डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

तुम्ही गेलात ही गोष्टच खोटी!

गावोगाव उमललेल्या कथामालांतून तुमच्या अस्तित्वाचा सुगंध आहे. समर्पित जीवनाचे आदर्श वस्तुपाठ पुढे ठेवण्याच्या सर्वांना तुमच्या आश्वासक श्वासांचा स्पर्श झालेला आहे. जिथं आंतर भारतीची ऊर्मी आहे. तिथं तुमचं प्रेमगान दुमदुमत आहे. जिथं अन्यायाचा प्रतिकार आहे तिथे तुमच्या सत्त्वशील तेजाची ठिणगी आहे. राष्ट्राच्या उभारणीचं काम करण्यासाठी ज्यांच्या हातांवरचे पट्टे वाढताहेत तिथं तुमचा प्रेमळ हात त्यांच्या पाठीवर आहे.

प्रिय साने गुरुजी,

तुम्ही निघून गेलात त्याला आता 25 वर्ष झाली. पाव शतक. अजूनही तुम्ही गेला आहात या कल्पनेवर आमचा विश्वासच बसत नाही. माणूस जिवंत असताना त्याच्या म्हातारपणी देखील त्याचा चिरतरुण म्हणून गौरव करण्याची रीत आपल्या ओळखीची आहे. माणूस गेल्यावरही तो नाहीच गेलेला अस वेडा हट्ट आम्ही पुष्कळदा करतो; कधी कीर्ति रूपाने तो अमर झाला आहे असं म्हणतो; पण गुरुजी, तुम्ही केवळ कीर्तीन अजरामर झाला आहात एवढाच आमचा दावा नाही; तुम्ही आहात, आमच्या जवळ आहात-अशी आमची श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा केवळ भाविकांची नाही; ही माझ्यासारख्या नास्तिकांचीदेखील आहे. ज्या वेळी कीट्स ऐन तारुण्यात कालवश झाला त्या वेळी शेळीनं त्याला उद्देशून एक सुंदर विलारिका लिहिली. तिच्या आरंभी त्यानं केवढा तरी आक्रोश केलेला आहे. आसमंतातल्या सगळ्या स्थिरचरांना आपल्याबरोबर खुशाल मुक्तपणं रडण्याच त्यानं आवाहन केलं आहे. पण नंतर त्या कवितेच्या शेवटी त्याच्या मनाचा रंग असा काही पालटून गेला आहे की, मो नॉट फॉर अडोनाइस' असा उलटा आग्रह त्याने धरला आहे. अरे कशाला रडता तो गेला म्हणून? तो पाहा तो सर्वत्र भरलेला आहे. ताऱ्यांमधून, वाऱ्यांमधून, वृक्षांमधून, पक्ष्यांमधून, नदी निर्झरांतून आकाशसागरातून सर्वत्र अनुभवाला येत आहे. त्याचं स्पंदन' अशी फार उदात्त सुंदर भावना शैलीने प्रकट केली आहे. पण हे सगळं वाचल्यावर आमच्या अस्तित्वानं लपलेला पढिक पोपट म्हणतो, आहे आपली ही कवि-कल्पना!' रोमँटिक प्रवृत्तीचा हाही एक विशेष बस्. एवढंच. 'केशवसुत कसले गेले, केशवसुत गातचि बसले' हादेखील आम्ही समजतो उपचारानं केलेला गौरव. जुन्याच गोष्टी बोलायच्या तर आपल्या मृत्युसमयी रडणाऱ्या शिष्यांना गौतम बुद्धांपासून रामदासांपर्यंत अनेकांनी आपलं दर्शन आपल्या विचारांतून घ्याच, असा उपदेश केलाच होता ना? आपले भले भले शिष्य रडू लागले हे पाहताच गौतम बुद्धांनी विश्वाच्या क्षणिकतेबद्दलचा आपला आवडता सिद्धान्त पुन्हा एकदा समजावला. तेवढ्यानं त्यांची मनःशांती कितपत झाली कुणास ठाऊक, पण एक गोष्ट खरी की, बुद्धाच्या निर्वाणानंतर कित्येक शतकं त्याच्या अस्तित्वाचं स्फुरण होतच राहिलं.

तुम्ही म्हणाल, " तू वेडा आहेस. माझी तुलना भगवान बुद्धांची, महावीरांशी, ख्रिस्तांशी कशी होईल? गांधीजी, रवीन्द्रनाथ आणि रामकृष्ण यांच्या महान जीवनांतून मी एखादा लहानसा अंश तेवढा उचलून घेतला बाहे, एवढंच! फार तर आपल्या शिष्यांना रामदास स्वामी म्हणाले होते, दासबोध माझा आत्माराम आहे. रडू नका. मी गेल्यावर मी तुम्हाला दासबोधात सापडेन, तसं तुम्ही मला माझ्या साहित्यात पाहा." गुरुजी, तशी तर आम्ही तुमचो भेट घेतोच. अजूनही महाराष्ट्रातले बालगोपाळ तुमच्या गोड गोष्टींचा खाऊ प्रत्यही मागताहेत. गोष्टीरूप गांधीजी हे आजही बालकांच्यापर्यंत पोचू शकणारं गांधीजींचं एकमेव दर्शन आहे. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अपवि।' ही तुमची शिकवण आजही इवल्या ओठांवर प्रार्थना म्हणून ठसलेली आहे. तुम्ही लिहिलेल्या कथा, कादंबऱ्यांनी कुमारांची मनं आजही हालुन जाताहेत; आणि जीवनातल्या कारुण्याचं, माणुसकीचं आणि उदात्ततेचं दर्शन घेण्यासाठी हजारो मराठी माणसं तुमच्या साहित्याकडे पुन्हा पुन्हा वळताहेत. तुमच्या सुंदर पानी माझ्यासारख्या कैक पिपासूंची तहान भागते आहे. भारतीय संस्कृतीच्या मोठेपणाच्या खुणा पाहण्यासाठी तुमच्या 'भारतीय संस्कृती' या थोर ग्रंथाकडेच महाराष्ट्र आजही जातो आहे.

आणि 'श्यामची आई'- तिच्याबद्दल तर काय सांगू? मुळात त्या अमृतमधुर कहाणीची पारायणं तर होत आहेतच. आचार्य अत्र्यांनी काढलेला आणि राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला याच नावाचा चित्रपट पाहून पुरेसं समाधान झालं नाही म्हणून की काय या कथेवर रचलेलं नाटकही आता रंगभूमी वर आलं आहे.

खरं सांगायचं तर पूर्वीसारखी तुमची हेटाळणी करणारी माणसंही आजमसुद्धा आमच्या आस पास असतात. पण ज्यांना अश्रूंची शक्ती माहीत आहे. अशी लक्षावधी माणसं असल्या हेटाळणीकडे दुर्लक्ष करतात. अश्रूनारायण म्हणणाऱ्या तुमचा अबू सामान्य नव्हता हे आम्हाला माहीत आहे. या अश्रूच सामर्थ्य धर्मराजाच्या रक्ताच्या थेंबा इतकं होते, की जो धरणीवर पडला तर प्रलयच ओढवावा! 

तुमच्या अश्रूनी हजारो तरुणांना भारतमातेचे अश्रू पुसण्याची प्रेरणा दिली. याच अश्रूंनी कामगार संघटनेचा समुद्र खवळून सोडला. फैजपूरला एक लाख शेतकऱ्यांची फौज उभी केली गढुळ झालेली पंढरीची चंद्रभागा निवळली ती या अश्रूंमुळेच.

आणि गुरुजी, साहित्याची चर्चा एक वेळ जरा दूर ठेवू या, तुमच्या जीवनात तुम्ही किती तरी अभाग्याचे अश्रू आपल्या अश्रूंनीच धुवून टाकण्याची किमया केलीत! हे अश्रू दुर्बलाचे असते तर ह्यातून काय निर्माण झालं असतं? तुमच्या अश्रूचा थेंब विराट होत गेला. अवघ्या अभाग्याने अश्रू उभे आमच्या डोळ्यांत। "असं तुम्हाला म्हणता आलं असतं. खरोबर अनिलांच्या कवितेतला मानव तो तुम्हीच आहात.

'अन्याय घडो कोठेही चिडून उठू आम्ही' अशी अन्यायाच्या प्रतिकाराची कधीच न विझणारी ज्योत हे तुमचं एक रूप होतं; आणि बळ पाठीवर आमच्या चाबुक उडी कोठेही' अशी जिवंत सहानुभूतीची पूर्वी हेही तुमचंच रूप होतं. तुमची आठवण आम्हाला सतत होत राहावी, तुमचे विचार आम्हाला प्रेरणा देणारे ठरावे, आणि तुमच्या भावनांनी आमच्या मनाची श्रीमंती वाढवावी, यासाठी तुमच्या साहित्याचा ठेवा तर आमच्याजवळ आहे, पण सवत स्फुरणदायी जसं तुमनं स्मरण बाम्ही ठोंबे असूनही आम्हांला होत राहतं ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. अर्थात हे मला माहीत आहे की, तुमचं जीवन आणि तुमचे साहित्य गांत मुळीच अंतर नव्हतं. हा तुमचा फार मोठा विशेष होता. 'आमार जीवन ई आमार बानी' असं गांधीजींच्यासारखं तुम्हीही म्हणू शकला असता. मला आठवतं, एमिलचं एक वाक्य तुम्हांला फार आवडायचं : ही ही टचेथ माय बुकट मी माझ्या साहित्याला स्पर्श करणं म्हणजे माझ्या अंतरंगाला स्पर्श करणं आहे!" माझ्या लेखी तरी तुम्ही आणि तुमची वाड:मयी मूर्ती यांत अंतर नाही. त्यामुळे तुमचं साहित्य वाचणं काय किंवा तुमच्या आठवणी येणं काय दोन्ही एकच आहेत. आता हे आकाश भाषण मी तुमच्याशी करतो आहे म्हणून माझ्या तोंडी मी, मला, माझं असली प्रथमपुरुषी रूप येताहेत; पण माझ्यासारखेच खरं सांगायचं तर माझ्यापेक्षाही तुमच्या साहित्यानं आणि जीवनानं अधिक भरलेले शेकडो लोक आहेत आणि त्या सर्वांची भावना माझ्यासारखीच आहे.

मला गंमत वाटते एका गोष्टीची तुम्ही असताना तुम्ही हजारो लोकांना झपाटून टाकावं अशी तुमची महती होतीच, पण तुम्ही निघून गेल्यावरही ही इतकी माणसं अशी तुमच्या प्रभावानं भारलेली मला दिसताहेत. हे खरं की, आम्ही बहुतेक माणसं शेणामेणाची असतो. परिस्थितीच्या उन्हानं सुकून जातो. उपेक्षेच्या हिवाळ्यात थरथरू लागतो. संसाराच्या रेटपाखाली भुईसपाट होतो किंवा क्षुद्र मोहाच्या नादानं घेतला बसा टाकून देतो. आम्ही उततो, माततो, नष्ट-भ्रष्ट होतो, पण हे असं काही घडतं आहे याची जाणीव होते आहे हे काय कमी आहे? आणि गुरुजी, हे मी तुमच्या सगळ्या धडपडणाऱ्या मुलांच्याबद्दल नाही म्हणू शकणार.

आज तुम्ही असतात तर तुम्ही पाऊणशे वर्षांचे झालेले असता. म्हणून तर तुमच्या जन्माचा अमृत महोत्सव महाराष्ट्रात साजरा होत आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून तुम्ही लोकजीवनाच्या समुद्रात उतरलात असं धरलं, तर सतत पंचवीस वर्ष तुम्ही अखंड जीवनसाधना केली असा हिशोब सहज मांडता येईल. पण गुरुजी, हा हिशोब चुकेल कारण तुम्ही सुरू केलेल्या कार्याचं सातत्य आजही टिकून आहे. म्हणजे आता पन्नास वर्ष होताहेत तुमच्या तपश्चर्येला. रावसाहेब पटवर्धनांनी साधना साप्ताहिकाच्या संदर्भात एकदा असं म्हटलं की, साने गुरुजींची साधना साने गुरुजींच्याबरोबर संपली.' त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की, प्रत्येक माणसाला साने गुरुजी होता येणार नाही. एका महागणपतीवरून छोटे छोटे छापाचे गणपती करीत बसण्यात काय अर्थ आहे? नुसती गुरुजींच्या नावाची जपमाळ ओडून आणि कढ काढुन काय होणार? गुरुजींची परंपरा चालवणं म्हणजे त्यांच्या नावाचा रबरी शिक्का बनवणं नव्हे. गुरुजी, तुमच्या पुष्कळ धडपडणाऱ्या मुलांनी त्या म्हणण्यातलं सार ओळखलं आहे. तुमची परंपरा सांगायची तर तुम्हांला आवडणारे तुकोबांचे शब्दच उच्चारले पाहिजेत: 'सत्या असल्यास मन केले ग्वाही'. तुमची धडपडणारी मुलं याच निष्ठेनं आणि निकरानं चौफेर आघाड्यांवर लढताहेत. कोणी सहकारी चळवळीचं लोग समाजाच्या खालच्या घरापर्यंत नेताहेत. कोणी कामगार संघटनांतून अहनिंश जागे आहेत. कोणी मावळतीकडे झुकले तरीही प्रचंड युवाशक्ती निर्माण करण्याचा ध्यास घेणारे आहेत. कोणी दलितांतल्या दलितांना मानाचं जीण‌ जगता यावं म्हणून झुंज घेताहेत. कोणी आदिवासींची अस्मिता जागो करण्यासाठी रान उठवत आहेत. कोणी नाडलेल्यांना न्याय मिळवून देताहेत, 'नाहीरे'ची बाजू घेऊन' आहेरे'च्या या विरुद्ध दंड थोपटताहेत. कोणी महारोग्यांतला माणूस ओळखून त्याला माणसासारखं स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवताहेत. 

विचारप्रवर्तनासाठी तुम्ही निर्माण केलेली साधना विझलेली नाही. आणि भारतीय एकात्मतेचं स्वप्न पाहात तुम्ही दिलेली आंतर भारतीची घोषणा प्रत्यक्षात यावी म्हणून धडपडणारेही आता दिवसानुदिवस वाढत चालले आहेत. ही सगळी कामं तर आहेतच, पण तुम्हाला जास्त आनंद होईल अशीही गोष्ट सांगतो: स्वयंप्रेरणेनं आणि नव्या परिस्थितीची आव्हानं स्वीकारीत अनेक क्षेत्रांत नव्यानं प्रयोग करणारी माणसं निर्माण झाली आहेत, होताहेत. खांद्यावर कुदळ, फावडं घेणारी, बरड जमीन पिकवू पाहणारी, जंगलात मंगल आणण्यासाठी राबणारी, आणि अर्धनग्न बांधवांना एकजुटीनं अन्यावाचा प्रतिकार करायला शिकवणारी अशी माणसं तुमच्या नावाचा उच्चार करोत कीन करीत, पक्ष, पंच यांना बांधून घेवोत कीन घेवोत, किया कोणत्याही पक्षात असोत. त्यांच्या मनोमानसो, गुरुजी- तुम्ही असता. तुमची जिद्द, तुमचा हट्ट तुमची प्रतनिष्ठा 'रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग' हा तुमचा वाणा या सर्वांच्या खातून जिताजागता आहे. म्हणून तर म्हणतो की, तुम्ही गेला बाहात हासुद्धा एक भ्रमच आहे. तुम्ही आहात हे शोधायला फार लांब जायची जरूरी नाही. गावोगाव उमललेल्या कथामालांतून तुमच्या अस्तित्वाचा सुगंध आहे. समर्पित जीवनाचे आदर्श वस्तुपाठ पुढे ठेवण्याच्या सर्वांना तुमच्या आश्वासक श्वासांचा स्पर्श झालेला आहे. जिथं आंतर भारतीची ऊर्मी आहे. तिथं तुमचं प्रेमगान दुमदुमत आहे. जिथं अन्यायाचा प्रतिकार आहे तिथे तुमच्या सत्त्वशील तेजाची ठिणगी आहे.

राष्ट्राच्या उभारणीचं काम करण्यासाठी ज्यांच्या हातांवरचे पट्टे वाढताहेत तिथं तुमचा प्रेमळ हात त्यांच्या पाठीवर आहे. गंमत अशी की, कीटसपमाणे तुम्ही सुद्धा ताऱ्यांमध्ये, ट्रेनमध्ये पाना-फुलांमध्ये लहान मुलांच्या निरागस हास्यामध्ये, सृष्टीच्या लास्यामध्ये सर्वत्र आहातच. तुमच्या आईनं तुम्हाला झाडामाडांवर, पशुपक्ष्यांवर प्रेम करायला शिकवलं. गुरुजी, तुम्ही किती नि: स्वार्थी होता! तुम्ही तो वारसाही आम्हांलाच देऊन टाकला आहे. आता लोक म्हणतात की, तुमच्या जन्माचा यंदा अमृतमहोत्सव आहे. आणि यंदा तुमची पंचविसावी पुण्यतिथीही आहे. पण मी म्हणतो, तुमच्या सुंदर जीवन साधनेचा यंदा सुवर्णमहोत्सव आहे. त्या निमित्त मागायचं एवढंच की, अजून अनेक वर्ष तुमची साथ तुम्ही आम्हाला देत राहा. गुरुजी, सांगायला शरम वाटते की, स्वातंत्र्याची रजतजंयती होऊन गेली तरीही जुने प्रश्न मिटलेले नाहीत, नवी अक्राळविक्राळ संकट येत आहेत. कणखर मनानं, घामेजल्या देहानं, स्फुरणाच्या बाहूनी आणि अपराजित आत्मशक्तीनं ही सारी आव्हानं स्वीकारायची तर तुम्ही आम्हाला हवे आहात; आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्ही गेलेले आहात ही गोष्टच खोटी आहे!

(आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 24-12-74 रोजी प्रसारित)

Tags: आकाशवाणी साधना वसंत बापट साने गुरुजी Sadhana Vasant Bapat Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत बापट ( 194 लेख )

(25 जुलै इ.स. 1922- 17 सप्टेंबर इ.स. 2002)

विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट हे मराठी कवी होते.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके