डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अर्थात माझं हे खटकलेपण,  वादविवादाविषयी असलेल्या चुकीच्या  समजुतीमुळेच होतं. ‘वादविवाद म्हणजे भांडण’, ‘वाद-विवाद म्हणजे हुज्जत घालणं’ अशा टाइपकास्ट व्याख्या अलिखितपणानं मनावर लहानपणापासून बिंबवल्या गेलेल्या होत्या. एक तर वादविवाद कसा करावा,  याविषयी आपणाला शाळेत काहीही शिकवलं  जात नाहीच, आणि आजूबाजूचं वातावरणही  त्यासाठी अनुकूल नसतं. ‘वाद-विवाद?  नको रे बाबा,’ असाच सर्वत्र सूर असतो. पण  वाद-विवादामुळे स्वतःची मतंही वॅलिडेट  करता येतात व नवनवीन दृष्टिकोन आपल्या  विचारांच्या कक्षा रुंदावत असतात, हे आज  मला प्रथमच या चर्चेच्या निमित्तानं जाणवलं.  वादविवाद हे एका अर्थानं मनाच्या  जिवंतपणाचंच लक्षण असतं.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमुळे वातावरण तापलं होतं.  एका विवेकी माणसाचं असं क्रूररीत्या आयुष्य संपविलं  जाणं हे कोणाही सुज्ञ माणसास खटकणारंच होतं. ही  व्यक्ती आपल्या मंडळात अवघ्या चार महिन्यांपूर्वी येऊन  गेली होती आणि देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता  ती किती मोठी असामी होती, याचा प्रत्यय त्यांच्या  मृत्यूनंतरच्या कालावधीत येत होता. ही व्यक्ती होती तरी  कोण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही या व्यक्तीची दखल  घेतली जावी, असं काय बरं कार्य यांनी केलं होतं, या  माहितीचा मी शोध घेत होतो. एक उत्तम कबड्डीपटू,  वैद्यकीय डॉक्टर, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक व  समाजातील अनिष्ट रूढींचा नायनाट करण्यासाठी स्थापन  केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक असं थक्क  करणारं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांच्याविषयीच्या  वाचनातून माझ्यासमोर उभं राहत होतं. 

एवढा मोठा आघात होऊनही डॉक्टरांची फॅमिली ज्या  संयमानं या सर्व प्रकरणाला तोंड देत होती, त्याला तोड  नव्हती. स्वतःचा पती असा क्रूररीत्या मारला जाऊनही  त्यांच्या पत्नीनं त्यांचं सांत्वन करण्यास आलेल्या  मुख्यमंत्र्यांना म्हटलं, ‘मुख्यमंत्रीजी, डॉक्टरांच्या हत्येमागे  जे कोणी असतील त्यांना आपली शासकीय यंत्रणा  पकडेलच; पण त्यामागे जी धर्मांध अपप्रवृत्ती आहे,  त्याचा नायनाट तुम्ही कसा करणार आहात? मारेकरी तर  पकडता येतील; पण अपप्रवृत्ती कशी संपवणार?’ किती  विवेकवादी बोलणं हे! पुढे वृत्तवाहिन्यांवर त्यांची दोन्ही  मुलं हमीद आणि मुक्ता यांचीही भारावून टाकणारी  मुलाखत ऐकली आणि या कुटुंबीयांनी मन जिंकून घेतलं.  एक वेळ इतरांना वेगळे विचार देणं, विचार सांगणं, खूप  सोपं असेल; पण तेच विचार स्वतःच्या घरात बायको-  मुलांना पटवून देणं हे महत्कठीण काम. डॉक्टरांनी ते  अगदी सहजरीत्या केलेलं दिसत होतं. त्याक्षणी मला  डॉक्टरांचं जे काही कार्य आहे, त्यात सर्वात मोठं कार्य  वाटलं ते म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या  समाजकार्यात एकरूप करून घेणं. 

समाजविकास मंडळात लगेच त्याच आठवड्याच्या  रविवारी दाभोळकरांसाठी श्रद्धांजलीची बैठक घेण्यात  आली. त्या सभेस जाण्याचं ठरवलं. पावसाळी सकाळ  होती ती. वसईचा परिसर हा समुद्रकिनाऱ्यालगत आहे,  त्यामुळे इथं पाऊस रिमझिम बरसत नाही तर  धबधब्यासारखा कोसळत असतो. एवढा मुसळधार  पाऊस असूनही त्या दिवशी श्रद्धांजलीसाठी आयोजित  सभेसाठी बरीच गर्दी जमलेली होती.  मं

डळाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी झालेला छत्र्यांचा व  चपलांचा ढीग आतमध्ये बरीच गर्दी जमल्याची पूर्वसूचना  देत होता. समाजविकास मंडळाची स्वतंत्र अशी इमारत  आहे. खाली तळमजल्यावरच असलेल्या प्रशस्त  लायब्ररीमध्ये मंडळाचे विविध पदाधिकारी, तसेच  पंचक्रोशीतून जमलेले काही ज्येष्ठ, तरुण असे बरेच जण  तिथं उपस्थित होते. प्रथम सर्वांनी मूकपणे उभे राहून  डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली आणि मग ते सहा  महिन्यांपूर्वी जेव्हा इथं व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी  आले होते तेव्हाच्या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात  आला. मंडळाचे प्रमुख विेशस्त व निवृत्त पोलीस  इन्स्पेक्टर बस्त्याव लोपीस, त्याचबरोबर मंडळाचे  तत्कालीन अध्यक्ष जॉन आल्मेडा व इतर उपस्थित  आपापली मतं व्यक्त करत होते. 

‘अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना आहे...’ जॉन आल्मेडा यांनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. 

‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असा निर्घृण खून व्हावा याचं दुःख फार मोठं आहे,’ मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणारे मंडळाचे हितचिंतक अँड्र्यू  लोपीस बोलत होते. 

डोळ्याला लावलेला चष्मा टेबलावर ठेवून, फिक्कट  रंगाचा सदरा घातलेले डिसोजा सर बोलण्यास उभे राहिले.  ते उद्विग्न झालेले दिसत होते, ‘दाभोळकरांचा खून झाला  असला तरी त्यांचे विचार कोणी संपवू शकत नाही.  सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, संत तुकाराम, गांधी यांनाही असंच  अकाली संपविण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु त्यामुळे  त्यांचे विचार अधिकच झळाळून निघाले. मी इथं उपस्थित  असलेल्यांना आवाहन करतो की, तुम्हीही विवेकमंचाच्या  चळवळीत सामील व्हा आणि खऱ्या अर्थानं दाभोलकरांना  श्रद्धांजली वाहा.’ 

दाभोळकरांच्या हत्येनिमित्त वसईत काही संघटनेतर्फे  निषेध म्हणून मूक मोर्चा काढण्यात आला होता. ॲड.  अनुप डिसोजा हे त्या मूक मोर्चाला गेलेले असल्याने  मंडळात हजर नव्हते.  त्यांच्यानंतर मंडळाचेच एक ज्येष्ठ विेशस्त बंडू मास्तर  बोलण्यास उभे राहिले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी  वर्षं झाली तरी अजून जिथं गांधी रुजलेले नाहीत, तिथं  दाभोलकर इतक्या पटकन कसे रुजतील बरे? अंधश्रद्धा  म्हणजे बांडगुळ आहे, ती तेवढी छाटायची; पण श्रद्धेवर  घाला नको. कारण ते मूळ आहे. मुळावरच घाव घातला  तर झाडच कोलमडून पडेल. श्रद्धा ही माणसाची आशा  आहे. ती त्याच्यापासून न हिरावून घ्यावी. ‘उम्मीद पे दुनिया कायम है।’’ धार्मिक असलेले बंडू मास्तर आपलं  वेगळं मत व्यक्त करत होते. 

पावन निर्मळकर तिथं उपस्थित होते. ‘दाभोळकरांच्या  हत्येमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक तारा  निखळलेला आहे. अंधश्रद्धा साऱ्याच धर्मांत आहेत. पण  अंधश्रद्धा म्हणजे काय? गोमूत्र पिऊन कधी पुण्य मिळतं  का? बरं ते जाऊ दे. आपल्या ख्रिस्ती धर्मात नाहीत का  अंधश्रद्धा? येशू पाण्यावर चालत होता, हे आज कोणाला  पटण्यासारखं आहे का? बरं ते ही जाऊ दे. येशू मेलेल्यातून  उठला हीदेखील आपली एक अंधश्रद्धाच नाही का?’ असं  ते म्हणत असतानाच, ‘अहो बस्स करा. काय बोलताय  काय तुम्ही? विषय काय आणि तुम्ही बरळताय काय?  बस करा.’ मंडळातील काही ख्रिस्ती लोकांना त्यांचं  बोलणं खटकलं होतं. त्यांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना  मध्येच तोडलं. निर्मळकरांना काहीतरी सांगायचं होतं; पण  विचारांची अस्पष्टता त्यांच्या बोलण्यात दिसत होती. मला  ते मनातून खूप गोंधळलेले वाटले.

 सभा उरकल्यानंतर सरांनी मला विवेकमंचाच्या  पुढच्या सभेस येण्याचं निमंत्रण देत म्हटलं, ‘डेव्हिड,  विवेकाचा आवाज आता आपल्याला आणखी बुलंद  करायचा आहे. विवेकमंच आणखी सक्रिय झाला पाहिजे.  तू पुढच्या रविवारी सभेला नक्की ये.’ सर मनातून काहीसे  खचलेले वाटत होते. दाभोळकरांच्या हत्येमुळे ते  खरोखरीच व्यथित झालेले दिसत होते. याअगोदर  अनायसे मी विवेकमंचाची चर्चा ऐकली होती. मला ती  चर्चा आवडली होती. त्या चर्चेत मला एक इंटेलेक्च्युल  स्पार्क जाणवला होता. त्यामुळे मी सरांना पुढच्या सभेस  येण्याचं आश्वासन दिलं आणि पुढच्या रविवारची वाट पाहू  लागलो. 

नेहमीप्रमाणे सकाळी रविवारची चर्चमधील मिस्सा  ऐकून मी दहाच्या सुमारास विवेकमंचाच्या सभेसाठी  मंडळात पोहोचलो. माझी बाईक मी रस्त्याकडेला लावतो  आहे, तोच ‘डेव्हिड’ अशी हाक माझ्या कानी आली. मागे  वळून पाहिलं तर तो माझा शालेय मित्र रॉयल होता.  त्यालाही डिसोजा सरांनी या विवेकमंचच्या सभेत  सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं. विवेकमंचच्या  निमित्तानं खूप वर्षांनी आम्ही पुन्हा भेटत होतो. 

पंधरा ते वीस जण वाचनालयाच्या वाचनकक्षात  मोठ्या टेबलाभोवती बसलेले होते. मागच्या सभेत  पाहिलेल्या चेहऱ्याबरोबरच नवीन चेहरेही समाविष्ट  झालेले होते. सहा महिन्यांपूर्वी जरी अचानक माझे या  सभेत येणं झालेलं असलं तरी अधिकृतरीत्या विवेकमंचात  माझं येणं प्रथमच होत होतं. मी व रॉयलबरोबर इतरही  काही नवीन लोक या सभेस आले होते. त्यामुळे सभेची  सुरुवात एकमेकांची ओळख करून घेण्यात झाली. आम्ही  कादोडी भाषा वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख  मी माझी ओळख सांगताना केला होता. विवेकमंचात चर्चा  ही मुक्त विषयावर असल्याने, चर्चेची सुरुवात मग ‘भाषा’  याच विषयाने झाली. 

‘स्थानिक बोलीभाषा संवर्धन, संस्कृतीमुळे आपण आपली भाषा काही काळ थोपवून धरू शकू; पण आज जग इतकं जवळ आलेलं आहे, की जगाला फक्त एकाच भाषेची गरज लागणार आहे,’ ॲड. अनुप यांनी  सुरुवातीलाच आपलं वेगळं निरीक्षण नोंदवीत म्हटलं. 

‘तुम्ही जे बोलताय ती प्रक्रिया आज जरी सुरू झालेली असली तरी ती पूर्ण होण्यास खूप वेळ लागेल.  इव्होल्यूशनच्या प्रक्रियेसारखीच ती प्रक्रिया घडेल. जग  कितीही जवळ आलं तरी वेगवेगळ्या भौगोलिक  पार्श्वभूमीवर विकसित झालेल्या अठरापगड भाषा व त्यांचं  रुपडं असं चटकन नाही बदलता येणार. समाजावर त्याचा  फार मोठा पगडा असतो.’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अँगल  वापरत डिसोजा सर म्हणाले. 

‘आपण आता इंग्लिश जरी जगाची भाषा म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली असली, तरी त्याचे इंग्लिश भौगोलिक संदर्भ आपल्या चटकन पचनी पडत नाहीत.’  घाऱ्या डोळ्याचा मितभाषी तरुण शिक्षक नॉर्मन बोलला.  तो डिसोजा सरांचा हॉली साक्रामेंट या शाळेतील सहकारी  शिक्षक होता. 

सावळ्या रंगाचे, सडपातळ बांध्याचे राम देशमुख  आपलं मत व्यक्त करताना म्हणू लागले, ‘‘आता मॉन्सूनचं  आपण भारतात स्वागत करतो. म्हणून आपण ‘येरे येरे  पावसा...’ म्हणतो. पण बाहेरच्या पाश्चिमात्य देशातील  लोकांना पावसाचं एवढं कौतुक नसतं. कारण तिथं पाऊस  कधीही येतो आणि बाराही महिने तो बरसत असतो. म्हणून  तिकडे ‘रेन रेन गो अवे’ असं लोक आळवीत असतात...  पण तरीही आपल्याकडे लहान मुलांना मॉन्सूनच्या  पावसात त्यांच्या पावसाची गाणी म्हणावी लागतात.’’ ते  फ्लोरीची मैत्रीण, प्रिया हिचे वडील होते. काहीशी  लाजाळू स्वभावाची प्रिया तिच्या वडिलांनाही सभेस  सोबत घेऊन आलेली होती. 

तोच उपस्थित कॉलेज तरुणींपैकी एक छोट्या चणीची,  पण चुणचुणीत असलेली कॅलेट म्हणाली, ‘हो अगदी  बरोबर. एवढंच कशाला उच्चारांचीही तीच गत आहे.  इंग्रजी भाषेचे उच्चार ब्रिटिशांसारखेच असले पाहिजेत,  असा उगाच आपण आपल्याला दंडक घालून घेतो.  ब्रिटिश ॲक्सेंट ‘अपर लीप स्टिफ’ असतो. पण ते तसं का  तर... तिकडे कडाक्याच्या थंडीमध्ये बोलण्यासाठी  तोंडापेक्षा नाकाचा वापर जास्त होतो.’ 

‘‘आणि त्यामुळे तोंड जितकं कमी उघडून बोलता येईल तितका ते प्रयत्न करत असतात. आणि आपल्याला  मात्र आपल्या वेगळ्या उच्चाराचा उगाच कॉम्प्लेक्स  येतो.’’ फ्लोरी कॅलेटच्या म्हणण्यास पुष्टी देत म्हणाली  आणि आपल्या बाजूला बसलेल्या कॅलेट, प्रिया व सोनल  यांच्याकडे काही खुणा करत ती त्यांना ‘रिमेम्बर? मिनी  फ्रॉम बी डिव्हिजन?’ असं काहीतरी कानात बोलली  आणि मग त्या साऱ्या जणी काहीसं आठवून तोंडावर हात  ठेवत, लाजत, जोरजोरात हसू लागल्या. 

‘भाषा’ या विषयावर येत असलेले हे वेगवेगळे विचार, फ्लोरीची बहीण सोनल, एका डायरीत नोट करत होती.  मध्येच काहीतरी आठवताच, हातातील पेन उंचावत,  काहीशी हळू आवाजात ती म्हणाली, ‘मी मागे असं  वाचलेलं, की आपल्या देशात पाण्याचे जलस्रोत खूप  आहेत, म्हणून विविध भारतीय भाषांत पाण्यासाठी भरपूर  समानार्थी शब्द आहेत. तर पाश्चिमात्य देशात बर्फ खूप  असल्यानं तिथं उगम झालेल्या भाषेत बर्फासाठी जास्त  समानार्थी शब्द आहेत.’ 

सोनल व तिची बहीण फ्लोरी या दोघी बहिणींचे  मंडळाच्या लायब्ररीत येणं-जाणं रेग्युलर वाटत होतं. या  दोघींनीच मग त्यांच्या मैत्रिणी कॅलेट व प्रिया यांनाही  सोबत आणलं असावं. चर्चा ही खुली असल्यानं  उपस्थितही त्याविषयी त्यांना माहीत असलेली माहिती,  किस्से शेअर करत होते. 

‘‘फक्त भाषेतच नाही, आपल्या धर्मातही निसर्गाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आपण जेव्हा देव वा स्वर्ग असं  म्हणतो तेव्हा वर आकाशाकडे पाहतो. का? कारण सर्व चांगल्या उपयुक्त गोष्टी जसे, सूर्यप्रकाश, पाऊस या  आकाशातून येत असतात. त्यामुळे माणसानं जे जे चांगलं  ते वर आकाशाशी जोडलं. मुसलमान धर्मात आपण  पाहिलं तर या धर्माचा उगम काहीसा वाळवंटी, ओसाड  असलेल्या देशात झाला. अशा ठिकाणी हिरवळीचं दुर्भिक्ष  असतं; म्हणून आपण मुस्लिम धर्मात बघितलं तर हिरव्या  रंगाचा प्रभाव दिसतो. तर हिंदू धर्मात अग्नीचं रूप म्हणून  भगव्या रंगाचा प्रभाव जास्त आढळतो.’’ सरांचं वाचन,  विषयाचा अभ्यास व व्यासंग दिसत होता.

 ‘भाषा’ या विषयावर विविध अंगांनी खूपच माहितीपूर्ण  आणि वैविध्यपूर्ण चर्चा होत होती. सभेत उपस्थित  असलेले सर्वजण भिन्न वयोगटातील व भिन्न शैक्षणिक  स्तरातले असल्याने खूपच वेगवेगळे पैलू या विषयाच्या  निमित्तानं या चर्चेमध्ये येत होते. मलाही माझ्या वाचनात  आलेली एक माहिती शेअर करावीशी वाटली. काहीसं  धैर्य एकवटून मी म्हणालो, ‘‘ ‘भाषेला भौगोलिक संदर्भ  असतो’ असं जे सरांनी वक्तव्य केलं त्याच्याशी मी अगदी  सहमत आहे. कधी कधी एखादा समूह एखाद्या विशिष्ट  प्रतिकूल परिस्थितीत राहत असेल, तेव्हा त्याचं वर्णन  करणारे शब्द त्या भाषेमध्ये जन्माला येतात. मी नुकतंच  ‘उचल्या’ हे पारधी समाजावरचं लक्ष्मण गायकवाड यांचं  पुस्तक वाचलं. त्यात त्यांनी एक किस्सा सांगितला होता,  की त्यांचा पारधी समाज गावाबाहेर राहत असल्यानं त्यांना  कधी कधी आठ ते दहा दिवस उपाशी राहावं लागायचं.  एक दिवस नाही, दोन दिवस नाही तर तब्बल आठ ते दहा  दिवस उपाशी राहावं लागायचं. एवढे आठ दिवस उपाशी  राहिल्यानंतर शरीराची जी स्थिती होते, त्या स्थितीचं वर्णन  करणारा एक शब्द त्या भाषेत आहे,’’ मला तो शब्द  आठवत नव्हता. ‘‘हम्म. हम्म.. मला तो शब्द आठवत  नाहीये; परंतु तो किस्सा मला तेव्हा आवडला होता.  कारण तशी तीव्रता व्यक्त करणारा शब्द दुसऱ्या कोणत्या  भाषेत जन्माला असेल असं मला वाटत नाही...’’

 ‘‘भाषा ज्या समाजात किंवा ज्या भूमीत जन्म घेते, त्या समाजाचं प्रतिबिंब त्या भाषेत नक्कीच उमटत असतं.  डेव्हिडनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संस्कृतीमध्ये त्याचे  काही अनोखे पैलू आपल्याला आढळून येतात.’’ रॉयलनं  मला साथ देत म्हटलं, ‘आपल्या कुपारी संस्कृतीचेच  बघा. आपल्याकडे जेव्हा एखादी मयत होते, तेव्हा  आपल्याकडच्या स्त्रिया त्या मयताच्या शेजारी बसून  त्याच्याविषयीच्या आठवणी गाण्यामध्ये आळवून शोक  करतात. आपल्या संस्कृतीचंही हे एक वैशिष्ट्य आहे.’  रॉयलनं कुपारी संस्कृतीतील एक वेगळेपण सांगताना  म्हटलं. 

पावन निर्मळकर हे थोडे उशिरानेच सभेमध्ये आले  होते. ते मध्येच या सभेत येऊन बसले. यांचं मात्र  बोलीभाषेविषयी वेगळं मत होतं, ‘आपली भाषा म्हणजे  काय भाषा आहे का; कचरा आहे तो. मराठी, इंग्रजी या  प्रमाणभाषा म्हणजे खऱ्या भाषा आहेत.’ हे ऐकून मला  धक्काच बसला. ते सरळसरळ बोलीभाषेला कचरा कसं  म्हणू शकतात? धक्का बसलेला मी एकटा नव्हतो. 

बाकीचे उपस्थित लोकही होते. सरांनी प्रसंगाचं गांभीर्य  बघून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, ‘आपण कचरा  कशाला म्हणतो, तर जे काही टाकाऊ आहे ते. आता  एखादी वस्तू टाकाऊ आहे की टिकाऊ, हे ती वस्तू  कोणत्या जागी आहे त्यावरून ठरतं. गाईचं शेण हे जर घरी  असेल तर तो कचरा ठरतो. पण तेच शेण जर शेतामध्ये  असेल तर ती उपयोगी वस्तू असते, ते खत म्हणून  ओळखलं जातं.’ सरांनी बाजू सावरून धरलेली होती. परंतु  ‘कचरा’ या वक्तव्याला आक्षेप घेणारे बरेच लोक होते.  काही बुजुर्ग व्यक्ती आमची चर्चा ऐकत होते. त्यापैकी एक,  तब्बल आगाशीसारख्या टोकाच्या गावातून सभेस आलेले  मनवेल परेरा काहीशा रागानं पावन निर्मळकरांना म्हणाले,  ‘तुम्ही जर कादोडी या बोलीभाषेला कचरा म्हणत असाल,  तर मग या तरुणांनी चालू केलेल्या ‘खित’ या कादोडी  अंकाविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तो जर कचरा  असला असता तर आपल्या समाजातून एवढा भरभरून  प्रतिसाद त्या अंकाला मिळाला नसता.’ 

‘‘हम्म हो हो ब-ब बोला बोला... काय म्हणणं आहे  तुमचं त्यावर?’’ तात्यांच्या बाजूला बसलेले, टक्कल  पडलेले, बारीक चणीचे सॅबेस्टियन अंकल एक्साईट  होत, पण काहीसं अडखळत म्हणाले.  ‘‘हे सगळे हवशे-गवशे आहेत. हे कधीपर्यंत चालतं  आपण बघू यात.’’ पावन निर्मळकर काही मागे हटण्यास  तयार नव्हते.

‘‘बऱ्याच चळवळी या अशा हवश्या-गवश्यामुळेच होतात. त्यामुळे आपण असं कोणाला कमी लेखून  चालणार नाही.’’ 

हाताची घडी घालून बसलेला व काहीसा इन्ट्रोव्हर्ट  असलेला नॉर्मन उपरोधिकपणाने म्हणाला, त्यालाही ते  वाक्य खटकलं होतं.

जवळजवळ पंधरा-वीस मिनिटं हा गोंधळ, वादविवाद  चालला होता. संपूर्ण विवेकमंचातील सदस्य एका बाजूनं  आणि पावन निर्मळकर एकटे दुसऱ्या बाजूनं असा हा  वादविवाद रंगलेला होता. 

शेवटी सरांनी परिस्थितीचा कंट्रोल घेत म्हटलं, ‘‘माझी  सूनबाई ही पीएच.डी. आहे. विविध भाषांचा तिनं अभ्यास  केलेला आहे. ती म्हणत असते की, विज्ञानामुळे हे सिद्ध  झालेलं आहे की, आपण जर मातृभाषेत आपल्या मुलांशी  संवाद साधला तर त्यांचा विकास चटकन होतो.’’ मध्ये  एक क्षण थांबून ते पुढे म्हणाले, ‘‘निर्मळकर यांनी विविध  बोलीभाषेसाठी वापरलेला ‘कचरा’ हा शब्द जरी  आपल्याला खटकला असला तरी, भाषाप्रेम, संस्कृतीप्रेम  किंवा अस्मिता हे तसे मनाचे खेळच आहेत. संस्कृती  म्हणजे काय तर अगोदर असं होतं, तेव्हा तसं होतं अशीच  चर्चा आपण करत असतो. किंबहुना आपण जे संस्कार  करत असतो तेसुद्धा आपल्या या उदात्त महान वाटणाऱ्या  संस्कृतीचं आचरण पुढे असंच सुरू राहावं या स्वार्थ  हेतूनंच! आता आपल्या कुपारी समाजाचंच घ्या. लाल  लुगडं आणि लाल टोपी हा पारंपरिक पोशाख आपण  कुपारी संस्कृती म्हणून मिरवत असतो. आजकालच्या  शाळेत जाणाऱ्या मुलांना सहा दिवस तोच तोच युनिफॉर्म  घालून कंटाळा येतो; त्यांना काहीतरी नवीन कपडे  घालायचे असतात. पण विचार करा, तीन-चारशे  वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी जेव्हा हा आपला समाज धर्मांतरित  केला, तेव्हा त्यांनी आपल्या समाजाला हा एक प्रकारचा  युनिफॉर्मच दिला होता, आणि तेव्हा तो सर्वांना सक्तीचा  होता. शालेय मुलांना पाच-सहा दिवसांत कंटाळा येतो  आणि आपला समाज तीन-चारशे वर्षं हा पोशाख घालत  आलेला होता. आत्ता आत्ता ४०-५० वर्षांपूर्वी आपण  कुठे तो वेष सोडला. एक प्रकारची ही गुलामगिरीच होती  ती. पण तीच गुलामगिरी आपण आज संस्कृती म्हणून  साजरी करत असतो. पोर्तुगिजांनी धार्मिक कट्टरपणाच्या  भावनेतूनच हे कृत्य केलं होतं.’’ 

सांस्कृतिक वा लग्न-समारंभावेळी असं पारंपरिक लाल  लुगडे नेसणाऱ्या स्त्रिया व डोक्यावर लाल टोपी घालणारे  पुरुष मी इथे पाहत आलेलो होतो. ती जणू इथं एक  सांस्कृतिक फॅशनच बनली आहे. काही वृद्ध स्त्री-पुरुष जे  अजूनही तसा वेष परिधान करतात, त्यांना तर मी इथल्या  समाजाच्या संस्कृतीचे सोज्वळ, शालीन रूप असंच मानत  होतो. पण उभ्या आयुष्यात फक्त एकाच रंगाचे कपडे  घालणं हे यांनी ठरवून केलं नव्हतं, तर यांच्यावर धर्मामुळे  लादलं गेलं होतं. हे उमजून मात्र माझा या पोशाखा-  विषयीचा आदर कमी झाला व या जुन्या पिढीतील  लोकांच्या हतबलतेविषयी कणव वाटली. कुपारी  संस्कृतीचं प्रतीक म्हणून मान्यता पावलेला हा पोशाख  मुळात इथल्या लोकांवर लादलेला गणवेशच होता.

 ‘भाषेला कचरा बोललो म्हणून कोणाला राग आला  असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण भाषा, संस्कृती  म्हणजे काय? सरांनी सांगितलं तसं एक प्रकारचा भ्रमच  आहे तो आपला. बरं ते जाऊ दे...’ आपला मुद्दा पटवून  देण्यासाठी काहीतरी उदाहरण आठवताच ते त्यांचं  अगोदरचं वाक्य तसंच मध्ये सोडून म्हणू लागले, ‘मी  काही वर्षं गल्फ कंट्रीमध्ये राहिलेलो आहे. आपण नेहमी  आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, असं बोलत असतो.  जिनं सोज्वळ साडी नेसलेली आहे, तिला भारतात आपण  संस्कारी म्हणतो; तर अरब देशामध्ये जिनं पायघोळ बुरखा  घातला आहे तिला संस्कारी समजलं जातं. परत  भारतातील साडी घातलेली संस्कारी स्त्री अरब देशात  असंस्कारक्षमच ठरते.’ पावन निर्मळकर परत सावरून  बोलू लागले. 

‘‘संस्काराच्या ज्या व्याख्या आहेत, अस्मिता आहेत, त्या सगळ्या भ्रम आहेत. वर्तमानकाळात विज्ञानाशी  वास्तवाशी विवेकानं पटवून घेऊन जगणं हे खरं  शहाणपणाचं. काहींना भीती वाटत असते, आमची  संस्कृती आम्ही जर नाही पाळली तर ती अस्तंगत होईल.  आपल्या समाजाचीही तीच गत झालेली आहे. कुपारी  संस्कृतीसाठी या तरुणांनी खूप चांगला उपक्रम केला,  त्यामागची भावना उदात्त होती यात शंका नाही. परंतु  आपल्या मनात एक भीती असते, आम्ही जर एकमेकांना  चिकटून एकत्र राहिलो नाही, तर आपण या समुद्रात पडून  मरू किंवा आपलं अस्तित्व संपून जाईल. पण असं काही  नसतं. आपणच आपलं बेट करून राहत असतो. आज  शिक्षण, कामानिमित्त, आपल्या मुलांना देशी-परदेशी  जावं लागतं व पुढेही जावं लागणार आहे. तेव्हा जिथं  आपण असू तिथं इतरांची धर्म-संस्कृती वेगळी म्हणून  ‘आपला-परका’ हा भेद पाळू नये. उलट ‘आपल्या  शेजारी राहणारी माणसं ती आपली’ एवढा साधा आणि  सोपा विचार आपण जोपासला पाहिजे.’’ डिसोजा सर  नम्रपणे ठाम सुरात आपलं बोलणं व्यक्त करत होते. 

आतापर्यंत शांतपणे चर्चा ऐकणारा एक युवक दीपेश  वझे आपल्या घोगऱ्या पण सौम्य आवाजात म्हणाला,  ‘‘राष्ट्रवाद, अस्मिता हीसुद्धा संस्कृतीचाच एक परिणाम  आहे असं मला वाटतं. आता काश्मीरचंच उदाहरण घ्या.  आपल्या भारतातील ८०-९० टक्के तरी जनता  काश्मीरमध्ये गेली नसेल, तिथलं जीवन कसं आहे ते  बघितलंही नसेल. तिकडच्या जनतेला काय हवं आहे हे  विचारात न घेता आपण इकडे महाराष्ट्रात बसून किंवा  दिल्लीत, कुठे कोपऱ्यात बसून म्हणतो काश्मीर आमचा  आहे. आमचा म्हणजे कोणाचा? आपण तिथं गेलोही  नाहीए. तो भाग बघितलेलाही नाही. त्यावर खरं  मतप्रदर्शन करायला हवं ते काश्मीरच्या लोकांनी. पण  आपण ते करत नाही. त्यांचं मत विचारात घेण्याऐवजी  काश्मीर आपण उगाचच अस्मितेचा विषय बनवून  ठेवलाय.’’ काश्मीर प्रश्न तेव्हा वृत्तपत्रांतून खूपच चर्चेत  होता. त्यामुळे दीपेशने current affairs, present topic शी जोडला होता.

 ‘अगदी खरं आहे हे,’ राम देशमुख दीपेशच्या मुद्याशी सहमत होत म्हणाले, ‘आता त्या दिवशी आम्ही मित्र बोलत होतो, आपल्या इथं मुंबईमध्ये बिहार, यूपीची लोकं येतात, पण ते कोणत्या नोकऱ्या पटकावतात? तर  छोट्या-मोठ्या नोकऱ्या. ते त्या नोकऱ्या का  पटकावतात; कारण स्थानिक मराठी लोक हलक्या  नोकऱ्या करायला तयार नसतात. याचं कारण काय? तर  आपली मराठी अस्मिता. आपल्या शिवाजीमहाराजांनी  इतके गड पादाक्रांत केले, इतके गड जिंकले, आपण सर्व  मराठीजण उगाचंच स्वत:ला शिवाजीमहाराजांचे वारसदार  समजत असतो. हा कुठेतरी आपला मानसिक भ्रमच आहे,  आपली ही जी अदृश्य अस्मिता आहे, ती आपल्या  विकासाच्या आडच येत असते. वर्तमानकाळापेक्षा  भूतकाळात जास्त रमत असतो आपण.’ 

चर्चा खूपच रंगतदार झाली होती. कादोडी भाषेपासून  जी सुरुवात झाली ती संस्कृती, भौगोलिक संदर्भ, काश्मीर,  अस्मिता अशी वळणं घेत विविध मुद्दे मुक्तपणे कव्हर झाले  होते. शेवटी वेळ झालेली होती. सकाळचे ११ वाजूनही  गेले होते. लायब्ररीचे दोन्ही कर्मचारी आमची चर्चा  संपण्याची वाट पाहत थांबले होते. रविवार असल्यानं  लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. ‘परंपरा,  संस्कृती, झेंडे यापेक्षा माणूस महत्त्वाचा,’ असा निष्कर्ष  काढून ती चर्चा संपली.

पावन निर्मळकर यांनी संस्कृतीसंबंधी सुरू केलेला  वाद-विवाद सुरुवातीला मला खटकला होता. माझ्या  चेहऱ्यावरील भाव सरांनी हेरले होते. त्यामुळेच असेल  कदाचित. मी घरी आल्यावर त्यांचा फोन आला. आणि  त्यांनी फोनवर सांगितले,  ‘इतक्या वर्षांची आपली संस्कृती आहे, आपण ज्या  वातावरणात वाढलेलो आहोत तेव्हा त्यातील फोलपणा  आपल्या चटकन लक्षात येत नाही. जरी तो लक्षात आला  तरी तो स्वीकारण्यात थोडा वेळ जातो...’ अर्थात माझं हे खटकलेपण, वादविवादाविषयी असलेल्या चुकीच्या समजुतीमुळेच होतं. ‘वादविवाद म्हणजे भांडण’, ‘वाद-  विवाद म्हणजे हुज्जत घालणं’ अशा टाइपकास्ट व्याख्या  अलिखितपणानं मनावर लहानपणापासून बिंबवल्या  गेलेल्या होत्या. एक तर वादविवाद कसा करावा,  याविषयी आपणाला शाळेत काहीही शिकवलं जात  नाहीच, आणि आजूबाजूचं वातावरणही त्यासाठी  अनुकूल नसतं. ‘वाद-विवाद? नको रे बाबा,’ असाच  सर्वत्र सूर असतो. पण वाद-विवादामुळे स्वतःची मतंही  वॅलिडेट करता येतात व नवनवीन दृष्टिकोन आपल्या  विचारांच्या कक्षा रुंदावत असतात, हे आज मला प्रथमच  या चर्चेच्या निमित्तानं जाणवलं. वादविवाद हे एका अर्थानं  मनाच्या जिवंतपणाचंच लक्षण असतं. 

वेगवेगळी मतं आल्यामुळे खूपच वैविध्यपूर्ण अशी ही  चर्चा आज घडलेली होती. खूप काही नवीन विचार मला  मिळालेले होते. आतापर्यंत संस्कृती, भाषा या गोष्टी मी  कवटाळून धरलेल्या होत्या. अचानक त्यातील फोलपणा  उघड करणारी, डोळे उघडणारी काहीशी आजची चर्चा  होती. वेगळे विचार, प्रश्न मनात उपस्थित राहू लागले होते.  वेगवेगळ्या समजुतीबद्दल पुनर्विचार करण्यास मला भाग  पाडलेलं होतं. 

जॉन एफ.केनेडी यांनी म्हटल्याप्रमाणे, बहुतांश  वेळेला, नवीन विचारांच्या असुरक्षिततेपेक्षा, आतापर्यंत  कुरवाळलेल्या स्वतःच्या सोयीस्कर मतांचा (कितीही  कालबाह्य असला तरी) सुरक्षितपणाच मानवाला जास्त  सुखावत असतो (Too often we enjoy the comfort of opinion without the discomfort of thought- John F. Kennedy). त्यामुळे जरी मला या पहिल्या चर्चेमुळे  असुरक्षित वाटलं तरी मन मात्र हे नवीन विचार  ऐकण्यासाठी आतुर झालं होतं.

Tags: भाषा वसई खित जॉन एफ.केनेडी कुपारी संस्कृती कादोडी जॉन आल्मेडा साधना साप्ताहिक कबड्डीपटू डॉ. दाभोळकर डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस Daniel Mascarenhas manch vivekmanch Kadodi Language John Almeda Vasai John F. Kanady Kupari Culture Editor Dr. Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात