डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

...

आपण बाहेर असलो की आपला सगळा वेळ इतरांच्या तोंडाकडे पाहण्यातच जातो. आत्मनिरीक्षणाला संधीच राहत नाही. गेल्या सबंध आयुष्यात मनाचा काही विकास झाला की नाही ते जमाखर्च पाहून ताळेबंदात नमूद करता येत नाही. बाहेर ज्या क्रिया होतात त्या केवळ घोकिव असतात. आमचे काही विचार, काही राजकीय गट, काही क्रिया उरलेल्या आहेत. फोनोग्राफच्या जशा तबकड्या आमच्यापाशी असतात. कोणत्या परिस्थितीत कोणती तबकडी लावावयाची ते मनाला ठाऊक असते. आणि परिस्थितीनुरूप योग्य ती तबकडी ते लावीत जाते.पण मनाचा जो मसाला आम्ही केव्हा एकदा तयार करुन भरुन ठेवला आहे त्याचे काय झाले... एवढ्या कालावधीत ते आम्ही पाहतो का कधी? त्याचे नाव नको. कारण आम्ही बाहेर एकटे असे नसतोय.अगदी केव्हाही पाहा. 'घरी दारी शय्येवरी' पाहा! मग आम्ही आमचे मन बाहेर काढणार केव्हा, ते निर्मळ आहे की नाही, अभंग आहे की नाही, शिस्तीने वाढते आहे की बेशिस्त वाढले आहे हे अजमावणार केव्हा? आम्ही स्वत:च्यासमोर कधी उभे राहतच नाही.आरशासमोर आपला देह उभा करून आम्ही जशी त्याची साफसफाई करतो तसे आमचे अंतरंग अधूनमधून आरशासमोर उभे करावयास नको काय?

'कारागृहाच्या भिंती' मधून

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके