डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

प्रिय पूज्य साने गुरुजी (11 जानेवारी 1975)

संमेलन संपल्यानंतर सांगलीला त्यांच्या हस्ते तेथील नगर वाचनालयाच्या सभागृहात लावण्यासाठी तयार केलेल्या तुमच्या प्रतिमेचे अनावरण पुलंच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी “साने गुरुजींचे साहित्य हे लोकवाङमय आहे; ते सहजस्फूर्त आहे” असे सांगून ते म्हणाले, “साने गुरुजींच्या साहित्यातून आणि जीवनातून ज्या अनेकांना स्फूर्ती, प्रेरणा मिळाली आहे, त्यांपैकी मी एक आहे.”

 

अमळनेर ही तर तुमची कर्मभूमी तसा अख्खा खान्देश आणि नंतर महाराष्ट्र ही एवढी तुमच्या कर्मभूमीची व्याप्ती. पण त्यातल्या त्यात म्हणतात तसे. अमळनेरलाच शिक्षण संपवून तुम्ही शिक्षक बन सातवाआधी अमळनेरला आलात ते येथील तत्त्वज्ञानमंदिरा मूळे. तत्त्वज्ञानाच्या ओढीने इयवर घाव घेतलीत, पण तहान काही भागली नाही. म्हणून शाळेत शिक्षक मालात आणि तुम्हाला तुमचे क्षेत्र गवसले.

जेमतेम पाच-सहा वर्षेच तुम्ही या शाळेत शिक्षक म्हणूनदेखील राहिलात. पण तेवढा अवधीत शिक्षक म्हणून तुम्ही केवढा लौकिक कमावला! केवढी नातीगोती जोडली!

अमळनेरला धोंडोपंत कुलकर्णी भेटले. बरेच थकले आहेत. बरीच वर्षे ए.ओ. होते. शालापत्रकाचे संपादनही त्यांनी केले. आणि त्या वेळीच श्यामची आई मधील काही ‘शालापत्रका' तून प्रथम प्रसिद्ध झाल्या.

धोंडोपंतांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. तुम्ही काढलेले स्वच्छता पथक, मूतशाळा, बगीचा वगैरे वगैरे. सूतशाळेतल्या मुलांनी काढलेले सूत तुम्ही पारोळघास घेऊन गेलात आणि त्याची खादी विणून आणलीत. त्या खादीचा कोट जेव्हा ए. ओ. च्या अंगावर दिसला तेव्हा तुमचे डोळे आनंदाने पाझरले होते!

श्री का. प्र. पुराणिकांच्या घरी गेलो. हे तर तुमचे सहकारी शिक्षक, पुराणिकानी तुमच्या त्या काळातील आठवणी सांगितल्या. पाठदर्शनाचा एक उपक्रम त्या वेळी शाळेत सुरू झाला होता. दर आठ-पंधरा दिवसांनी एकेका शिक्षकाने सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत पाठ घ्यायचा व त्यावर नंतर चर्चा करायची असा तो उपक्रम. एकदा पाठ घेण्याबद्दल पुराणिकांनी तुम्हाला विचारले, पण तुम्ही 'मी शिक्षणशास्त्र अभ्यासिले नाही. त्याची कोणतीही परीक्षा दिली नाही असे सांगून त्यांना नकार दिलात. पुराणिक म्हणाले, “तुम्ही पाठ देणार नसाल तर आम्ही सर्व शिक्षक तुमच्या नेहमीच्या तासास वर्गात येऊन बसू.” पण एवढ्याने तुम्ही बघणार? म्हणालात, तसे तुम्ही आला तर मी वर्गातून पळून जाईन! 

त्या वेळी तरी हा प्रश्न तसाच राहिला ? पण पुढे काही दिवसांनी पुनःविनंती केल्यावर मराठीचा पाठ घेण्यास तुम्ही अनुमती दिलीत. पाठाचा विषय होता मराठी पद- केकावलीतील काही श्लोक ' 

त्या दिवशी सकाळी तुम्ही 9॥ ला पाठ सुरू केलात आणि एवढे रंगून गेलात एवढे रंगून गेलात की अकराला पाठ संपविलात! पुराणिक म्हणाले, बाम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी तर मान हरपूनच बसलो होतो. मंत्रमुग्ध झालो होतो. 

पिता जरि विटो, अननी कुपुत्री विटे
म्हणूनि म्हणती भले भ्रूण न जन्मदेचे फिटे ॥ 

या पंक्तीचे विवरण किती बहारीने तुम्ही त्या वेळी केले होते. हे पुराणिकांनी अगदी ते दृश्य डोळ्यांपुढे आणून सांगितले. मातेचे वात्सल्य, माता मुलाकरता सोशीत असलेले अपार कष्ट, त्याच्याकरता करीत असलेला असीम त्याग, त्याच्यावर करीत असलेले निरपेक्ष प्रेम इत्यादींचे तुम्ही केलेले सोदाहरण विवेचन ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरारले!

पाठ संपला नि भारावलेल्या मनाने सगळेच बाहेर पडले. पुराणिक म्हणाले, “असल्या पाठावर काय चर्चा करणार?" एका विशिष्ट समाधानाच्या स्थितीतच आम्ही बाहेर पडलो... असे होते साने. निष्ठावंत व उपजत बॉर्न शिक्षक.

श्री द. मा. वैद्य यांच्याही परी गेलो होतो. हे तुमचे विद्यार्थी. नंतर तुमच्याच शाळेत शिक्षक झाले. वैद्यांनी अतिशय हृद्य आठवण लिहिली आहे: "अडलेल्यास मदत करण्यास गुरुजी सदा तत्पर असत. फीला पैसे नाहीत या सबबीवर शाळा सोडावी लागण्याचा प्रसंग माझ्यावर आला होता. पण गुरुजींना हे कळताच त्यांनी मला सांगितले, 'तुला वर्षभर मी फी देईन, पण शाळा सोडू नकोस.' आणि खरोखरीच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गुरुजी माझ्या वर्गासमोर येऊन मला बाहेर बोलावून माझे नाव वर लिहिलेली फीच्या पैशांची पुडी मला देऊन जात असत."

एकदा छात्रालयात रात्री खिडकीचे दार लावताना एक मुंगळा चिरडला गेला हे पाहून सारी रात्र तुम्ही दुःखाने रडून काढली. उशी ओलावली. छात्रालय दैनिकातही हो शोकवार्ता तुम्ही दिली होती; आठवते का? 

अमळनेरच्या मुक्कामात तुमची शाळा- आताचे ‘प्रताप हायस्कूल', त्या वेळची छात्रालयाची ती अंदमाननामक जागा पाहिली. तुम्ही तिथे बगीचा फुलवलात आणि अंदमानाचे आनंदभुवन केलेत. या बगीचासाठी सगळे काम उरकल्यावर रात्री अंधारात समोरच्या तत्वज्ञान मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीचे पाणी दोन हातांत दोन बादल्यांनी भरून आणीत असा.

अशी धडपड करून ती बाग शिंपलीत, फुले फुलवलीत, आणि छात्रालयातल्या मुलांची मनेही उमलवलीत! सद्गुणांचा सुगंध भरलात! यासाठी हा आटापीटा! सगळ्यांचे सगळे बघायचे करायचे, शिकवायचे, आणि रात्रीतून पुन्हा एक-टाकी छात्रालय दैनिक' लिहून काढायचे! सकाळी त्यावर शाळेतल्या मुलांच्या उडया पडायच्या, आठवते ना!

तुमच्या छात्रालयातील एक विद्यार्थी यशवंतराव पवार यांना शिरपूरला गेलो त्या वेळी चार मैलांवरच्या बापाडीला त्यांच्या हवेलीत जाऊन भेटून आलो. आपला गजानन जोशी-मिरपूरलाच असतो. एल. आम. सी. मध्ये आहे. त्याच्या पत्नी, मुलेबाळे ठीक आहेत. तर त्याच्या बरोबर फटफटीवर बसूनच गेलो होतो. हा तुमचा विद्यार्थीही आता बराच थकला आहे.

छात्रालयात असताना हे तुमच्याच खोलीत राहात असत. घरची श्रीमंती, सरदारी राहणी. बडोद्याहूनच ते अमळनेरला आले होते. नको असलेल्या सगळ्याच सवयी त्यांच्याजवळ त्या वेळी होत्या. पण तुमच्या सहवासात तेही पार बदलून गेले. तुमच्या धडपडणाऱ्या मुलात त्यांचे चित्रण तुम्ही केलेलेच आहे. तर वाघाडीला गेलो तेव्हा यशवंतराव म्हणाले, भलाईची व मानव धर्माची जाणीव गुरुजींच्या सानिध्यात मला झाली.'

एकदा तुम्ही तुमचे मित्र चंद्रोदय भट्टाचार्य यांच्याबरोबर वाडीला त्यांच्याकडे गेला होता, असे यशवंतराव म्हणाले. आणखी एक आठवण सांगितली. म्हणाले, "मी 1937 च्या निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र म्हणून उभा राहिलो होतो. काँग्रेसच्या विरोधी. गुरुजींना हे कळताच त्यांनी मला रागावून लिहिले होते, तू माझा माणूस असून काँग्रेस विरोधी उभा राहतोस?" गुरुजींना माझे उभे राहणे आवडले नव्हते."

अमळनेरला जिथे तुमची सूतमाळा होती ती वसंतराव मुठ्यांच्या चिरेबंदी वाड्यातली पाठीमागची जागा पाहिली. आता पूर्वी होती तशी ती नाही. नव्याने भिंती वगैरे घातल्यामुळे थोडा बदल झाला आहे. कोणी भाडेकरूही तिथे हल्ली राहताहेत.

वसंतरावांच्या बरोबर त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यात गप्पा-गोष्टी झाल्या. वसंतराव पहिल्यापासूनच संगीताचे भक्त. त्यांच्या त्या दिवाण खान्यात किती तरी थोरामोठ्यांनी पायधूळ झाडलेली. लोकमान्य टिळकही एकदा तिथे उतरले होते. त्यांच्याबरोबर त्या वेळी काढलेल्या एका फोटोत लहानगे वसंतरावही आहेत. तुम्ही काढलेल्या राष्ट्रीय मेळाव्यात वसंतराव होतेच. तुम्ही नाटक, गाणी, संवाद लिहून द्यायची, त्यांनी व इतर सोबत्यांनी ते बसवून गावोगाव प्रचार करत हिंडायचे. सर्वांना खादीचा गणवेश असायचा.

एकदा पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन, स्त्री-वेश घेऊन तुम्ही या मूठयांच्या वाड्यातूनच पसार झाला होता. आणि त्यामुळे पुढे म्हणे पाच वर्षे त्यांच्या वाड्यावर पोलिसांचा कडक पहारा होता! 

वसंतराव प्रख्यात तबलावादक आहेत. त्यांच्या एका स्नेहांनी गाणे म्हटले आणि वसंतरावांनी तबल्याची साथ केली. आता वय झाले, तरी त्यांच्या हातातली सफाई नि कौशल्य उणावलेले नाही. एक छोटीशो मैफिलच त्या दिवशी झाली म्हणाना! माझ्याबरोबर तुमचे पी. जी. कुलकणी व बी. जी. ऊर्फ भालजी ब्रम्हे हे होते. वा रा. सोनारही उशीरा पोचला. या मंडळींनी अमळनेरच्या मुक्कामात खूपच मदत केली गुरुजी!

मुठयांच्या घरातच तुमचे पुसाळकर वकील राहायचे. ते हल्ली पुण्यास मुलाकडे असतात. दोन तीन वेळा त्यांची भेट झाली. बोलणे झाले. किती तरी गोष्टी त्यांच्याकडून समजल्या. तुमची अमळनेरची पत्र्याची खोली, ज्या केसरी सरांच्या घरात तुम्ही एकदा उपोषण केलेत ते घर, प्रताप हायस्कूल, अंदमान छात्रालय, अशी काही छायाचित्रे पुसाळकरांनी मला दिली आहेत. तुमच्या प्रकाशनाचे व्यवहार किती तरी दिवस तेच पाहात असत. तुम्ही कुणा-कुणाला सतत आर्थिक साहाय्य करीत बसा ते ज्याचे त्यांना पोचते करणे वगैरे कामही पुमाळकरच करीत असत. त्यासंबंधीच्या आणि तुमचे 'काँग्रेस साप्ताहिक, कर्तव्य' दैनिक इत्यादींसंबंधीच्या अनेक हकिकती त्यांच्याकडून कळल्या. काँग्रेस संघटनेतही ते पदाधिकारी असत; त्यामुळे चळवळीतल्या देखील खूप आठवणी त्यांनी सांगितल्या.

एकदा म्हणे ग्वाल्हेर दरबारकडून 400 रुपयांची मनीऑर्डर तुमच्या नावे आली होती. तुमचा सगळा पत्रव्यवहारच पुढे पुसाळकरांच्या पत्यावर होता. एवढी रक्कम पोस्टमास्तर त्यांना देईना. तुम्ही तर दौऱ्यावर, पैसे पोस्टात पडून. मग धावाधाव करून तुमची अॅथॉरिटी आणवली आणि ते पैसे म्हणे मिळाले. मी विचारले, 'हे कसले पैसे ?' तेव्हा त्यांनी सांगितलेली हकिकत मला मजेशीर वाटली. ग्वाल्हेरच्या राणीसाहेबांना म्हणे पुत्ररत्न झाले होते. संस्थानभर आनंदी आनंद साजरा होत होता. तिथे कोणा एकाला वाटले, आपण राणीसाहेबांना काय बरे भेट द्यावी ? तो होता तुमचा वाचकभक्त. तुमचे 'स्त्री-जीवन' त्याने वाचलेले. त्याला मास्टर,विनायकांप्रमाणेच अतिशय आवडलेले. त्याने काय केले, त्यातील काही वात्सल्यपूर्ण ओव्या सुबक, सुंदर अक्षरात लिहून वेलबुट्टी वगैरेंनी सजवून त्याच राणीसाहेबांना नजर केल्या! आणि त्या ओव्या पाहून राणीसाहेबही खूश झाल्या. इतक्या खूश झाल्या की, त्यांनी तुम्हाला चारशे रुपये बक्षीस म्हणून धाडले! आठवते ना, गुरुजी! काही असो, कुणाच्या तरी फाटक्याला ठिगळ लावायला कुणाची तरी अडचण निवारायला तुम्हाला ते कामास आले! 

ते सहज जाता जाता, 'स्त्री-जीवन'ची आठवण झाली म्हणून कळवून टाकतो. नुकतेच इचलकरंजी येथे पन्नासावे मराठी साहित्य संमेलन झाले. या सुवर्ण महोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष होते आजचे सर्वात लोकप्रिय लेखक श्री पु. ल. देशपांडे पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाच्या वेळी आम्ही निरनिराळी गाणी म्हणत असू. त्यांत श्री पु. ल. देशपांडे यांचेही एक गीत म्हणत असू आठवते का? 

हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलो हरिचरणी 
पंढरिराया राउळ तुमच्या वसू धरान धरणी... 
चोखामेळ्याच्या भक्तीची शक्ती आम्हांला 
मिराबाइचे घुंगुर चरणी, सखुच्या करताला ॥ 
तुकयाची वाणी मुखामधि निश्चय नाम्याचा 
बंडखोर आम्ही म्होरक्या ज्ञानदेव अमुचा । 
शिणलो गा पाउले विठ्ठला तिष्ठुनिया दारी 
उघडा दरवाजे नका हो घालवु माघारी ॥ 
चोखामेळ्याला जयांनी दुष्टपणे छळले 
त्या बटव्यांहनि का दयाळा मन अमुचे मळले ? 
कान्होपात्रेला ठरवून त्याज्य पतिता 
अनाचार करितो राऊळी तुझ्याच भगवंता ॥ 
कशी न तुला वाटे दयाळा भक्तांची संत 
का? तुझ्याहि दरबारि जाहला न्यायाचा अंत ? 
जनाबाइला जे बडवीती म्हणोनिया चोर 
बडवे झाले का दयाळा आम्हाहन पोर ? ॥ 
दूर लोट वा पोटी घेई केला निर्धार 
वेदा-शास्त्रांचा असो वा नसोच आधार 
महाराष्ट्राच्या रे सावळ्या विठ्ठल महाराजा
तुटले जरि हे मस्तक तुटेल चरणावरि तुझ्या ॥ 

किती सुंदर गीत! तर पुलंनी तुमच्या लोकवाङमयाच्या वेडाचा मोठ्या गौरवाने आणि कृतज्ञ भावनेने उल्लेख केला. ते म्हणाले, "...अनेक वर्षांनंतर साने गुरुजींनी फुलांच्या परड्या भरून आम्हाला आणून देईपर्यंत आमचेही लक्ष तिकडे गेले नव्हते." 

संमेलन संपल्यानंतर सांगलीला त्यांच्या हस्ते तेथील नगर वाचनालयाच्या सभागृहात लावण्यासाठी तयार केलेल्या तुमच्या प्रतिमेचे अनावरण पुलंच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी “साने गुरुजींचे साहित्य हे लोकवाङमय आहे; ते सहजस्फूर्त आहे” असे सांगून ते म्हणाले, “साने गुरुजींच्या साहित्यातून आणि जीवनातून ज्या अनेकांना स्फूर्ती, प्रेरणा मिळाली आहे, त्यांपैकी मी एक आहे.”

अमळनेरला जिथे तुमचे काँग्रेस साप्ताहिक छापले जाई त्या 'अरविंद प्रेस 'मध्ये गेलो होतो. प्रेसचे मालक श्री न. वे शिपी भेटले. त्यांना तुमच्याविषयी केवढा आदर! म्हणाले, “गुरुजींच्या रूपाने खुद्द पांडुरंगाचे पाय आमच्या प्रेसला लागले; आमचे फार चांगले झाले!”

काँग्रेस' पत्रावर पुढे सरकारची अवकृपा झाली. पत्र बंद करावे लागले. शिपीनाही आर्थिक त्रास सोसावा लागला. आपल्यामुळे असा त्रास कोणाला झाला तर ते तुमच्याने कसे पाहवणार? शिपी म्हणाले, "एकदा रात्री गुरुजी घरी आले आणि माझ्याकडून प्रॉमिसरी नोट लिहून घ्या म्हणाले. पण मी काही घेतली नाही."

याशिवाय अमळनेरच्या मुक्कामात हिराभाई शहा, शंकरभेट शिपी, मो. द. ब्रह्मे, डी. एस. देशमुख, सौ. कमलाबाई परांजपे, इत्यादी तुमचे परिचित भेटले. कमलाबाई सांगत होत्या की, "कधी तरी गुरुजी आमच्याकडे जेवायला यायचे. अर्ध्या पाटावर अंग चोरून बसायचे. संकोचूनच जेवायचे. हवं-नको हातानेच सांगायचे. पण मला कधी कधी कळायचे नाही. वाढावं की नको! मी सासुरवाशीण. माझी पंचाईत व्हायची. "

एकदा त्यांच्या भगिनी मंडळात तुमचे व्याख्यान ठरले होते. वेळ होत आली, पण तुमचा पत्ता नाही. म्हणून त्या चिंतेत पडल्या. पण बरोबर वेळेवर तुम्ही जिना उतरून खाली आलात. मागच्या बाजूने गुपचूप केव्हा येऊन जिन्याच्या वरच्या पायरीवर जाऊन बसला होता कुणास ठाऊक! दर चतुर्थीला तुम्ही भिकुअण्णा परांजपे यांच्याकडे जेवायला जात असा. भिकुअण्णा सरकार पक्षाचे होते. पण तुमच्याविषयी त्यांना फार आस्था होती. काही तरी निमित्ताने तुम्हाला जायला उशीर झाला म्हणजे म्हणायचे, "मोरया जेवायला यायचा आहे अजून!"

डी. एस्. देशमुखांच्याकडे धानोरयाला अनेक वेळा तुम्ही गेलेले आहात. ते सांगत होते, एकदा आम्हांला म्हणाले, 'गुरुजी' 'गुरुजी' म्हणता तर गुरुदक्षिणा द्या. आम्ही विचारले, 'काय देऊ ?" तर म्हणाले, चहा पिणार नाही. बिडी-सिगरेट ओढणार नाही, निर्व्यसनी राहीन, अशी प्रतिज्ञा करा-म्हणजे मला माझी गुरुदक्षिणा मिळाली. आम्ही मुरलीधराच्या समोर त्यांच्या पायावर हात ठेवून तशी शपथ घेतली. मी ती अजून पाळली आहे."

एकदा तुम्ही धानोऱ्याला गेलात. देशमुखांच्याच खोलीवर उतरलात. गावातील भुतडा शेटजीकडून पंचपक्वान्नांचे ताट भरून आले; पण ते पाहून तुम्हांला रडू कोसळले! म्हणालात, "माझ्या देशातल्या गरीब लोकांना हे कधी तरी मिळेल का ? मग मी कसे खाऊ ?" त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हाताने भाकरी व पोफळ्याची भाजी करून खाल्लीत.

धानोऱ्याचीच गोष्ट तिथे बारणे नावाचे एक ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कुटुंब होते. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एका हरिजन मुलाला वळेनेच बाप्तिस्मा देण्याचा त्यांनी घाट घातला होता. तुम्हांला हे कळले. तुम्ही सेवा दलाच्या तरुणांना म्हणालात, 'हे धर्मांतर होऊ देऊ नका!' आणि ते सक्तीचे धर्मान्तर थांबले.

काँग्रेसच्या प्रचाराला बैलगाड्यांवर तिरंगी झेंडे फडकावीत मंडळी तुमच्याबरोबर निघायची. गावोगावचे लोक बघून म्हणायचे. 'काँग्रेसना लोके उनात रे बाप काँग्रेसचे लोक येऊन राहिलेत रे बाबा!" 

तुमचे राजा कुलकर्णी मो. द. वो यांच्याकडे असायचे. तिथेच त्याची एक आत्याही राहायची. ती मोठी सनातनी, सोवळी होती. तुम्हा सुधारणावाद्यांचे तिला काही पटायचे नाही. पण गांधीजी गेल्याचे कळल्यावर त्याबाई नदीवर जाऊन आंघोळ करून आल्या. ब्रम्हे वकील म्हणाले, “पटत नव्हते तरीही गुरुजीचा प्रभाव असा आत्यावर पडलेला होता!” आता थांबतो. बाकी पुढच्या पत्री.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके