डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझे रक्त त्या नाचाच्या तालावर नाच लागले आणि शरीरातून कसल्या तरी तालबध्द लहरी दौडू लागल्या. वाटले सगळे चराचर नाचते आहे मग आपण का न नाचा? उठावे आणि आपणही नाचू लागावे! असा तो नाव होता. सहजस्फूर्त आणि वेडवणारा नाच. आकाशात मेघ गडगडू लागले की मोर कसा नाचतो?

तो नाच मी कधी विसरणार नाही. खरे लोकनृत्य आम्ही त्या दिवशी पाहिले. वर आभाळ भरुन आले होते, अधूनमधून पावसाची सर येऊन नर्तकांना आणि प्रेक्षकांना भिजवून जात होती आणि आखाड्यात ढोलाच्या तालावर बेहोष झालेले पुरुष आणि स्त्रिया नाचत होत्या. असे मोकळे अकृत्रिम नृत्य मी तरी कधी पाहिलेले नाही. कोणी मुद्दाम वेषभूषा केलेली नव्हती, की अंगाला अथवा तोंडाला रंग लावलेला नव्हता. नाचणाऱ्यांचा खास गट वेगळा आणि बाकीचे गावकरी नुस्ते बघ्ये प्रेक्षक असाही प्रकार तेथे नव्हता. सारा गावच नाचत होता. त्यात तरुण नाचत होते, अविवाहित तरुणी नाचत होत्या. कर्ते पुरुष नाचत होते आणि पाटीवर मुले बांधलेल्या गृहिणी नाचत होत्या. ढोलावर टिपरू पडल्याबरोबर झोपडी-झोपडीतून हसतमुख स्त्रिया व पुरुष भराभर बाहेर आले आणि नाचात सामील झाले. झुरमुळ्या पडून सारे अंग सुरकुतून गेलेली एक वृद्ध स्त्री डाव्या हातात नातवंडाचा हात घेऊन जेव्हा साऱ्या जणींच्या बरोबर नाचू लागली तेव्हा माझ्या डोळ्यांत तर आनंदाश्रू उभे राहिले!

माझे रक्त त्या नाचाच्या तालावर नाच लागले आणि शरीरातून कसल्या तरी तालबध्द लहरी दौडू लागल्या. वाटले सगळे चराचर नाचते आहे मग आपण का न नाचा? उठावे आणि आपणही नाचू लागावे! असा तो नाव होता. सहजस्फूर्त आणि वेडवणारा नाच. आकाशात मेघ गडगडू लागले की मोर कसा नाचतो? चंद्रोदय झाल्याबरोबर समुद्राच्या लाटा कशा फेसाळून किनाऱ्याकडून झेपावू लागतात? दरडीमधून गुणगुणत आणि तृणवेलींशी रमतगमत झरा कसा मोकळ्या अंगाने गिरक्या घेत घेत वाहत असतो? मोरामध्ये जी उत्फूर्तता आहे, सागराच्या लाटांमध्ये जी उचंबळून येणारी अधीरता आहे, निर्झरामध्ये जो बेभानपणा आहे तो या नाचात मला दिसला. आखाड्यातली ती पन्नास-पाऊणशे माणसे सतत दोन तास मोरासारखी झुलत डुलत होती, लाटांसारखी हेलावत नि उचंबळत होती, निर्झरासारखी स्वतःच्याच मस्तीत गात गिरगिरत होती.

Tags: चंद्रोदय. मोर कवित्व moonrise peacock #Poetry weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके