Diwali_4 मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

दिवस आता झोपला होता. रात्र आता जागरण करीत होती. उजेडाचे दिवे मंदावले होते. काळोखाचे दिवे पेटले होते. ला व्हिक्टोरिया हॉटेलचा एक डोळा पेंगत होता, एक डोळा मात्र लख्ख उघडा होता. पहाटेलाच मला जाग आली. पिकल्या पानासारखी रात्र गळून पडली होती. ला व्हिक्टोरिया हॉटेल सुस्नात होऊन ताजेतवाने झाले होते. स्पीड बोट नुकत्याच पाय बुडवायला समुद्राच्या पाण्यात गेल्या होत्या. स्विमिंग पूल अंग चोळीत अंथरुणावरून उठत होता. तीन-चार माळी फुलझाडांची हेअर स्टाईल करत होते. व्हिक्टोरियाचे रेस्टॉरंट ब्रेकफास्ट मांडायच्या तयारीला लागले होते. 

Tags: बेट दत्ता नायक सागरदर्यातले साखरबेट मॉरिशस देश-विदेश ireland Mauritius Datta Nayak Sagardaryatale sakharbet weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात