डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • येणार कोण बोला?
  • नाथ पेंचे कृतिरूप स्मारक

येणार कोण बोला?

सेनापती बापटांनी स्वातंत्र्यसंग्रामाचे वेळी हा प्रश्न विचारला होता. आजच्या बदललेल्या संदर्भात तो प्रश्न अद्याप कायमच आहे.

मुंबईपासून चाळीस मैलांवर कुलाबा जिल्ह्यात तारा येथे यूसुफ मेहरअली केंद्रातर्फे आरोग्य सेवेसाठी एक एम्. बी. बी. एस्. व एक बी. ए. एम्. एस्. असे दोन डॉक्टर्स हवे आहेत. आरोग्याच्या जोडीने ग्रामीण विकासाच्या कार्यात त्यांनी भाग घ्यावा अशीही अपेक्षा राहील.

संपर्क: सेक्रेटरी, यूसुफ मेहेरअली सेंटर, नॅशनल हाउस, 6 टूलो रोड, अपोलो बंदर, मुंबई 400039.

नागालँडमध्ये चु-चु-इमलांग ( पिन 798614 ) या मोकोकचुंग जिल्ह्यातील गावात श्री नटवर ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली गांधी आश्रमातर्फे अनेक विधायक कार्य चालतात. त्यांना शेतीकामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेला, शेती शास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला सिव्हिल व मेकॅनिकल इंजीनियर, हिशोबनीस, टंकलेखक, टॅन्झिस्टर व रेडिओ शॉप चालवू शकेल असा एक तरुण हवा आहे.

नटवरभाई लिहितात, " तारुण्याला आव्हान देणारे आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी आणणारे अनेक कार्यक्रम आम्ही हाती घेत आहोत. कोण येतात ते पाहू या."

----

नाथ पेंचे कृतिरूप स्मारक

नाथ पैचे कोकण-गोमंतकावर आणि या प्रदेशातील जनतेचे त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. नाथ पैंची स्मृती जागती ठेवण्यासाठी काही तरी भरीव करावे अशी त्यांच्या सर्वच चाहत्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी अनेक पातळीवर विचारविनिमय चालला होता. त्याला आता निश्चित असे रूप वाले आहे. नाथ पै ग्रामीण विकास प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा निश्चय त्यांच्या सर्व चाहत्यांनी केला आहे. नाथ पैच्या जन्मदिनापर्यंत प्रतिष्ठानच्या नोंदणीची सर्व तयारी पूर्ण झालेली असेल.

प्रतिष्ठानतर्फे पंचविध कामे हाती घेण्यात येतील. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रांत संस्था कार्य करील.
संस्था प्रथम रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरू करील. त्यानंतर ठाणे, कुलाबा हे जिल्हे आणि गोमंतक यांत कार्य विस्तार करण्यात येईल.

याउप्पर संस्थेची शक्ती असेल तर महाराष्ट्रात इतरही कार्य हाती घेण्यात येईल.

श्री मधू पानवलकर यांची प्रतिष्ठानच्या कार्यवाहपदावर नियुक्ती झाली आहे. कोकणच्या प्रश्नांची त्यांची जाण चांगली आहे आणि श्री भाऊ तेंडुलकर यांचे सहकारी म्हणून त्यांनी कोकणात पुष्कळ वर्षे कार्य केले आहे. आर्थिक व राजकीय जाणकारी बद्दल ते प्रसिद्ध आहेत.

संपर्क : श्री मधू पानवलकर, डी-5, नवसमाज हाउसिंग सोसायटी, नेहरू रोड, विलेपार्ले. मुंबई 400 057.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके