डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डॉ. आंबेडकर अकादमीतर्फे फेब्रुवारीत पहिले राज्यव्यापी वैचारिक संमेलन

फेब्रुवारी 94 मध्ये होणाऱ्या पहिल्या संमेलनासाठी 'धर्म' हा विषय निवडण्यात आला असून संमेलनाध्यक्ष प्रा. रेगे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा ‘विषय विसाव्या शतकातील धर्मचिंतन’ हा आहे. याशिवाय या संमेलनात 'विसाव्या शतकातील धर्माचा राजकारणावरील प्रभाव', 'विसाव्या शतकातील विविध धर्मातील नवे प्रवाह', 'लोकांच्या धार्मिकतेमुळे जमातवादाला खतपाणी मिळते काय?' व 'विसाव्या शतकातील धर्मनिरपेक्षता नकली किती? असली किती?' या विषयांवर परिसंवादही होतील.

अध्यक्षपदी प्रा. मे. पुं. रेगे यांची निवड 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या वतीने दि. 19 व 21 फेब्रुवारी 94 रोजी महाराष्ट्रातील पहिले राज्यव्यापी वैचारिक संमेलन सातारा येथे होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ प्रा. मे. पु. रेगे यांची निवड झाली असल्याची माहिती अकादमीचे कार्यवाह श्री. किशोर बेडकीहाळ यांनी दिली.

20 वे शतक संपायला अवघी 6 वर्षे शिल्लक आहेत. या निमित्ताने अकादमीच्या वतीने 1994 पासून 'विचार वेध' या नावाने वैचारिक संमेलनाचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

या शतकात धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, समाजप्रबोधन, परिवर्तनवादी चळवळ, साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रांत खूपच घडामोडी झाल्या. या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा चिकित्सक आढावा घेणे हे या शतकाच्या संधिकालात आवश्यक आहे. या हेतूने प्रतिवर्षी 20 व्या शतकातल्या घडामोडींवर आधारित एकेक क्षेत्र घेऊन त्याचा गंभीर ऊहापोह करणारी वैचारिक संमेलने हे शतक संपेपर्यंत व्हावीत व त्यानंतरही दरवर्षी 'विचार वेध' संमेलने चालावीत या हेतूने अकादमीने पुढाकार घेऊन पहिल्या संमेलनाचे हे यजमानपद स्वीकारले असल्याचे श्री. बेडकीहाळ यांनी सांगितले.

फेब्रुवारी 94 मध्ये होणाऱ्या पहिल्या संमेलनासाठी 'धर्म' हा विषय निवडण्यात आला असून संमेलनाध्यक्ष प्रा. रेगे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा ‘विषय विसाव्या शतकातील धर्मचिंतन’ हा आहे. याशिवाय या संमेलनात 'विसाव्या शतकातील धर्माचा राजकारणावरील प्रभाव', 'विसाव्या शतकातील विविध धर्मातील नवे प्रवाह', 'लोकांच्या धार्मिकतेमुळे जमातवादाला खतपाणी मिळते काय?' व 'विसाव्या शतकातील धर्मनिरपेक्षता नकली किती? असली किती?' या विषयांवर परिसंवादही होतील.

या संमेलनाच्या उद्घाटनासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व समारोपासाठी राज्य शासनाच्या साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. य. दि. फडके यांना निमंत्रित केले आहे.

या संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नामवंत, विचारवंत व अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ.आ.ह.साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनासाठी परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची भोजन व निवासव्यवस्था रु. 125/- शुल्क घेऊन केली जाईल. इच्छुक व्यक्तींनी आपली आगाऊ नोंदणी दि. 15 जानेवारी 1994 पर्यंत रुपये एकशे पंचवीस चा चेक/ डी.डी. अथवा मनीऑर्डर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी' या नावाने कार्यवाह, डॉ. आंबेडकर अकादमी, 'मुक्तांगण' 590 अ, गुरुवार पेठ, सातारा 415 003 या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन या संमेलनाचे कार्यवाह श्री. किशोर बेडकीहाळ यांनी केले आहे.

Tags: मुक्तांगण सातारा विसावे शतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी डॉ.आ.ह.साळुंखे डॉ.य.दि.फडके मे. पुं. रेगे. श्री. किशोर बेडकीहाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर Muktangan Satara Babasheb Ambedkar Academy Twentieth Century Dr Dr. A.H. Salunkhe Dr. Y.D. Fadke M.P. Rege. Shri. Kishor Bedkihaal Babasheb Ambedkar Dr weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके