असतो.
24 मार्च 1980 साली साने आपल्या शेवटच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'आज तिसऱ्या महायुद्धार्थ संकट जगातील लोकांच्या डोक्यावर घोंघावत आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत पडण्यापासून मी स्वतःला वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. या स्थितीतून आम्ही कधीही वर येणार नाही, असं मला वाटतं. आपण अतिशय तुच्छ आणि स्वार्थी हेतूने आपापसात करतो आहोत... आपण दररोज छोटया-मोठया क्रांतीये झेंडे फडकवत्त असतो. पण प्रत्येक फ्रांती ही एका नव्या अस्वस्थतेला जन्माला घालीत आहे. सामान्य माणसाचं आधुष्य सुखी करणं हा कोणत्याही क्रांतीचा उद्देश आहे, असं आपल्याला दिसत नाही. आता माझ्या आयुष्याची काही वर्षच उरली आहेत. त्यामुळे मरणापूर्वी ही दुनिया पूर्वीपेक्षा अधिक कुरूप आणि भयानक असणार आणि त्यात भी काहीही बदल घडवून आणू शकणार नाही, या विचारामुळे मला निराशा आलेली आहे... मी आशावाद मनाशी बाळगून मरू शकलो असतो तर किती बरं झालं असतं! पण अशी आशादायक स्थिती माझ्या भाग्यात लिहिलेली दिसत नाही...' त्यांच्या या वक्तव्यावरून ते एक इमानदार, मानवतावादी लेखक होते, हे कुणीही मान्य करेल, सार्च यांचं सगळं जीवनच 'एका सत्याचा शोध घेण्यात व्यतीत झालं होतं. सार्चच्या साहित्यात एक प्रकारचा नैतिक तणाव आहे: तो आपल्याकडील साहित्यात दिसत नाही ही चिंतेची बाब आहे.
बेंजामीन झेफनाय हे एक कृष्णवर्णीय. कार्यकर्ता आणि कवी आहेत. गुलामगिरीच्या प्रयेमुळे गोच्यांनी कृष्णवर्णीयांची संस्कृतीच नष्ट करून टाकली, याची त्यांच्या मनात खंत आहे. वर्णभेदाविरुद्ध संघर्ष, प्राणिहकांसंबंधी काम, इराक युद्धविरोधी भूमिकेतून काम अशा कामांबरोबरच आपल्या कविता लेखनातून ते साम्राज्यशाही विरोधात झोड उठवतात. त्यांना या कामापासून परावृत्त करण्याचा एक मार्ग म्हणून देण्यात आलेला 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा किताब स्वीकारण्याचं त्यांनी नाकारलं, त्याविषयी लिहिताना त्यांनी लिहिलं होतं की... 'क्षणभर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी आणि ओबीई? हा सन्मान असत्ताच तुम्हीच घेऊन बसा तो. 'साम्राज्य' हा नुसता शब्द जरी ऐकला तरी माझा संताप होतो. त्यामुळे मला गुलामगिरीची आठवण होते. हजारो वर्षांच्या क्रौर्याचं स्मरण होतं... हे ओबीई प्रकरण माझ्या साहित्य सेवेबद्दल आहे असं म्हणता... तर माझ्यापेक्षा कितीतरी लेखक श्रेष्ठ आहेत. माझ्याप्रमाणे ते चळवळीत वगैरे नाहीत. ते फक्त लेखन करतात..... साम्राज्याची भेट म्हणून त्यांना मला काही द्यायचंच असेल तर प्राणिहकांसंबंधी माझे काही कार्य आहे. त्याबद्दल नाही का देऊ शकणार? वर्णभेदाविरुद्ध माझा संघर्ष असतो: त्याकरिता ते का काही देत नाहीत? बनावट आरोपाखाली निरपराध व्यक्ती तुरुंगात असताना मी त्यांना पत्र लिहितो; याकरिता मत्ता किताब देण्याचा विचार कसा आहे? इराकमधील युद्धाच्या विरोधात लाखो लोक ठामपणे उभे आहेत, त्यांच्या वतीने कार्य करणान्या मता काही सन्मान देऊ केलात तर तो स्वीकारण्या-बाबत मी विचार करीनदेखील. हे काम कष्टाचे आहे. कवितापेक्षा निश्चितच खडतर.
असं बरंच काही झेफनाथ यांनी लिहिले आहे. असं आपल्या आतल्या आवाजाला स्मरून या साहित्य संमेलनात सोलापूरला कुणी साहित्यिक काही बोलतो का, है बवण्याशिवाय आपल्या हातांत काय आहे? अर्थात बेळगाव सीमाप्रश्राविषयी ठराव करण्याचे घाटतं आहे, पण त्या ठरावांना शासन किती किंमत देतं है आपल्याका माहिती आहेच. पण आतल्या आवाजा च स्मरण आपण देत रहायचं. त्याने एखादा तरी दिया पेटला तरी आपल्याभोवतीचा अंधार थोडा तरी कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं.
Tags: बेंजामीन झेफनाय गंगूबाई हनगत गीतरामायण नारायण राणे सोनिया गांधी आतला आवाज चंद्रकांत भोंजाळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या