डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाहता पाहता नानांची जन्मशताब्दी साजरी झाली. नाना म्हणजे नानासाहेब नारळकर. इतिहासाने ज्याच्या थोरवीची ओळख पटवून दिलेली असते, असा माणूस पुढे दंतकथांचा नायक होऊन जातो आणि त्याच्या गोष्टी समाजात चवीने सांगितल्या जातात. पण नाना कधी ऐतिहासिक पुरुष झालेलेच नाहीत. त्यांची कर्तुकी अशी मोठी की ते शिवत असतानाच त्यांच्या कहाण्या, त्यांचे किस्से एकमेकास सांगण्यात माणसे आनंद मानीत. 

पाहता पाहता नानांची जन्मशताब्दी साजरी झाली. नाना म्हणजे नानासाहेब नारळकर. इतिहासाने ज्याच्या थोरवीची ओळख पटवून दिलेली असते, असा माणूस पुढे दंतकथांचा नायक होऊन जातो आणि त्याच्या गोष्टी समाजात चवीने सांगितल्या जातात. पण नाना कधी ऐतिहासिक पुरुष झालेलेच नाहीत. त्यांची कर्तुकी अशी मोठी की ते शिवत असतानाच त्यांच्या कहाण्या, त्यांचे किस्से एकमेकास सांगण्यात माणसे आनंद मानीत. 

म्हणजे जिते-जागते नानाच अद्भुतरम्य कलेचे नायक झाले होते. तसे पाहिले तर नानांच्या चौहऱ्यात्तर वर्षाच्या आयुष्यात जेमतेम सहा वर्षे ते नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम करून गेले. पण आता चौहऱ्यात्तरातून सहा उणे केल्यास बाकी काय उरले, असे वाटते! बरे या सहा वर्षांच्या आयुष्यात पराक्रम तरी कोणता केवळ एका विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी केलेल्या कामगिरीचा. आपल्या समाजाच्या लेखी ‘शाळेचा हेडमास्तर' म्हणजे एक गरीब बापड़ा हेडगुर्जी, व्यवस्थापक मंडळाने त्याला वरून चेचावे, शिक्षक बंधूनी त्याला मत्सराचे चटके द्यावे आणि गुडघ्याला बिलगलेल्या पोरांनी सर्वांनी मिळून पाय ओढावे. अशा तिकाटण्यात अडकलेला माणूस करून करून करणार तरी करणार किती आणि कोणाचे? 

नानाची गोष्ट वेगळी. पुण्यातल्या त्या वेळच्या सर्वात मोठ्या शाळेचा त्यांनी कायापालट करून टाकला. कोणत्याही संस्थेत दुस्वास करणारी काही माणसे असतात, पण नानांचे काम पाहून आचंब्याने 'आ' म्हणल्यावर ‘ब्र’ तरी कोणत्या तोंडाने म्हणणार ! शाळकरी मुलांच्या लिलिपुटी घोळक्यात नाना कसे गलिव्हरसारखे उत्तुंगपणे उभे राहिले ! गुणी आणि हुशार मुलांना तर त्यांच्या तळहातावर आणि खांद्यावर जागा मिळाली. एखाद दुसरा अपवाद वगळला, तर त्यांच्याशी भांडणे शिक्षकांना अशक्यच होते. आणि शाळेशी साक्षात संबंध नसलेल्या जाणत्यांच्या डोळ्यांना विद्येचा क्षेत्रात हसतमुखाने उभ्या असलेल्या या आडमाप माणसाबद्दल भरमसाठ कौतुक वाटत राहिले. 

ज्याला ‘गुरुवर्य' ही पदवी यथार्थतेने द्यावी असे नाना महाराष्ट्राचे आदर्श मुख्याध्यापक ठरले. हा त्यांचा लौकिक अर्ध्या तपात जोडलेला पण आता पन्नास वर्षे झाली तरी आपले तेज जराही न ढळू दिलेला असा आहे. म्हणजे राजाने सिंहासन सोडले, त्याचे राज्यही बुडाले, तरी त्याच्या खानदानाने घरातले आलोलकीचे रत्न जपून ठेवावे आणि अभ्यागताला  अभिमानाने दाखवावे, तसा नानांचा लौकिक महाराष्ट्राने जपून ठेवलेला आहे.

नाना पुण्यात आले, नागपूर-जबलपूरकडून बी.ए.बी.टी. नव्हे, तर ‘एल.टी’ ही तिकडची उपाधी नावापुढे लावून, शिक्षण प्रसारक मंडळीची त्यांनी नाना प्रकारे सेवा केली. कुठल्या तरी आपाततः मिळालेल्या शुभमुहूर्तावर मंडळीच्या भाग्यविधात्यांनी नानांची नू.म.वि.चे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केली. नाना आले. मुलांनी त्यांना पाहिले आणि - दोघांनीही एकमेकांना जिंकले! जूनमध्ये पुण्यातले सर्व रस्ते नू.म.वि. कडे जातात असे शाळांचे दिपोटी लिहू लागले. या आधी भेदरलेल्या मनाने आणि अजागळ चेहऱ्याने आपली अस्ताव्यस्त दप्तरे संभाळीत जाणारी पोरे आता कॉलर वर करून 'मी नू.म.वित जातो' असे ऐटीत म्हणू लागली. 

सगळ्या शाळेनेच कात टाकली. विद्याभ्यास असो, कोट असोत की वकृत्व आणि नाट्य असो- नानांच्या शाळेचे यश अक्षरशः मुलखावेगळे तळपू लागले. पण या यशापेक्षाही मोठी गोष्ट होती, ती  समजदार ममतेची. लालन आणि पालन यांची शाळेत सांगड पडली होती. नानांची मायाममता मोठी आणि प्रोत्साहक. पण मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांनी जे कष्ट घ्यायला हवेत, जी साधना करायला हवी, तिच्यावरचे त्यांचे लक्ष मात्र कधीच जात नसे.

नाना शिक्षणशास्त्रज्ञ होते. पण शास्त्र शिकल्यानंतर ते गुंडाळून ठेवून यावे आणि हरघडी येणाऱ्या आव्हानाना स्वतंत्रपणे उत्तरे शोधावीत, याची जाणीव त्यांच्या मनात नित्य जागी असे. घोकंपट्टी आणि घटपट यांच्यापेक्षा महत्त्व आहे ते उपक्रमशीलतेला आणि अंगभूत तेजावर फुंकर घालून ते चेतवण्याला, हे सूत्र शिक्षकाने आणि मुख्याध्यापकानेही कसे आत्मसात केले पाहिजे, त्याचा वस्तुपाठ नानांनी सहा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत दिला. 

माध्यमिक शिक्षणातले हे नाना पर्व संपले- त्यालाही आता पन्नास वर्षे झाली. माती पुन्हा नानांचे कार्यक्षेत्र केवळ पुण्यपत्तनात, पण गेली 50 वर्षे मराठी लोकांच्या समस्त शिक्षणसंस्थांत मानाचा किताब समोर ठेवण्याचा प्रयत्न करणारी, निदान त्यांच्या काही गुणविशेषांचा स्वीकार आणि अंगीकार करणारी माणसे ठायी ठामपणे उभी राहिली, असे दृश्य आपण पाहत आहोत, नानांनी अर्धशतकापूर्वी जे केले, ते महाराष्ट्रातील शाळांना आजही आदर्शवत वाटतं. नानांची सूत्रे घेऊन ही माणसे आता महावस्त्र विणू लागली असली तर नवल नाही.  

शताब्दी राष्ट्राच्या नेत्यांची होते आणि त्या निमित्ताने नौबती वाजतात आणि विद्यूदीपांचा लखलखाट होतो. शताब्दी थोर गायकांची होते आणि त्या निमित्ताने गावोगाव मैफली रंगतात, शताब्दी क्रीडापटूची होते आणि त्याच क्षेत्रातल्या खेळाडूंचे दिमाखदार सामने आयोजित होतात. शताब्दी नटाची होते तेव्हा नाट्यमहोत्सव साजरे होतात आणि गुलहौशी माणसाची पावले रंगमंदिराकडे खेचली जातात. पण नानांसारख्या अनोख्या समाजगुरूची शताब्दी कशी साजरी करावी ? ती देखील अनेक उपक्रमांनी साजरी करता येईल आणि तिच्या निमित्ताने मूकपणे अनेक प्रतिज्ञा करता येतील. पहिली प्रतिज्ञा कोवळ्या विद्यार्थ्यांची मनापासून निगराणी करण्याची, दुसरी प्रतिज्ञा विद्येच्या क्षेत्रातील सर्व भ्रष्टाचार आणि अनाचार नष्ट करण्याची- निदान स्वतःपासून सुरुवात करून !- आणि तिसरी प्रतिज्ञा स्वदेशी, स्वाभिमान आणि स्वार्थत्याग या त्रयीचा डांगोरा न पिटता स्वीकार करण्याची.

मोठमोठे विद्वान विचारतात, हे शताब्दी-समारंभ कशासाठी साजरे करायचे ? केवळ आपल्या उत्सवप्रियतेला वाट करून देण्यासाठी ना? त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, जैसा अंधार दाटदाट होत राहतो, दिशा हरवतात आणि डोळ्यांवर झापड येऊ लागते, तेव्हा नानांसारख्यांचे चरित्र आणि चारित्र्य यांचा अजूनही तेवत राहणारा प्रकाश अधिकच अप्रूप वाटतो. अवसेच्या रात्री निबीड अरण्यातून जाणाऱ्या पांथस्थाला एखाद्याच देवळात जळत असलेल्या समईच्या प्रकाशाने ना दिलासा मिळतो. काय सांगाल हो?

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके