1948 - फेब्रुवारी 15 - भावनगर येथे सौराष्ट्र राज्यसंघाची स्थापना. एप्रिल 3 - जोधपूर, जयपूर, बिकानेर, जेसलमेर, उदेपूर, भरतपूर या संस्थानांच्या राजस्थान संघाचे उद्घाटन. एप्रिल 22- ग्वाल्हेर, इंदूर इ. मध्य भारतातील 23 संस्थानिकांनी संघ बनवण्याच्या करारावर सह्या केल्या. नोव्हेंबर 3- नागपूर विद्यापीठ, नोव्हेंबर 25- बनारस हिंदू विद्यापीठ, नोव्हेंबर 27- अलाहाबाद विद्यापीठ यांच्यातर्फे सन्माननीय डॉक्टरेट.
1875 - 31 ऑक्टोबर रोजी खेडा जिल्ह्यातील नडियाद गावी जन्म. करमसद हे त्यांचे गाव. वडील झवेरभाई आणि आई लाडबाई यांचे चौथे पुत्र. करमसद येथे प्राथमिक व इंग्रजी तिसरीपर्यंत शिक्षण.
1893 - करमसद नजीकच्या गाना गावी झवेरबा यांच्याशी लग्न.
1897 - नडियादच्या सरकारी शाळेतून शालांत परीक्षा उत्तीर्ण.
1900 - वकिलीची परीक्षा उत्तीर्ण आणि पंचमहाल जिल्हयात गोध्रा येथे वकिलीची सुरुवात.
1902 - गोध्रा सोडून बोरसद येथे स्थलांतर. फौजदारी वकील म्हणून प्रसिद्धी.
1903 - मणिबेन या कन्येचा जन्म.
1905 - डाह्याभाई या मुलाचा जन्म.
1909 - पत्नी झवेरबा यांचे 11 जानेवारीला मुंबईत निधन.
1910 - बॅरिस्टर होण्यासाठी ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये प्रयाण. मिड्ल टेम्पल या महाविद्यालयात प्रवेश.
1912 - बॅरिस्टरीच्या परीक्षेत पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण, 50 पौडांचे पारितोषिक. भारतात परत.
1913 - अहमदाबादमध्ये फौजदारी वकिलीला प्रारंभ.
1914 - वडील झवेरभाई यांचे पंचाऐंशीव्या वर्षी निधन.
1915 - अहमदाबादच्या गुजरात सभेत प्रवेश आणि सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ.
1916 - गांधीजींशी ओळख. स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची इच्छा बळावली. लखनौ काँग्रेसला गुजरात सभेचे प्रतिनिधी म्हणून हजेरी.
1917 - अहमदाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश. आरोग्य समितीचे अध्यक्ष. इंग्रज आयुक्तांची नेमणूक रद्द करवली. गोध्रा येथील पहिल्या गुजरात प्रांतिक सभेच्या कार्यकारिणीचे चिटणीस. वेठबिगार पद्धती विरुद्ध चळवळ.
1918 – एन्फ़्लुएन्झाच्या साथीत लोकांची सेवा. एका तात्पुरत्या रुग्णालयाची स्थापना. दुष्काळग्रस्त खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शेतसारा सरकारने घेऊ नये, यासाठी करबंदीचा यशस्वी लढा.
1919 – अहमदाबाद नगरपालिकेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड. स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी इंग्रज सरकारने रौलेट कायदा करण्याचे ठरवले होते. त्याविरुद्ध लढा. राष्ट्रीय सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवशी 7 एप्रिल पासून सत्याग्रही पत्रिका सुरू केली.
1920 - अहमदाबाद नगरपालिकेच्या सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. विदेशी वस्त्रांवर बहिष्कार आणि खादी वापरण्याला सुरुवात. सविनय कायदेभंगाच्या ठरावाला पाठिंबा. नागपूर काँग्रेस अधिवेशनात टिळक स्वराज्य फंड जमवण्याचा संकल्प. गुजरातमधून 10 लाख रुपये निधी जमवला. काँग्रेसचे 3 लाख सभासद नोंदवले. गांधीजींच्या सल्ल्याप्रमाणे गुजरात विद्यापीठाची स्थापना. राष्ट्रीय शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ.
1921 - गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड. अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.
1922 - गुजरात विद्यापीठासाठी ब्रह्मदेशची राजधानी रंगून येथून 10 लाख रुपयांच्या देणग्या गोळा केल्या.
1923 - नागपूर येथे सफल झेंडा सत्याग्रह. बोरसद तालुक्यातील लोकांवर डिसेंबरमध्ये सरकारने जो अन्याय कर बसवला त्याविरुद्ध लढा. सरकारला कर रद्द करावा लागला. वल्लभभाईंना बोरसद भागाचे नेतृत्व बहाल.
1924 - अहमदाबाद नगरपालिकेच्या प्रमुखपदी निवड.
1927 - गुजरातमध्ये पुराचे अभूतपूर्व संकट. पूरग्रस्तांसाठी सरकारकडून एक कोटी रुपये मिळवले.
1928 - अहमदाबाद नगरपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा. बारडोलीतील खेडुतांचा सारावाढीविरुद्ध सरकारशी सत्याग्रही मार्गाने वल्लभभाईंच्या नेतृत्वाखाली यशस्वी लढा. त्यामुळे लोकांनी 'सरदार' ही पदवी प्रेमाने दिली. कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात स्वातंत्र्यलढ्याचे सरदार म्हणून प्रशस्ती.
1929 - पुण्याच्या महाराष्ट्र राजकीय परिषदेचे प्रमुख अतिथी. मोरवीच्या काठेवाड राजकीय परिषदेचे प्रमुख.
1930 - मिठाच्या सत्याग्रहाचा प्रचार केल्याबद्दल रास गावात 7 मार्चला अटक. 26 जूनला सुटका. 30 जून रोजी काँग्रेसचे कार्यकारी सर्वाधिकारी म्हणून नेमणूक. 1 ऑगस्टला अटक आणि येरवडा जेलमध्ये पाठवणी.
1932 - स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल अटक. येरवडा तुरुंगात गांधीजींबरोबर 16 महिने कारावास. आईचे नोव्हेंबरमध्ये करमसद येथे निधन.
1933 - एक ऑगस्टला नाशिक जेलमध्ये पाठवणी. मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल यांचे स्वित्झर्लंडमध्ये 22 ऑक्टोबरला निधन.
1938 - काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय शिस्त समितीचे प्रमुख. शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली. दुखावलेली मंडळी त्यांना हुकूमशहा म्हणू लागली. काठेवाड राजकीय परिषदेचे प्रमुख.
1940 - व्यक्तिगत सत्याग्रहात पुढाकार आणि अटक. नोव्हेंबर 18 ला साबरमतीच्या तुरुंगात. तेथून येरवडा तुरुंगात पाठवणी.
1941 - आजारपणामुळे 20 ऑगस्टला तुरुंगातून सुटका.
1942 - ऑगस्ट 8 रोजी मुंबई काँग्रेस अधिवेशनात 'भारत छोडो' ठरावाला अनुमोदन. ऑगस्ट 9 ला इतर काँग्रेस नेत्यांबरोबर अटक, नगरच्या किल्ल्यात ठेवले. 1944 पर्यंत कारावास.
1945 - 15 जूनला येरवडा तुरुंगातून सुटका.
1946 - भारतीय संविधान सभेत 9 डिसेंबरला सहभाग.
1947 - एप्रिलमध्ये वल्लभ विद्यानगरात विठ्ठलभाई पटेल महाविद्यालयाचे उद्घाटन. जुलै 5 रोजी संस्थान खात्याची निर्मिती आणि प्रमुखपद. सर्व संस्थानिकांना देशहितासाठी समजूतदारपणे वागण्याची तंबी. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात उपप्रधानमंत्री व गृहमंत्री. नोव्हेंबर 13 - सोमनाथ पाटणला भेट आणि सोमनाथ महादेवाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्प.
1948 - फेब्रुवारी 15 - भावनगर येथे सौराष्ट्र राज्यसंघाची स्थापना. एप्रिल 3 - जोधपूर, जयपूर, बिकानेर, जेसलमेर, उदेपूर, भरतपूर या संस्थानांच्या राजस्थान संघाचे उद्घाटन. एप्रिल 22- ग्वाल्हेर, इंदूर इ. मध्य भारतातील 23 संस्थानिकांनी संघ बनवण्याच्या करारावर सह्या केल्या. नोव्हेंबर 3- नागपूर विद्यापीठ, नोव्हेंबर 25- बनारस हिंदू विद्यापीठ, नोव्हेंबर 27- अलाहाबाद विद्यापीठ यांच्यातर्फे सन्माननीय डॉक्टरेट.
1949 - फेब्रुवारी 26 - उस्मानिया विद्यापीठाची डॉक्टरेट. ऑक्टोबर 7 ते नोव्हेंबर 15 - नेहरूंच्या विदेश निवासकाळात भारताचे कार्यकारी प्रधानमंत्री.
1950 - सप्टेंबर 20-22- नाशिक येथील अधिवेशनात सहभागी.
डिसेंबर 15 मुंबईत अल्प आजारानंतर निधन.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या