बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 साली झाला. वयाच्या तेराव्या वर्षी ते अभ्यासासाठी मुंबईस गेले. ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवितानाच हिंदी, बंगाली, कानडी आदी भाषांचा अभ्यास केला. तसेच इतिहास, गणित, पदार्थविज्ञान, पुरातत्वशास्त्र आदी विषयांचेही त्यांनी अध्ययन केले, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी 'दर्पण' सुरू केले.
बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक. 6 जानेवारी 1832 ला त्यांच्या संपादकत्वाखाली 'दर्पण' या मराठीतील आद्य वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. मराठी पत्रकारांच्या वतीने दर वर्षी 6 जानेवारीस 'पत्रकार दिन' साजरा केल जातो. यंदा सहा जानेवारीस कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या जन्मगावी- पोंबुर्ले या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावी- झाले, ही फार समाधान देणारी घटना आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 साली झाला. वयाच्या तेराव्या वर्षी ते अभ्यासासाठी मुंबईस गेले. ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवितानाच हिंदी, बंगाली, कानडी आदी भाषांचा अभ्यास केला. तसेच इतिहास, गणित, पदार्थविज्ञान, पुरातत्वशास्त्र आदी विषयांचेही त्यांनी अध्ययन केले, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी 'दर्पण' सुरू केले. 'दर्पण' हे सुरुवातीस पाक्षिक होते. दर्पणमध्ये मराठी व इंग्रजी या दोनही भाषांतून मजकूर प्रसिद्ध होत असे. नवीन ज्ञानाचा आणि पाश्चात्यांकडील विज्ञानाचा लोकांना परिचय करून द्यावा, आणि त्यांच्या अभ्यासामुळे देशाची समृद्धी आणि लोकांचे कल्याण साधावे हा 'दर्पण'चा उद्देश पहिल्या अंकात जाहीर करण्यात आला होता. बाळशास्त्रींचे लिखाण माहितीपूर्ण, निर्भीड व सडेतोड असे. बाळशास्त्री हे देशाभिमानी आणि बाणेदार वृत्तीचे होते. लोकशिक्षण करीत असतानाच ते सरकारलाही काही गोष्टी स्पष्टपणे सुनवीत असत. त्यांनी 'दर्पण' सुमारे साडेआठ वर्षे चालविले.
बाळशास्त्री जांभेकर यांचे 1846 मध्ये अवघ्या पस्तिसाव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ दीडशे वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले. मराठी वृत्तपत्र सृष्टीची पायाभरणी करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहे.
Tags: मुंबई पुरातत्वशास्त्र पदार्थविज्ञान संस्कृत सिंधुदुर्ग पत्रकार दर्पण बाळशास्त्री जांभेकर Mumbai Archaeology Physics Sanskrit Sindhudurg Journalist Darpan Baalshastri Jambhekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या