या मुद्रणालयाला भेट देण्यास 19 तारखेस संध्याकाळी बी. एस. एम. गेले होते. त्यांनी श्री. मनोहर कोतवाल यांच्यासह सर्वाचं म्हणणे ऐकून घेतले व पुण्यातील जनवाणी प्रेसची कथा सांगितली. कामगार नेत्यांना कसे वापरतात यावर या कथेने प्रकाश पाडला.
वडाळयास इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये वीस वर्षांपूर्वी सुरू केलेले लोकप्रिय सहकारी मुद्रणालय आता केवळ उत्कृष्ट प्रतीचे मुद्रणालयच बनले आहे असे नसून ते प्रकाशनालयही झाले आहे. श्रीमती कुमुद करकरे नोकरी सोडून हे मुद्रणालय उत्तम पद्धतीने चालवण्याच्या जिद्दीने उभ्या राहिल्या. श्री. के. आर. प्रभुदेसाई यांच्यासारखा हाडाचा सहकारी गार्गदर्शनास लाभला. तीन लाखांचे एच. एम. टी. चे मशीन बैंकाने चेक छापण्यासकट सर्व कामे उत्तम देते; पण ही सगळी जमेची बाजू असली तरी कामगारांच्या किती ट्रेड युनियन मेंबर आहेत असा सवाल केला तर तीन बोटेच दाखवावी लागतात. एकूण सभासद संख्या 418. पैकी 197 सभासद व्यक्तिगत रीत्याच सभासद आहेत. गेल्या वर्षी या मुद्रणालयाने 8 लक्ष 82 हजारांचे काम केले! कामगारांना जेवढे वेतन द्यायला हवे तेवढे हे मुद्रनलाय देते. भागधारकाचे भांडवल मात्र 66 हजार 175 रुपयांचेच आहे.
आणीबाणीत या सोसायटीने म्हणजे प्रेसने मा. गांधीचे छाया चित्र छापले हे इंदिरा गांधीना रुचले नाही! त्या दिव्यातून पार पडताना जे नुकसान आहे त्याची भरपाई करून देऊ असे श्री. वसंतदादा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा म्हणाले होते, पण त्यांनी काहीही नुकसान भरून दिले नाही! त्यांच्या मागुन पुलोद सरकार आले, त्यांनीही दिले नाही. पण या मुद्रणालयाचे चीफ प्रमोटर पी. केशवराव घैसास, अशोक सरफरे, कोषाध्यक्ष कुमुद करकरे, मॅनेजर पाटील यांनी सहकारी मुद्रणालय वर आणायचेच व आदर्श करून दाखवायचेच असा चंग बांधला आहे. एच. एम्. टी. चे मशीन घेण्यासाठी हजार रुपयांचा पहिला हप्ता दोन वर्षे सरकारकडे पडून होता.
सहकारी मुद्रणालय त्यावर व्याज भरावे मागत होते. एकी साधी गोष्टही सरकारच्या ध्यानी आली नाही. सरकारनेच जर सहकाराशी असा असहकार केला तर सहकार फुलावा कसा? मंत्रीगण सहकाराच्या घोषणा करतात, पण सहकारी मुद्रणाल्यास छपाईचे काम देत नाहीत! कार्पोरेशन, महाराष्ट्र सरकार सगळीकडे हात ओले करणारांना काय मिळते. प्रामाणिकपणे सहकारावर जगणाऱ्यांनी पुढे कसे जावे?
या मुद्रणालयाला भेट देण्यास 19 तारखेस संध्याकाळी बी. एस. एम. गेले होते. त्यांनी श्री. मनोहर कोतवाल यांच्यासह सर्वाचं म्हणणे ऐकून घेतले व पुण्यातील जनवाणी प्रेसची कथा सांगितली. कामगार नेत्यांना कसे वापरतात यावर या कथेने प्रकाश पाडला. जनवाणी प्रेसचे ई. एस. आय. चे व कामगार भविष्य निधीचे हप्ते थकले तेव्हा एस. एम्. ना कोर्टात खेचून हप्ते न भरल्यावर 30 रु. दंड झाला. तीस हप्त्यात थकबाकी भरावी असा कोर्टाने हुकूम दिला. एवढे झाल्यावर कामगारांनी नियमानुसार बोनस मागितलाच. एस्. एम्. कामगारांना म्हणाले, 'प्रेस तुमच्या मालकीचा करतो, पण कामगारांना ती जबाबदारी नको होती. प्रेस राष्ट्रीयीकृत करा! एस्. एस् नी पुण्यातील पारिजात कन्झुमर्स सोसायटी का बंद करावी लागली तेही सांगितले लोकमित्र मुद्रणालयाच्या साक्षीत गरजेच्या मुद्यावर येऊन ते म्हणाले, 'तीन लक्षांचे एच. एम. टी. मशीन घेतलेत, त्यातील दोन लक्ष रूपये सभासद संख्या वाढवून का जमा करता येऊ नयेत?
हिंद मजदूर सभेने आपल्या किती युनियन्सना या मुद्रणालयाचे याचे सभासद बनविले? आज आपण अश्या समाज व्यवस्थेत आहोत की जिला भ्रष्ट कॉपिटॉलिझम शी स्पर्धा करीत करीतच आपल्याला वर यावे लागले, सोशलिस्ट रेव्हील्युशन येथे होणार नाही. लोकशाही मार्गांनीच आपणास विकास साधावा लागेल व समाजवादी समाजरचना आणावी लागेल. लोकाशिक्षणाला मूल्य किती देता यावर ते अवलंबून. लोकांना आपण सांगितले पाहिजे की, बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, पण तेथे इंदिरा गांधी नेमतील तो कस्टोडीयन येतो व ज्याचा गरज त्याला क्रेडिट मिळतेच असे नाही! सहकारी बैंकेत निदान आम्हीच निवडून दिलेली माणसे असतात.
लोकशिक्षणाने लोकांच्यात शक्ती निर्माण करता येईल काय? ते करणार नसाल तर हेच काय कोणतेही संस्कार झाले तरी काही होणार नाही, आाज सगळयाच स्वयंसेवी संस्थाचे पतन झाले आहे. वशिल्याने कामे होण्याची मर्यादाही संपली जाहे. कोणी म्हणतात, समाजवादी पक्षाचे पुनरुज्जीवन केले तर सारे काही ठीक होईल. सडलेल्या बटाट्याची भाजी होत नसते हे ध्यानात ठेवा आणि प्रेस कष्टानेच चालवावा लागेल हे विसरू नका. असे एस. एम. नी सांगितले. हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी ताबडतोब आपल्या ट्रे. यु. प्रेसच्या सभासद होतील असे अभिवचन दिले.
Tags: इंदिरा गांधी मनोहर कोतवाल एस.एम. जोशी मुद्रणालय वडाळा Indira Gandhi Manohar Kotwal S.M. Joshi Press Wadala weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या