डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रकाश मोहाडीकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवशी संकल्प

या संकल्पाच्या सिद्धीसाठी त्यांनी जी यात्रा करावयाचे ठरविले आहे ती 10 जानेवारी 1994 रोजी पश्चिम ठाणे जिल्ह्यातील बोर्डी गावापासून सुरू होणार आहे. आपण हाती घेतलेल्या या कामाला सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळावे अशी कळकळीची विनंती त्यांनी सर्वांना आणि विशेषतः शाळांच्या मुख्याध्यापकांना केली आहे.

श्री. प्रकाश मोहाडीकर यांनी आपल्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सर्व संस्थांच्या अधिकारपदांवरून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु आपली प्रकृती अजूनही कार्यक्षम आहे हे लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील गावोगावच्या शाळांतून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणाऱ्या गोष्टी सांगावयाच्या, असा संकल्प सोडला आहे. त्या त्या गावी साने गुरुजींच्या वाङ्मयाचा प्रसार करणे, त्यांच्या जीवनाचे दर्शन घडविणे आणि साने गुरुजींच्या जन्मग्रामी त्यांचे स्मारक उभे करणे या गोष्टींचाही त्यांच्या संकल्पात अंतर्भाव आहे.

या संकल्पाच्या सिद्धीसाठी त्यांनी जी यात्रा करावयाचे ठरविले आहे ती 10 जानेवारी 1994 रोजी पश्चिम ठाणे जिल्ह्यातील बोर्डी गावापासून सुरू होणार आहे. आपण हाती घेतलेल्या या कामाला सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळावे अशी कळकळीची विनंती त्यांनी सर्वांना आणि विशेषतः शाळांच्या मुख्याध्यापकांना केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची व्यवस्था कशी असावी याची सविस्तर कल्पना देण्यासाठी त्यांनी सूचनापत्रक तयार केलेले आहे. त्यात प्रवास, निवास, आहार, वाङ्मय विक्री, श्रोतृसमुदायाचे स्वरूप आणि संख्या यांविषयीचे तपशील आहेत. मानधनाचाही खुलासा आहे. दौऱ्यामध्ये शिक्षक सभांचे आयोजन व्हावे आणि त्यात शिक्षकांचाही सहभाग असावा अशी प्रकाशभाईंची अपेक्षा आहे.

24 डिसेंबर 1999 हा साने गुरुजींच्या जन्मशताब्दीचा मंगलदिन आहे. त्या दिवशी पालगडला- गुरुजींच्या जन्मगावी- त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची सिद्धता पूर्ण करून प्रकाशभाई आपल्या यात्रेची सांगता करणार आहेत. 

Tags: पालगड ठाणे महाराष्ट्र प्रकाश मोहाडीकर साने गुरुजी Palgarh Thane Maharashtra Prakash Mohadikar Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके