Diwali_4 पुन्हा एकदा रचनात्मक संघर्ष
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

अवघड प्रश्नांना सोपी उत्तरे देण्याचा लोकप्रिम खेळ स्थितिवादी मंडळी खेळणारच. त्यातून प्रश्नांची खरी सोडवणूक आणखी दूर जाणार. पण प्रश्न सोडवणुकीचे खरे मार्ग माहिती असलेल्या परिवर्तनवाद्यांच्या मागचे जनसमूह हे त्या चुकीच्या छावणीत जात आहेत, हा भुलभुलैया अधिक धोकादायक आहे. त्याचे उत्तर रचनात्मक संघर्षाच्या हत्याराने प्रत्यक्ष रणभूमीवरच साकार करावयास हवे.

सद्‌भावनेच्या पातळीवर ‘सर्वत्र मंगल व्हावे’ असे शब्दांनी सांगणाऱ्यांची मांदियाळी सध्या सर्वत्र फॉर्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच एक मोठा पुरस्कार मिळाला. हे त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण. त्यावेळी केलेल्या त्यांच्या भाषणाचा सारांश असा- ‘‘धर्म आणि जात यांना न मानणारी मानवता हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. धर्म आणि जातीच्या भिंती उभारल्या की समाज दुभंगण्यास व राष्ट्र अस्थिर होण्यास सुरुवात होते... अंधश्रद्धा हा मानवी समाज बदलाच्या प्रक्रियेतील सर्वांत मोठा अडथळा आहे. कर्मकांडे करून मानवाचे जीवन सुधारते हा समज फेकून दिला पाहिजे...सर्व काही सरकार करेल असे मानण्यापेक्षा स्वत:च्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास हवी.” यावेळी मोकळ्मा माळावर, रणरणत्या उन्हात स्वखर्चाने आलेले सुमारे 2 लाख श्रीपरिवाराचे सदस्य कमालीच्या शिस्तीने उपस्थित होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या, कोणत्याही नेतृत्वाला हे आज शक्य नाही.

हे विचार ऐकले आणि हा पाठिंबा पाहिला की या मार्गाने जाण्यात चूक काय? मार्ग भले संप्रदायाचा असेल, पण विचार तर आज अगदी हवेत असेच आहेत ना?  असे अनेकांना वाटू शकते. यासाठीसद्‌भावनेच्या पातळीवर केलेल्या अशा नैतिक आवाहनाचे स्वरूप, सामर्थ्य व मर्यादा समजून घ्यावयास हवी. या मंडळींना ही भाषा बोलावी लागते, ही समाधानची बाब आहे. परंतु अधिक तपशिलात जाऊन त्या विचारांचा कस पाहिला जात नाही. भाजप जसे धर्मनिरपेक्षतेचे कट्टर समर्थन करतो आणि मग हिंदूधर्म हाच धर्मनिरपेक्षतेचा खरा आधार आहे, असा मुद्दा चलाखीने पुढे करतो; तसे घडत नाही ना, हे तपासण्याची गरज आहे. अत्यंत उदात्त भाषा बोलणारी ही मंडळी जातींचे मेळावे, धर्माधिष्ठीत संघटनाबद्दल कधीही बोलत नाहीत. त्याविरोधी वैचारिक संघर्ष तर दूरच राहिला. व्यापक परिवर्तनाच्या बाबततर ते शब्दही उच्चारत नाहीत. ‘दारू पिऊ नका’ असा उपदेश होतो. पण पद्धतशीरपणे दारूवर्धक नीतीचालवणाऱ्या शासनाबद्दल मौन पसंत केले जाते. प्रत्यक्ष संघर्ष तर होतच नाही. शोषण, अन्यायांविरुद्धचे थेट लढे टाळले जातात. धर्म आणि जातीच्या नावाने या देशात पावला-पावलावर माणुसकी अवमानित होते. परंतु त्यात परिस्थिती सुधारण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा विचारही या मंडळींच्याकडून केला जात नाही.

मात्र खरा मुद्दा आहे तो त्यापुढचा. परिवर्तनाचा हा मार्ग नव्हे असे मानणारा एक वर्ग आहे. त्या मंडळींच्यावरही याबाबत घेण्यात येणाऱ्या आक्षेपांबाबतची वस्तुस्थिती नीटपणे समजून घ्यावयास हवी. पुरोगामी चळवळीला आलेल्या दुर्बलतेतून निर्माण झालेला पेच त्यातून स्पष्ट होतो. समतेसाठी धडपडणाऱ्या पुरोगाम्यांच्यावर पहिला आक्षेप येतो तो ‘ते नुसतेच बोलतात’ असा. तो लोकांना खरा वाटतो, कारण परिवर्तनाची जी भाषा बोलली जाते त्यासाठीचे संघर्ष त्यांना जवळपास कोठेच दिसत नाहीत. याबाबत पुरोगाम्यांची कोंडी झालेली आहे. प्रत्यक्ष लढ्याच्या आधी वैचारिक संघर्ष घडवावा लागतो. ते लिहिणे बोलणेच असते, पण तो शब्दांचा खेळ नसतो, तर लढ्याचे तर्कशुद्ध हत्यार असते. मात्र प्रसारमाध्ममातून वैचारिक संघर्ष भले तो कोणत्याही क्षेत्रातला असो, चालविणे जवळपास बंदच झाले आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या वा देशाच्या समाजकारण-राजकारणातील प्रमुख प्रश्नावर प्रसारमाध्ममांतून किती सकस वैचारिक संघर्ष घडले हे आठवले तर याची प्रचिती पटेल.

सभा लावणे आणि श्रोते जमवणे हेही दिवसेंदिवस अवघड बनते आहे. यामुळे वैचारिक रणधुमाळी होतच नाही. त्याचा पुढचाटप्पा येतो प्रत्यक्ष लढ्याचा. ते होतात, ते फक्त अतिशय तीव्र भौतिक प्रश्नांवर, अथवा भावना उद्दिपित करून. हे संघर्ष म्हणजे परिस्थितीच्या रेट्यातून झालेला वा घडवलेला स्फोट असतो, तो प्रासंगिक असतो. संघर्ष जितका भडक आणि हिंसक त्याप्रमाणात अधिक ठसा उमटवून जातो. प्रश्नाची धग कमी झाली की संघर्षातील शक्ती जवळपास लुप्त होते. रचनात्मक संघर्षाचे जे तत्त्वज्ञान मांडले जाते तो हा संघर्ष नव्हे. तसे संघर्ष होत नाहीत, कारण त्यासाठी लोकशक्ती मिळत नाही. लोक आणि विशेषत: मध्मम वर्ग हा परिवर्तनाच्या चळवळीचा आधार मानला गेला आहे. त्याची असंवेदनशीलता,चंगळवादाचा प्रभाव, संघर्षाने समाज बदलतो यावरचा त्याचा उडालेला विश्वास, अस्थिर जीवनातून आलेली अगतिकता अशी अनेक कारणे त्यासाठी सांगितली जातात. नवे आर्थिक धोरण या देशात आल्यानंतर गेली दीडतपेही कारण परत-परत सांगितली जातच आहेत. मात्र त्यावर मात कशी करावयाची याची प्रयोगभूमी ठरणाऱ्या चळवळीवा संघटना मात्र अपवादानेच दिसतात. माणसांच्या मनात स्वत:साठी वा समाजासाठी काही चांगले घडत असेल तर त्याला जोडून घ्यावे ही एक स्वाभाविक आस असते. ती आस साकार करणारी संघटना विचार व कृती या लोकांना आजूबाजूला दिसत नाही. अशा वेळी त्यांना स्वयंशिस्तीने रणरणत्या उन्हात येणारे लाखो लोक आणि समाज बदलाची भाषा यांची युती भुरळ पाडणार यात नवल नाही. शिवाय त्या जथ्यात सामील होताना, विचार करून स्वत:ला बदलण्याचीगरज नाही ही मोठी सोय असतेच.

या सर्व वास्तवातून आपण एका विदारक सत्यापर्यंत पोचतो. याचे दृश्य रूप निवडणुकांत आता अधिकाधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे. जगातील सगळ्यांत मोठी लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो. निवडणुका नियमितपणे व शांततेत होतात याचे कौतुक होते. कोणीही सामान्य माणूस सत्ताधिशाला आव्हान देऊ शकतो याची महती गायली जाते. परंतु आता दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना हा सर्व पोकळ दिखाऊ पणा आहे हे उमगते आहे. प्रत्यक्ष निवडणूकहा पैसा, सत्ता, जात व गुंडगिरी या चतुरंग सेनेचा खेळ झाला आहे. सामान्य माणूस त्याचा फक्त मूक साक्षीदार वा साथीदार होऊ शकतो. हीच बाब सत्संगापासून सर्व प्रकारच्या धर्माधिष्ठित कार्मक्रमांना लोटणाऱ्या गर्दीच्या बाबत व तेथे व्यक्त होणाऱ्या उपदेशाबाबत घडते आहे. प्रत्यक्ष बदलाचे आव्हान टाळून आभास निर्माण केले जात आहेत. अशा वेळी परिवर्तनवादी शक्तींनी काम करावे हा लाख मोलाचा बिकट प्रश्न आहे.

मा उत्तराचा ताईत देणारा एक गांधीबाबा या देशात होऊन गेला. त्याला समजून घेण्यात आणि अनुसरण्यात या देशातील परिवर्तनवादी कमी पडले. प्रबोधन आणि संघर्ष हे सुटे उभे राहू शकत नाहीत; त्यासाठी संघटन लागते व ते निर्माण होण्यासाठी रचनात्मक काम लागते. थोडयात, रचनात्मक काम हा दैनंदिन भाग असतो, त्यातून संघटन तयार होते, टिकते, स्थिरावते व विकसितही होते. ती शक्ती मग प्रबोधन मेळाव्याला व मोर्चाला उपयोगी पडते.

असे संघटन उभारण्याचा एक मार्ग धर्मातून जातो. दुसरा मार्ग सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांचे जाळे उभारण्यातून तयार होतो. तिसरा (बहुधा) सवंगपणे व पैशाच्या साहाय्याने नृत्य, गाणी, क्रीडा असे सांस्कृतिक सोहळे संयोजनातून तयार केला जातो. धर्माचा मार्ग परिवर्तनवाद्यांना मान्य नाही. संस्थांच्या आधारे रचना उभी करणे ही वेळ आता टळून गेली आहे. कथित सांस्कृतिक सोहळे हा तर पैशांचा खेळ झाला आहे. जीवनाच्या प्रत्यक्षसंघर्षातून माणसांना जोडणे हा सर्वांत चांगला मार्ग. पण संघर्षाला लोक येत नाहीत आणि आलेच तर प्रश्न थोडाफार सुटताच, व्यापकत्वाचे भान घेण्याऐवजी सुखेनैव आपल्या आमुष्यात परत मश्गुल होण्याचा प्रयत्न करतात असे आजचे वास्तव आहे. ही कोंडी फोडण्यासाठी रचनात्मक कामाची काही नवीन जुळणी करावी लागेल. त्यात व्यक्ती चा फायदा असेल, सातत्य असेल आणि ते करता करता विचाराचा धागाही जोपासला जाईल. गांधींच्या चरख्मात ते सामर्थ्य होते. स्वत:च्या प्रकृतीसाठी इष्ट वाटणारा योगासनांचा व्यायाम प्रत्येकाला देऊन, त्यांना धरून ठेवणारे संघटन बघता बघता भारतभर उभे राहते हे अलिकडचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्यापासून बोध एवढाच घ्यावयाचा की पुरोगाम्यांच्या नेतृत्व फळीला अधिक प्रतिभासंपन्नता दाखवावी लागेल, ज्यासाठीही पुन्हा गांधींनाच विचारावे लागेल.

अवघड प्रश्नांना सोपी उत्तरे देण्याचा लोकप्रिम खेळ स्थितिवादी मंडळी खेळणारच. त्यातून प्रश्नांची खरी सोडवणूक आणखी दूर जाणार. पण प्रश्न सोडवणुकीचे खरे मार्ग माहिती असलेल्या परिवर्तनवाद्यांच्या मागचे जनसमूह हे त्या चुकीच्या छावणीत जात आहेत, हा भुलभुलैया अधिक धोकादायक आहे. त्याचे उत्तर रचनात्मक संघर्षाच्या हत्याराने प्रत्यक्ष रणभूमीवरच साकार करावयास हवे.

Tags: parivartanvadi परिवर्तनवादी Gandhi गांधी sangharsha संघर्ष purogami पुरोगामी punha ekada rachanatmak sangharsha पुन्हा एकदा रचनात्मक संघर्ष weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात