Diwali_4 सर्जनशील आणि समाजसन्मुख
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आणि डॉक्टरांच्या हत्त्येनंतर, त्यांना ज्यात रुणाईचे विशेष अगत्य होते, त्यांच्यासाठी युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. मागील नऊ वर्षे बालकुमार अंकांच्या सरासरी तीन लाख प्रती वितरित होत आल्या आहेत, तर मागील तिन्ही वर्षी युवा अंकांच्या सरासरी पंचावन्न हजार प्रती. 

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गुरुजींच्या नंतर आचार्य जावडेकर, रावसाहेबपटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट आणि ग.प्र.प्रधान या संपादकांनी साधनाची ओळख एक वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी करून दिली.

साधनाच्या पन्नासाव्या म्हणजे सुवर्णमहोत्सवी वर्षांत डॉ.नरेंद्र दाभोलकर संपादक झाले आणि त्यानंतरची15 वर्षे त्यांनी साधनाची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होत राहील, या दिशेने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेला आणि त्यांच्या धडाडीमुळेच नावारूपाला आलेला बालकुमार दिवाळी अंक आता दहा वर्षांचा झाला आहे. आणि डॉक्टरांच्या हत्त्येनंतर, त्यांना ज्यात रुणाईचे विशेष अगत्य होते, त्यांच्यासाठी युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. मागील नऊ वर्षे बालकुमार अंकांच्या सरासरी तीन लाख प्रती वितरित होत आल्या आहेत, तर मागील तिन्ही वर्षी युवा अंकांच्या सरासरी पंचावन्न हजार प्रती. 

युवा अंक कशासाठी, याबाबतची आमच्या मनातील कल्पना सुरुवातीपासून सुस्पष्ट होती. हा अंक ‘युवाअभिव्यक्ती’चा नाही, तर युवकांनी वाचण्यासाठी आहे, त्यांच्या कक्षा रूंदावण्यासाठी आहे. त्यामुळे बहुतांशलेखन विविध क्षेत्रांतील आयकॉन्स किंवा आयडॉल्स यांच्या संदर्भातील किंवा त्यांच्याकडून येईल असाच प्रयत्न राहिला आहे. तरुणाईला भूत-वर्तमान-भविष्य अशा पद्धतीने काळाच्या संदर्भात विचार करता यायला हवा, व्यक्ती-समाज-व्यवस्था यांच्यातील अंतर्गत ताणेबाणे त्यांच्या लक्षात यावेत आणि काही नवी दालने खुली झाल्याचा आनंद त्यांना मिळावा. अशी यामागची भूमिका राहिली आहे. 

या वर्षीच्या अंकात सात लेख आहेत. गेल्या चार पाच वर्षांत ‘सोशल मीडिया’ने आपल्या समाजजीवनाचा खूप मोठा भाग व्यापला आहे, त्याचा पसारा अक्राळ-विक्राळ पद्धतीने वाढत आहे. त्यासंदर्भात वास्तवाचे भान देणारा, विनायक पाचलग या ऐन पंचविशीतील तरुणाचा लेख प्रारंभी घेतला आहे. गेल्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिला जीवनाचे प्रेयस आणि श्रेयस केव्हा आणि कधी लक्षात आले ते प्रांजळपणे सांगितले आहे, ‘वेळीच सावध व्हा’ असा इशारा देण्यासाठी तो लेख पुरेसा आहे. मोठ्या तावातावाने चर्चा करणे, वाद घालणे हे तरुणाईचे प्रधान लक्षण असते; त्या तरुणाईला रामचंद्र गुहा यांचा लेख वेळप्रसंगी ‘बॅकफूटवर’ जाण्यासाठी सूचित करेल. आणि बोनिफेस वांगीची संघर्षकथा सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेशी टक्कर देण्यासाठी प्रेरणा देत राहील. झेलम परांजपे यांच्या अनुभव कथनातून गूढतेचे वा अनाकलनीयचे वलय लाभलेल्या नृत्याच्या क्षेत्राविषयीचे कुतूहल वाढीस लागेल. नायजेरियाची तरुण व लोकप्रिय लेखिका चिमामांडा एन्गोझीचे भाषण विद्यार्थी-पालक-शिक्षक या सर्वांनाच अनेक साधी सत्ये हाती लागल्याचा आनंद देईल आणि अर्थातच आपापल्या स्तरावर तरी बदल करावेत अशी जाणीव उत्पन्न करेल.गांभीर्याने वाचन करू लागलेल्या आजच्या तरुणाईला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याविषयी बरेच आकर्षण व कुतूहल आहे, ते काही अंशी शमवणारी आणि त्यांचा गाभा व आवाका दाखवणारी मुलाखत या अंकात समारोपाला घेतली आहे.

या सातही लेखांमधून विवेकाचा पाठपुरावा आणिप्रगतीची आस दिसेल, त्यातून सर्जनशील व समाजसन्मुख जगण्याची तरुणाईची इच्छा अधिक प्रबळ होईल.
 

Tags: युवा दिवाळी अंक संपादकीय विनोद शिरसाठ yuwa diwali an vinod shirsath sampadkiy Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात