डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

.

पंडित भास्करबुवा बखले

1997 हे वर्ष तसे दुहेरी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राला अभिजात उत्तर भारतीय राग-संगीताचे माहेरघर करून टाकणाऱ्या पंडित भास्करबुवा बखले यांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी यंदा आहे. पंडित भास्करवुवांचे शिष्योत्तम मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जन्मशताब्दीचा सोहळाही यंदा कृतज्ञतेने साजरा केला जात आहे. अभिजात संगीताचा ललित आविष्कार ज्यांच्या गावकीमधून सतत घडत राहिला : ज्यांनी नाट्य, चित्रपट, उपशास्त्रीय संगीत इत्यादी सर्व क्षेत्रात आपल्या प्रतिभेने आणि सहज अभिव्यक्तीने अविस्मरणीय ठसा उमटवला.  त्या मास्तर कृष्णरावांनी महाराष्ट्राला केवढी मोठी देणगी दिली आहे आणि गेल्या तीन पित्यांचे सांस्कृतिक जीवन किती रसदार आणि श्रीमंत केले आहे याची जाणीव झाली की रसिकांचे मस्तक आदराने लवल्याशिवाय राहत नाही. साधना साप्ताहिकाचा हा विशेषांक थोर गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले आणि त्यांचे शिष्योत्तम मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या पुण्यस्मृतीला आम्ही नम्रतापूर्वक अर्पण करीत आहोत.

श्रीयुत राजमान्य राजेश्री मास्टर कृष्णराव यांस नारायणरावाचा सप्रेम नमस्कार विनंती अशी की श्रीयुत राजमान्य मुकुंदराव हे पुन्हा आपल्याकडे येताहेत. बद्योड्याला माझ्या सत्कार समारंभाला त्यांनी आपल्याला मोठ्या भक्तिपूर्वक अंत:कारणाने आमंत्रण दिले व आपण ते मान्य ही केले. आपण हजार राहणार म्हणून बडोद्याला माहित केले आहे. परंतु अचानक आपण हजर राहणार नाही असा टेलिग्राम त्यांना आल्यामुळे त्यांची फारच कमालीची फजिती होते आहे. काही काही वेळेला आपला आणि माझा योगा योग येतो. तो आपण आणि मी एकाच गुरुचे शिष्य आहोत.

----------

कै. तीर्थरूप गुरुवर्य भास्करबुवा हे गाण्याच्या केलेतील आपले दोघांचे गुरु आहेत. आणि त्यांची गणना सत्पुरुषामध्ये मी करितो. तीर्थरूप कै. बळवंत राव टिळक आणि कै. तीर्थरूप दादासाहेब खापर्डे यांचा योग मी पहिला आहे. कोणाचेही व्याख्यान होण्याच्या वेळेला एकमेक एकमेकांच्या वेळेला अध्यक्षस्थान स्वीकारीत असत. मी काही त्या योग्यतेचा मुळीच नाही. परंतु ध्येयाकरिता मोठ्यांचीच उदाहरणे कोणीही घेतात. मी खरोखरीच आपल्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवीत नाही. 

आपला अधिकार खरोखरीच तो आहे. आपण कसेही या समारंभाला येऊन बडोदा वासियांना उपकृत करावे आणि माझी आपल्याला भक्तिपूर्वक अंत: करणाची विनंती आणि मागणे आहे. आपण पराभू कृपेने माझे मागणे पूर्ण कराल अशी खात्री आहे. श्री. मुकुंदराव कोरात्रे यांच्या बरोबर श्रीयुत सीताकांत लाड हे हि येणार आहेत. आपण आल्याने जे काही यश येईल ते मी वर्णन करू शकत नाही. मी आपल्या पुजाऱ्या सम आहे. परंतु गुरु जवळ असला की मला जो धीर येत असतो मी तो वर्णन करू शकत नाही. खरोखरीच माझी अशी स्थिती आहे. आता आपणच माझे गुरुजी आहात. आणि हे आपल्याला पटलेच पाहिजे. आपण आमच्या नाटकाला चाली दिलेल्या आहेत, आपले अभंग सुद्धा मी म्हणतो. तेंव्हा आपण आमचे गुरु आहात आणि आता माझ्या गुरुजीच्या जागी आपणच आहात.   

नारायण 

(मराठी रंगभूमीवरील स्वर्गीय राजहंस : बालगंधर्व नारायणराव राजहंस यांनी मास्तरांना लिहिलेले एक बोलके पत्र. बालगंधर्वाच्या मनात मास्तर कृष्णरावांविषयी असलेल्या भक्तीचा आणि आदराचा किती मनोरम प्रत्यय वरील पत्रात येतो.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके