डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘दक्षिणायन’चे एक आवर्तन (वर्ष) पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुम्हाला हवा तसा साधनाचा एक अंक संपादित करावा. अर्थात एक मोठी अपेक्षा आम्ही अशी व्यक्त केली होती की, त्या अंकात ‘दक्षिणायन’ संकल्पना मनात अशी आली, कार्यवाही कशी झाली, वर्षभरानंतर हाती काय लागले, आगामी काळात काय होऊ शकते वा व्हायला हवे यासंदर्भातील शक्य तितका विस्तृत लेख-निबंध गणेश देवी यांनी लिहावा. 

स्वातंत्र्योत्तर भारताचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा 2015 हे वर्ष पुरस्कार-वापसीचे वर्ष म्हणून उल्लेखिले जाईल. त्या वर्षीच्या मध्याला अशी लाट आली की, सव्वाशे-दीडशे लेखक-कलावंत-वैज्ञानिक यांनी त्यांना पूर्वी मिळालेले सरकारचे वा साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. तीन विचारवंत कार्यकर्त्यांच्या खुनाचा आणि त्यानंतरच्या अनेक घटनांचा निषेध करण्याचा भाग म्हणून ती पुरस्कारवापसी होती. त्या वर्षी ‘अभिव्यक्ती’ आणि ‘असहिष्णुता’ हे दोन शब्द भारतातील सांस्कृतिक विश्वात सर्वाधिक चर्चिले गेले, आणि 2016 हे वर्ष तर जागतिक पातळीवर ‘पोस्ट ट्रुथ’ आणि ‘झेनोफोबिया’ या दोन शब्दांच्या अधिक वापरासाठी ओळखले गेले. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत अकांकडे पाहिले जावे.

पुरस्कारवापसीचा प्रारंभ करणाऱ्या लेखक-विचारवंतांपैकी एक असलेल्या गणेश देवी यांनी विविध प्रांतांतील, विविध भाषांतील लेखक-कलावंत-कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘दक्षिणायन’ अभियान सुरू केले. त्या अभियानाची पहिली मोहीम म्हणून, पुणे-कोल्हापूर-धारवाड या तीन ठिकाणांना त्यांनी गुजरातमधील आठ-दहा लेखकांसह भेटी दिल्या. कारण याच तीन ठिकाणी तीन विचारवंत-कार्यकर्त्यांच्या हत्त्या झाल्या होत्या. त्या मोहिमेतला पहिला कार्यक्रम पुणे येथे साधना साप्ताहिक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी आयोजित केला होता. त्या मोहिमेला तीनही ठिकाणी उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला होता.

त्या मोहिमेनंतर ‘दक्षिणायन’ अभियानाचा भाग म्हणून दांडी (गुजरात) येथे 30 जानेवारी 2016 रोजी ‘सर्वभाषा संवाद’ परिषदेचे आयोजन झाले. त्यानंतर मार्च 2016 मध्ये धारवाड (कर्नाटक) येथे तर नोव्हेंबर 2016 मध्ये मडगाव (गोवा) येथे दक्षिणायनच्या तीनदिवसीय परिषदा झाल्या. दरम्यान विविध राज्यांतील विविध शहरांत छोटे- मोठे कार्यक्रम चालूच होते. त्यामुळे डिसेंबर 2016 मध्ये, आलेल्या काही सूचना लक्षात घेऊन गणेश देवी यांना आम्ही अशी विनंती केली होती की, ‘दक्षिणायन’चे एक आवर्तन (वर्ष) पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुम्हाला हवा तसा साधनाचा एक अंक संपादित करावा. अर्थात एक मोठी अपेक्षा आम्ही अशी व्यक्त केली होती की, त्या अंकात ‘दक्षिणायन’ संकल्पना मनात अशी आली, कार्यवाही कशी झाली, वर्षभरानंतर हाती काय लागले, आगामी काळात काय होऊ शकते वा व्हायला हवे यासंदर्भातील शक्य तितका विस्तृत लेख-निबंध गणेश देवी यांनी लिहावा. मात्र त्यानंतरच्या चारही महिन्यांत त्यांच्या हाताशी असलेली व वाढत गेलेली कामे यामुळे तसा लेख लिहिण्यासाठी ते वेळ काढू शकले नाहीत. परंतु तसा दीर्घ लेख-निबंध पुढील वर्षभरात त्यांच्याकडून लिहून होईल अशी आशा बाळगू या, त्या लेखातून दक्षिणायनची प्रक्रिया कशी घडून आली आणि फलनिष्पत्ती काय व किती याविषयी नेमकेपणाने कळू शकेल. त्या आगामी लेखातील विवेचन-विश्लेषण समजून घेण्यासाठी हा अंक पार्श्वभूमी तयार करणारा ठरेल.

Tags: गणेश देवी असहिष्णुता अभिव्यक्ती दक्षिणायन अभियान झेनोफोबिया पोस्ट ट्रुथ वाचकदिन विनोद शिरसाठ vinod shirsath कैफियत लेखकांची सर्वभाषा संवाद साहित्य अकादमी पुरस्कार-वापसीचे वर्ष गुजरात Ganesh Devi South Ward Gone South Return of writer Explanation of Writer All language conversation colloquy Award Return Year intolerance Expression Manifestation Xenophobia Post Truth Sahitya Akadami Gujarath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके