डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वतःला पुरोगामी म्हणविणारे शासन हे धार्मिक कार्यक्रम करायला सांगते! पुन्हा दलितांनी कर्मकांडातच गुंतावे काय? विशिष्ट संघटनांनी त्यांचे समर्थन केल्यास समजू शकते; पण शासनाने अशा रूढींना वाव का द्यावा? समाजपरिवर्तनासाठी प्रबोधनापेक्षा कर्मकांडाचाच आधार शासनाला घ्यावासा वाटतो! 

वसुधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या 'करुणेचा कलाम' या बाबा आमटे यांच्याकवितासंग्रहाच्या विक्रीचा शुभारंभ केन्द्रीय रसायन व खतमंत्री श्री. वसंत साठे यांच्या हस्ते झाला.

या पुस्तकाचे सर्व उत्पन्न बाबा आमटे यांच्या 'आनंदवन'ला देण्यात येईल.

----

आमच्या विक्री केंद्रात

स्व. साने गुरुजी, नरहर कुरुंदकर, कवी वसंत बापट, सर्वश्री बाबा आमटे, नानासाहेब गोरे, रावसाहेब कसबे, बगाराम तुळपुळे, नलिनी पंडित इ. अनेक नामवंत साहित्यिक, राजकारणी, समाजधुरीण, कामगार कार्यकर्ते यांची उत्तमोत्तम पुस्तके मिळतात.

आमच्या प्रकाशनाखेरीज इतर नामवंत प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकेही येथेच खरेदी करा.

रविवारखेरीज रोज 9 ते 6 समक्ष येऊन आपल्या व आपल्या मुलांच्या पसंतीची पुस्तके निवडा.

साधना प्रकाशन
430-31 शनिवार पेठ, पुणे : 411030 (फोन : 470686)

----

निधार्मिकता - धार्मिक मार्गाने?

14 एप्रिल ते 1 मे, महाराष्ट्र शासनाने अस्पृश्यता निर्मूलन पंधरवडा साजरा केला. प्रसिद्धी खात्याने 'भेदाभेद भ्रम अमंगळ' ही पुस्तिकाही यावेळी प्रसिद्ध केली. तीमध्ये जातीयता नष्ट करण्यास पुढील उपाय सांगितले आहेत : (1) 'हम सब एक है', जातिभेदांचा धिक्कार असो' अशा घोषणा देणाऱ्या मिरवणुकी गावागावातून काढाव्या. (2) उपहारगृहे, केशकर्तनालये, मंदिरे, सर्वांना खुली करावी. (3) गावोगावी जातिनिर्मूलन मंडळे स्थापावी, तरुणतरुणींनी आंतरजातीय विवाहाची शपथ घ्यावी. (4) सर्व जाती-जमातीच्या लोकांच्या सहभागाने क्रीडा स्पर्धा, भजन-कीर्तने व्हावी. (5) मागासवर्गीयांच्या हातून सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू करावे.

स्वतःला पुरोगामी म्हणविणारे शासन हे धार्मिक कार्यक्रम करायला सांगते! पुन्हा दलितांनी कर्मकांडातच गुंतावे काय? विशिष्ट संघटनांनी त्यांचे समर्थन केल्यास समजू शकते; पण शासनाने अशा रूढींना वाव का द्यावा? समाजपरिवर्तनासाठी प्रबोधनापेक्षा कर्मकांडाचाच आधार शासनाला घ्यावासा वाटतो! 

पंतप्रधानांपासून सर्वच जण धार्मिक वर्चस्व मानतात. तेथे नतमस्तक होतात. त्याचेच अनुकरण सामान्य लोक करतात. माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही, कर्मकांडाला आहे. 

-नवकिशोर शुक्ल

----

स्वागत

• मीतु : म. फ. शहाजिदे, आंतर भारती प्रकाशन, पुणे
• कादंबरीकार गो. नी. दंडिकर : संपादन-प्रा. वीणा देव, मॅजेस्टिक, मुंबई
• नादझोत : कल्याण इनामदार, हर्षद प्रकाशन, पुणे
• भटके पक्षी : मंगेश पाडगावकर, मौज प्रकाशन, मुंबई
• इस्लामचे भारतीय चित्र : हमीद दलवाई, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
• नागडा : वि. ज. बोरकर, मौज प्रकाशन, मुंबई
• प्रेरणा चिपकोची, भटकंती गढवालची : जगदीश गोडबोले, वार्ता प्रकाशन, पुणे
• ग्रंथमाला : संपादित, ग्रंथाली, मुंबई
• गलोल : प्रमोद लांडगे, प्रज्ञा प्रकाशन, सोलापूर
• साहित्याचे तत्त्वज्ञान : वि. ना. ढवळे, कॉन्टिनेन्टल, पुणे

----

डॉ. सुनील लवटे यांचा सन्मान

श्री. भाऊसाहेब खांडेकर यांच्या निवडक मराठी कथांचा उत्तम हिंदी अनुवाद केल्याबद्दल भारत सरकारच्या शिक्षण खात्याने अहिंदी भाषकाच्या हिंदी साहित्याची समृद्धी वाढवण्याच्या कामगिरीबद्दलचे पारितोषिक त्यांना घोषित केले आहे.

ह्या कथांची निवड स्वतः भाऊसाहेब खांडेकरांनीच केलेली होती.

डॉ. सुनील लवटे यांनी विपरित परिस्थितीचा मुकाबला करीत करीत आपले शिक्षण पूर्ण केले. हिंदीतील एक प्रख्यात क्रांतिकारक लेखक यशपाल यांच्यावर संशोधनात्मक प्रबंध लिहून, त्यांनी शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. कोल्हापूरच्या एका महाविद्यालयातील ते एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आहेत. सेवा दलाच्या परिवारातले ते आहेत. निराधार मुलांसाठी ते अनेकविध धडपड सतत करतात. त्यांचे अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी त्यांना शुभेच्छा!

----

हुंडाविरोधी चळवळ : भित्तिपत्रक स्पर्धा

हुंड्याचे दुष्परिणाम, त्याचे भीषण रूप, हुंडाबळी, हुंडाबंदी, स्त्री-मुक्ती या विषयांवर हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या संस्थेने कॅम्लिन प्रायव्हेट लि.च्या सौजन्याने अखिल भारतीय स्तरावरील भित्तिपत्रक स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा सर्वांस खुली असून स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे:

(1) भित्तिपत्रक 24''x18'' आकारातील ड्रॉइंग पेपरवर अथवा कॅनव्हास माऊंट बोर्डवर विविधरंगी असावे. चित्रावरील मजकूर (मराठी, हिंदी अथवा इग्रजीमधील) दहा शब्दांहून अधिक नसावा. स्पर्धकास एकापेक्षा अधिक भित्तिपत्रके पाठविता येतील. मुंबईबाहेरील स्पर्धकास भित्तिपत्रक न दुमडता गुंडाळी करून रजिस्टर्ड पोस्टाने पाठविता येईल. मुंबईतील स्पर्धकांनी मात्र आपले भित्तिपत्रक जाड कार्डबोर्डवर चिकटवून समक्ष द्यावे.

(2) स्पर्धकाने आपले नाव व पूर्ण पत्ता भित्तिपत्रकाच्या मागील बाजूस स्पष्ट लिहावा.

(3) कॅम्लिन प्रायव्हेट लि., मुंबई या कॅमल चित्रकला साहित्य बनविणाऱ्या कंपनीकडून मिळणाऱ्या देणगीतून पहिल्या पाच विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून पहिले पारितोषिक रु. 1000/- असेल व उत्तेजनार्थ दहा बक्षिसे दिली जातील. परीक्षकांचा निकाल अंतिम असेल. स्पर्धकाची कलाकृती परत केली जाणार नाही.

(4) सर्व स्पर्धकांच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवून विजयी स्पर्धकांना समारंभपूर्वक बक्षिसे देण्यात येतील. या भित्तिपत्रकांची प्रदर्शने देशात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येतील.

(5) स्पर्धकांनी भित्तिपत्रके ता. 15 ऑक्टोबर 1984 पर्यंत श्री. दा. व. कुलकर्णी, संचालक हुंडाविरोधी चळवळ, 4/50 विष्णुप्रसाद सोसायटी, लक्ष्मी थिएटरसमोर, विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400 057 येथे पाठवावीत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके