डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक अनोखी संस्था : वॉन्टेड-वात्सल्य श्रीवत्स!

...

1973 मध्ये स्थापन झालेली एक संस्था. आज तिची मोठी वाढ झालेली आहे; पण इतक्या वेळा निरनिराळ्या कामांनिमित्त ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन देखील या संस्थेची माहिती कशी ती नव्हती. एका योगायोगाने ही संस्था ठाऊक झाली आणि जास्तीत जास्त वाचकांना तिचा परिचय करून द्यावा असे वाटले. 1964 मध्ये ससून मित्रमंडळाची स्थापना झाली. त्यानंतर विवाहबाह्य संबंधातून जन्मल्यामुळे टाकून दिलेल्या अनाथ किंवा पोलिसांना वगैरे सापडलेल्या बालकांना संगोपन लाभावं अशा कल्पनेतून 'श्रीवत्स'चा जन्म झाला, ससुनने त्यांना जागा दिली. आजही श्रीवत्स त्याच जागेत आहे. आज तिथे जवळ जवळ पन्नास मुलं आहेत, त्यांचं संगोपन, वैद्यकीय उपचार वगैरे ‘श्रीवत्स'तर्फे केले जातात. ही मुलं भारतीय विदेशी जोडप्यांना दत्तक दिली जातात. क्वचित काही मुलांना तात्पुरतं एखाद्या कुटुंबात (फॉस्टर फॅमिली) ठेवण्याची सोय केली जाते.

श्रीवत्सच्या काही मुलांची सॅलिस्बरी पार्कमधल्या सेव्हन्थ डे अ‍ॅडव्हेन्टिस्ट फॉस्टर केअर येथेदेखील सोय केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट यांची या संस्थेत मान्यता मिळालेली आहे. खेरीज समाजकल्याण खात्याकडून प्रत्येक वीस मुलांमागे एका तिमाहीस रु. 6000 पर्यंत अनुदान मिळते. परंतु संस्थेतील प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची संख्या, वाढती महागाई इ. गोष्टींचा विचार करता हे अनुदान पुरत नाही. श्रीवत्सला त्यामुळे खाजगी देणगीदारांना आवाहन करावे लागते. श्रीवत्समधील मुलांची वाढती संख्या लक्षात घेता वेगळी इमारतदेखील आवश्यक आहे. पण यासाठी लोकांकडून उत्स्फूर्त देणग्यांची गरज आहे. या देणग्या केवळ द्रव्य स्वरूपातच नव्हे तर खेळणी, खाऊ या स्वरूपांतदेखील स्वीकारल्या जातात. वात्सल्याला पारखी झालेली ही मुले... यांच्यासाठी यथाशक्ती मदत केली, तर तिचा आनंदाने, आनंदासाठी स्वीकार होईल. (इन्कमटॅक्स अ‍ॅक्टच्या 80 जी या कलमान्वये श्रीवत्सला दिलेल्या देणगीवर आयकर माफ होऊ शकतो.)

Tags: वात्सल्याला पारखी झालेली मुले अर्बन डेव्हलपमेंट अॅन्ड पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट -विजय तरवडे वॉन्टेड-वात्सल्य श्रीवत्स Vatsalya's children Urban Development and Public Health Department -Vijay Tarwade #Wanted-Vatsalya Shrivats weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके