डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आंतरजातीय विवाह आणि समाजकंटक

लग्नापूर्वी मंगलाला हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. तिला पळवून नेऊन तिच्या जातीतील तरूणाशी तिचं लग्न जमवण्याचा बेतही आखण्यात आला होता. हा बेत फसला म्हणून गावकरी चिडले आहेत.

युवक क्रांती दल ही महाराष्ट्रातील तरुणांची एक लढाऊ संघटना.

सत्याग्रही समाजवादाला बांधीलकी असलेल्या अनेक तरूणांचा संच या संघटनेजवळ आहे. आणीबाणीच्या काळात या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते मिसाबद्ध होते.

अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गाव युक्रांदचे प्रमुख कार्यक्षेत्र. या गावातील प्रमुख जमीनदाराच्या गुंडगिरीला आणि दहशतीला तोंड देत देतच युक्रांदचा एक मुसलमान कार्यकर्ता आणीबाणीच्या काळात राशिनला हुतात्मा झाला. याच राशिन गावात मंगला खिंवसरा या नावाची 'युक्रांद'ची एक पूर्णवेळ कार्यकर्ती काम करते.

मंगला इन्टर आर्ट्सपर्यंत शिकलेली असून सज्ञान आहे. युक्रांदचा शांताराम पंदेरे हाही संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता. शांताराम दलित जातीतला. मंगला मारवाडी समाजातली.

जाती-धर्मविरहीत समाजवादी समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी धडपडणारे. संघटनेत काम करत असताना दोघेही परस्परांवर प्रेम करू लागतात. दोघांच्या जाती अलग अलग. मंगला उच्चवर्णीय तर शांताराम दलित जातीतील.

पण जातीच्या या भिंती त्यांना भेडसावत नाहीत. इतकेच नव्हे तर आजची चातुर्वर्ण्यावर आधारलेली समाजव्यवस्था मोडण्यासाठी आंतरजातीय विवाहांची आवश्यकता ते मानतात आणि ते विवाहबद्ध होतात.

या विवाहाने राशिनला खळबळ माजते. उच्चवर्णीयांचा अहंकार डिवचला जातो. युक्रांदच्या कार्यकर्त्यांना मारहाण सुरु होते.

युक्रांदचे एक कार्यकर्ते संदिवान बडगिरे या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी राशिनला गेले, तर त्यांनाही गावातील पन्नास समाजकंटक अमानुष मारहाण करतात. राशिन युक्रांदचे चिटणीस श्री. प्रकाश बजाज व त्यांच्या वृद्ध आईसही बेदम मारतात. अजुनही गावगुंडाकडून युक्रांदच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे, कुरबुरी काढणे इ. प्रकार सुरू आहेत.

आपण हा विवाह स्वखुषीने केला असल्याची तार गावकऱ्यांना पाठवली आहे.

लग्नापूर्वी मंगलाला हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. तिला पळवून नेऊन तिच्या जातीतील तरूणाशी तिचं लग्न जमवण्याचा बेतही आखण्यात आला होता.

हा बेत फसला म्हणून गावकरी चिडले आहेत. त्यामुळेच सध्या त्यांनी राशिनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

विवाह हा दोन व्यक्तींमधला मर्यादित संबंध असला तरी अजूनही सज्ञान मुलीला आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेऊ न देणारी ही क्रूर समाजव्यवस्था आहे.

जातीप्रथा आणि स्त्रीदास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या प्रथेविरुद्ध शांततामय आंदोलन राशिनला सुरु करण्याचा निर्णय युक्रांदने घेतला आहे.

पुरोगामी युवक संघटनांनी आणि व्यक्तींनी युक्रांदच्या या संघर्षात उतरले पाहिजे.

Tags: आंतरजातीय विवाह समाजवादी संघटना युवक क्रांती दल inter caste marriage socialist organization yuvak kranti dal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके