डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • केरळ लोक विज्ञान चळवळ अभ्यास यात्रा
  • पुण्यातून दोन नवी दैनिके

केरळ लोक विज्ञान चळवळ अभ्यास यात्रा

फेब्रुवारी 1980 मधे

केरळ एक निसर्गरम्य, छोटे पण प्रगत राज्य.केरळच्या समृद्ध सांकृतिक वारशाचा परिचय करून घेण्याची ही संधी. सुशिक्षितांचे राज्य.91 टक्के साक्षरता अतिशय संघटित व सर्वत्र पसरलेली ग्रंथालय चळवळ. केरळचे लोक सर्व दृष्टीने जागृत सर्व प्रश्नात लक्ष घालणारे. आपल्या समस्यांवर आपणच विचार करणारे लोक. सरकारवर दबाव आणण्याचे काम आणि सहयोग देण्याचे काम लोकशक्तीनेच केले.

पण हे सारे कोणी संघटित केले?

कसे संघटित केले?

गेल्या 10-15 वर्षांतच हे घडले.

ते केले केरळच्या शास्त्र साहित्य परिषदेने. गावोगावी ग्राम शास्त्र समित्या उभ्या केल्या. विज्ञान दृष्टी खेड्यापाड्यापर्यंत नेली. लोकप्रबोधन व जनता जागृतीमुळे. परिषदेने मोठी शक्ती उभी केली. त्यातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन उभे केले.

विज्ञानदृष्टी म्हणजे एकाद्या प्रश्नाकडे शास्त्रीय चिकित्सक दूरगामी दृष्टीने पाहण्यास व विचार करण्यास शिकणे व आपले प्रश्न सोडवण्यास आपण सिद्ध होणे.

हे केरळात होते तर इतर राज्यात काय अशक्य. हे जाणून घेण्यासाठी केरळात फेब्रुवारीत एक अभ्याससहल आंतर भारतीच्या वतीने आयोजित करीत आहोत. ही अभ्यास सहल 15 दिवसांची असेल. खर्च त्रिपुरा पासून 400 रुपये. सर्वांनी 7 फेब्रुवारी 80 रात्री त्रिपुराला पोचावयाचे आहे. तिथून पुढे बसने प्रवास.

त्रिचुरपर्यंत शिक्षकांना कन्सेशन तिकीटाने येता येईल. इतर आवश्यक ती माहिती आणि कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल.


----

पुण्यातून दोन नवी दैनिके

‘श्रमिक विचार' हे दैनिक महात्मा फुले स्मृतिदिनापासून पुण्यातून प्रकाशित होऊ लागले आहे. श्रमिकांनी स्वतःच्या बळावर सुरू केलेले हे पुण्यातले पहिले दैनिक श्रमिकांचा कैवार हे ह्या दैनिकाचे वैशिष्ट्य राहाणार आहे. लाल निशाण गटाच्या जवळपास पन्नास संघटनांनी पहिल्या अंकाला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तेव्हा ‘श्रमिकविचार'चा आर्थिक व संघटनात्मक पाया मजबूत असेल असे मानायला हरकत नाही.

संपादक म्हणून भास्कर जाधव यांची नेमणूक झाली असून इतर तरुण व उत्साही पत्रकारांची त्यांना साथ आहे. कामगारवर्गाचे मनोगत इतरांना कळण्याची सोय 'श्रमिकविचार' मुळे होईल, पण सर्वसामान्यांना ते वाचावेसे वाटावे, असे त्याचे स्वरूप ठेवावेलागेल. आजवर व्यापारी उद्योगपतींनी चालवलेली दैनिके यशस्वी झाली, परंतु इतरांना त्यात फारसे यश मिळाले नाही. 'श्रमिक विचार' त्याला अपवाद ठरावे, अशी सदिच्छा!

'राष्ट्र तेज' नावाचे मराठी दैनिक पुण्यातून महिन्यापूर्वी सुरू झाले. इंदिरा काँग्रेसच्या कलाचे हे दैनिक राहील असे दिसते ह्या दैनिकाचा पायाव्यापारी पद्धतीचा असावा असे त्याच्या स्वरूपावरून जाणवते. पुण्यातून सकाळी-सायंकाळची मिळून सात मराठी दैनिकेआणि शिवाय एक इंग्रजी व एक हिंदी अशी 9 दैनिके प्रकाशित होत आहेत. अर्थात मुंबईच्या दैनिकांशी स्पर्धा करण्याचे त्राण अद्याप त्यांच्यात निर्माण झालेले नाही. परंतु पुण्यातीलएकही दैनिक उद्योगपतीच्या आश्रयाखाली चालणारे नाही, ही विशेष गोष्ट म्हटली पाहिजे.

----

विशेष वार्ता

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव साजरा होत आहे. स्पर्धात्मक आणि समीक्षात्मक अशादोन विभागांत बालचित्रपटांची विभागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत वीस देशांतून अनुबोधपटआणि लघुपट आले आहेत.

स्पर्धात्मक चित्रपटांमधे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या चित्रपटांसाठी सुवर्णगज आणि पाच रौप्यगज पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या विभागासाठीआतापर्यंत 80 बालचित्रपट प्रवेशिका आल्या आहेत. संपूर्ण भारतातून निवडक मुले महाराष्ट्र सरकारचे पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. या महोत्सवाच्या परीक्षक मंडळाचे नेतृत्वश्री सत्यजित रे करणार आहेत. याशिवाय युगोस्लाव्हिया ब्रिटन, सोव्हि. संघराज्य आणि फिलीपाइन्सया देशांमधील मान्यवर चित्रपट तज्ञ परीक्षक मंडळात असतील. अमेरिका, जपान इ. 12 देशांचे प्रतिनिधी महोत्सवाला येतील अशी अपेक्षा आहे.

भारत सरकारने बालकल्याण निधीसाठी एक रुपया किंमतीचीकुपने काढली आहेत. निरनिराळ्या सामाजिक संस्थांना बालकांच्या प्रश्नाविषयी आस्था बाळगणाऱ्याव्यक्तीकडून हा निधी जमा करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. वरळीच्या प्रगती कलामंडळाने24 नोव्हें. पासून हा निधी गोळा करण्याची मोहीम सुरु केली आहे.

आंतर भारती व बालबोधपीठ यांच्या तर्फे, येत्या14 ते 18 डिसेंबरला होणाऱ्या बाल आनंद महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची नावनोंदणीमंगळवार दि. 27 पासून सुरू होत आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी, स्वयंसेवक म्हणूनकाम करू इच्छिणारांसाठी

संपर्काचा पत्ता :                                                                                                                                                बाल आनंद महोत्सव समिती,                                                                                                                            नू. म. वि. मुलींच्याशाळेचे शारदा सभागृह,                                                                                                          एस. पी. कॉलेजच्या आवारात, पुणे 
30. फोन. 448494.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके