डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अभियांत्रिकी पदवीधरांच्या परिषदांत कसली चर्चा होते?चीनमधील माणशी ऊर्जेचा खप भारताच्या तिप्पट आहे, अमेरिकेचा/दुबईचा खप भारताच्या पंचवीसपट आहे. म्हणजेच आपण किती मागासलेले आहोत असे सांगितले जाते. चीनचे कौतुक करण्याची तर सर्वत्र स्पर्धा आणि चढाओढ चालू असते. (चीनमध्ये भारतासारखी भोंगळ लोकशाही नाही, चीनसारखीच हुकूमशाही आपल्याकडे असावी अशी एक सुप्त मनीषा या चढाओढीमागे असते) चीन हिमालयाच्याही पलीकडे आहे. म्हणजेच तो आपल्यासारखा उष्ण कटिबंधात येत नाही. समशीतोष्ण कटिबंधात येतो. बिजींगमधील तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते. स्वाभाविकपणेच त्यांना जास्त ऊर्जा लागते. पण हे सांगितले जात नाही. चीनमधील हवा, पाणी आणि अन्न या सर्वच गोष्टी भारताच्या जवळजवळ दुप्पट प्रदूषित आहेत हे सत्य पण दडपले जाते. आपल्याकडील पर्यावरणवादी संस्थांमुळे; मेधा पाटकर, डॉ.अभय बंग अशा कार्यकर्त्यांमुळे व काही नेत्यांमुळे भारतात लोकशाही असल्यामुळे अजूनही हवा शुद्ध राहिली आहे.

जागतिक तापमानवाढ ही सध्या जगापुढील सर्वांत गंभीर समस्या आहे, हे आता जवळजवळ सर्वमान्य झालेले आहे. पण भारत, चीन आणि अमेरिका या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने पहात आहेत असे वाटत नाही.

ऊर्जेचा अनिर्बंध वापर हे या सर्व समस्येचे मूळ कारण आहे. पण ऊर्जेची काटकसर करा, ऊर्जा जपून वापरा हे सांगण्याचे धाडस कोणीच करताना दिसत नाही. महात्मा गांधींनी सर्वात आधी ही गोष्ट सर्वांना समजावून सांगितली असती, ‘पृथ्वी समस्त मानव जातीची गरज भागवू शकेल, पण हाव मात्र भागवू शकणार नाही’... असे गांधीजी म्हणाले होते ती वेळ आली आहे. कर्ब वायूंचे उत्सर्जन 1970 च्या पातळीवर आणले पाहिजे असे अल् गोर यांनी सांगितले आहे, त्यासाठी जीवनशैली बदलावी लागेल असे ते सांगत आहेत, पण आम्ही असे सांगत नाही.

अभियांत्रिकी पदवीधरांच्या परिषदांत कसली चर्चा होते? चीनमधील माणशी ऊर्जेचा खप भारताच्या तिप्पट आहे, अमेरिकेचा/दुबईचा खप भारताच्या पंचवीस पट आहे. म्हणजेच आपण किती मागासलेले आहोत असे सांगितले जाते. चीनचे कौतुक करण्याची तर सर्वत्र स्पर्धा आणि चढाओढ चालू असते. (चीनमध्ये भारतासारखी भोंगळ लोकशाही नाही, चीनसारखीच हुकूमशाही आपल्याकडे असावी अशी एक सुप्त मनीषा या चढाओढीमागे असते) चीन हिमालयाच्याही पलीकडे आहे. म्हणजेच तो आपल्यासारखा उष्ण कटिबंधात येत नाही. समशीतोष्ण कटिबंधात येतो. बिजींगमधील तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते. स्वाभाविकपणेच त्यांना जास्त ऊर्जा लागते. पण हे सांगितले जात नाही. चीनमधील हवा, पाणी आणि अन्न या सर्वच गोष्टी भारताच्या जवळजवळ दुप्पट प्रदूषित आहेत हे सत्य पण दडपले जाते. आपल्याकडील पर्यावरणवादी संस्थांमुळे; मेधा पाटकर, डॉ.अभय बंग अशा कार्यकर्त्यांमुळे व काही नेत्यांमुळे भारतात लोकशाही असल्यामुळे अजूनही हवा शुद्ध राहिली आहे.

भारतीयांनी पण अमेरिकन नागरिकांप्रमाणे ऊर्जेची उधळपट्टी केली तर जगाची अवस्था काय होईल? भारताची लोकसंख्या 110 कोटी आहे. अमेरिकेची 25 कोटी आहे. काय होईल कल्पना करा.पण याचे सोयरसुतक या अभियांत्रिकी पदवीधरांना कसे नसते तेच मला कळत नाही. मी स्वतः अभियांत्रिकी पदवीधर आहे म्हणून मला तर हे फार बोचते.

“आम्ही विकसनशील देश आहोत. आणि आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले तर आमची प्रगती खुंटेल. अमेरिकेत माणसे मोटारीमधून हिंडतात, मग भारतीयांनी मात्र का वापरू नये? थोडी वर्षे जाऊ द्यात, मग आम्ही जीवनशैली बदलायची की नाही ते ठरवू”असेभारत, चीन म्हणत आहे. पण भारत व चीन यांची मिळून लोकसंख्या जगाच्या 40% आहे. जागतिक तापमानवाढीविरोधी मोहिमेत हे दोन मुख्य देश आतापासूनच सामील झाले नाहीत तर?

पण सरकारी पातळीवर यासंबंधी कोणतेही प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसत नाही. मुंबई-दिल्ली-कलकत्ता-मद्रास या मार्गावर मालवाहतूक करण्यासाठी, संपूर्ण वेगळा रेल्वेमार्ग टाकून रेल्वेमार्गाने वाहतूक वाढविण्याचा रेल्वेमंत्र्यांचा विचार स्तुत्य आहे. पण याव्यतिरिक्त कोणतीही कौतुकास्पद कामगिरी अन्य ठिकाणी नाही.प्रफुल्ल पटेल विमान वाहतूक भरमसाठ कशी वाढेल यांचा प्रयत्न करीत आहेत. विमान वाहतुकीने सर्वाधिक प्रदूषण होत असते.सर्वसामान्यांसाठी एक लाखाची मोटार ही गोष्ट अभियांत्रिकी दृष्टिकोनातून कौतुकास्पद असेलही, पण माशेलकरांनी त्याचे कौतुक करावे याचे आश्चर्य वाटते. पर्यावरणाचे काय? जागतिक बाजारात क्रूड पेट्रोलियमचा भाव 100 डॉलर्स/बॅरल पोहोचत आहे. त्याचे काय?

पारंपरिक ऊर्जास्रोतांचा (आज दुर्दैवाने त्यांना अपारंपरिक स्रोत असे म्हटले जाते.) विकास कसा होईल, देशाची संपूर्ण ऊर्जेची गरज- पारंपरिक व शाश्वत ऊर्जेद्वारे कशी भागवता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. शाश्वत ऊर्जा आपण वापरली तर कर्बवायूंचे प्रमाण वाढण्याचा प्रश्नच येत नाही.

ऊसापासून इथेनॉल करून, मक्यापासून इथेनॉल करून काही लोक ऊर्जेची गरज भागवू पाहतात, पण अन्नपदार्थ जास्त आवश्यक आहेत की इंधन, याचा विचार करता हे उपाय तात्पुरतेच वाटतात.

तुमचे- तुमच्या मुलांबाळांवर खरेच प्रेम असेल तर जीवनशैली बदला, ऊर्जेची उधळपट्टी टाळा असे अल् गोर म्हणतात. दुर्दैवाने आजची तरुण पिढी मात्र याबाबत अजिबात जागरूक नाही.

टाइम्स ऑफ इंडियात जवळजवळ दररोज यासंबंधी थोडीशी माहिती येत असते. खुद्द अमेरिकेतदेखील आता सार्वजनिक वाहनांना उत्तेजन दिले जात आहे. आपण मात्र जास्तीत जास्त उड्डाणपूल बांधून खाजगी मोटारीच्या सुविधा वाढविण्यात गर्क आहोत.

बालीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती, त्याप्रमाणे भारतातील सर्व राज्यांची या प्रश्नासंबंधी वर्षातून एक किंवा दोन वेळा परिषद भरायला हवी व क्योटो प्रोटोकोलप्रमाणे एखादा ‘भारत प्रोटोकोल’बनवून त्याची सुसूत्रपणे अंमलबजावणी व्हायला हवी.

‘विज्ञान सर्व प्रश्नांची उत्तरे काढू शकते. ग्लोबल वॉर्मिंगवर देखील विज्ञान उत्तर शोधील. आपण उगाच डोक्याला ताप करू नये’असे विज्ञानावरदेखील श्रद्धा ठेवणारे लोक म्हणतात. पण आपण एवढे निष्काळजी किंवा अंधश्रद्ध होऊ नये.

Tags: अमेरिका चीन आणि भारत पर्यावरण जागतिक तापमानवाढ श्याम केळकर global worming'shyam kelkar paryavaran weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात