डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या बँकेचे अकाउंटंट आहेत श्री.शंतनू भट्टाचार्य. ते म्हणाले, 'की बँकेतील पुरुष कर्मचाऱ्यांपैकी मी एक पुरुष आहे. साधारणपणे एका महिलेला महिन्याभरात दहा रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत बचत करणे शक्य असते. त्यांच्या बचतीप्रमाणे त्यांना कर्जाचे वाटप करण्यात येते. या कर्जाची रक्कम पाचशे रुपयांपासून ते अगदी दहा लाखापर्यंत जाते.

बँका, सहकारी पतपेढ्या सर्वत्र पोचलेल्या आहेत. खेडोपाड्यात, दुर्गम प्रदेशात तर केवळ कामगारांनी तसेच स्त्रियांनी सहकारी तत्त्वावर चालविलेल्या बँकाही आता नवीन राहिल्या नाहीत. पण कोलकात्यातली एक बँक मात्र आगळी-वेगळी आहे. तिचे नाव आहे 'उषा सहकारी बहुउद्देशीय संस्था मर्यादित लि., 'ही सहकारी बँक वेश्या व्यवसायातील स्त्रिया चालवतात. तिची २००७-८ ची उलाढाल जवळपास दहा कोटी रुपये आहे. या बँकेचे सदस्यत्व वेश्या व्यवसायापुरतेच मर्यादित असून त्यांची सदस्यसंख्या आहे ८५६७. विशेष म्हणजे या बँकेच्या व्यवस्थापन मंडळावरचे बारा सभासद, कोलकात्याच्या सोनागाछी या देशातील सर्वात मोठ्या वेश्यावस्तींपैकी एक असलेल्या विभागातले आहेत. या सहकारी बँकेत खाते उघडण्यासाठी इतकी झुंबड उडतेय, की बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने प.बंगाल राज्याच्या मुर्शिदाबाद, हुगळी या जिल्ह्यांत आणि उत्तर बंगालमधील अन्य वेश्या वस्तीच्या विभागात सहा शाखा उघडण्याचे ठरवले आहे.

येथील वेश्या वस्तीतील महिलांना स्वत:चे बँकेचे खाते उघडण्याची इतकी उत्कंठा लागण्याचे कारण आजवर त्यांना इतर बँकात बचत खाते सुरू करण्यास मज्जाव केला जात असे. त्या तिथे गेल्या, तर त्यांची हेटाळणी केली जात होती. या संदर्भात उषा सहकारी बँकेच्या अध्यक्ष प्रतिमा दास म्हणतात, या बँकेने माझ्या कुटुंबाचे रक्षण केले आहे. मीदेखील राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते चालू करण्यासाठी गेले होते. पण मला त्यांनी शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सिद्ध करणारे अनेक कागदपत्रे मागितले. माझी शिधापत्रिका व मतदार ओळखपत्र ही सारी कागदपत्रे माझ्या मुर्शिदाबादमधील मूळच्या घरी होती. मी ती आणू न शकल्यामुळे मला आजपर्यंत खातेच उघडता आले नव्हते. याशिवाय त्या बँकांमधील वातावरण आपुलकी, स्नेह निर्माण करणारे नव्हते. तिथले बाबू लोक आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पहात आणि आमच्यासारख्या महिलांना लाजीरवाणे होऊन जायचे.' 

श्रीमती दास पुढे म्हणाल्या, 'आमच्यापाशी अडीअडचणीच्या प्रसंगी पैसा नसतो. आजरपण येते, किंवा रुग्णालयात भरती होण्याची पाळी ओढवते, तेव्हा आम्हाला स्थानिक सावकाराचे पाय धरावे लागतात. तो तर आमच्याकडून १०० टक्के व्याज वसूल करतो. १९९५ मध्ये या सर्व वेश्यांनी स्वत:ची अशी बँक स्थापन केली. जो काही पै-पैसा या बँकेत जमा करण्यात येतो, त्याचे बहुतांशी व्यवस्थापनही याच महिला करतात. या बँकेचे अकाउंटंट आहेत श्री.शंतनू भट्टाचार्य. ते म्हणाले, 'की बँकेतील पुरुष कर्मचाऱ्यांपैकी मी एक पुरुष आहे. साधारणपणे एका महिलेला महिन्याभरात दहा रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत बचत करणे शक्य असते. त्यांच्या बचतीप्रमाणे त्यांना कर्जाचे वाटप करण्यात येते. या कर्जाची रक्कम पाचशे रुपयांपासून ते अगदी दहा लाखापर्यंत जाते.

विज्ञान शिक्षणाचा वर्ग शाळेच्या भिंतींबाहेर 

मोहम्मद रफीक, वय वर्षे ४९. रफीकमिया गेले काही महिने आपल्या राजाबझारमधील घराजवळ समाजाच्या उपेक्षित वर्गातील मुलांसाठी विज्ञानाचा खास वर्ग घेत आहेत. दररोज सकाळी दोन तास झाकीर हुसेन अकादमी आणि आरोग्य केंद्रात ते चाळीस एक मुलांना इंग्लिश व उर्दू शिकवतात. पाच ते दहा वर्षांची ही मुले आहेत. रफीकमियांच्या नक्वी अख्तर या व्यापारी मित्राने दिलेल्या २५० चौरस फुटांच्या जागेत हा वर्ग चालतो. या वर्गात येणारी काही मुले शाळेत नियमाने जाणारी आहेत, तर काहींना घरातील आर्थिक अडचणींपायी शाळा सोडावी लागलेली आहे. संध्याकाळी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातो. बहुतांश विद्यार्थी वर्गाची फी भरू शकत नाहीत. जे काही देऊ शकतात, त्यांच्याकडून नाममात्र पन्नास रुपये घेण्यात येतात. या वर्गाचे बहुतेक शिक्षकही पैसे घेत नाहीत. हे वर्ग चालवण्याचा खर्च (म्हणजे वीज आणि स्टेशनरी इत्यादी) अंदाजे महिन्याकाठी पाच हजार येतो. यापैकी बराचसा खर्च अख्तर साहेबांच्या खिशातून होतो. रफीकमिया निधी गोळा करून आणतात, तर काही वेळा स्वतः हातभार लावतात.

'मी वयाच्या सतराव्या वर्षापासून शिक्षण घेऊ लागलो. शाळेची फी देणं अशक्य होतं, कारण माझ्या वडिलांचं मी लहान असतानाच निधन झालं होतं. मी एका छापखान्यात काम करून कुटुंबाचा सांभाळ करत होतो. पण मग शिकण्यासाठी वेळ हवा म्हणून विड्या वळण्याचं काम पत्करलं.' रफीकमिया सांगतात.रफीकमियांनी १९९३ मध्ये उर्दू विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठाची एम.ए. पदवी संपादन केली. आज ते विद्यापीठाच्या अंडर ग्रॅज्युएट कौन्सिलचे वरिष्ठ सहाय्यक आहेत. नोकरीच्या वेळाशिवाय ते या वर्गाची जबाबदारी घेऊ लागले. त्यांनी या विभागातील घराघरात जाऊन तेथील पालकांना या वर्गासाठी आपली मुले पाठवण्याला उद्युक्त केले. बहुतेक पालकांना आपली मुले शिकावीत. असे वाटत होते, पण त्याबरोबर कुटुंबाचा सांभाळही गरजेचा होता. त्यात सारे पालक स्वतः अशिक्षित असल्यामुळे त्यांना या वर्गाची कल्पना पटवणे रफीकमियांना खूप जड गेले, पण त्यांनी स्वत:चं उदाहरण देऊन या वर्गाचं महत्त्व सांगितलं.

आता यापुढे अकरावी आणि बारावीच्या शाळा सोडलेल्या मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू करण्याची योजना आहे' रफीकमिया यांचे हे आत्मविश्वासाचे बोल आहेत.
 

Tags: कलकत्ता विद्यापीठ मोहम्मद रफीक श्री.शंतनू भट्टाचार्य बँक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके