डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हृदयरोगाचा झटका आपणास येऊन गेल्याची जाणीव सर्वच रुग्णांना होते, असे नाही. त्याची प्रकृती नाजूक मात्र होते! 700 रुग्णांची पाहणी केली असता बोस्टनच्या वैज्ञानिकांना गमतीदार अनुभव आले आहेत. जवळजळ एक तृतीयांश रुग्णांना याची कल्पनाच नव्हती. अनेकांना तर त्यांच्या डॉक्टरांनी अल्सर, हर्निया, अशी दुखणी असल्याचेच सांगितले होते। हृदयारोगाचा झटका आल्याचे निदान न झालेले, 45 टक्के लोक दहा वर्षांनी मृत्यू पावले, तर स्पष्ट निदान झालेल्यांचे निधन लौकर झाले-याला काय म्हणावे?

* नवा असिस्टंट? *

जपानने तयार केलेला एक नवा यंत्रमानव 150 सें. मी. उंच व 287 किलो वजनवाला भारी आदमी आहे. इमारतीची देखभाल तो करतो. जमीन पुसतो, जिने चढतो, उतरतो. वाटेतले अडथळे दूर करू शकतो, आमचे संपादक गंभीरपणे म्हणाले, मला साहाय्य करू शकणारा यं. मा. मी लवकरच शोधून काढणार आहे!

अरे बापरे!

* 'जीवनाशके' *

भोपाळच्या भीषण घटनेमुळे जंतुनाशके वापरण्यातील धोक्यांकडेही लक्ष वेधले जावे,' असे निसर्गवेत्ते डॉ. ओझा यांनी म्हटले आहे. निसर्गचक्रावर अंतुनाशकांचा किती विपरीत परिणाम होतो, हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टी दाखविल्या आहेत. मनुष्याला उपयोगी ठरणाच्या, पराग वाहून नेणाऱ्या कीटकांचाही ही जंतुनाशके नाश करतात. पक्षी, मासे, यांच्या अनेक जातीमधील पुनरुत्पत्तीवर, त्यांच्या भक्यांवर त्यांचे दुष्परिणाम होतात. जमीन सुपीक, समृद्ध करणाच्या जंतूंनाही ही नाशके सोडीत नाहीत. माणूस? त्याचे काय? डॉ. मोक्षा म्हणतात, तिसव्या जगातली 5 लक्ष माणसेही दरवर्षी या जंतुनाशकांना बळी पडतात.

* बेट कृतघ्नतेचे *

श्री. सुंदरलाल बहुगुणा यांनी काही समर्पित कार्यकत्यासह 'चिपको आंदोलन उभारले, ते बेछूट अंगलतोड करणाप्या नफेखोरांना रोखण्यासाठी. त्यांना 'वेडे गिरिबासी' ठरवून त्यांची टोपी उडविण्याचेही प्रयत्न झाले. अशा अफाट जंगलतोडीमुळे भू-विशा-निक दुष्परिणामही होत आहेत असा इषारा आता जाणते देत आहेत. 1974 मध्ये एका अमेरिकन उपग्रहाने टिपलेले पृथ्वीचे एक चित्र, हे याचे उदाहरण. 104 कि. मी. चे एक नवे बेटर हरिभंगा नदीतीरी निर्माण झाल्याचे उपग्रहाने दाखविले. हिमालयातील गाळ साचत गेल्याने हे बेट तयार झाले. जंगलतोडीमुळे राजस्थानच्या 9290 कि. मी. प्रदेशावर मारण्या वाळवंटाचे आक्रमण झाले, व आणखी 1,62,900 चौ. कि. मी. वाळवंटाने ग्रासले जात आहे, असे दिसते. या पाहणीत पुढे म्हटले आहे. मनुष्यांमधील संबंध,युद्धे, यांवरही निसर्ग-पर्यावरणाचा लक्षणीय परिणाम होतो.

* बळी- निसर्गाचे *

डायनोसॉर हे महाकाय प्राणी, पृथ्वीवरून ते काही आकस्मिक संकटामुळे अस्तंगत झाले असावेत. एकादी प्रचंड वस्तू पृथ्वीवर आवळल्याने तयार झालेल्या धुळीच्या लोटामुळे वातावरण इतके बदलले की, काही हजार वर्षामध्ये हे प्राणी नष्ट झाले. विल्यम ए.क्लेमन्स या तज्ज्ञाने म्हटले आहे. वातावरणातील असह्य बदलामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले असावे.

* प्रदूषणाची बेटे *

पॅसिफिक महासागरातल्या विकीनी बेटांवर अमेरिकेने 1940 ते 50 अनेक अणुचाचण्या केल्या. त्यामुळे ती सर्व बेटे कमालीची प्रदूषित झाली. तेथे पिकणारे अन्नही किरणोत्सर्गी असेल. त्या जमिनीचा मोठा थर खणून काढणे हा यावर उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. त्यासाठी 40 लाख अमेरिकन डॉलसं खर्च येईल,

* त्यांचा जन्म मरणासाठी? *

भूमध्य सागरातील एक मोठे बेट, सायप्रस. युरोपातील पश्चिमेच्या इंग्लंडपासून पूर्वेस कास्पियन सागरापर्यंतचे, तसेच मध्य आफ्रिकेतील प्रचंड सरोवररांपासून इथिओपिया पर्यंतच्या प्रदेशातील पक्षी वार्षिक स्थलांतर करताना सायप्रस बेटावर उतरतात. गलक कॅप' हा त्यांमधील एक चिमुकला पक्षी. खाणाऱ्याचा आवडता. या सर्व पक्ष्यांचा प्रचंड संहार तेथे होतो. 1968 पर्यंत ही संख्या 50 लाख (फक्त) होती; पुढे उत्तम दर्जाची 10-12 मीटर लांबीची जाळी वापरात आली, आणि पकडल्या जाणांच्या पक्ष्यांची संख्या 2 कोटींवर गेली. पक्षीसंरक्षण संस्थांनी ओरड केली, पण सरकारने उलट हया जाळ्यांची आयात वाढविली. आता मात्र स्कैंडिनेव्हियन देश व पश्चिम जर्मन प्रवाशांनी या कारणासाठी सायप्रसवर बहिष्कार घालण्याचा इषारा दिला आहे. त्यांचे भले होवो!

* यावर संशोधन हवे! *

राज्यपालांनी अभयारण्यात सोडलेल्या हरणांची राखणदारांच्या खाजगी भांडणातून हत्या होण्याच्या एका घटनेनंतरची ही दुसरी. मुंबई-पुणे रस्त्यावरील कांबरे येथे जमावाने एका सांबरास पाठलाग करून ठेचून मारले. दुर्मिळ प्राण्यांच्या मांसाच्या लोभानेच हे घडले, असे जाणते सांगतात. या लोकांना अडविणाऱ्या वनाधिकान्याला दमदाटी करण्यात आली. (भागले तेवध्यावर!) 'यामध्ये संशोधन करण्याजोगा एक मुद्दा आहे,' एक तज्ञ कळवळून म्हणाले, आमच्या टी. व्ही.. वर, रेडिओवर चित्रपट संगीताची, दृश्यांची लयलूट चालते- त्यावर रवींद्र नाथांच्या रचना; ट्रॅफिकचे नियम; अशा वन्य जीवांच्या रक्षणाची जाणीव- असे काही का शिकवीत नाहीत?'

* धक्कादायक *

हृदयरोगाचा झटका आपणास येऊन गेल्याची जाणीव सर्वच रुग्णांना होते, असे नाही. त्याची प्रकृती नाजूक मात्र होते! 700 रुग्णांची पाहणी केली असता बोस्टनच्या वैज्ञानिकांना गमतीदार अनुभव आले आहेत. जवळजळ एक तृतीयांश रुग्णांना याची कल्पनाच नव्हती. अनेकांना तर त्यांच्या डॉक्टरांनी अल्सर, हर्निया, अशी दुखणी असल्याचेच सांगितले होते। हृदयारोगाचा झटका आल्याचे निदान न झालेले, 45 टक्के लोक दहा वर्षांनी मृत्यू पावले, तर स्पष्ट निदान झालेल्यांचे निधन लौकर झाले-याला काय म्हणावे?

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके