डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आवाहन : बालकुमार व युवा अंक मोहिमेसाठी...

या वर्षीच्या बालकुमार व युवा दिवाळी अंकांकडे पाहावे लागते. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची परिस्थिती बरीच सुधारली असली तरी कोविड संकट पुरेसे ओसरलेले नाही आणि शाळा-महाविद्यालयेही जुजबी पद्धतीनेच चालू आहेत. त्यामुळे या दोन्ही अंकांसाठी प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी करता येण्याला अनुकूलता नाही. म्हणून आम्ही वाचकांना आवाहन करीत आहोत, पुढीलपैकी एका वा अधिक मार्गाने आपण पुढे यावे आणि या दोन्ही अंकांच्या प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी मोहिमेला सक्रिय हातभार लावावा.

साधना साप्ताहिकाचे नवे वर्ष जरी 15 ऑगस्टला सुरू होत असले तरी वार्षिक नियोजनासाठी मात्र दिवाळी ते दिवाळी असे वर्ष मानले जाते. त्याप्रमाणे दिवाळीपूर्वीचे केवळ तीन अंक आता शिल्लक आहेत. म्हणजे या अंकानंतर यदुनाथ थत्ते विशेषांक आणि नंतर एक नियमित अंक प्रकाशित होईल. त्यानंतर तीन दिवाळी अंक येतील आणि मग वार्षिक सुट्टीमुळे तीन आठवडे अंक येणार नाहीत. गेल्या काही वर्षांत साधनाचे दिवाळी अंक म्हटले की, बालकुमार, युवा व मुख्य असे तीन अंक वाचकांच्या नजरेसमोर येतात. कारण मागील 13 वर्षांपासून बालकुमार आणि 7 वर्षांपासून युवा दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. बालकुमार अंक सलग बारा वर्षे सरासरी तीन लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित झाले, तर युवा अंक सलग सहा वर्षे सरासरी तीस हजार प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित झाले. मात्र गेल्या वर्षी कोविड 19 संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंद राहिली, परिणामी या दोन्ही अंकांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. तरीही गेल्या वर्षी बालकुमार अंक 22 हजार प्रती आणि युवा अंक 10 हजार प्रती वितरित झाला. हे आकडे सांगण्याचे कारण विक्रमी विक्री करण्यात आम्हाला रस आहे असे नाही, आणि या अंकांच्या विक्रीतून साधनाला मोठा आर्थिक फायदा मिळतो असेही नाही. मुख्य मुद्दा आहे तो या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अन्य वाचकांपर्यंत एका विशिष्ट कालखंडात पोहोचता येते. काही विषय, काही थीम यांचे निमित्त करून वाचनसंस्कृतीच्या विकासाला हातभार लावता येतो. अंतिमत: व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांच्या जाणीवा विकसित होतात आणि समाजमन चार पावले तरी पुढे ढकलण्यास ही प्रक्रिया उपयुक्त ठरते.

या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या बालकुमार व युवा दिवाळी अंकांकडे पाहावे लागते. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची परिस्थिती बरीच सुधारली असली तरी कोविड संकट पुरेसे ओसरलेले नाही आणि शाळा-महाविद्यालयेही जुजबी पद्धतीनेच चालू आहेत. त्यामुळे या दोन्ही अंकांसाठी प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी करता येण्याला अनुकूलता नाही. म्हणून आम्ही वाचकांना आवाहन करीत आहोत, पुढीलपैकी एका वा अधिक मार्गाने आपण पुढे यावे आणि या दोन्ही अंकांच्या प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी मोहिमेला सक्रिय हातभार लावावा.

1) बालकुमार वा युवा अंकाच्या 50 किंवा त्या पटीतील प्रती स्वत: खरेदी कराव्यात आणि आपले गाव, गल्ली-मोहल्ला, आपले नातलग या स्तरांवरील मुला-मुलींना भेट म्हणून द्यावेत. असेच करायला आपल्या आणखी एखाद्या मित्राला, नातलगाला सांगावे. 

2) बालकुमार वा युवा अंक 50 किंवा त्या पटीत खरेदी करावेत आणि आपल्याला विशेष परिचित आहे अशी एखादी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय यांच्याकडे ते अंक पाठवावेत आणि त्यांनी ते तेथील मुला-मुलींना भेट म्हणून द्यावेत. असेच करायला आपण एखाद्या मित्राला वा नातलगाला सांगू शकता.

3) आपण 50 वा त्या पटीतील बालकुमार वा युवा अंकासाठीची रक्कम साधना साप्ताहिकाला पाठवावी आणि त्यांचे वाटप योग्य त्या ठिकाणी करावे असे कळवावे. आम्ही आम्हाला माहीत असलेल्या दुर्गम भागातील मुला-मुलींपर्यंत (शाळा, संस्था, कार्यकर्ते यांच्यामार्फत) पोहोचवण्याची व्यवस्था करू. ते अंक कोणाला पाठवले ते आपणास कळवू.

वरील तिन्ही मार्ग म्हटले तर फार सोपे आहेत, पण त्याचा किती परिणाम होतो किंवा होईल असे काही लोकांना वाटू शकते. मात्र साधनाच्या बालकुमार व युवा अंकांच्या प्रकाशनपूर्व नोंदणी मोहिमेचा प्रभाव मागील दशकभरातील काही लाख मुला-मुलींवर चांगला राहिला आहे. त्याचे परिणामही दृश्य स्वरूपात पाहायला मिळत आहेत. या नोंदणी मोहिमेच्या संदर्भातील सर्व तपशील साधनाच्या या अंकात आहेत, पुढील दोन अंकांत प्रसिद्ध होतील. प्रस्तुत अंकात सेंटर स्प्रेड पानावर बालकुमार दिवाळी अंकाची माहिती दिली आहे, पुढील अंकात अशीच माहिती युवा दिवाळी अंकाबाबत दिली जाईल. त्यानंतरच्या अंकात या दोन्ही अंकांबाबत अधिक तपशील दिले जातील.

Tags: साधना दिवाळी अंक युवा अंक 2021 बालकुमार अंक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके