डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पत्र पाठवून देऊन खोली आवरली, तेवढ्यात साहेब आले. लगबगीने केस-दाढी विंचरून, अगदी सभ्य माणूस होऊन, जणू दुसरं काहीच काम नव्हतं, जणू दिवसभर आरामच करीत बसलो होतो, अशा आविर्भावात दिवाणखान्यात येऊन बसलो. साहेबाबरोबर थोडंसं हसून, हस्तांदोलन करून, अत्यंत निश्चिंतपणे गप्पा करू लागलो. साहेबांच्या शयनगृहाचं काय झालं हीच चिंता अधूनमधून मनात येऊ लागली. जाऊन पाहिलं , तर जरा ठिक दिलसं. रात्री साहेब तिथे झोपूही शकेल-अर्थात जर त्या बेघर झुरळांनी त्यांच्या पायांना गुदगुल्या केल्या नाहीत, तर... 

दुपारी पगडी घालून, कार्डवर नाव लिहून, पालखीत बसून जमीनदारबाबू (रवींद्रनाथ) निघाले. साहेब तंबूच्या व्हरांड्यात बसून अर्जदारांच्या आर्जवर न्यायानिवाडा करतो आहे. त्याच्यामागे डावीकडे पोलिस शिपाई उभा आहे. अर्जदार मैदानात झाडांच्या तलाशी पडून आपली पाळी येण्याकची वाट पाहातहेत . एकदम साहेबांच्या नाकासमोर पालखी उतल्यावर साहेबाने स्वागत करून खुर्चीत बसवलं. साहेब दिसायला पोरगेलासा, नुकतीच मिसरूड फुटू लागलेली . केस अगदी बारीक कापलेले. मधूनमधून पांढरे कसे. ते पाहायला अगदी अद्भुत वाटलं. अचानक वाटे, गृहस्त म्हातारा झाला असावा, पण चेहरा अगदी तरुण. साहेबाने माझं बरचं स्वागत-अतिथ्यकेलं.

मी त्याला म्हणालो, 'उद्या रात्री आमच्याकडे जेवायला या.' तो म्हणाला, 'मी आजच एका ठिकाणी pig-sticking ची तयारी करायला जाणार आहे. (मला मनातल्या मनात फार आनंद झाला.) त्याला म्हणालो, 'फार दु:खायची गोष्ट. 'साहेब म्हणाले, 'सोमवारी परत येईन. '( हे एकूण मनाला फार निराशा वाटली. ) म्हणाली, ' मग सोमवारीच या जेवायला. 'तो लगेच राजी झाला. असो. सोमवार अजून दूर आहे असा विचार करून, नि;श्वास टाकून घरी परत आली. प्रचंड ढग दाटून आले. खुप वादळ झालं, मुसळधार पाऊस सुरू झाला. पुस्तकाला हात लावावासा वाटेना. काही लिहिणंही अशक्य. मन खुप चंचल झालं. ज्याला कवित्वाच्या भाषेत म्हणतात काहीतरी नाहीय, कुणीतरी नाहीय, ते कुणीतरी असतं तर चांगलं झालं असतं, पण ते कुणीतरी आसपास कुठेही दिसत नाही इत्यादी.. या खोलीतून त्या खोलीत येरझारा घालू लागली. अंधार झालाय, ढग गडगडाट करताहेत, वीजांवर विजा चमकताहेत, हू-हू करीत वाऱ्याच्या झपाटे देताहेत आणि आमच्या व्हरांड्यासमोरच्या मोठ्या झाडाला जोराजोराने हलवताहेत. बघता बघता पावसाच्या पाण्याने आमचं कोरडं खळं पूर्ण भरलं. असचं आणखी लिहिण्याची इच्छा आहे, पण आता लिहिन्यांसारख काही नाही. 

 असो, अशा प्रकारे फेऱ्या घालता घालता अचानक मला वाटलं की अशा पावसाळी वातावरणात त्या मॅजिस्ट्रेटला माझ्याघरात आश्रय घेण्यासाठी विनंती करणं हे माझं कर्तव्य पत्र लिहून टाकलं, 'साहेब, या पावसात pig sticking साठी बाहेर पसणं तुम्हाला जमणार नाही. तुम्ही साहेबाचे बच्चे असलात, तरी तंबूत राहणसुद्धा स्थळचर प्रकारच्या प्राण्यासाठी त्रासदायक आहे. तेव्हा कोरडं वातावरण आवडत असेल, तर माझ्या आश्रयालाया.'

 पत्र पाठवून देऊन खोली आवरली, तेवढ्यात साहेब आले. लगबगीने केस-दाढी विंचरून, अगदी सभ्य माणूस होऊन, जणू दुसरं काहीच काम नव्हतं, जणू दिवसभर आरामच करीत बसलो होतो, अशा आविर्भावात दिवाणखान्यात येऊन बसलो. साहेबाबरोबर थोडंसं हसून, हस्तांदोलन करून, अत्यंत निश्चिंतपणे गप्पा करू लागलो. साहेबांच्या शयनगृहाचं काय झालं हीच चिंता अधूनमधून मनात येऊ लागली. जाऊन पाहिलं , तर जरा ठिक दिलसं. रात्री साहेब तिथे झोपूही शकेल-अर्थात जर त्या बेघर झुरळांनी त्यांच्या पायांना गुदगुल्या केल्या नाहीत, तर... 

 साहेब म्हणाला, 'उद्या सकाळीच शिकरीला निघेन.' मी काही याला हरकत घेतली नाही. संध्याकाळच्या सुमारास साहेबांच्या नोकराने येऊन खबर दिली. की वादळात त्यांचा तंबू फाटून त्यांचे अगदी तुकडे-तुकडे होऊन गेले. आहेत. त्याच्या कचेरीचा तांबयसुद्धा पूर्ण भिजून  गेला आहे. त्यामुळे शिकार रद्द करून जमीनदारबाबूंकडेच (म्हणजे माझ्याकडे मुक्काम करायला हवा. 

कलकत्ता

२६ जानेवारी १८९० 

अनुवाद : विलास गिते

Tags: vilas gite रवींद्रनाथ ठाकूर विलास गीते इंदिरादेवीला लिहिलेली पत्रे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके