डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

व्हिट लुसाक आणि फिलिपरेमुंडा या प्राग फिल्म स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी हा सगळा घाट घातला.एक डॉक्युमेंटरी करायची म्हणून योजना केली. त्यात प्रत्यक्ष घटना जशा घडल्या तशा शूट करून, एडिट करून 87 मिनिटांचा चित्रपट केलाय. ‘जसं घडलं तसं आम्ही दाखवलंय’ असं जवळजवळ प्रत्येक डॉक्युमेंटरी करणारा म्हणतोच. मायकेल मूरनंही आपल्या ‘फॅरनहाईट 9/11फ आणि‘बोलिंग फॉर कोलंबाईन’ या बॉक्स ऑफिसवर यशस्वी आणि ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांबद्दल असाच दावा केला होता. परंतु इतरांनी त्यातल्या थापा आणि तांत्रिक करामतींनी साधलेला ‘खोटा-खरेपणा’ उघडा पाडायला परत डॉक्युमेंटरीज केल्या. अशाच थापा किंवा अर्धसत्य सांगणाऱ्या कट्‌टर(!) पर्यावरणप्रेमींच्या चित्रपटांवरही पुराव्यांसहित टीका झालेली आहे. या सगळ्यांची माहिती देणारं भांडारच इंटरनेटवर आहे. गोदार्द या चित्रपट अभ्यासकाचं वाचलेलं एकवाक्य या संदर्भात आठवतंय ‘सिनेमाइज ट्रुथ 24 टाईम्स अ सेकंड अँड एव्हरी कट इज अ लाय.’

सध्याच्या फट्‌ट म्हणता भावना दुखावण्याच्या काळात पाहिल्यामुळे असेल पण ‘झेक ड्रीम’ नावाची सणसणीत थप्पड मारणारी ‘डॉक्युमेटरी’ अशी काही भावली म्हणता! सध्याच्या आपल्या यादवी-हुसेनी (चित्रकार एम्‌.एफ. हो!)च्या पार्भूमीवर विचार करा... आपल्याकडे कुणी हजारो सामान्य माणसांना गंडवून तद्दन मूर्ख ठरवलं आणि त्याची फिल्म तयार करून इतर देशांतल्या फेस्टिवलांना पाठवली तर त्या फिल्ममेकरला कुणाकुणाची, किती किती वर्षं माफी मागावी लागेल आणि दगडफेकीच्या, धक्काबुक्कीच्या भितीनं भूमिगत रहावं लागेल? कुणास ठाऊक! नुकतीच अनुराग कश्यपची (ब्लॅक फ्रायडे, गुलाल इ. चित्रपटांचा दिग्दर्शक) मुलाखत वाचण्यात आली. तो म्हणतो ‘नेत्यांनी एकमेकांची विचारसरणी, पार्टी, व्यक्तिमत्वं यावर चिखलफेक करण्यासाठी अनेक तासांचा एअरटाईम घेतलेला चालतो. माझ्या चित्रपटात मी काही म्हटलं तर राजकीय नेत्याबद्दल अशा कॉमेंट करणं कसं चूक आहे याबद्दल तत्त्वज्ञान पाजतात. अशी परिस्थिती असताना वेगळं काही मांडायचं धारिष्ट्य असणारे अपवादानंच निघणार. ‘झेक ड्रीम’ या डॉक्युमेटरीमध्ये मोठंच धारिष्ट्य केलंय. तेही सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या आर्थिक सहकार्यानं, मुद्दाम घडवून.

बंदिस्त कम्युनिस्ट राजवटीतून बाहेर येऊ न एखादं दशक होत असताना झेक रिपब्लिकमधल्याच नव्हे तर खाऊजा संस्कृतीतल्या ग्राहकांना, जाहिरातदारांना, राजकारण्यांना आतूनबाहेरून स्वतला पहायचा आरसाच दिलाय झेक ड्रीमच्या रूपानं. पण असं काही बघून कुणी शिकतं का, हा आता जागतिक प्रश्न म्हणायला हरकत नाही, चित्रपटनिर्मितीसाठी एक मेगॅरिॲलिटी शोच घडवलाय. अस्तित्वात येणारच नसलेल्या हायपरमार्टच्या उद्‌घाटनाची सणसणीत, अभ्यासपूर्ण(?) ॲड-कँपेन खरोखरच घडवली. त्यात ठिकाण मात्र आदल्या रात्रीपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं होतं. 31 मे 2003 या उद्‌घाटनाच्या दिवशी काम होईल त्याची कल्पना करत फिल्म क्रू बसला. तीन एक हजार लोक जमा झाले. फीत कापून, छोटंसं भाषण करून फिल्म मेकर/एझेमुटिव्हज यांनी कुंपणाचं गेट उघडलं आणि माणसं काही अंतरावर समोर दिसणाऱ्या रंगीबेरंगी भिंतीकडे चालू लागली. आधी तिथे पोचलेल्यांना कळलं, इमारतीसारखा दिसणारा तो फक्त लांबच लांब पडदा आहे, स्कॅफोल्डिंगवर बसवलेला. कुठल्या ही प्रकारचा दंगा न करता माणसं परत फिरली, काही रेंगाळली. प्रचंड राग, शरम, दु:ख, खंत,मजा, आनंद अशा अनेक भावना कॅमेऱ्यापुढे व्यक्त झाल्या. या सगळ्या प्रकाराचं प्रत्येक पायरीवर चित्रीकरण करून ही डॉक्युमेंटरी तयार झाली आहे.

चित्रपट बघताना या अचाट प्रकल्पानं आपण अचंबित तर होतोच पण आपल्याला गंमत वाटत राहते. असं कुणी कुणाला हेतु पुरस्सर फसवावं का असा तात्त्विक प्रश्नही पडतो. हे असलं काही कुणी खरंच करू शकतं का, केलं तर एवढी माणसं सामील असलेला एवढा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकल्प गुपित कसा ठेवला असेल याची शंकाही येत राहते. बघून झाल्यावर मात्र चित्रपटाचे इतके असंख्य पदर उलगडू लागतात- छोटी छोटी दृश्य, संवाद, प्रसंग यांतली खोली जाणवू लागते. आणि मग जाणवतं ही डॉक्युमेंटरी आहे का फिशन आहे हा प्रश्न विचारायचं कारणच नाही. कशावर काही फ्री किंवा पाडलेल्या किंमतींची अमिषं दाखवणाऱ्या जाहिराती पाहून जिथे तिथे गर्दी करणारी, चेंगराचेंगरी करणारी मंडळी आपण काम पहात नाही? श्रीमंत व्हायचीजवळ जवळ खोटी स्वप्नं दाखवणाऱ्या जाहिराती पाहून लॉटरी तिकिटं घेत राहणारी मंडळी आपण पाहतोच. ते कशाला, फसवणुकीच्या पद्धती सतत बातम्यांतून येत असतात तरी परदेशी लॉटरी

लागल्याचा इ मेल आल्यावर (जाहिरातींचा मारा न करताही)मोह पडून, बुद्धी गहाण ठेवून गंडवली जाणारी मंडळीही आपण पाहतोच. अशीच मोह पडणारी आणि त्यांना मोहात पाडामचा व्यूह रचणारी मंडळी या चित्रपटात आपण पाहतो.

व्हिट लुसाक आणि फिलिप रेमुंडा या ‘प्राग फिल्म स्कूल’च्या दोन विद्यार्थ्यांनी हा सगळा घाट घातला. एक डॉक्युमेंटरी करायची म्हणून योजना केली, त्यात प्रत्यक्ष घटना जशा घडल्या तशा शूट करून,एडिट करून 87 मिनिटांचा चित्रपट केलाय. ‘जसं घडलं तसं आम्ही दाखवलं’ असं जवळजवळ प्रत्येक डॉक्युमेंटरी करणारा म्हणतोच. मायकेल मूरनंही आपल्या ‘फॅरनहाईट 9/11फ आणि ‘बोलिंग फॉरकोलंबाईन’ या बॉस ऑफिसवर यशस्वी आणि ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांबद्दल असाच दावा केला होता. परंतु इतरांनी त्यातल्या थापा आणि तांत्रिक करामतींनी साधलेला ‘खोटा-खरेपणा’ उघडा पडायला परत डॉक्युमेटरीज केल्या. अशाच थापा किंवा अर्धसत्य सांगणाऱ्या कट्‌टर(!) पर्यावरण प्रेमींच्या चित्रपटांवरही पुराव्यांसहित टीका झालेली आहे. या सगळ्यांची माहिती देणारं भांडारच इंटरनेटवर आहे. गोदार्द या चित्रपट अभ्यासकाचं वाचलेलं एक वाय या संदर्भात आठवतंय ‘सिनेमा इज ट्रुथ 24 टाईम्स अ सेकंड अँड एव्हरी कट इज अ लाय.’ चित्रित, ध्वनिमुद्रित केलेल्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या आपण जोडतो कशा त्यावर अवलंबून असतं. आपल्या चित्रपटातलं सत्य, अर्धसत्य किंवा घडवलेलं सत्य हे चित्रपटांशी निगडित मंडळींना माहीत असतं, परंतु सगळ्याच प्रेक्षक-ग्राहकांना माहीत असतंच असं नाही. त्याचा फायदा अनेक डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स घेतात. ‘झेक ड्रीम’ बद्दलशंका घेणारेही नेटवर सापडले. ‘असं सगळं खरंच घडलं होतं का, हे कुणी झेक मला सांगेल का?’ असा प्रश्न एकानं विचारलाय. याचं उत्तर सापडलं ‘हो घडलं होतं. माझी आई प्रागमध्येच राहते.’ हे हाताशी धरून या चित्रपटावर लिहायचं ठरवलं.

1993 साली झेकोस्लोवाकियातली कम्युनिस्ट राजवट जाऊन गुण्यागोविंदानं झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया असे दोन देश निर्माण झाले. कम्युनिस्ट राजवटींमध्ये गरजेच्या अन्नपदार्थांसाठी रांगा लावाव्या लागत होत्या, हे सत्य आता उघड झालेलं आहे. त्यानंतरच्या दशकाच्या उत्तरार्धात झेक रिपब्लिक मध्ये 100 च्या वर हायपरमार्ट उघडली गेली. ग्राहकांची ‘एकाच ठिकाणी सर्व खरेदी’ ही भूक प्रखर होत गेली, या बाबींचा संदर्भ अर्थातच या चित्रपटाला आहे. प्रतिमा निर्मितीच्या या खेळाची सुरुवात करताना दिग्दर्शक जोडी स्वतचा मेक ओव्हर करून घेते. त्यासाठी एक पब्लिक रिलेशनची फर्म नेमली जाते. ‘ह्युगो बॉस’ ही आंतरराष्ट्रीय पोशाख कंपनी प्रायोजक होते. त्यांचा लोगो अर्थातच ‘दिसला’ पाहिजे. अंडरवेअर मधले फिल्मस्कूलचे बावळट पण चार्ज्ड विद्यार्थी ते सुटातले, योग्य देहबोलीचे एक्झ्यूकेटीव्ह हा अनेक तासांचा बदल आपण काही मिनिटात पाहतो.(कॅमेरावर्क आमि एडिटिंगची कमाल आहे.) मग एक प्रसिद्ध जाहिरात कंपनी नेमली जाते.

इथून व्यवस्थित ॲड कँपेन सुरू होते. निर्मितीच्या पायऱ्या आपण पाहतो. विशिष्ट कामं करणारी माणसं आणि अभ्यासासाठी निवडलेले ग्राहक पाहतो. त्यांच्या एकमेकांशी, दिग्दर्शकांशी आणि डॉक्युमेंटरीच्या कॅमेऱ्याशी होणाऱ्या वेगवेगळ्या आंतरक्रिया, संवाद पाहतो, ऐकतो. एकॲडमॅन बढाई मारतो ‘प्रॉडट कसंही असलं किंवा नसलंच तरी आमच्या जाहिराती यशस्वी होतात.’ टिपिकल हायपरमार्ट कुटुंबं अभ्यासासाठी हवी असल्यानं ऑडिशन्ससाठी आवाहन केलं जातं, त्याला ही खूप प्रतिसाद मिळतो. या ऑडिशनमधले काही मासले. कोणी म्हणतं ‘पूर्वीचे केळ्यांसाठीचे यु आठवतात.’ एक मध्यमवयीन पुरुष सांगतो ‘हायपरमार्टला भेट देण्याची तयारी आदल्या दिवशीपासून होते. काय घ्यायचं, किती खर्च करायचा याचा एक ताण असतो. यादी करायची असते.’ एक कुटुंब कॅमेऱ्यात बोलण्याच्या कल्पनेनं उत्साहित झालेलं दिसतं. आई सांगते की ते सगळे हामकिंगला गेले असताना मुलगी जरा नाराजच होती, पण परत येताना तिला टेस्कोमध्ये नेलं आणि ती खुश झाली. मुलगी म्हणते ‘हायकिंगपेक्षा टेस्कोमध्ये जास्त मजा आहे.’ या कुटुंबांना एका हायपरमार्टमध्ये बोलावलं जातं. जाहिरात तयार करण्या साठी तुमची खरेदी करण्याची पद्धत अभ्यासायची आहे असं सांगितलं जातं. एकाच्या शॉपिंगकार्टमध्ये पुढच्या रंगीबेरंगी सीटमध्ये एक कंटाळलेलं मूल बसलेलं आपल्याला दिसतं. काही जण दोन दोन कार्ट घेऊन आहेत. मग शर्यतीतले सहभागी रेषेवरून सुटतात तशी ही माणसं सुटतात. आपल्या शॉपिंग कार्ट भरू लागतात. कुणी पारखून वस्तू घेताहेत. कुणी फ्री सँपल चाखताहेत. मग सगळे मिळून हसत खेळत नाश्ता करताहेत. ज्यांचे वाढदिवस आहेत त्या मुलांना दुकानातर्फे एक बाई फुगे देते आहे. अशी सगळी दुकान मात्रा (का रंगीत जत्रा म्हणू या?)आपल्याला बघता येते. शेवटी सगळेजण बाहेर पडल्यावर त्यांच्या आनंदी प्रतिक्रिया दिसतात. एक आई आपल्या मुलांबरोबर ‘सगळे आनंदी होतील... झूम गली गली गली... हाय होफ अशा प्रकारचं गाणं म्हणून दाखवते. त्याची ट्यून पुढे परत परत वापरली आहे.

या भागात आपल्याला ग्राहकांचं मानससास्त्र, त्यांची जाहिरातीवरून, वस्तूंवरून नजर फिरते कशी, कुठे स्थिरावते, निवड कशी होते इत्यादींचा अभ्यास करणारी तज्ञ महिला भेटते. त्यानंतर झेकड्रीम हे नाव निवडल्याचं कळतं आणि त्याच्या विविध माध्यमांसाठी जाहिराती कशा तयार झाल्या ते दिसतं. त्या दरम्यान जाहिरात माध्यमात काम करणाऱ्यांचे संवाद,  त्यांनी कॅमेऱ्याला सांगितलेल्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो. पोस्टर्स तयार होताहेत. या वेळच्या संवादाचा हा मासला. हशा घेणारा.

‘झेक ड्रीमच्या उद्‌घाटनाच्या दिवशी तुम्ही रिक्त हस्तानं परत जाणार नाही असं म्हटलं तर चूक काय त्यात?’

‘हे खोटं आहे. नसलेल्या हायपरमार्टमध्ये लोकांना काहीच मिळणार नाहीये.’

‘त्यांना वस्तू मिळणार नाहीयेत, पण एक अनुभव घेऊन ते जाणारच आहेत.’

‘तुम्ही लोकांना व्यक्तिश: सांगणार असलात तर लिहा. आम्ही असं खोटं बोलत नाही.’

‘हे खोटं नाहीये. तुम्हाला वस्तू मिळतील असं आम्ही म्हटलेलंच नाहीये.’

‘तुम्हा चित्रपटवाल्यांना सवय आहे, लोकांना खोटं सांगायची. आम्ही जाहिरात क्षेत्रातले लोक खोटं बोलत नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण आम्ही नाही खोटं बोलत.’ ‘तू पुन्हा हेच सांगशील का कॅमेऱ्याला’, असं विचारल्यावर तो ठामपणे ते पुन्हा सांगतो, क्लोजअपमध्ये. एक जण तर म्हणतो, ‘जाहिरात शिकवताना सिस्टाईन चॅपेलचं उदाहरण देतात. तो छतावर आतून केलेला मेगॅबिल बोर्डच आहे. पैशाच्या मोबदल्यात करून घेतलेली जाहिरात, गॉडइज ग्रेट सांगणारी. मेड टु ऑर्डर आणि त्याला आर्ट म्हणतात.’ अशीप्रेक्षकांचा हशा घेणारी मत-मौक्तिकं ओघळतच राहतात चित्रपटभर.

कॉमिकबुकमधल्या संवादांच्या फुग्यात फक्त ‘झेक ड्रीम’लिहिलेली लाल पिवळी हिरवी आकर्षक पोस्टर्स तयार होतात. दुकानांच्या दरवाज्यावर, बसस्टॉपवर, ट्रॅमवर, लोकल ट्रेनच्या डब्यात, स्टेशनांवर, एस्कलेटर्सच्या काठाकाठानं, शहरात लावली जातात. आपल्याला प्रागची छोटी सैरही घडते. त्याबरोबर आनंदी थीमसाँग ऐकू येतं. रेडिओ, टीव्हीसाठी जाहिराती तयार होतात. या जिंगल्सचं रेकॉर्डिंग, त्यात हवे तसे अचूक भाव आणण्यासाठी घेतलेली मेहनतही आपण पाहतो. उत्तम गायिका, साथीच्या वाद्यमेळासाठीही उत्तम टीम, कोरस गाणाऱ्या मुलीही निवडक, तयारीच्या. आपण ‘झेक ड्रीम’ हे थीमसाँग ऐकतो आणि पूर्ण झालेलंही शेवटी ऐकतो. ते साधारण असं आहे.

आपला देश, आपली भूमी एवढीशी आहे; पण हाताशी काही नसताना आपण अवकाशात किे बांधू शकतो. तुमच्या लक्षात असूद्या 31मे. आपण लहान मुलांच्या नजरेतून बघूया, जरा अफाटच वाटेल सगळं. डोंट बी अ स्लॉथ, कम ग्रॅब द कार्ट, डोंट ब्लो इट ऑफ. लेट द झेक ड्रीम स्टार्ट. जग तुमचं आहे घेऊन टाका ते. तुम्हाला ते तितकंच हवंसं वाटणं महत्वाचं. इट विल बी नाईस बिग बॅश, इफ यु हॅव नो कॅश, गेट अ लोन अँड स्क्रीम आम वाँट टु फुलफिल माम ड्रीम... कॅपिटॅलिस्ट मार्केट इकॉनॉमीचं राष्ट्रगीतच जणू.

नव्या हायपरमार्टमध्ये काय काय फ्री किंवा स्वस्त मिळू शकेल त्याची पँफ्लेट घरांच्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये टाकली जातात, ठिकठिकाणी वाटली जातात. अशी सगळी जोरदार जाहिरातबाजी चाललेली असताना त्या हायपरमार्टचं स्थळ कुठेही सांगितलं जातनाही. त्यानंतर त्याच कॉमिकबुकच्या संवादफुग्या त- जे आतापर्यंत झेक ड्रीमशी निगडित म्हणून लोकांच्या लक्षात राहिलेले आहेत- नवीवामं येतात. ‘मुळीच येऊ नका’, ‘खर्च करूच नका’ अशी नकारात्मक छोटी वाक्य लिहिलेल्या पँफ्लेटची मोहीम होते. जाऊ नका सांगितलं की जाण्याची उत्सुकता माणसांना वाटतेच असा आडाखा. प्रत्यक्ष उद्‌घाटनाच्या दिवशी चित्रपट निर्मितीतले लोक, आपले दोन हिरो आणि आपण प्रेक्षक, माणसांची वाट बघतोय. पडद्यावर त्यांची चर्चा चाललेली. माणसं जमतात. त्यांना छोटे झेंडे दिले जातात. लहान थोर,एकटे दुकटे, लहानमोठी कुटुंबं दिसतात.

त्यांना सत्य कळतं आणि आपण खूप वेळ त्यांच्या प्रतिक्रिया बघतो, ऐकतो. थोड्या दूरवर झाडी, स्वच्छ प्रसन्न ऊन, गवतातला बेडूक, मोठ्या हिरव्यागार कुरणावर काही म्हातारी माणसं काठी टेकत कष्टानं चालताहेत, वैतागून परत फिरताहेत. दमा येते. थोडा रागही येतो फिल्ममेकर्सचा. इतर प्रतिक्रिया आपल्याला अंतर्मुख करतात- मूर्ख बनवलं आम्हाला- असंच प्रचार करून आम्हाला गंडवणार आहेत आणि आम्ही गुरांच्या कळपासारखे युरोपियन युनिअनमध्ये सामील होणार.- मला वाटलंच होतं काही तरी गडबड आहे.- तुम्हांला राग नाही आला?- नाही मला हसू येतंय. मस्त अंजन घातलं.- मी बि किनी आणायला हवी होती, हवा छान आहे.- बरं झालं आम्हीश निवारी घराबाहेर तरी पडलो.- चला पिकनिक करूया. रागानं शिव्या घालणारे आणि चित्रपट इथे संपत नाही. शहरातल्या झेक ड्रीमच्या जाहिराती उतरवल्या जाताहेत. त्याजागी लकी स्ट्राईक, मास्टरकार्डच्या जाहिराती उलगडल्या जाताहेत. दिग्दर्शक न बोलता म्हणताहेत हे असंच चालणार! आम्ही नाही तर दुसरं कुणी ग्राहकांना असंच गंडवत राहणार!

दिग्दर्शकाची मुलाखत नेटवर वाचताना अमेरिकेतल्या प्रेक्षकानं दिलेला प्रतिसाद नोंदवावासा वाटतो. ‘झेक ड्रीम हे अमेरिकेसाठी ‘वेपन ऑफ मास डिस्ट्रशन’ सारखं आहे’फ त्यांच्या धोमांबद्दल असाच सरकारी हाईप चालला. इराकवरचा हा रास्त ठरवण्यासाठी. शेवटी कळलं तसं काहीच नव्हतं. माध्यमं वापरून गंडवण्याचा प्रकारच तो. जे सांगितलंय, त्यातून बघणाऱ्या ऐकणाऱ्याला इतरही काय काय दिसतं,समजतं. एकासारखं दुसऱ्याचं नसतं हीच तर आशयघन कलाकृतींची खासियत असते ना!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके