डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. साठेंनी या आणि अन्य बाबींचा आपल्या लेखात सुबोध भाषेत ऊहापोह केला असून भारतीय लोकशाहीच्या ‘कृशपणा’ची कारणे उघड केली आहेत. डॉ. साठेंच्या लेखमालेचे साधनाने पुस्तकात रूपांतर करावे असे मला वाटते. सेवा दलातर्फे होणारी शिबिरे, अंनिसची शिबिरे आदी ठिकाणी त्यावर चर्चा व्हावी. विविध शासनपद्धतींमध्ये तिच्या मर्यादा आणि दोष यांच्यासह लोकशाही हीच शासनपद्धती व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांना कमीतकमी मारक ठरणारी आहे.

जागतिकीकरणाबद्दल विरोध संघटित व्हावा

साधनातील कव्हर स्टोरी व इतरही सदरे नित्य वाचनीय, चिंतनीय व मननीय असतात. 1948 पासून मी वार्षिक वर्गणीदार आहे. साधना परिवारातील म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो. श्री. मुकुंदराव किर्लोस्कर हे ज्येष्ठ विचारवंत, त्यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात अतिशय सुंदर, मुद्देसूद व परखड विवेचनात्मक लेख लिहिला आहे.

जागतिकीकरणाबद्दल बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध तर प्रचंड विरोध संघटित व्हावयाला हवा आहे. फळे, दूध, शीतपेये, चैनीच्या वस्तू, अमेरिकन व चिनी बनावटीचा स्वस्त माल या देशातील उद्योगांचे उद्योजकांचे-शेतकऱ्यांचे-सर्वांचेच कंबरडे मोडणार आहे. त्याला त्वरित प्रतिबंध झाला पाहिजे.
नंदिनी आत्मसिद्ध यांचेही लेख छान असतात.

डॉ. प. शं. झेंडे, श्रीरामपूर.

 

भारतीय संविधान - लेखमालिका विचारप्रवर्तक

27 जानेवारीच्या साधनातील डॉ. सत्यरंजन साठे यांचा ‘भारतीय संविधान : 50 वर्षांची वाटचाल’ या लेखमालेतील ‘भारतीय राज्यघटनेचा आशय’ हा लेखमालेचा समारोप करणारा लेख वाचला. लोकशाही रुजण्यासाठी व टिकण्यासाठी संस्थात्मक लोकशाहीची कायद्याचे राज्य, लोकसहभाग आणि शासनाचे उत्तरदायित्व ही महत्त्वाची अंगे आहेत. या गोष्टींकडे प्रथमपासूनच आपल्या देशात कळत-नकळत, अज्ञानाने वा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. डॉ. साठेंनी या आणि अन्य बाबींचा आपल्या लेखात सुबोध भाषेत ऊहापोह केला असून भारतीय लोकशाहीच्या ‘कृशपणा’ची कारणे उघड केली आहेत. डॉ. साठेंच्या लेखमालेचे साधनाने पुस्तकात रूपांतर करावे असे मला वाटते. सेवा दलातर्फे होणारी शिबिरे, अंनिसची शिबिरे आदी ठिकाणी त्यावर चर्चा व्हावी. विविध शासनपद्धतींमध्ये तिच्या मर्यादा आणि दोष यांच्यासह लोकशाही हीच शासनपद्धती व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांना कमीतकमी मारक ठरणारी आहे.

-प्रा. सुरेश शिरोडकर, कोल्हापूर.

 

पुस्तक काढावे

'साधना'तील डॉ. सत्यरंजन साठे यांची लेखमालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावी.

- श्रीनिवास कुलकर्णी.
 

Tags: वाचक प्रतिक्रिया - response from readers. weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके