डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वत:च्या यंत्रांना तेलपणी करणं चांगलं असं ऐकत आलो आहे, पण कंबरेबद्दलच म्हणायचं, तर मुक्तकंठाने असं म्हणता येईना, की स्वत;च्या कंबरेला मोहरीच्या गरम तेलाने मालिश करण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या कंबरेला मालिश करणं मी perfer करतो. याविषय माझ्या sentimentस पूर्णपणे नि:स्वार्थी आहेत, एवढचं काय, almo christian पण असो. कंबरेबद्दल बोलणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यामुळे तिच्याबद्दल बोलणार नाही. 

माझ्या कंबरेबद्दलची संपूर्ण खबर तुला सुरेनच्या पत्रात मिळेल. कंबर ही केवळ धोतराचा काचा खोचण्याची जागा आहे, असं मी आता इतून पुढे कधी म्हणणार नाही. माणसांचा माणुसपणा कंबरेच्या आधारमुळेच आहे. आजचं हे पत्र जर dull असेल, म्हणजेच त्यात काही momvement नसेल- विषयातून विषयांतर, भावणातून भावन्तर , खबरेतून खबरान्तर हे जर माझ्या लेखनातून नीट झालेलं नसेल- तर समज की तो माझ्या या दुखऱ्या कंबरेचा दोष आहे - टीसाठी इतर कोणालाच दोष देता येणार नाही. त्यात पुन्हा मधूनमधून मला उचक्या येताहेत . वाटतं, जणू शरीराचा वरचा भाग कंबरेपासून तुटून पडणार. पण हा विषय आता पुरे. कंबरेबद्दल आता आणखी लिहिणार नाही. माझ्या दुखऱ्या कामरेबद्दल नखी लिहिणार नाही. शपथेवर सांगतो, कंबरेबद्दल आणखी लिहिणार नाही. माझ्या कंबरेबद्दल मी ज्याला म्हणुन संगतो, तो हसतो. कुणालाही करुणा वाटत नाही. जून कंबर मोडणं हे हृदय भंगण्यापेक्षा कमीच असतं. पण आता कुणालाही काही सांगण्याची माझी इच्छा नाही. कुणाची ही दया नको मला. 
वरकमी कितीही का अहंकार व्यक्त केला असेना, खरी गोष्ट आहे की माझी कंबर ही माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाची तरी कंबर असती, तर बरं झालं असतं असं मला खुप वाटतंय. स्वत:च्या यंत्रांना तेलपणी करणं चांगलं असं ऐकत आलो आहे, पण कंबरेबद्दलच म्हणायचं, तर मुक्तकंठाने असं म्हणता येईना, की स्वत;च्या कंबरेला मोहरीच्या गरम तेलाने मालिश करण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या कंबरेला मालिश करणं मी perfer करतो. याविषय माझ्या sentimentस पूर्णपणे नि:स्वार्थी आहेत, एवढचं काय, almo christian पण असो. कंबरेबद्दल बोलणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यामुळे तिच्याबद्दल बोलणार नाही. कारण, कंबरेक्यातिरिक्तही माणसाला इतर अवयव असतात, त्याला मन असतं, त्याला आत्मा असतो- पण काहीही म्हण, त्याला कंबरही असते आणि चांगलीच असते. 
हृदयभंग झाल, (निराशा आली) , की लोक मन:शांतीसाठी, सांत्व नेसाठी पहाडांवर फिरायला जातात, कंबरमोडली, की समतल क्षेत्रच सर्वांत चांगलं, अशावेळी पार्क स्ट्रीटवरचे ते तक्के आतावतात आणि त्याच्याबरोबर आणखीही काही पूर्वस्मृती मनात येतात - पण असो. कंबरेचा विषय पुन्हा काढणार नाही- पूर्वी कधी कंबर दुखली होती हे पूर्णपणे विसरून जाईन, पण आता कंबर दुखतेय हे कसं बरं विसरणार? 
नानिद म्हणतात, एक उपाय आहे. Rhus Tox 6th Dilution हे औषध दोन-दोन तासांच्या अंतराने घ्या. मलाही तसंच वाटतंय. जवळ सरल उभी आहे. माझं पत्र पाहून ती contradict करील. तिच्यामते मोहरीच्या तेलाच्या मलमाशिवाय इतर कुठलं ही चांगलं औषध नाही, पण ती बिचारी फार निराश होईल. माझ्या कंबरेला काय होतंय हे पाहण्याची तिला काही सोय नाही. पण म्हणूनती सोडून देणाऱ्यांतली नाही. 
तुझ्याकडून मला जी थोडी सहानभूती मिळेल, ती तिला सहन होणार नाही., पण आता तुला मान्य कारावंच लागेल की माझ्या कंबरेच्या संदर्भातमीच सर्वात अधिक विश्वासार्ह आहे, एवढंच काय, सरलासुद्धा याविषय माझ्यापेक्षा better authority नाही. पण माझ्या कंबरेबद्दल तू मुळीच विचार करू नकोस - माझ्या कंबरेच्या सगळ्या वेनामीच गुपचुप सहन करीन. पण 'गुपचुप' हा शब्द बरोबर होणार नाही. उठता-बसता मी वारंवार असं काही कण्हतोय की त्याला 'गुपचुप' हा शब्द योग्य होणार नाही. आधी मला वाटलं होतं की सुरेनच्या पत्रातच माझ्या कंबरेबद्दलचं सगळं वर्तमान तुला समजेल, तुला माझ्या कंबरेबद्दल काहीही सांगणार नाही, तिचा विषयही काढणार नाही, जुन्या तेल मालिशच्या आठवणी पुन्हा जगावणार नाही, पण काशातून काय झालं!
पण आता कंबेबद्दल आणखी बोलणार नाही. त्याचं मुख्यकारण म्हणजे आता पत्रात जागा शिल्लक नाही. जागा असती तर मी या क्षणापासून जगाच्या अंतापर्यंत अखंड लिहीत राहू शकलो असतो. भोंगा वाजला असता, सगळे उठले असते आणि मी कंबरेवर हात ठेवून कण्हलो असतो. पण हा काही थट्टेचा विषय नाही. तू थोडी रागाऊसुद्धा शकतेस. काहीही असो, कंबरेबद्दलचं गार्हाण आणि माझं पत्र इथेच संपलं 

Tags: रवींद्रनाथ ठाकूर दार्जिलिंग रवींद्रनाथ टागोर विलास गीते इंदिरादेवीला लिहिलेली पत्रे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके