डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींची काव्य-संपदा

ऐसा एक जगात आज मजला गांधी महात्मा दिसे।

दीनांसाठि सदा जळे, तळमळे सत्यास पूजीतसे ।

गीता चालति बोलती मज गमे गीतार्थ त्यांची कृती।

ऐशी थोर विभूति लाभत अम्हा भाग्यास नाही मिती।

1930 ची दांडीयात्रा

1930 साली महात्मा गांधींनी दांडीयात्रा सुरु केली. भारतवर्षात नवे चैतन्य संचारले. कोणत्याही संकटाला अहिंसात्मक पद्धतीने तोंड द्यायचे नास्मिक सामथ्र्य जनतेत निर्माण झाले. अशा या कालखंडात स्वातंत्र्याच्या आंदोलनात साने गुरुजी सहभागी झाले. तुरुंगवास पत्करणा तुरुंगात त्यांनी साहित्यनिर्मिती केली.

काव्याचे स्वरूप

त्या काळाला अनुरूप अशी, त्या काळाशी इमान राखणारी ही रचना आहे. त्या काळाचे प्रतिबिंब, त्यांच्या व्यक्तित्वाचेही दर्शन काव्याद्वारा आपणास पडते. या पार्श्वभूमीवर साने गुरुजींच्या काव्याचा विचार करणे प्राप्त ठरते. साने गुरुजींनी विपुल काव्यनिर्मिती केली आणि 'पत्री' या काव्यसंग्रहातून त्यांच्या कवितेला प्रसिद्धी मिळाली. साने गुरुजींचा पिंड श्रद्धेचा आणि भक्तीचा होता. श्रद्धा, भक्तीला त्यांच्या जीवनात फार मोठे स्थान होते.

श्रीरामप्रभू

गुरुजींच्या मानसमंदिरात श्रीरामप्रभूच्या प्रतिमेची फार मोठी प्रतिष्ठा होती. बालापणापासूनच श्रीरामप्रभूच्या भक्तीचे वेड या 'रामवेडया' देशभक्ताला हाते. ही निष्ठा त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवरून प्रत्ययाला येते.

'रामाचा शेला' ही कादंबरी म्हणजे त्यांच्या रामभक्तीचे प्रतीक मानावे लागेल. 'पत्री'तील अनेक कवितांमधून त्यांच्या या रामभक्तीचे दर्शन घडते.

मात्र त्यांची ही भक्ती अंध भक्ताची नाही. त्यांनी ईश्वरविषयक कवितेत-आपण स्वतः एक साधक आहोत, अशी भूमिका घेतली. जीवनातील चढउताराची आशा, निराशा,सुख-दुःखी, विविध ध्येये यांच्यासंबंधीची करुण कहाणी' प्रभुचरणी सांगितली आहे. या कविता म्हणजेच 'प्रार्थना' आहेत. माझ्या जीवनातील दंभ, दर्प, काम, क्रोध यांचा नाश होऊ दे. सद्विचार आणि भक्तिभाव या मंगलमय कर्माची पूजा तुझ्या ठायी होऊ दे. अशी प्रार्थना करून 'माझ्यावर कृपा करावी मती तवपदी जडावि माझी-' असे विनवितात.

‘जीवनात माझ्या सद्या राम गुंफिन’

या कवितेत व्यक्त झालेली भावना रमणीय आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञानच त्यांनी येथे मांडले आहे.

त्यांना रामाचा ध्यास लागला आहे.रामाचे वेड त्यांनी घेतले आहे. पण त्यांचे हे रामाचे वेड फार वेगळे, उदात्त आणि मनोरम आहे. रामवेडा' कवितेत ते म्हणतात,

मला पत्ता सांगाल काय कोणी

राम राहे तो कोणत्या ठिकाणी?

राम-सीतेचा कुठे असे जोडा?

मला सांगा मी असे राम-वेडा!

रामाची आराधना करणाऱ्या गुरुजींची “जीवनात राम गुंफण्याची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. राम गुंफायचा म्हणजे काय करायचे? सत्य, शिव आणि सौंदर्य याची पूजा करायची. त्याची जोपासना, संवर्धन करायचे.

विमलभाव, सरलभाव

मधुरभाव, प्रेमभाव

सेवानि:स्वार्थभाव

त्यात ओतीन-मी राम गुंफिन । श्रीरामचंद्रांची पूजा म्हणजेच जनता- जनार्दनाची पूजा, सर्वस्वाचा त्याग करून लोकरूप रामाची पूजा, ही त्यांची भावना. राम मा ऐषारामी। राम ना लोळण्यामध्ये राम तो एक गोष्टीत। परार्थ जळण्यामध्ये ।। परहितार्य चंदनासारखे जळणे-झिजणे यातच त्यांना जीवनाची कृतार्थता वाटते!

सत्य-शिव सुंदराचे,

पूजन मी करिन साचे

हयास्तव मी या जीवाचे

मोल पिन--

राम गुंफिन ।

ही त्यांची जीवनदृष्टी आहे. 'रामवेडा' आणि 'जीवनात राम गुंफिन ' या कविता त्यांच्या भक्तिभावनेची उत्तम उदाहरणे आहेत.

आम्ही देशाचे मजूर

आम्ही देशाचे मजूर आहोत. कष्ट करून आम्ही जीवनानंद निर्माण करणार आहोत. स्वातंत्र्य मिळविणार आहोत. जीवनातील विविध दुःखाने व्याकुळ होणारे गुरुजी 'प्रभु सतत मदतर हासु वे ' या कवितेत म्हणतात-

प्रभु सतत मदतर हासु दे

तुझ्या कृपेचा वसंत बारा

जीवनवनी मम नाच दे।

विश्वग्रंथी पानी पानी

दृष्टि तुजचि मम वाचू दे

सकलाकारी तुजला पाहून

उचंबळून मन जाऊ दे ॥

यातून त्यांच्या मनातला नाशवाद स्पष्ट होतो.

या कवितांतून सानेगुरुजींची नि:स्वार्थ भावना, सेवावृत्ती, नम्रता प्रत्ययास येते. आपल्या हातून जे जे पडेल ते ते मंगलमय असू दे, सर्वांव कल्याण होऊ दे आणि हे सर्व माझ्या हातून पडण्यासाठी- देवा, माझा तसा मनो-विकास पडू दे, अशी त्यांची परमेश्वराला प्रार्थना आहे.

मम जीवन हरिमय होऊ दे, देवा धाव धाव, मन माझे सुंदर होवो, मी केवळ मरुनी जावे, रडण्याचे ध्येय, रडायाचा लागलासे देवा एक छंद, प्रेम का करावे, जीवनातील दिव्यता आदि कवितांतून करुण, वत्सल आणि शांतरसाचा सहज आविष्कार झाला आहे. ईश्वराची अनंताची ओढ गुरुजींना कशी होती आणि ही ओढ त्यांच्या देवभक्तीतून समाजसेवेत, राष्ट्रसेवेत परिणत करण्याची त्यांची उत्कट इच्छा प्रकर्षान दिसते.

फुलाची आत्मकथा

'फुलाची आत्मकथा' या कवितेत साने गुरुजींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रकट झाले आहे. श्रद्धा आणि तपश्चर्या याच्या बळावर मानवी आत्मा परमेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेतो. आणि त्याची परिणती सेवेत झाली म्हणजे कृतकृत्यता वाटते हा विचार या कवितेत सांगितला आहे. या कवितेत ते शेवटी म्हणतात, 'मी आणि माझे सारे माझे नसून परमेश्वराचे आहे. सारी त्याचीच कृपा, देणगी आहे.'

'सुगंध माझा सुंदरता मम त्याची ही देणगी

म्हणुनी ठेवित उघडी जगी

मला कशाला संचयमति ती माझे काहिच नसे प्रमुचे प्रभुस समर्पितसे

माझे मुटोत सारे धन

हेची बांछी माझे मन

त्यागे परमेश्वर पूजिन

सेवा करनी सुकुनी जाईन, जाईन प्रभुच्या पदी

मग ती पतन भीति ना कधी'

'प्रियकर प्रभु मम हृदयी आला!' आहे आणि त्यामुळे 'अति आनंद हृदयी भरला' आहे. आणि अशा वेळी एका परमेश्वराशिवाय त्यांना जगात कोणाचा आधार आहे असे वाटत नाही. 'मजला तुझ्यावीण जगि नाहि कोणी!' अशी त्यांची भावना आहे. सेवा करावी अशी मनाची इच्छा असतानाही ती घडत नाही म्हणून 'तव अल्प हातून होईन सेवा' असे म्हणून ते संत व्यक्त करीत आहेत.

किती दुःख लोकी

किती लोक शोकी,

परि काहि यना करायास देवा-मनीची इच्छा असुनही काहीच करता येत नाही म्हणून, गुरुजी म्हणतात-

खाणे पिणे झोप

मज वाटते पाप-

अशा परिस्थितीत हे प्रभू 'सदय हृदय तू, प्रभु मम ताता' आहेस तूच मला वाचव, तुझ्या अंगणातील मी 'वेल;' माझी तू काळजी घे. माझा जीवनतरू सफल व्हावा अशी कवीची तीव्रतम इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात;

'प्रभु' जन्म सफल हा व्हावा

मम जीवनतरू फुलवाया।

बंधुस साकली देवी

बंधुस सौपरस देवो।

सेवेत सुकोनी जावो

हा हेतु विमल-पुरवावा।

संतकाव्याशी नाते

साने गुरुजींची कविता संतकाव्याशी नाते सांगणारी. संतकाव्याला जवळची, विठ्ठल-भक्ती करताना संतांनी विठ्ठलाला आळविले. विठ्ठलाला आळविताना त्यांनी त्याला 'माय-माऊली' म्हणून संबोधिले.

'ये ग ये ग विठाबाई। माझे पंढरीचे आई' ही जनाबाईची ओवी प्रसिद्धच आहे, साने गुरुजी आपल्या उपास्यदेवतेची आळवणी करताना मज माहेराला नेई या कवितेत म्हणतात-

'येईग आई

मज माहेराला नेई

वृक्ष जसा मूळाविण फूल जसे वृत्तांवीण ।

मीन जसा तो नीरावीण । तसे मज होई॥

माझे ध्येय' या कवितेत-

करीन सेवा तव मोलवान ।

असो अहंकार असा मला न ।

मदीय आहे बळ अल्प देवा ।

बळानुरूप मम घेई सेवा।

असा विचार मांडतात.

या जगात सर्वत्र आनंदाचे साम्राज्य पसरावे असे त्यांना वाटते. सर्वांना आनंद चावा व त्या आनंदात आपण सहभागी व्हावे असे त्यांना वाटते.

प्रेमाचे गाणे

'प्रेमाचे गाणे' या कवितेत भूतकाळ भविष्यकाळाला प्रेमाचे गाणे शिकवितो. भूतकाळ भविष्यकाळाला 'हृदय प्रेमाने सजविण्यास सांगतो. सारे जम द्वेषाने -सूडबुद्धीने भरले आहे. त्याला प्रेमाची गरज आहे. ते प्रेम तू जगाला दे. असे सांगतो.

तू देशील प्रेम जरी जगताला

बदलशील आजच्या काळा

ना जगती कधी प्रेम दिल्याने सरते

हे प्रेम कधी ना मरते

ते दिधल्याने वाढतसे, जागविते

परहृदयि सुप्त जे असते

द्वेषभावनेने तापलेल्या जगावर प्रेमाचा वर्षाव कर अशी त्यांची इच्छा आहे. या जगात 'मयसमा राहिली भरून ' अशी परिस्थिती आहे. सर्वत्र भेसूर आणि भयाण अवस्था आहे. जग जसे प्रत्यक्षात दिसते तशी वस्तु-स्थिती नाही.

 दंभ हा जगाचा धर्म,

उलटेच जगाने कर्म

मन्मन होई खिन्न,

-मयसभा राहिली भरून ।'

या स्थितीत 'प्रेमधर्माची निकड ते सांगतात. सर्वत्र सुखाचे अद्वैताचे साम्राज्य पसरावे म्हणून 'खरा धर्म' या कवितेत ते म्हणतात,

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित

जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे

मानवतेची महान कल्पना या कवितेत आहे.

देव हाच देश, देश हाच देव

अशी त्यांची कल्पना आहे. ही कल्पना 'आई, दार उघड' कवितेत साकार होते. देशाच्या स्वातंत्र्याशिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात नव्हता. स्वातंत्र्याचा एकच ध्यास त्यांनी घेतला होता. 'पारतंत्र्य पाहून वाट जना सर्व व्यर्थ' असे त्यांना वाटे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी ते सर्वांना आवाहन करतात.

व्हा सिद्ध तुम्ही प्राणार्पण करण्याते

त्यागायिण काही न मिळते।

भारतमातेचे प्राचीन वैभव व पारतंत्र्यातील विषन्नता पाहून ते दुःखी होतात. आपले मनोगत 'मनमोहन मूर्ती तुझी, माते' या कवितेतून व्यक्त करतात.

आमचे कार्य' कवितेत- देशाबद्दलची उत्कट भक्ती व्यक्त झाली आहे. ते म्हणतात,

'अम्ही मांडू निर्भय ठाण । देऊ हो प्राण

स्वातंत्र्यसुधेचे निजजननीला घडवू

मंगल पान ।

स्वार्थाची करुनी होळी

छातीवर झेलू गोळी

करू मृत्युशी खेळीमेळी

मातृभूमीच्यासाठी मोठे करू सारे बलिदान।

'देशभक्त किती ते मरती' या कवितेत मातृभूमीला हसविण्यासाठी किती लोक त्याग करतात हा विचार मांडला आहे.

'झालो तुफान करू हासत देइदान

स्वातंत्र्य आणु अपवा मरू हीच आण'

ही त्यांची विचारसरणी आहे. स्वातंत्र्याची उत्कट इच्छा व पारतंत्र्याची चीड त्यांच्या कवितेतून तीव्रतेने व्यक्त झाली आहे.

स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई। सुख प्रियतम भारतमायी।' अशी त्यांची भावना आहे.

स्वातंत्र्याचा ध्यास त्यांच्या कवितेत व्यक्त झालेला आहे. स्वातंत्र्य मिळावे भारत देश सुखी संपन्न व पोर व्हावा हीच त्यांची उत्कट इच्छा आहे.

'माझी एकच इच्छा' या कवितेत-ते म्हणतात-

एक मात्र चितन आता एकची विचार

भाग्य पूर्ण होईल कधी हि भूमि थोर ।

प्राण-पुष्प माले माझ्या मातृभूमि कामी।

जरी येई उपयोगाला कितिक होई नामी।

'गांधीजींवरील श्रद्धा

गांधीजींवर साने गुरुजींची श्रद्धा होती. गांधीजींच्या पहिल्याच भेटीत, गांधीजींनी उद्गारलेल्या 'श्रद्धा होना' या शब्दाने गुरुजी प्रभावित झाले होते.

'हुतात्मा' कवितेत ते म्हणतात,

ऐसा एक जगात आज मजला गांधी महात्मा दिसे।

दीनांसाठि सदा जळे, तळमळे सत्यास पूजीतसे ।

गीता चालति बोलती मज गमे गीतार्थ त्यांची कृती।

ऐशी थोर विभूति लाभत अम्हा भाग्यास नाही मिती।

'महात्माजींस' या कवितेत ते म्हणतात,

गीता मानि श्रुति स्मृति तुम्ही तुम्हीच

सत्संस्कृती।

त्यांचा बयं मला विशंक शिकवी ती

आपली संस्कृति ।

राष्ट्रा जागविले तुम्ही प्रभु खरे पाजूनिया

अमृता।

अशी ही गुरुजींची कविता महाराष्ट्र-शारदेचे एक निखळ लेणे होऊन राहते.

Tags: महात्मा गांधी काव्य कविता साने गुरुजी Mahatma Gandhi Poetry Sane Guruji #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके