डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

एका संकल्पनेचा पाठपुरावा चार वर्षे

मागील बारा वर्षांत साधनाचा बालकुमार अंक आशय व विषय या दोन्ही बाजूंनी मोठा होत गेला आहे. त्यातही कळस गाठला गेला तो मागील तीन आणि चालू एक अशा चार वर्षांतील अंकांनी. 2017 व 2018 या दोन्ही वर्षी (प्रत्येकी सहा) जगातील कर्तबगार मुला-मुलींच्या खऱ्या-खुऱ्या गोष्टींचे अंक होते. 2019 या वर्षीच्या अंकात भारतातील विविध राज्यांतील सहा कर्तबगार मुला-मुलींच्या गोष्टी होत्या आणि या वर्षीही भारतातीलच तशा पाच मुला-मुलींच्या गोष्टी आहेत. म्हणजे या चार वर्षांत 23 मुला-मुलींच्या गोष्टी आहेत. ही थीम आकाराला आली ती 2016 या वर्षीच्या अंकात घेतलेल्या अशाच दोन मुलांमुळे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत 25 कर्तबगार मुलामुलींची ओळख साधना बालकुमार अंकांमधून झालेली आहे. ही सर्वच मुले-मुली बुद्धिवान, प्रतिभावान किंवा साहसी, कल्पक या वर्गवारीत अग्रस्थानी घ्यावी लागतील अशी आहेत.

बालकुमार वाचकांसाठी वर्षातून एखादा अंक हे वैशिष्ट्य साधना साप्ताहिकाच्या बाबतीत सुरुवातीपासून राहिले आहे. साने गुरुजींनी हे साप्ताहिक सुरू केले असल्याने साधनाला मुलांचे अगत्य असणे साहजिकही आहे. मात्र या उपक्रमात मागील सात दशकांत कमी अधिक चढ-उतार आले आहेत. यासंदर्भात सर्वाधिक बहराचा कालखंड म्हणून 1955 नंतरची बारा वर्षे आणि 2008 नंतरची बारा वर्षे यांचा उल्लेख करावा लागेल. पूर्वीच्या बारा वर्षांच्या काळात ज्या मुला-मुलींनी साधनाचे बालकुमार अंक वाचले ते आता वयाच्या साठीच्या पुढे आहेत. त्यांतील अनेक मुले-मुली आता वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत आणि ‘त्या वेळी बालकुमार अंकाने आम्हाला प्रभावित केले होते’, अशी आठवण त्यातील अनेकजण सांगत असतात. तसाच काहीसा प्रकार 2008 नंतरच्या बारा वर्षांत ज्यांनी बालकुमार अंक वाचलेत, त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात झालेला असणार आणि ते स्पष्टपणे दिसायला किंवा व्यक्त व्हायला आणखी पाव शतकाचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. पहिला कालखंड गाजला त्यात संपादक यदुनाथ थत्ते यांचे मोठे योगदान होते आणि दुसरा कालखंड बहराला आला तो संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यामुळे.

साधनाच्या हीरकमहोत्सवी वर्षापासून सुरू झालेले बालकुमार दिवाळी अंक मागील बारा वर्षे सरासरी अडीच लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित झाले आहेत. महाराष्ट्रातील लक्षावधी मुले, त्यांचे पालक, शिक्षक व अन्य वाचक यांच्यापर्यंत ते अंक एक वा अनेक वेळा पोहोचले आहेत. वर्षातून एकदाच अंक काढायचा असल्याने आणि मोठ्या प्रमाणात तो पोहोचवायचा असल्याने त्याचे संपादन करताना दोन प्रमुख घटक कायम जपले होते. एक सर्व प्रकारच्या व सर्व स्तरांतील वाचकांना हा अंक वाचावासा वाटला पाहिजे, संग्राह्य वाटायला हवा आणि खरेदी करून इतरांना द्यावासा वाटला पाहिजे. दुसरा घटक असा की, क्लासचा मजकूर मासपर्यंत गेला पाहिजे. अर्थातच, या दोन घटकांच्या अंतर्गत अनेक लहान-मोठे घटक येऊन जातात.

मागील बारा वर्षांत साधनाचा बालकुमार अंक आशय व विषय या दोन्ही बाजूंनी मोठा होत गेला आहे. त्यातही कळस गाठला गेला तो मागील तीन आणि चालू एक अशा चार वर्षांतील अंकांनी. 2017 व 2018 या दोन्ही वर्षी (प्रत्येकी सहा) जगातील कर्तबगार मुला-मुलींच्या खऱ्या-खुऱ्या गोष्टींचे अंक होते. 2019 या वर्षीच्या अंकात भारतातील विविध राज्यांतील सहा कर्तबगार मुला-मुलींच्या गोष्टी होत्या आणि या वर्षीही भारतातीलच तशा पाच मुला-मुलींच्या गोष्टी आहेत. म्हणजे या चार वर्षांत 23 मुला-मुलींच्या गोष्टी आहेत. ही थीम आकाराला आली ती 2016 या वर्षीच्या अंकात घेतलेल्या अशाच दोन मुलांमुळे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत 25 कर्तबगार मुलामुलींची ओळख साधना बालकुमार अंकांमधून झालेली आहे. ही सर्वच मुले-मुली बुद्धिवान, प्रतिभावान किंवा साहसी, कल्पक या वर्गवारीत अग्रस्थानी घ्यावी लागतील अशी आहेत.

हे चारही अंक जरी थीम म्हणून क्रमाक्रमाने विकसित होत गेले असले तरी, या थीमचे बीज आमच्या मनात पडले व रुजले त्याचे कारण श्री.म.माटे यांच्या एका लेखात दडले असावे. ‘देशोदेशीचे ज्ञानेश्वर’ हाच तो लेख. तो लेख साधनाच्या 1956 मधील कुमार अंकात प्रसिद्ध झाला होता. आता तो लेख पुनर्भेट म्हणून प्रस्तुत अंकात घेतला आहे, त्यामुळे त्याविषयी इथे अधिक काही सांगण्याची गरज नाही. मात्र देशोदेशीची कर्तबगार मुले-मुली ही थीम घेऊन काढलेले साधना अंक आता पुरे झाले. याच थीममध्ये बसतील अशी अनेक मुले-मुली आता वाचकांना शोधता येतील, त्यांची कर्तबगारी समजून घेता येईल. आम्ही यापुढील काळात बालकुमार अंक आणत राहू, आणखी वेगवेगळ्या थीम घेऊन! अर्थातच त्या थीम आकर्षक असतील, अफलातून असतील, लहान मुला-मुलींना मोठे करणाऱ्या असतील...!

Tags: देशोदेशीचे ज्ञानेश्वर दिवाळी २०२० बालकुमार संपादकीय विनोद शिरसाठ balkumar 2020 editorial sadhana balkumar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात